Category: Short Story
” सत्य का ज्ञान ” – भाग ३१
” अंधकार “
भाग – २९
पैसा तेरा मोल कैसा
अपनी बीबी के लिये उसने रास्ते मे खडी उस औरतसे कुछ फूल खरीद लिये| जेब मे पचास रुपये का एक पुराना नोट था| कल से किसी ना किसीको देने की कोशिश कर रहा था | वो ही नोट निकाल कर उसने उस औरत के हाथ मे थमा दिया| कल रातसे उस फुल वाली के बच्चे को बुखार था| डाॅक्टर के पास जाने के लिये पैसे नही थे| सामने दवाईकी दुकान से छोटसा बोतल लेकर उसे पिला दू, तो हमेशा कि तरह बुखार निकल जायेगा ऐसा सोच रही थी वो| गोदके बच्चे का बुखार बढ रहा महसूस हो रहा था| ये सब फूल जितनी जल्दी बिक गये तो जाकर दवा ले लुंगी| बस और बीस रूपिये के फुल बिक गये तो जल्द ही इधरसे निकलूंगी| उसने चुपचाप वो नोट ले लिया| नसीबसे और भी कोई आ गया| बचे हुए फूलो की किमत ३० रुपयेसे कम नही थी, फिरभी बीस मे दे दिये उसने| हात मे नोट लिये दवाई के दुकान मे पहुंची| वो भी अपनी नन्ही परी के लिये बच्चो का खास साबून लेने उसी दुकान मे जा रहा था, तब वो औरत हाथ मे फटे पुराने नोट लिये दुकानसे बाहर निकल रही थी| दुकान मे काम करनेवाले एक दुसरे से बात कर रहे थे, ” कैसे दे दवाई इन फटी पुरानी नोट के बदले? लोग भी ना जाने कैसे इनके हाथ इतना फटा पुराना नोट थमा दे देते है? “ ३ साबुन का एक पॅक खरीदकर वो बाहर निकला | देखा तो सिग्नल पर वो औरत अपने रोते हुए बच्चे शांत कर रही थी और “अपनी आखोंके अंगार को अपनेही आंसूसे बुझानेकी कोशिश कर रही थी| उस औरत के आसूंकी बाढ मे उसने अपने अहंकार को बहते देख वो वही पर सुन्न रह गया| रुपिया छोडो, एक नोट का मोलभी हर एक के लिये अलग – अलग ही होता है|
दान …
“ दे … दान … सुटे गिरानं …!! रस्त्यावर उभ्या असलेल्या एका बाईच्या तोंडून अशी खणखणीत हाळी ऐकू आली आणि मागोमाग आईचा आवाज कानावर आला … “अमु …जा रे …! त्या बाईंना ह्या सुपात ठेवलंय ते देऊन ये..” मी गुमान उठलो आणि सूप घेऊन बाहेर आलो. ती बाई कडेवर छोटंसं मूल आणि डोक्यावर परफेक्ट बॅलन्सड केलेली टोपली घेऊन दोन पावलं पुढं आली. मी त्या सुपातलं सगळं तिच्या ओटीत घातलं आणि वळणार इतक्यात ती बाई हात जोडून म्हणाली, “ दादा , पोर सकाळ पास्न उपाशी हाय. वाईच थोडं दूध मिळंल का? “ आरं भाऊ, हे गिरान सुटपातूर कोनी बी खायला दिलं नाय बग.” मी तिला हातानेच थांबायची खूण केली. आत जाऊन ग्लासभर दूध घेऊन बाहेर आलो. त्या बाळाने आणलेले दूध घटघट पिऊन टाकलं आणि तो लहानगा जीव शांत झाला. त्या बाईच्या डोळ्यांत कमालीचं ओशाळलेपण होतं आणि माझ्या… ??? घरात आलो तर आईचा चेहरा रागाने लाल झालेला. मला कळेना कीं काय चुकलं ते ? एक होतं … आईला न विचारता मी दूध नेऊन बाळाला दिलं होतं. आईकडे प्रश्नार्थक नजरेने पाहात असताना आई म्हणाली “ तू दूध नेऊन दिलंस त्याचं मला काहीच वाटलं नाही. उलट तुझ्या ह्या कृतीने मला आनंदच झाला. पण…? “ आता मात्र मी गोंधळलो. पण ? नक्कीच काहीतरी चुकलं होतं. “ पण काय आई..? मी दूध तुला सांगून द्यायला हवं होतं का?” आई काही बोलेल म्हणून मी तिच्याकडे नजर टाकली. आता तिच्या डोळ्यांत रागाच्या ऐवजी एक वेगळीच चमक होती. माझा हात धरून ती उद्गारली… “ बस इथे.” एक क्षण थांबून ती पुढे म्हणाली ..” अमित, तू दूध देताना मी पहात होते. ती भिक्षा मागायला आलेली बाई लाचार नसली तरी अगतिक मात्र नक्कीच होती. तिच्या डोळ्यांत तू देत असलेलं दान घेताना मला अगतिकता दिसली आणि तुझ्या डोळ्यांत दानशूरतेचा अहंभाव. मी म्हणजे किती मोठा दाता आणि ती घेणारी बाई… ती तर फक्त याचक??? अमित… दुधाचं दान करतेवेळी तुझ्या चेहऱ्यावर मला उन्मत्तपणाचा भाव दिसला. मी म्हणजे कोण..? आज माझ्यामुळेच त्या बाईच्या मुलाला दूध मिळालं असा गर्व दिसत होता तुझ्या अंगोपांगी. अमु, अरे जरा महारथी कर्णाला आठव.