बरसाव्या जलधारा
जणू कlही या अमृतधारा
पाण्याविना सारे शुष्क
चार सरीही देती अपार सुख
मेघ दाटता मोर नाचती
कडाडत्या विजा चमचम करती
पाऊस येता मंडूक डर्रावती
चातकही ते सुखावून जाती
हिरव्या शालूने नटू दे धरती
चिंब भिजू दे हिरवी पाती
मनांत दाटावी ओली प्रिती
अमृतधारांची किती ही महती