दूरवरुन हाक येते…मन गुंतते हाकेकडेस्वर ते शांत तरीही…गुढ पसरे चहुकडे आक्रंदते आत काही…तुटके जुनेच तेभग्न स्वप्नासही वाटे आतायेथेच आहे क्षितीज ते आठवणींचे शिल्प फुटके…कवटाळी हृदय मंदिरीका कशास्तव जखम पुरानी…ऊरात गुलाब फुलविते
Category: Short Poems
नभीं दाटले मेघसावळ-आठवांचा ओघबरसती धारा तव सुधेच्यान् प्रीत-बिजलीची चमकली रेघ
गडद दाट धुक्यात हरवून गेली ,आज प्रीतीची ही वाट मखमली |किरण आशेचा उगवेल कधी …विरघळेल धुकं, होईल वाट मोकळी ||
प्रतिमा उरात जपताना,हृदय गुलाबी स्पंदते |आठवणीसंगे झुलताना …जखमी स्पंदन आक्रंदते ||