एकदा मी स्वप्नात देवाला विचारले………“तु चांगल्या माणसांनाच का लवकर घेवुन
जातोस रे ???”
देव हसला आणि म्हणाला, “मला जी माणसं खुप आवडतात नं त्यांना या पृथ्वीवर मी जास्त वेळ ठेवत नाही…”
मी म्हणाले….“याचा अर्थ, मी तुला आवडत नाही कां ???” देव म्हणाला, “तसं नाही गं ! तु पण तुझ्या साधेपणामुळे प्रेमळपणामुळे मला खुप
आवडतेस !”
नक्की …? मी म्हणाले. हो गं … नक्की. देव म्हणाला. “मग मी या पृथ्वीवर अजुन कशी आहे???” मी विचारलं .
देव प्रसन्न हसला आणि म्हणाला, “तु पृथ्वीवर आहेस कारण….
.
.
.
.
.
माझ्या पेक्षाही कुणालातरी तू जास्त आवडतेस म्हणुन …..