तिळगुळ घेऊन गोड बोलुनीजिंकून घ्यावे मन साऱ्यांचेसंक्रांत केवळ निमित्त असावेव्रत असू द्यावे हे आयुष्यभराचे कुणास टोचू नये काटेहलव्यासारखे हसत रहावेकोणी टोचले जरी काटेआपण हास्यच फुलवत रहावे हलवा- तिळगुळ देऊन कधीकटुता मनातली जात नसतेबोल प्रेमाचे द्यावे घ्यावेआनंदाचे वाण लुटावे नुसते हाच खरा तिळगुळ समजावागोड बोलणं सोडू नकाकाहीही झालं तरी यापुढेघेतला वसा टाकू नका
Category: Short Poems
हृदयांची मैफिल,श्वासांचा आलाप |समेतून बहरला …प्राजक्त कैफ ||
भरजरी शालू….
हे भरजरी वस्त्र आयुष्याचे,वरदान मिळे जणू ईशाचे!ह्या शालू सम वसना वरचे,बुट्टे जरतारी निमिषां चे ! मृदू , रेशमी क्षणाक्षणांची,काढली नक्षी रंग बिरंगी!उभ्या-आडव्या जरतारी नी,ती खुलून जडली मन रंगी ! चंदेरी जरीच्या स्मृती तारा,चमकती किती काठा वरती!संचित ,कोमल ,सान क्षणांचे,नर्तन करिती मोर किती ! हा वार्धक्याचा रंग पांढरा,मिसळला असे शालूत जरी!जीर्ण शीर्ण हा शालू आगळा,अधिक प्रौढ अन् मनहारी!
धग लागो ईश्वरांमुक्त मनपाखरांसोडुनियां संसारांतुज भेटाया यावे.. धग लागो ईश्वरांक्रियमाणपसारासप्तकोषांचा साराजाळीं स्मरणमात्रे.. धग लागो ईश्वरांत्यागुनि कणसुरांज्ञानामृताच्या धारांबरसाव्या कृपेने.. धग लागो ईश्वरांपूर्वस्मृतींच्या सारांमायेस न हो थारांभोग झणिं सरावे..
नव वर्षा तव सहर्ष स्वागत !
नव वर्षा तव सहर्ष स्वागत !अभिमान ही तो गर्व नकोनवागताचे होते स्वागतहुरळूनी तू कधी जाऊ नको ll १ll जुने जाऊनी नवीन यावेनियमचि आहे निसर्ग हादुःख सरोनी सुख दिन यावेरात्री मागुनी दिवसचि हा ll २ll जुने ही असते भले चांगलेउत्त्तम जे जे ते घ्यावेदुःख उगळुनी तेच तेच तेकशास कोणा हिणवावे ll ३ ll जर्जर जनता गतवर्षीचाआठव सुद्धा नको नकोनिसर्ग खेळ हा ईश्वरी सत्तादोष कुणाही नको नको ll ४ ll चूक आमुची विसरुनी गेलोत्यांना गर्वाने फुगलोनिमित्त केवळ गतवर्षा तूरोग रौरवी सापडलो ll ५ ll गत वर्षा तू संकटातहीदिलीस शिकवण भली भलीआयोग्य सेवा माणुसकी हीसर्व सुखांची गुरु किल्ली ll ६ ll झाले गेले विसरुनी जाऊगत वर्षा ! तुज निरोप हानव वर्षा तव आगमनाचीउत्सुकता मनी, सूर्य नवा ll ७ ll ये नव वर्षा ! सुख शांती धनआरोग्य घेऊनी चैतन्यगौरवू तुजला सन्मानही करुजीवन व्हावे तव धन्य ! ll ८ ll
आयुष्याचा उत्सव व्हावा
