अमीर फोर्ट (राजस्थान) येथील शीश महल मध्ये पाहण्यात आलेले जरा हटके चित्र …
हसणाऱ्या सिंहाचे हे चित्र माझे लक्ष वेधून घेऊन गेले…
आणि ते कॅमेरात कटीबद्ध करावेसे वाटले…
हे पाहताना मला जाणवले फार पूर्वापार अशी व्यंगचित्रकला असावीच आणि ती साकारणारे कलाकारही…
अख्खा खांब अगदी बारीक बारीक नक्षीकाम करून त्यावर त्याच पद्धतीने सुंदर काचेचे तुकडे जोडून मंत्रमुग्ध करणारी लयकारातील नक्षी साकारल्यावर खांबाच्या अगदी पायथ्याला हा असा हसणारा वनराज! का बरे असे केले असेल त्याने! मनात दिवसभराचे काम संपल्याचा आनंद तर कलाकाराने व्यक्त केला नसेल चित्राच्या माध्यमातून….
हो नाहीतर सिंह हसतोय ही कल्पनाच गंमतशीर आणि ते चित्रातून प्रकट करणे तेही एवढ्या भव्य दिव्य वास्तू मधील खांबावर… मनात येत आहे कसा असेल बरं तो कलाकार! काय असेल त्याच्या मनात! अख्खा दिवस मनमोहक चित्रे रंगवून मनामध्ये वनराज ही आपली ही कलाकृती पाहण्यासाठी आला आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर ही आपण साकारलेली सुंदर कलाकृती पाहून हास्य उमटले आहे अशी कल्पना करून त्याने शेवटच्या क्षणी कुंचला ठेवताना रेखाटले असावे..
होते विसंगत पण मला आवडून गेले…