तिळगुळ घेऊन गोड बोलुनी
जिंकून घ्यावे मन साऱ्यांचे
संक्रांत केवळ निमित्त असावे
व्रत असू द्यावे हे आयुष्यभराचे
कुणास टोचू नये काटे
हलव्यासारखे हसत रहावे
कोणी टोचले जरी काटे
आपण हास्यच फुलवत रहावे
हलवा- तिळगुळ देऊन कधी
कटुता मनातली जात नसते
बोल प्रेमाचे द्यावे घ्यावे
आनंदाचे वाण लुटावे नुसते
हाच खरा तिळगुळ समजावा
गोड बोलणं सोडू नका
काहीही झालं तरी यापुढे
घेतला वसा टाकू नका