दीप मनीचा तेवता तो
झाकुनी ठेवू नको
जे दिल्याने वाढते ते
राखुनी ठेवू नको
दीप मनीचा…१…
पेटले जे भोवती ते
फक्त तू पाहू नको
धाव घेई शांतवाया
मागे कधी राहू नको
दीप मनीचा…२…
दु.खितांना हात दे तू
कष्टता लाजू नको
अंतरीचा तो उमाळा
मारुनी राहू नको
दीप मनीचा…३…
वरद हस्ते लाभले ते
एकला भोगू नको
लक्ष हस्ते दे समाजा
थोरवी सांगू नको
बा मना विसरु नको