अजूनही त्याच्यासारखा श्रेष्ठ दाता झाला नाही आणि ह्या जगाच्या अंतापर्यंत होणारही नाही. कधीच नाही. अरे त्या दानश्रेष्ठ कर्णाकडून दान स्वीकारताना याचकसुद्धा स्वतःला भाग्यवान समजायचा.” आई बोलून शांतपणे उठून आत गेली. मी शून्यावस्थेत तिथेच बसलो होतो. आईने अचूक घाव घातला होता…थेट वर्मावरच. क्षणात आठवला तो कर्ण … अंगराज कर्ण. त्याहीपेक्षा मित्रत्वाचं अमूल्य असं दान दुर्योधनाच्या पदरात टाकून आपल्या मृत्यूपर्यंत निभावून नेणारा चिरंजीव मित्र. एकदा दान दिल्यावर काय दिलं आणि त्यात आपला फायदा काय ह्याचा क्षणमात्रही विचार मनात न आणणारा महान… उत्तुंग… दिलदार आणि सच्चा वीरदाता. स्वतःच्या मृत्यूचेही दान प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या ओंजळीत आपल्या अंग- कवचाच्या रूपाने देणारा अतुल्य श्रेष्ठ दाता. अख्ख कर्णायन डोळ्यासमोरून सरकलं आणि अचानक डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आठवलं … कर्ण दान देत असताना ते घेणाऱ्या त्या याचकाकडे कधीही पहात नसे. आपली दृष्टी जमिनीकडे स्थिर ठेवून कर्ण दानधर्म करीत असे. हृदयात केवळ एकच भाव… मी दान करीत असताना त्या याचकाच्या नजरेतला अगतिकतेचा ओशाळेपणा न दिसावा आणि माझ्या नजरेत दान करीत असतानाचा गर्व- अहंकार नसावा. अहाहा… काय हा भाव. किती थोर विचार आणि आचरण. मी उठलो. धावत जाऊन आईच्या कुशीत शिरलो. “ आई..! मी चुकलो. मला माझी चूक समजली. तुझी शप्पथ घेऊन सांगतो पुन्हा असं होणार नाही.” आई प्रसन्न हसली. माझ्या केसांत बोटं फिरवत मला नुसतीच थोपटत राहिली. मला तिचा क्षमेचा स्पर्श समजला. त्या जगनियंत्याने आपल्यावरचा क्षमाशीलनाचा भार हलका करण्यासाठीच तर आईच्या रूपाने स्त्रीला पृथ्वीवर पाठवलं होतं … बरोबर मातृ- कर्तृत्वाचे दान देऊन … कायमचं.
जलता इश्क …
डोळ्यासमोरचं अविश्वसनीय चित्र…. आप्तेष्ट, मित्र सगळ्यांची धावपळ. कानावर मौलवी साहेबांचे गंभीर आवाजातले कुराण पठण आणि समोर एक पडदा. त्यामागे सेहऱ्यातला लाजरा चौदवी के चांद सा मासूम मुखडा.… मेरे मेहबूब का … वल्लाह … क्या हसीन शाम थी वो. इतक्यात अचानक समोर धाडकन काहीतरी आपटल्याचा आवाज आला आणि डोळ्यासमोरचं सगळं नाहीसं झालं. क्षणभर काहीच उमजेना. कळतच नव्हतं काय झालं आणि मी कुठे आहे तो. अरे… हे काय…! इतके लोक कां जमलेत? ओळखीचे तर सगळेच होते. आप्तेष्ट आणि मित्र सुद्धा. पण हे सगळे इतके गंभीर आणि दुःखी चेहरे घेऊन का वावरतायत …? मला कुठे घेऊन चाललेत ? कानावर काही अस्फुटसं पडत होतं. परवरदिगार … या अल्लाह… यह क्या हुआ? गलती किसकी और सजा के हकदार कौन …? इतने जिंदादिल लडके कां कसूर क्या था ..? बस, उस लडकी से इश्क किया था. इतने बेदर्दीसे इस बच्चे के प्यार को ठुकराकर वह तो चली गयी और इसे भेज दिया कब्रस्तान के रास्ते पर… मला काहीच कळत नव्हतं. कळणार तरी कसं …? डोळ्यापुढे अंधार आणि सोबतीला मातीचा वास. किती वेळ गेला कोण जाणे. अचानक पैंजणांचा ओळखीचा आवाज आणि मेहंदीचा सुगंध जाणवला. होय…तीच ती …!! बंद आंखो से पहचाना मैने … कैसा भूलता मैं ? आज मेरा इष्क मेरे ही कब्रपर फूलों की चद्दर लेके आया था. मेरे मरने के बाद … मेरे लिये दुआ मांगने और वह भी अपने हमसफर के साथ… या अल्लाह… मेरे आका …मेरे परवरदिगार… यह कैसा इन्साफ है तेरा… ?? मैं अंदर ही अंदर तडपता रह गया … जलता रहा मेरे हसीन सपनों के साथ… कम्बख्त… कौन कहता है की दफ़नाने के बाद, जलाया नही जाता…
