कडुलिंबाचा टाळा ..सोबत फुलांच्या माळा!चमके साडी जरतारीची,अन् गोडी साखर माळेची!कळस चांदीच्या गडूचा,सण साजरा करु चैत्र गुढीचा!
Category: Short Poems
चैत्र शुद्ध प्रतिपदा उगवली, सरली रात्र अमावस्येचीशुभदिनी आज चला उभारु गुढी सायुज्यतेचीअधर्माची सोडुन वाटधरुया कास सद्धर्माची शुभदिनी आज चला उभारु गुढी प्रभुकृपेचीकोकिळ पहा देतसे चाहुल वसंतऋतु आगमनाचीशुभदिनी आज चला उभारु गुढी निसर्गप्रेमाचीहृदयमंदीरी करुन स्थापना देव देशाची शुभदिनी आज चला उभारु गुढी मांगल्याचीशुभकृत संवत्सर हे जीवनी तुमच्या येवो घेऊन पहाट सौख्याचीआरोग्यपूर्ण दिर्घायुष्य लाभो सकलांना हीच इच्छा मम मनीचीशुभदिनी आज चला उभारु गुढी परस्परांच्या सद्भावाची..मराठी नववर्षाच्या मन:पुर्वक शुभेच्छा
प्रेमरंग प्रीतसंगराधाराणी होई दंग शाममनोहर करीबासुरीस पहा धरी धुंद गुंजतसे धूनजाई गोकुळ रंगून आप-पर फिटे भावकृष्ण घेई मनीं ठाव रंग रंगवुनी रंग रंगेराधा कृष्ण भक्ति संगे
चंद्र
चंद्र यांचा 🌙चंद्र त्यांचा🌕चंद्र तुमचा 🌛चंद्र आमचा🌜चंद्र पौर्णिमेचा🌝चंद्र बीजेचा🌙चंद्र कोजागिरी त्रिपुरारीचा🌝चंद्र ईदचाचंद्र आज होळीचा चंद्र नाही कुठल्याही धर्मांचाआहे मात्र सर्वांच्या प्रेमाचा
गेलीस निघून तरीही,अंगणात तुझा गंध आहे |अल्लड अवखळ वाऱ्यासवे …उंबऱ्यात दरवळत राहे ||
फूल ओघळले, भू वरी पडले, परि न चुकले सुगंधी कर्म | उदात्त उन्नत वसा दानशूरतेचा … मुकेपणाने शिकवी निसर्ग धर्म ||
जगायचे कसे
जगायचे कसे? शिकविलेस तू वागायचे कसे आदर्श आई तू! सुख द्यावे घ्यावे गोड हवी वाणी रंगुनीया जावे आनंदाची गाणी! दीन दु.खी कोणी धाऊनिया जावे पूस डोळे त्यांचे साह्य सदा व्हावे! मानवता धर्म सार्थक जन्माचे जाणून घे बाई, कसे जगायचे?
काही तरी हूकतंय..चूकतंयधुंद हवेत काहीतरी सुचतंयकरुन टाकावं मदहोश स्वतःला…राहून राहून वाटतंय ! मग मदहोशी कशाची असावी ?जीवाला भुल कशाची पडावी ?साज-या फुलाची..की नाच-या मोराची….डोळे निवणारी बात घडावी ! नाच-या मोराचे कुरुप ते पायअंधार दिव्याखाली..असा काही न्यायसखीची सुंदरता परी.. नाजूक.सात्विकयाहून दुसरे पाहिजे ते काय ! तीला पाहुनिया निवतात डोळेबंध हृदयाचे होतात मोकळेसाथ तीची राहो निरंतरचंद्र प्रीतीचा… कदापी ना ढळे
तब हर दिन बचे बाल..बालअब हर दिन गिरे बाल..बाल तब हँसते तो बिखरते मोतीअब हँसने पर भी आँख सीकुडती तब मिलते अमरुद..चाकलेट के मेलेअब बस उनके फ्लेवर के झमेले तब एक अनजाना भी पेहचान देताअब पेहचान बनाने को तरसता हर कोई तब रेत में भी उछलते फाँदतेअब नरम गद्दों पर भी फुँक फुंक कर चलते तब सब अपने थे..पराया न था कोईअब अपने परायों के बीच फर्क ढुँढता हर कोई
थंडीची गुलाबी चादरधुक्याचा शुभ्रसा पदरआसमंती आनंदाची लहरउन्हाचा उबदार वावरकरतोय गारुड मनावरआला सण मकरसंक्रांतीकरु एकमेकांची कदरतुमच्या आमच्या नात्याला न लागो कुणाची नजरसगळ्या दु:खसंकटांनादेऊ एक जोरदार टोलातिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला..