भावाला सुट्टी नसल्याने रात्रभर खपून त्याला आवडतात म्हणून ओल्या नारळाच्या करंज्या डबा भर करून घेऊन अति आनंदाने ती भावाकडे जायला निघाली, मुलांना आणि नवऱ्याला सांगितले जेवायच्या वेळेपर्यंत येते, लगेच राखी बांधून. असे म्हणून लगबगीने आनंद तरंगात निघाली…. लक्षात आले तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती, अर्धवट ग्लानीत, दादाs … राखी…. करंज्या…. असे म्हटले आणि परत भानावर येऊन डोळे उघडून पाहिले. तिचा नवरा व मुले अवतीभवती दिसली आणि बाजूच्या कॉटवर तिचा दादा सलाईन ड्रीप लावून झोपलेला दिसला! ती धडपडून मी इथे कशी म्हणून उठू लागली…. पण तिच्या पायात जोरात कळ आली आणि ती रडू लागली, नवऱ्याने सांगितले तुला जाताना एक्सीडेंट झाला, पाय फॅक्चर.. खूपच रक्त वाहून गेले…. रक्ताची तात्काळ गरज होती… दादानेच रक्त दिले….. त्यांना अशक्तपणा आल्यामुळे सलाईन लावली होती…. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले…. तेवढ्यात भाऊ उठून तिच्या जवळ आला, आणि डोक्यावरून हात फिरवून म्हणाला पुढच्या आठवड्यात उड्या मारायला टुणटुणीत होशील… ती हसली…. मुलीने तिच्या हातात राखी दिली आणि तिने भावाच्या मनगटाला पडल्यापडल्याच राखी बांधली., आणी म्हणाली हे माझे अमूल्य रक्षाबंधन…. भाऊराया ❤️❤️ अजून काही नको 🙏 तुझे माझे अखंड बंधन असेच राहू दे ! आनंदाश्रुच्या महापुरात सारे कुटुंब अधिक मजबूत धाग्यात बांधले गेले……
Category: Short Story
विषवेल
दूध उकळायला ठेवून ती तिथेच उभी होती. विचारात गुरफटली होती. मैत्रिणीचे बोल तीला आठवत होते, “तूझ्या प्रत्येक गोष्टीत जर नवरा दोष काढत असेल तर समजून जा..तो बाहेर कुठे तरी गुंतलाय !”असं खरंच असेल का..आपलं ध्यान खरंच असं असेल ? या विचारानं तीला हसू देखील आलं.अन् ती समोर असताना दूध ऊतू गेलं.समोर दूध ऊतू जात असताना हीच्या चेह-यावर हसू पाहून नवरा जोरात ओरडला. त्या ओरड्यानं तीचा संशय बळावला तर तीच्या हसण्यानं याचा !कारण याला सुद्धा कुणीतरी बायकोच्या उगाचच हसण्याचं भलतंच कारण सांगितलं होतं.
प्रश्न
एक थर वाहतोय ज्वालामुखी रसाचासापडत नाहीय त्याला बाहेर पडण्याचा मार्गआतल्या आतच मुरवायचंय त्याला सारंकसं तेच कळेनासं झालंय कारण हे सांगायला तरी बाहेर पडावं लागणारचमग घेईल का कोण ही ऊब चोरुनस्वत्वाची…तत्वांची…विचार लाटांचीही भीती त्या ज्वालामुखीपेक्षा दाहक आपण असे नव्हतो…मग असं का घडलं…याच फे-यात अडकलाय मेंदूगुडगाभर पाण्यातच बुडण्याची भीती वाटतेयसमुद्राचा गहिरेपणा पहायची इच्छा नव्हतीच असं नाहीपण काठावरच समाधान मानायचं हे बाळकडू आडवं येतं वाटतं कधीकधी बेभानपणे जगावं…घेतला निर्णय तडिस न्यावाउधळावं चैतन्य सख्यावर..जीवलगावरपण मग इतर जीवलगांची जाणीव माघारी ओढतेपुसट होतात स्वतःच्या इच्छा..अपेक्षाहे आपलं प्रारब्धच आहेया जुन्याच अन् पारंपारिक कारणाचा आधार मिळतोअन् शिळं होऊन जातं एक आयुष्य