सीमोल्लंघन …
संध्याकाळी शाळेतून आल्यावर मला आमच्या झोपडीत एक विचित्र शांतता असल्याची जाणीव झाली. दिवसभराच्या कामातून घरी आलेली आई आज कधी नव्हे ते ताईवर तोंडसुख घेत होती. बोलताना मात्र डोळ्यांतून धारा वाहत होत्या. ताईला आज तिच्या कामाचे पैसे मिळणार आहेत हे आईला ठाऊक होते आणि ती त्याच बद्दल ताईस विचारत होती. पण आईचा चाललेला त्रागा तिच्यापर्यंत पोचत होता की नाही हे मलाच काय, पण आईलासुद्धा कळत नव्हतं. उद्यावर आलेला दसऱ्याचा दिवस कसा घालवायचा ह्याचं मोठ्ठ प्रश्नचिन्ह आईसमोर होतं. ताई तिच्या कामाचे पैसे मिळाल्याचं सांगत होती पण त्या पैशाचं तिनं काय केलं ह्या बद्दल काहीच बोलत नव्हती. त्याच मुळे आईच्या रागाचा पारा वर चढत होता. ताई मात्र ढिम्म. आता मलाही ताईचा खूप राग आला आणि मी काही बोलणार इतक्यात ताई उठून बाहेर पडली. आई इतकी अगतिक झालेली मी पहिल्यांदाच पहात होतो. उद्याचा दसरा कसा काढायचा ह्याची चिंता तिला होती. ती रात्र मी आणि आईने पाण्याबरोबर कोरडी काढली. कदाचित ताईने सुद्धा… दुसऱ्या दिवशी दसऱ्याचा सण आणि घरात सुतकी वातावरण. आई गप्प आणि ताई घुम्यासारखी. मी ताईवर भयंकर चिडलो होतो. ती मात्र काल मिळालेल्या पैश्याचं काय केलं हे अजूनही सांगायला तयार नव्हती.आईची धुसपूस ताईच्या कालपासूनच्या काहीच न बोलण्यामुळे होत होती. जेवणाच्या वेळेआधी मात्र ताई अचानक उठली आणि घरात असलेल्या अडगळीच्या जागेतून एक डबा घेऊन आली. तिने तो डबा न बोलता आईच्या हातात दिला आणि शांतपणे बाजूला झाली. आई गोंधळलेल्या नजरेने तो डबा आणि शांतपणे समोर उभ्या असलेल्या ताईकडे आळीपाळीने पहात होती. शेवटी मीच आईच्या हातातून डबा घेतला आणि उघडला. विस्फारलेल्या नजरेने आईपुढे उघडलेला डबा धरला. आईचे डोळे सुद्धा विस्फारले. त्याच अवस्थेत तिने ताईकडे बघितलं आणि कालपासून गप्प असलेली ताई बोलती झाली. ती म्हणाली “ काल मी तुझं आणि सावकारीण बाईंचं बोलणं ऐकलं. तुला पैसे मिळाले नाहीत हे मला कळलं होतं आणि म्हणूनच तुला न सांगता मी हे सगळं केलं ते फक्त आजचा दसऱ्याचा सण गोड व्हावा म्हणून.”… आईने डबा माझ्याकडे दिला आणि ताईला आपल्या जवळ ओढलं. त्या डब्यात ताईने खास आजच्या सणासाठी बेसनाचे लाडू केले होते. आईचे डोळे पुसत ती म्हणाली ,” आई…! उद्या दसरा आहे हे मला माहित होतं आणि तुझे हक्काचे पैसे मिळालेले नाहीत हे सुद्धा कळलं होतं. म्हणूनच मी तुला न सांगता हे बेसनाचे लाडू केले आणि हे त्या रुपयातले थोडेसे उरलेले काही पैसे, घे आणि ठेव तुझ्याकडे.” आई आश्चर्याने ताई कडे बघतच राहिली. “ अगं ताई… ! तू हे कालच कां बोलली नाहीस? मी किती नको नको ते बोलले तुला..?” आई कळवळली. ताई फक्त हसली आणि म्हणाली, “ आई… कालच सगळं सांगितलं असतं तर आजचा दसऱ्याचा सण इतका गोड झाला असता का?” आईने ताईला कुशीत ओढली आणि बरोबर मलाही. ती हमसून रडू लागली. आता मात्र ताईने आईला सावरलं. बेसनाचे लाडू न खाताच आज आमच्या तिघांचीही पोटं भरली होती. दसऱ्याचा सण साजरा झाला होता. आनंदाचा गोडवा कायमच रहाणार होता. सहजच एक विचार डोक्यात आला … आईत ताई असते की नाही हे मला माहित नाही. नक्कीच असेल. पण,ताईत आई असते हे मी छातीठोकपणे सांगू शकतो. बाबा नसतानाही गरीब परिस्थितीत ताई खंबीरपणे नुसती आईच्या पाठीशीच उभी नव्हती तर मलाही परिस्थिती नुसार विचार करायला शिकवून आणि घडवून तिने ताठ मानेने ह्या जगात उभं केलं. केवळ ताईमुळेच आज आमची परिस्थिती खूपच चांगली