अक्षय तृतीयेचा अक्षय ठेवा..
आईची आठवण..
नाही नजरेसमोर, नाही कधी भेटणार..
अक्षय तिचे माझ्यात असलेले
तिचे गुण ही साठवण..
नाही कधी तिची बरोबरी होणार..
अवगुणांची खाण मी, ती माझी हिऱ्याचे कोंदण…
किती आठव तुझे करावे,
तुझ्याविना सारे सहावे…
तुटले बंध संपून गेले माहेरपण..
माहेर या शब्दास मुकले..
अंतरी पायीचे घुंगुरवाळे,
माहेरच्या आठवणीत लडिवाळे नादावत राहिले…
वेणीत माळलेला मोगऱ्याचा गजरा सुकोनी गेला..
भिजल्या नयनी अश्रू ओघळले..
सणासुदीला पावडर कुंकू काजळ नटवून रुपडे अपुले..
आई मी कशी दिसते?😥
तिच्या डोळ्यातले अपार प्रेम अप्सरेस ही लाजवून गेले…
आई तुझे नसणे पदोपदी मनास समजावून गेले…
तेवढ्याच उत्कटतेने तुझ्या आठवणीत मन रमून गेले..
गढूळलेले थकले मन फिरून प्रफुल्लित होऊन गेले…
हे आई चैतन्याच्या खाणी
तुझ्या सवे जगायचे अजून राहून गेले….