आयुष्याचा उत्सव व्हावा फुलून यावे गाणेध्यास असावा नित नूतनाचा उगा कशाला झुरणेलावीत जावे मनामनातून आनंदाचे झाडधडपडताना जपत राहावे मूल मनातील द्वाड. कशास बुरखे विद्ववतेचे कशास आठ्या भाळीवाचियले ते कुणी कधी का लिहिले काय कपाळीफुलवित जाव्या चिवटपणाने स्वप्नफुलांच्या वेलीउगारील जो हात, तयाच्या हातावरती द्यावी टाळी. असतील, नसतील सुंदर डोळे; तरी असावी डोळस दृष्टीज्याच्या त्याच्या दृष्टीमधूनी दिसेल त्याची त्याची सृष्टीशोधित असता आनंदाला कधी न व्हावे कष्टीमर्म जाणतो तोच करीतसे सुख सौख्याची वृष्टी वाट वाकडी असली तरीही सरळ असावे जाणेकाट्यामधूनी, दगडामधूनी जावे सहजपणानेशोधित जाता ताल सुरांना सुचतील मधुर तराणेआयुष्याचा उत्सव व्हावा फुलून यावे गाणे
स्वागत नववर्षाचे
सूर्य उगवतीचा घेऊन येईल,आशा आकांक्षाची नवी पहाट!नवीन संकल्प, नवीन आशा,दाखवतील आम्हा सोनेरी वाट ! आशेच्या हिंदोळ्यावरती ,आकांक्षांचे रावे झुलती !साथ देऊनी त्यांना आपण,करु कालक्रमणा त्यांचे संगती! नववर्षाची सोनपावले,उमटतील अवनीवरती!नाविन्याचे क्षण उमलता,आनंद दाटला अवतीभवती! कालचक्रा ना आदी अंत रे,बिंदू मात्र हो आम्ही पामरे!जुने जाऊ द्या काळामागे ,विसरुन अवघे भरु या मोदे!
हिरव्या देठानं कितीही जरी सावरलं,तरीही वय सरतं..किती मिळालं कितीही कमवलं,तरी मन कुठे भरतं.. न भरलेल्या मनालाएका क्षणीं थांबवायला हवंथकलेल्या शरीराची जागातेव्हाच घेईल कुणी नवं येणं-जाणं, चालणं-थांबणंकालानुरूप सारं होईलअडूनच रहायचं म्हटलंतर जगण्याची मजा जाईल म्हणूनच म्हणतात जीवनपटींआपली भूमिका साकारावींहसत-हसत अचानकचरंगमंचावरून ‘एक्झिट’ घ्यावी…
मन राऊळी
मनाच्या राऊळी, विठ्ठल झाला हो जागा !नाही पंढरी, मंदिरी, आहे तुझ्याच अंतरंगा! मनाच्या राऊळी, घंटानाद होई पहाट प्रहरी!मनातील विठ्ठला संगे, करू पंढरीची वारी ! वाळवंटी चंद्रभागेच्या, वारकरी गर्दी ना करे!विठ्ठलाच्या डोळ्यातून, विरहाचे अश्रू झरे! भक्तगण झाला, माझ्या संगतीला पारखा!अश्रुंनी भिजला, भक्त पांडुरंगाचा सखा! रोगराईने केली भक्त गणात दूरी दूरी!अंतरीच्या ओढीने, भक्त विठ्ठला साठी झुरी! विठ्ठल म्हणे भक्ता, नाही तुझ्या माझ्यात अंतर!तुझ्या मनाच्या राऊळी, असे मी निरंतर!
आशा
दूरवरुन हाक येते…मन गुंतते हाकेकडेस्वर ते शांत तरीही…गुढ पसरे चहुकडे आक्रंदते आत काही…तुटके जुनेच तेभग्न स्वप्नासही वाटे आतायेथेच आहे क्षितीज ते आठवणींचे शिल्प फुटके…कवटाळी हृदय मंदिरीका कशास्तव जखम पुरानी…ऊरात गुलाब फुलविते