आहे हे निर्विवाद सत्य मी आणि माझ्या पत्नीने कायम हृदयात जपून ठेवलं आहे. आम्ही दोघे आणि ताई नेहमीच आईच्या सेवेत हजर आहोत. जगाची दृष्ट लागण्या इतकं ताईला मिळालेलं सासर ही तर आईच्या सुखाची परिसीमाच. आजही वर्षानुवर्षे ताई दसऱ्याला सहकुटुंब आमच्याकडे येते आणि आजही आमचा दसरा ताईच्याच हातचे बेसनाचे लाडू खाऊनच साजरा होतो. नेहमीच कठीण परिस्थितीवर खंबीरपणे मात करण्याच्या कौशल्यामुळे आजही आईच्या डोळ्यात ताईबद्दल अपार कौतुक दिसतं आणि… केवळ लेकीमुळेच त्यावेळी घराच्या उंबऱ्याबाहेर आमच्या गरीब आणि दरिद्री परिस्थितीने केलेले ‘ सीमोल्लंघन ‘ हीच खरी दसऱ्याला लुटलेल्या आपट्याच्या पानांची सोनेरी झळाळी मला आणि आईला आजही प्रकर्षाने जाणवते. अगदी दरवर्षी … प्रत्येक दसऱ्याला.
‘ नो ‘ … !!!
“ नाही..! हे कधीच शक्य नाही. नो …“!!! “ अरे, तुझी लायकी काय आणि तू बोलतोस काय…”? “ चालता हो इथून. चल निघ. भीखमंगा कही कां…” !! तिचा थैमानल्यागत ओरडा पाहून तो बिचारा केविलवाणा होऊन खाली मान घालून तिथून निघून गेला. ती आणि तो… शाळेपासून एकत्र. तिचा अभ्यास तो करायचा आणि ती नुसती उंडारायची. अभ्यासापेक्षा नटण्या मुरडण्याकडे जास्त लक्ष. समोरचा तुच्छ आणि मी म्हणजे कोण … हा तिचा स्थायी भाव. बाप गावचा जमीनदार. हेच कारण होतं तिच्या बेमुर्वत स्वभावाचं. घरी एकंदरीत सगळ्याच बाबतीत बोंब. आपल्या आईला घरात किती किंमत आहे हे तिला समज आल्यापासूनच कळलं होतं. तो मात्र तिच्यावर मनापासून प्रेम करायचा, प्रेम आंधळं असतं हे माहीत असूनही … एकतर्फी. दिसायला चारचौघांसारखा. गावाकडे बाप आणि माय आपल्यासाठी राबतायत हे त्याच्या डोक्यात ठसलेलं. नसानसांत वाहणारी शिक्षणाची श्रीमंती. त्यामुळेच शाळेतल्या सगळ्याच शिक्षकांना त्याच्याकडून फार अपेक्षा. आपल्याला काय करायचंय हे पक्के डोक्यात भिनलेले. पण ती कशी आहे ते ठाऊक असूनही तिच्यावर खूप प्रेम करणारा तो सरळ साधा प्रेमवीर. ती मात्र नेहमीच त्याला झटकण्याच्या मूडमध्ये. आज शाळेतला शेवटचा दिवस. आता शाळा संपणार आणि आपण आपल्या मार्गाला लागणार म्हणून त्याने आजच तिला गाठून धीर करून विचारायचं ठरवलं अन तो तिच्यासमोर जाऊन थडकला. मात्र … सगळ्यांसमोर झालेल्या उघड अपमानाची भळाळती जखम घेऊन तो तिथून बाहेर पडला. अश्वत्थाम्याने जशी कपाळावर कायमची बाळगलेली. पण ह्याची जखम थेट हृदयातच… बहुतेक ती ही कायमची. तिथेच बसलेल्या तिच्या कंपूतली 5-7 टाळकी कुत्सितपणे त्याच्याकडे बघून हसली. त्यातही तिचाच आवाज आणि कुत्सितपणा त्याला जास्त ठळकपणे जाणवला. आला दिवस, महिने… वर्ष सरली. तिच्या जमीनदार बापाला कुठल्यातरी बेकायदेशीर धंद्यात अटक झाली, पोलिसांनी बापाची कुंडली मांडली. त्याची सगळी प्रकरणे बाहेर पडताच तिच्या घराचे… नव्हे,वाड्याचे वासेच फिरले. आई त्या धसक्याने गेली. इतकं सगळं होऊनसुद्धा तिची गुर्मी मात्र तशीच. नंतर हळूहळू परिस्थितीचे चटके बसू लागल्यावर ती जमिनीवर आली. पैशाचा माज उतरला, घमेंड मातीमोल झाली आणि उद्या जगण्याची भ्रांत तिला जाणवू लागली. तिच्याच पैश्यामुळे जवळ आलेल्या मित्र- मैत्रिणींनी आता तोंडावर थुंकायला सुरवात केली. तिला सगळं समजून चुकलं आणि पोटा – पाण्यासाठी गावातच नोकरी पत्करून स्वतःलाच जगवण्याचा प्रयत्न करू लागली. आणि तो…? आज तो स्वतःला सर्वार्थाने घडवून गावात परत आला होता. शाळेत त्याच्यावर प्रेम करणाऱ्या शिक्षकांची आणि शाळेची मान त्याने समाजात उंचावली होती. शिक्षणाचं तेज त्याच्या डोळ्यांत आणि वृत्तीत दिसत होतं. त्याने माय आणि बापाला गावाकडून आणून शाळेसमोरच्या आपल्या स्वकष्टार्जित आलिशान वास्तूत ठेवले होते.