दहा दिवसांचा पाहुणचार घेऊन बाप्पा निघाले.
जड मनाने निरोप देताना मनाबरोबर पायही जडावलेले.
बाप्पाला निरोप देऊन सगळे परतले;
अन थोड्याच वेळात दहा दिवसांत श्रमलेल्या…
दमलेल्या गलितगात्र शरीरास बिछान्यात झोकून दिलं सगळ्यांनी. आणि मी ?…
मी मात्र जीवनाच्या पाटावर अजून बसलोय. विषण्ण गलितगात्रांसह. . .
विसर्जनाची वाट बघत….