आली ग गौराई,
नटून सजून !
पायात पैंजण,
सोन्याचे घालून!
गौरीचे पाऊल,
येई उंबऱ्यात !
औक्षण केले हो,
घंटेच्या गजरात !
गौरीची पाऊले,
सोन्याची सोन्याची!
अक्षय समृद्धी,
धनाची, धान्याची !
इथे काय आहे?
उदंड उदंड !
वावर तिचा हो,
अखंड अखंड !
समृद्धी घेऊनी,
सौभाग्य लेऊनी!
नांदाया घरात !
आली सुवासिनी!
गणेश गौरीची,
सजावट केली !
बहिण न् भाऊ,
सौख्यांत भेटली !
PC to Shri Ketan Kulkarni..Thanks..
Dhanywad