माय बापाने जोडीने खस्ता खाल्लेली गावाकडची 2-4 बिघे जमीन आता 50-60 एकराची झाली होती. लक्ष्मी आणि सरस्वती दोघीही त्या वास्तूत आता कायमस्वरूपी मुक्काम ठोकून होत्या. स्वतःची उतुंग ओळख निर्माण करूनही त्याचे पाय अजून जमिनीवरच होते. आपल्या बंगल्यातून समोर शाळेकडे बघताना मात्र तो खिन्नपणे हसायचा. कुणाच्याही नकळत ओलावलेल्या डोळ्यांच्या कडा पुसायचा.एकटाच कुठेतरी शून्यात हरवून जायचा. एकतर्फी केलेल्या विशुद्ध प्रेमाची सय उफाळून यायची. काळाचं मार्गक्रमण सुरूच होतं. अश्याच एके दिवशी आपल्या माय बरोबर काही खरेदी करण्यासाठी तो दुकानात गेला आणि अचानकपणे तिला समोर बघताच गलबला. तिचा अवतार बघून कळवळून गेला. त्याला बघून ती ही चमकलीच. ओळख पटली होती. तोच तो… पण आज दुकानात त्याने केलेल्या खरेदीवरून त्याच्या परिस्थितीची तिला चांगलीच जाणीव झाली. आपला पस्तावलेला केविलवाणा चेहरा तिने तोंड पुसण्याचा निमित्ताने झाकून घेतला आणि भानावर येताच त्याच्यामागे दुकानाच्या पायऱ्यांपर्यंत धावली. त्याला हाक मारताच तो थांबला आणि वळला. तिने परत ओळख दाखवली. तो कसनुसं हसला. तिच्याकडून झालेल्या अपमानाची कधीही भरून न येणारी जखम उराशी घेऊन तो जगला होता आणि त्याच अवस्थेत इतक्या वर्षानंतर तिच्याशी बोलत होता. बोलण्याच्या ओघात अचानक तिच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह उमटलं आणि अनाहूतपणे ती विचारती झाली… “अजून एकटाच आहेस तू ? अजूनही प्रेम करतोस माझ्यावर ?” … एकच क्षण… फक्त एक क्षणच त्याने तिच्या डोळ्यांत बघितलं आणि तो मान फिरवून चालू पडला. तसूभरही मागे वळून न पहाताच उत्तरला…. ‘ नो !’… तो निघून गेला. अनपेक्षितपणे आलेल्या उत्तराने सैरभैर झालेली ती विचारात पडली, काय असेल त्याच्या ‘ नो ‘ चा अर्थ ??? त्ती सरबटली. डोकं गच्च धरून त्याच्या ‘ नो ‘ च्या विचारात तडफडत राहिली. इतकी वर्ष तो तडफडत होता आणि आज ती. मात्र…त्या ‘ नो ‘ चा अर्थ तिला कळलाच नव्हता आणि आता तर कधीच कळणार नव्हता…
वाळूत मारल्या रेघा …
भरतीमुळे उधाणलेला दर्या. अधीरतेने किनाऱ्याकडे झेपावणाऱ्या त्याच्या असंख्य लाटा अन आता नुकताच विरघळेल आणि समुद्राच्या विशाल कवेत सहज सामावून जाईल असं वाटणारा तांबूस लाल रंगाचा गोळा … दिवसभराच्या श्रमाने तप्त आणि थकलेला देह श्रांत करायला जणू त्या अथांग जलाशयात उतरणारा तो तेजोनिधी लोहगोल. जाता जाता त्यानेच आसमंतात चितारलेले तांबूस लाल किरमिजी रंगाचे फटकारे आणि ह्या सर्वावर कडी म्हणजे समुद्राचा धीर-गंभीर गाज … आज तिला न मला आमच्या आवडत्या ठिकाणी यायला अंमळ उशीरच झाला. शांत समुद्र किनारा, संध्याकाळचा समुद्रवारा प्राशन करायला आलेली मंडळी, सांज ढळून चालल्यामुळे ओढीने घरट्यात परतणारे जीव… हे सगळं नेत्रसुख अनुभवण्यास आम्ही रोज यायचो. ठरलेली बसायची जागा आणि तिच्या केसांत गजरा माळताना श्वासागणिक धुंदावणारी सांज-संध्या, अहाहा…तिच्या चेहऱ्यावर विलसत असलेला लालिमा डोळ्यांनी पिऊन तृप्त व्हावं आणि वाळूत रेघा मारताना तिच्या लांबसडक निमुळत्या बोटांची होणारी हालचाल काहीच न बोलता फक्त पहात रहावी… माझा आवडता छंदच होता तो. वाळूत मारलेल्या रेघांतून ती बरंच काही बोलायची. कौलारू घर आणि त्यात मारलेल्या तीन उभ्या रेघा. आम्ही दोघे आणि आमचा एक… फक्त तीनच रेघा. आज सहज मला थट्टा करायची लहर आली. तिची लांब सडक तर्जनी धरून मी अजून एक रेघ ओढली आणि लाजून चूर झालेली तिची नजर माझ्या नजरेत मावेनाशी झाली. पुढच्याच क्षणी श्वास