शब्द भावना दाटल्या,
काहूर माजले अंतरंगी!
सोडून गेली काया ,
लताचे सूर राहिले जगी!
स्वर लता होती ती ,
दीनानाथांची कन्या !
सूर संगत घेऊन आली,
या पृथ्वीतलावर गाण्या!
जरी अटल सत्य होते,
जन्म-मृत्यूचे चक्र !
परी मनास उमजेना,
कशी आली मृत्यूची हाक!
जगी येणारा प्रत्येक,
घेऊन येई जीवनरेषा!
त्या जन्ममृत्यूच्या मध्ये,
आंदोलती आशा- निराशा!
मृत्यूचा अटळ तो घाला,
कधी नकळत घाव घाली!
कृतार्थ जीवन जगता जगता,
अलगद तो उचलून नेई !