गौरीच्या नंदना l तू गजवदना l
सुखवी सर्वांना l दर्शनाने ll….१
पोटाचे हे दोंद l तिथे रुळे सोंड l
नाव वक्रतुंड l गजानना ll….२
मोदक प्रीय तूl लाडू आवडतो l
मोद तो मिळतो lआस्वादाने ll…३
वाहन तुझे ते lसान मूषकाचे l
शोभिवंत साचे l दिसे जनी ll…४
सुंदर गुणांचा l बुद्धीचा तू दाता l
प्रीयच जगता l तुझी मूर्ती ll….५
येतोस या जगी l देतोस आनंद l
आनंदाचा कंद l गणराय ll…६
गजानना तुझे l रुप मनोहर l
तू तारणहार l भक्तप्रिय ll…७
आगमन तुझे l मोद देई सर्वा l
आनंदाचा ठेवा l जनांसाठी ll..८