कांही कांही शब्द लहानपणी किती निरागस कोमल मृदू होतें आणि आतां त्यांचेच अर्थ, संदर्भ किती बदलत गेले;
असं आताशा
फार जाणवतं!
अफगाण स्नो स्वच्छ पांढरा, थोडीशी चमक असलेला आणि त्याचा गार गार स्पर्श!!
निळ्या काचेच्या बाटलीत प्रत्येक मध्यम वर्गीय घरातलं सर्वमान्य कॉस्मेटिक!!
तीन ड्रॉवर असलेलं, वरती मोठा आरसा असलेलं एक टेबल;
त्यावर उटी चंदन पावडर, दरबार गंध आणि हीं दणदणीत अफगाण स्नो काचेची ची बाटली!! बर्फ़ाच्या डोंगरांचे चित्र मिरवणारी!!
स्वच्छ तोंड धुवून याचे चार ठिपके चेहऱ्यावर लागलें कीं एकदम ताजेतवाने!
जणू साठीच्या दशकातील ग्लो अँड लव्हली!!
आणि
अफगाणचें प्रसिध्द ड्राय फ्रुटस!!
अक्रोड आणि बेदाणे!!
रवींद्रनाथ टागोर आणि बलराज सहानी यांचा घराघरात पोहोचलेला काबुलीवाला
तरुणपणी फिरताना आवडीचं ठिकाण
नेव्ही नगर परिसर आणि तिथेच असलेलं अफगाण युद्धाची स्मृतीं जपणारं अफगाण चर्च!!
आतां
आतां
आज अफगाणिस्तान शब्दाचा अर्थच दहशतवाद असावा अशी भावना आहें आपली.
काय काय ऐकू येतंय !
काय काय दिसतंय!
कुठे हरवले तें सरळ सोपे दिवस?
कुठे सापडेल तो काबुली वाला?
सापडेल का खरंच?
पुन्हा म्हणेल एकदा तरी—–
ए मेरे प्यारे वतन
ए मेरे बिछडे चमन
तुझपे दिल कुर्बान
तूं हीं मेरी आरजू
तूं हीं मेरी आबरु
तूं हीं मेरी जान