जगतच असते मी नातेसंबंधाना जोपासत, गोंजारत
कधी नीरसपणे, कधी उत्कटतेनेही
असते कधी मुलगी, कधी पत्नी कधी ताई आणि कधी आई देखील
त्या त्या भूमिका सांभाळत बोलतै देखील सर्वांशी,
ऐकतो नवरा तेव्हा बायको काय म्हणतेय ते, मुल ही ऐकतात आई काय म्हणतेय,
पण जेव्हा तू विचारतोस, काय चाललय तूझं, तेव्हा विचारात पडते मी!
कारण तेव्हा कळत मला, मी काही केवळ मु्लगी
पत्नी ,आई आणि ताईच नाहीये मी
ही “मी’ सूद्धा आहेच की आणि मी,शोधायला लागते
स्वतःला अशा रस्त्यावरुन जो शेवटी पोहचतो तुझ्यापर्यंत
मग विश्वासते तुझ्यावर स्वत्व सांभाळत माझं !
तेव्हा विचारतोस तू तुझ्या माझ्यातलं नातं ?
आता कसं सांगू तुला ?
सगळ्याच नात्यांना नावं द्यायची नसतात ते,
तुला कधी कळेल का हे ?