जन्मा सवे येते मैत्री,
नात्यांच्या विणीतुनी,
सम विचारधारेतुनी,
कधी शत्रू मैत्री,
कधी विशुद्ध मैत्री.
मैत्री कधी ठरवून का होते?
मैत्री ला वयाचे बंधन नसते.
मैत्री दिनी काव्य करायचे,
मैत्री वरच बोलायचे.
मैत्री तर अखंड वाहणारा निर्मळ झरा…..
जिथे मिळतो आनंदाचा निखळ सहारा……
मैत्री असावी जन्मजन्मांतरी ची,
मैत्री खरी संकट घडीला टिकणारी,
मैत्री असावी आश्वस्त शब्दांची,
बालवयी जरी पांगलो,
यौवनात जरी दूर गेलो,
वृद्धत्वी जरी निजधामी गेलो,
मागे राहिलेल्या मैत्रेयाला आठव असणारी…..