आई-वडिलांचं छत्र होतं डोक्यावर तोवर आपले हट्ट पुरवून घेण्याचा पिळ होता..
जबाबदारी खांद्यावर आली तेव्हा कर्तव्यबुद्धीचा पिळ होता..
मुलांना त्यांच्या आवडीनुसार वाढू देण्यासाठी
कधी-कधी स्वतःच्या मतांना घातलेली मुरडही होती..
वार्धक्याकडे कूच करताना मात्र त्याने ठरवलं आता सगळेच पिळ सोडायचे
आणि फक्त मुळांसारखा आधार बनून रहायचं..
फळं-फुलं-पक्षी अंगावर खेळवत
आणि खोल-खोल जाणिवा रुजवत..