दुष्ट बुद्धी दुराचार
विकृतीचा पुतळा तो
तुंबळ युद्ध देवांशी
बाण वर्षा करी तो….१
महिषासुर..त्या सामोरी
मूर्त सुरांच्या तेजांची
सिद्ध सिंहावरी सवार
दुर्गा अष्ट भुजांची….२
देवी दुर्गा पराक्रमी
महिषासुरा मर्दिले
देवांचा जय देखोनी
जयजयकारे नभ भरले….३
दुष्टांचे निर्दालनही
रक्षण केले सुजनांचे
पराभूत वृत्ती असुरी
विजय सत्त्य नी नीतीचे….४
परंपरा ही विजयाची
आजही असत्त्य अन्यायी
पहा हारती सर्वत्र
सत्य जिंकते ही ग्वाही….५
सीमोल्लंघन आजला
नव विचारे ही प्रगती
विजयादशमी!विजयाचा
सत्याचा ध्वज घ्या हाती….६
खूप छान कविता