एकमेकात गुंफले गेले. वाळूत मारलेल्या त्या चार रेघांबरोबरच आसमंतात पसरलेला लाल किरमिजी रंग अजूनच गडद झाला… यथावकाश आम्ही दोघे नाजूक बंधनात अडकलो. आता रोजची समुद्र किनाऱ्यावरची संध्याकाळ, रोज केसांत माळलेल्या गजऱ्याचा सुगंध, तिच्या चेहऱ्यावर रोज लालिमा पसरवून पाण्यात विरघळणारं ते तेज, रोजचीच ती अन मी … आणि रोजच्याच प्रमाणे तिने वाळूत रेखाटलेल्या रेघांची चित्रं. एक सांगू कां …? अहो, माझीच काय पण तिथे किनाऱ्यावर धडकू पहाण्याऱ्या लाटांमध्ये सुद्धा तिने वाळूत मारलेल्या रेघा पुसायची तर सोडाच पण त्यांना स्पर्श करायची सुद्धा हिंमत नव्हती. रेघांच्या रूपाने वाळूत काढलेल्या चित्ररेषा मनात साठवत आम्ही तिथून निघायचो. एक निश्चय रोजच डोक्यात असायचा… तो म्हणजे दोघांनी रेखाटलेल्या प्रीतीच्या रेघा जीवनात कधीही न पुसण्याचा. चालताना बोटं गुंफली गेली की तळहाताच्या रेघाही एकमेकांत एकरूप होऊन जायच्या. विलग न होण्यासाठीच … समुद्राच्या वाळूत तिच्या लांबसडक, नाजूक बोटांनी आखलेल्या त्या घरात अजूनही तीन रेघा होत्या. मात्र ओलसर दमट वाळूत आखलेल्या रेघांचं कौलारू घरकुल आता प्रत्यक्षात उतरलं होतं. बराच कालावधी लोटला होता पण अजूनतरी दोनाच्या तीन रेघा झाल्या नव्हत्या. घरी कुजबूज आणि चिंता दोन्हीचा एकदम वावर नित्याचाच झालेला. निष्णात धन्वंतरी, उपास तापास, घरगुती उपाय, सगळं सगळं पार पडलं तरी पुढे प्रश्नचिन्हच. भौतिक सुखांनी घरात ठाण मांडलेलं. पण आमच्या दोघांच्या मानसिक आणि भावनिक सुखावर कशाची तरी पडछायाच…. आणि तीही दिवसेंदिवस अधिकच गडद होत जाणारी. आता तर तिच्या मनाची समजूत काढणं महाकठीण झालं होतं. मुळचंच हळवं, कोमल असलेलं तिचं मन आता अजूनच तरल झालं होतं आणि मी …माझं काय …? ओहोटीच्या वेळेस खूप खोलवर गेलेल्या समुद्राच्या पाण्यास शांततेचा एक विशिष्ट आवाज असतो. आमच्या कौलारू घरातही मानसिक सुखाला लागलेल्या ओहोटीमुळे स्पष्ट ऐकू येणाऱ्या नैराश्याच्या गाजेने मेंदू कुडतरायला लागला होता. समुद्राची भरती निसर्ग नियमाप्रमाणे येतेच येते. ती कधीच चुकत नाही. इथे तर पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा ओहोटीच. भरती कधी येणार हे त्या नियंत्यालाच ठाऊक. असो.. कालाय तस्मै नमः म्हणतात ना, तेच खरं … दिवस … रात्र … भरती … ओहोटी … निसर्गचक्र साचेबद्धपणे अव्याहत सुरूच होतं. पण माझ्या घरात देवच काय निसर्गही रुसला होता. आमचं समुद्रावर जाणं आता कमी झालं होतं. गेलोच तर तिच्या लांबसडक बोटांनी मारलेल्या रेघा आता विस्कटलेल्या वाटायच्या. कधी तरी कौलारू घर रेखाटलं गेलंच तर तिथे दोनच रेघा दिसायच्या. त्यात अजून दोन काय पण एक रेघ सुद्धा रेखाटायची हिंमत आता माझ्यात नव्हती.मी सुन्न होऊन पहात राहायचो. पण ती? ती तर शांतपणे शून्यात नजर लावून बसलेली असायची. इतकी शांत की कुठल्याही क्षणी तिच्या मेंदूत स्फोट होईल. अचानक सांज लालिम्या ऐवजी भेसूर भाव चेहऱ्यावर उतरायचे. त्या भेसूर भावस्थितीत वाळूत काढलेलं कौलारू घर आज उध्वस्त झालं होतं. मी मात्र सवयीनुसार समुद्रकिनारी आमच्या नेहमीच्या ठिकाणी बसून वाळूत तिचं आवडतं कौलारू घर आणि त्यात तीन रेघा काढायचा जमेल तसा प्रयत्न करतो होतो. एकटाच… एकाकी. ऋतुचक्राप्रमाणे भरती-ओहोटी सुरूच होत्या. माझ्या नशिबी आता फक्त ओहोटीच…. आणि आज ??? आज वाळूत मारलेल्या रेघा किनाऱ्यावर धडकणाऱ्या आणि डोळ्यांतून कोसळणाऱ्या लाटांमध्ये विरघळून सामावून गेल्या होत्या आणि वाळूची चित्र- चौकट समोर पसरलेल्या अथांग अश्या दर्यात विसर्जित झाली होती … कायमची….
