निसर्ग किमयागार अफलातून
नयनरम्य दृष्यांनी ठेवतो खिळवून
कधीतरी देतो अद्वैताचे भान
मूकजीवांना कधी चरण्यास रान
हिरव्यागार कुरणांनी धरतीला सजवी
परोपकाराची भाषा तो शिकवी
मातीचा गंध ..लावी ध्यास सृजनाचा
आधारही मोठा तोच मानवाचा
याच्या असीमतेला सीमा नाही
विजयादशमीचे सोने भरभरुन वाही
फुलवतो बघा कसा हा कट्टा सराफाचा
सजवून कंठ आपला मिरवतो दसऱ्याचा