गतसालाच्या आठवणींची,
सुंदर अन् रंगीत कमान !
डोळ्यापुढती बघताना ती,
मनीचे माझ्या हरपले भान!
गतसालाच्या खुणा उमटल्या,
देई उजाळा आठवणीना !
कसे वर्ष गेले काही न कळले,
आठवता त्या मधुर क्षणांना!
मेळ घातला लेखिका सख्यांचा,
वेगवेगळ्या उत्सव निमित्ताने!
नवीन काही मला गवसले,
मन भरले त्या आनंदाने!
काव्य, कथा अन् ललीत लेखन,
अधिकच माझ्या मना भावले!
साहित्याच्या नवनवीन रंगी,
मन माझे हे गुंतून गेले !
अखंड राहो आपली मैत्री,
सर्व सख्यांच्या प्रेम ज्योती!
व्हाट्सअपच्या माध्यमातूनही,
जुळली आपली प्रेमळ नाती!
निरोप देऊ या सरत्या वर्षाला,
स्वागत करू या नववर्षाचे !
आनंदाचे, सौहार्दाचे वर्ष आले,
दिवस येऊ द्या भाग्याचे !