स्त्रीदिन का पुरुष दिन
राहुल लाळे
मीही छान थोपवतो
मनातली वादळे
…शांतपणे सांभाळतो
वेदनांची काहुरे
डोळ्यांतलं पाणी, आणि
श्वासातला हुंदका
दाखवतेस तू
अन् लपवतो मी
वाटेतील संकटं
अपार काळज्या….
बऱ्याच तुलाही,
अन अनेक मलाही
अस्वस्थ मन
दडवतो मी
अंतरीच्या व्यथा
उच्चारतेस तू
व्यक्ततेची भावना तुझी
शिकायचीय मला
तीच लपवायची जागा माझी,
शोधशील नक्कीच तूही
तळपते ऊन
झोडपणारा पाऊस
पोळवतो मलाही
भिजवतो तुलाही
मी कायम तुझ्याचसाठी
तुझ्यातील तुला
धीर देण्यासाठी !
तू सदा माझ्याचसाठी
माझ्यातल्या मला सावरण्यासाठी
तसाच आजचा दिवस…
अन् येणारा प्रत्येक दिवसही
माझा ही….
आणि तुझाही