डोळ्यासमोरचं अविश्वसनीय चित्र…. आप्तेष्ट, मित्र सगळ्यांची धावपळ. कानावर मौलवी साहेबांचे गंभीर आवाजातले कुराण पठण आणि समोर एक पडदा. त्यामागे सेहऱ्यातला लाजरा चौदवी के चांद सा मासूम मुखडा.… मेरे मेहबूब का … वल्लाह … क्या हसीन शाम थी वो. इतक्यात अचानक समोर धाडकन काहीतरी आपटल्याचा आवाज आला आणि डोळ्यासमोरचं सगळं नाहीसं झालं. क्षणभर काहीच उमजेना. कळतच नव्हतं काय झालं आणि मी कुठे आहे तो.
अरे… हे काय…! इतके लोक कां जमलेत? ओळखीचे तर सगळेच होते. आप्तेष्ट आणि मित्र सुद्धा. पण हे सगळे इतके गंभीर आणि दुःखी चेहरे घेऊन का वावरतायत …? मला कुठे घेऊन चाललेत ? कानावर काही अस्फुटसं पडत होतं. परवरदिगार … या अल्लाह… यह क्या हुआ? गलती किसकी और सजा के हकदार कौन …? इतने जिंदादिल लडके कां कसूर क्या था ..? बस, उस लडकी से इश्क किया था. इतने बेदर्दीसे इस बच्चे के प्यार को ठुकराकर वह तो चली गयी और इसे भेज दिया कब्रस्तान के रास्ते पर…
मला काहीच कळत नव्हतं. कळणार तरी कसं …? डोळ्यापुढे अंधार आणि सोबतीला मातीचा वास. किती वेळ गेला कोण जाणे. अचानक पैंजणांचा ओळखीचा आवाज आणि मेहंदीचा सुगंध जाणवला. होय…तीच ती …!! बंद आंखो से पहचाना मैने … कैसा भूलता मैं ? आज मेरा इष्क मेरे ही कब्रपर फूलों की चद्दर लेके आया था. मेरे मरने के बाद … मेरे लिये दुआ मांगने और वह भी अपने हमसफर के साथ… या अल्लाह… मेरे आका …मेरे परवरदिगार… यह कैसा इन्साफ है तेरा… ?? मैं अंदर ही अंदर तडपता रह गया … जलता रहा मेरे हसीन सपनों के साथ…
कम्बख्त… कौन कहता है की दफ़नाने के बाद, जलाया नही जाता…