मुरलेलं लोणचं
आज वासंतीच्या घरात बरीच गडबड चाललेली होती.. कारणही तसेच होते, तिच्या लाडक्या लेकीची ‘ चोर चोळी ‘भरण्याचा कार्यक्रम होता, तसे बघायला गेले तर साधेच कारण… पण आजकाल छोट्याशा कुटुंबात आनंद साजरा करण्यासाठी आणि जी काही दोन-चार नातेवाईक मंडळी जमू शकतात यांच्यासाठी हे कारण फारच मोठे वाटत होते… त्यानिमित्ताने तिच्या सासरची मंडळी म्हणजे इन मीन तीन माणसे, स्वतः नवरा म्हणजे ती चा लाडका जावई अजय आणि त्याचे आई-वडील… आणि वासंती कडे म्हणाल तर.. ती स्वतः तिचा नवरा रमण आणि मुलगा चिन्मय झाली फक्त सहा डोकी.. वासंतीची मोठी बहीण येतेच म्हणाली आणि व्याह्यांचीही मोठी बहीण जवळच रहात असल्याने ती पण आली.. फार हौशी बाई… सगळे तिला अक्का म्हणतात.. अशी एकंदर आठ माणसे जमली.. पण घरामध्ये आनंदाला नुसते उधाण आलेले होते वासंती ची मुलगी मयुरी अतिशय आनंदात होती, कारणही तसेच होते म्हणा लग्नाला चार वर्षे झाल्यानंतर ही गोड बातमी तीच्या सार्या देहबोलीतून आणि टवटवीत फुललेल्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होती, तिच्या सासूबाई म्हणजेच नीलाताई त्यांना तर सुनेचे कौतुक किती करू आणि किती नको असे झालेले.. संध्याकाळी सोसायटीमधील पाच सवाष्ण बायका बोलावून त्यांनी ‘चोर-चोळीचे ‘हळदी कुंकू थाटात करून घेतले…. दिवसभराचा शिणवटा घालवायला म्हणून सगळेजण’ लॉंग ड्राईव्हला ‘बाहेर जायचे म्हणून तयारी करू लागले.. इतक्यात व्याही बुवांची मोठी बहीण अक्का वय वर्षे 77 ती म्हणू लागली की, आता बाहेर जाणे नको, घरातच राहू.. पहिलटकरीण आहे, दृष्ट लागेल माझ्या परीला… फार लाडकी होती ना ती!… त्यातच आता उशीर झालेला आहे.. घरातच थोडासा वरण भात खाऊ आणि आराम करू…. मग काय! जावई, मुलगी तिचा भाऊ आणि बाकीचे सारे हिरमुसले, अक्काबाई ना म्हणू लागले तुम्ही बसा घरात आम्ही जाऊन येतो.. त्यावर अक्काबाई म्हणाल्या माझे जरा ऐका! हवे तर उद्या आपण सकाळ पासून बाहेर पिकनिकला जाऊ, पण आता नको.. असे त्या वारंवार सांगू लागल्या, त्यांना कशाची जाणीव होत होती बरे! त्यामुळे थोडाश्या नाराजीने सगळ्यांनी जाणे रहित केले… आणि वासंती अनिच्छेने स्वयंपाक घरात पोट पूजेच्या तयारीला लागली… मयुरी पण कपडे बदलायला म्हणून तिच्या खोलीत गेली आणि पाच मिनिटात मयुरीच्या रडण्याच्या आवाजाने सारे तिच्या खोलीकडे धावले.. पाहतात तर काय तिच्या खोलीतील वॉशरूम चा दरवाजा सताड उघडा होता, आणि मयुरी सिंक जवळ आधार घेऊन अस्ताव्यस्त बसून रडत होती… चेहरा पार घाबरलेला होता, वासंती तिच्याजवळ धावली तर तिला जाणवले मयुरी चे सर्व अंग थरथरत असून तिला धड उभे देखील राहवत नाही.. अजयने म्हणजेच तिच्या जावयाने अलगद उचलून मयुरीला बेडवर आणून बसविले, त्याआधीच तिच्या बाबांनी ऑलरेडी एसी चालू करून ठेवला होता.. वासंतीने मयुरीचा चेहरा आपल्या ओढणीने पुसून आणि चिंतेने व्याकुळ होऊन तिला विचारले.. मयुरी बाळा काय झाले? तर तिने आईला सांगितले काही नाही… मला बाहेर जायचे नाही म्हणून खूप राग आला होता म्हणून मी रागानेच कपडे बदलत असताना, मला मळमळायला लागले आणि उलटी झाली, चेहरा धुवून आरशात पहात असताना, माझी मीच घाबरले… आणि परत तोंडावर पाणी मारून आरशात पाहिले तर काय! माझ्यासारखीच एक छोटीशी मुलगी मागून डोके काढून माझ्या चेहऱ्याला चेहरा घासत मला म्हणाली..’ आई मला मुरलेले लोणचे हवे ‘… आणि मयुरी वासंतीला आत्ताच्या आत्ता मला मुरलेले लोणचे लिंबाचे दे तूss माझी मुलगी मागते आहे… आणि आईला म्हणजेच वासंतीला गच्च मिठी मारून रडू लागली… आईने म्हणजेच वासंतीने तिची मिठी अलगद सोडवून मयुरी चा चेहरा आपल्याकडे वळवून प्रेमभराने तिला म्हणाली, मयुरी बाळा! अगं अक्काआत्या तुझ्यावर अतिशय माया करतात ग. माझ्यापेक्षाही तुझ्याशी त्यांनी अंतरंगाने जिव्हाळ्याची नाळ जोडलेली आहे, तू त्यांच्याकडे आत्या बाई म्हणून किती हट्ट करतेस आणि पुरवुन घेतेस ! मग त्यांनी बाहेर जाऊ नकोस, असे उगीच नाही सांगितले, अगं ही जुनी अनुभवी माणसं.. जुन्या मुरलेल्या लोणच्यासारखी असतात, लक्षात येते का बाळा तुझ्या? म्हणजेच लोणचे मुरल की, त्याचे औषधी गुण जास्त वाढतात… त्याच बरोबर चवही वाढते.. तसेच ह्या अक्का आत्याचे… तिने तुला झालेली दिवसभराची धावपळ, दगदग अनुभवी नजरेने ओळखली होती, आणि तुला लागलेले कडक डोहाळे, जाणून होती म्हणूनच थोडासा धाक दाखवून तिने घरात बसविले… हे सारे मायेपटीच बरं… एरवी सर्वात मोठी म्हणून सगळी जबाबदारी त्यांच्यावरच टाकून आपण निर्धास्त असतो ना! मग त्यांनी एखादी गोष्ट अधिकाराने सांगितली तर त्यामागे सुद्धा आपल्याबद्दल असलेली काळजीत असते ग.. आपणच त्यांना समजून घ्यायला कमी पडतो! आत्ताच पहा बरं..’माझी लेक मुरलेलं लोणचं मागते म्हणून कळवळून रडलीस ना! अगदी तसेच अक्का आत्याला वाटले… अगं त्या पण मुरलेल्या लोणच्या सारख्या आहेत… आयुष्याचे अनुभव घेऊन, त्यांच्या मुरलेल्या नजरेने तुझे कडक डोहाळे जाणून त्या तुला जपत आहेत … आईच्या सांगण्याने मयुरीला गलबलून आले.. तिचे डोळे पाणावले आणि म्हणाली खरंच ग आई, आपल्या अक्का आत्या मुरलेलं लोणचं आहेत…. सगळ्यांचे उतरलेले चेहरे जादूची कांडी फिरवल्यासारखे हास्याने फुलले… आणि सगळ्यांनी एकच गलका केला आम्हाला पण पाहिजे… मुरलेले लोणचे 😀😀.. तेवढ्यात आक्का बाई म्हणाल्या चला आता पान घेतलीत, आणि येताना मी लिंबाचं मुरलेलं लोणचं पण आणलय बरणी भर… अन काय परत एकदा साऱ्या घरात हास्याचे कारंजे फुलले… सगळ्यांनी वरण-भात तूप आणि लिंबाचे मुरलेले लोणचे यावर ताव मारला आणि मयुरी ला म्हणाले, ‘बघ बाई आता! खुश झालीस ना तू!… अजय म्हणजेच मयुरीचा नवरा तिच्याकडे सहेतुक हसला… मयुरी खूपच लाजली… अन हळूच त्याला म्हणाली, मला कुठे रे हवे होते मुरलेले लोणचे! तुझ्याचं लेकीला हवं होतं’ मुरलेलं लोणचं ‘… बघ आता! असे रोज रोज हट्ट करेल ह़ ती… असं हे अक्का आत्या सारखंच,.. मुरलेलं लोणचं, चोर-चोळीची लज्जत वाढवून गेलं….