फक्त आजच मातेची आठवण काढण्यास,
मन माझे धजावत नाही…
तीच तर आहे माझ्या ठाई ठाई…
तिनेच दिले जगण्याचे धडे,
आणि भरले ज्ञाना मृताचे घडे…
दृष्टीआड जरी तू जहालीस,
क्षणाक्षणाच्या आनंदी जगण्याची,
किमया तूच साध्य करुनी दिलीस….
दिलेस प्रेम आत्मा तव रिता करून…
उतराई नच होणार तुझी,
जीवन जरी गेले सरून….
![](https://i0.wp.com/aspiringviibes.com/wp-content/uploads/2022/05/Supriya-mothers-day.jpeg?fit=850%2C567&ssl=1)