आलास तु परतूनी बाळा…
जाऊनिया दूर मानव देशी !
वारूनी दुःखे, सुखवायां सकळा..
लाडक्या,नित्य किती कष्टशी !!
तुझ्या दर्शने गणेशा, होती..
यातना जनांच्या बोलक्या !
महिमा तव कृपेचा रे किती..
वेदना साऱ्या होती हलक्या !!
ते भक्त तिथे हर्षिती किती..
जाणूनी..आम्ही, विरह तुझा साहतो !
काळाची थबकली वाटे गती…
आणूनी नेत्री प्राण,वाट तुझी पाहतो !