गच्च दाटलेल्या नभातून,गडद जलद कोसळत आले |उष्णावलेल्या धरित्री सह …अधिर मनास चिंबवून गेले ||
Category: Short Poems
श्रीराम
तुला हवे ते तितुके तू खावेउरे अन्न ते व्यर्थ वाया न जावेतसे ज्ञानही तू इतरांसी देईमना दासबोधीच हा बोध घेई।।श्रीराम।।
पहाट दर्शने भास्करा,नित्य लालिमा लपेटे धरा |आले खुलून तवं वदन…उगवताच प्रीत तारा ||
माय गंss
आठवतो स्पर्श तिचा येथील प्रत्येक ठिकाणी,उगीचच मग स्वतः हात फिरवुनीघेते तो अनुभवुनी….कुठे हरवला तो स्पर्श?ते श्वास ते मायेने पाहणारे डोळे!साऱ्या सुखाच्या राशी,केल्या जरी रित्या तरी,ते प्रेम ना मिळे!आठव आठव आठवांचा,पिंगा घालुनी साद घालीते अंतरातुनी…होतीस तोवरी न जाणले,महत्व तुझ्या असण्याचे..प्रत्येक टप्प्यावर आयुष्याच्या आता,या जिवाला सलते तुझ्या नसण्याचे…..काय सांगावे दुःख बापुडे होऊन गेले….माय तुझ्यासवे जगण्याचे आयुष्य राहून गेले……
आईsss
फक्त आजच मातेची आठवण काढण्यास,मन माझे धजावत नाही…तीच तर आहे माझ्या ठाई ठाई…तिनेच दिले जगण्याचे धडे,आणि भरले ज्ञाना मृताचे घडे…दृष्टीआड जरी तू जहालीस,क्षणाक्षणाच्या आनंदी जगण्याची,किमया तूच साध्य करुनी दिलीस….दिलेस प्रेम आत्मा तव रिता करून…उतराई नच होणार तुझी,जीवन जरी गेले सरून….
आईस…
निघून गेलीस तू दूरच्या प्रवासाला!संस्काराची शिदोरी देऊन ती आम्हाला !माहीत होते की हा प्रवास आहे अटळ..पण माहीत नव्हते हीच आहे ती वेळ!कितीक वर्षांच्या, दिवसांच्या क्षणांच्या च साक्षी!मनी बघता फोटोत द्रुष्यरूप तेची!डोळ्यासमोर येते ती तुझीच मूर्ती!पाणीदार तुझे डोळे येती नजरेपुढती!दिवस जातील, पुन्हा रूळून जाऊजीवनाशी !काव्य रूपी ही श्रध्दांजली तुझ्याचरणाशी !
दिवस आंब्याचे!(बाणाक्षरी)
वागुनी शहाणपणाने मान महाराष्ट्राचा वाढवावाआठवुनी चरीत्र शिवराय, बाजीरावांचे, पराक्रम मनी जागवावाटिळक, सावरकर, आगरकर गोखले आणिक कितीतरीत्याग त्यांचा आज आठवावायावे रामराज्य पुन्हा ह्या मऱ्हाटदेशी, मनामनात वन्ही हा चेतवावाझिजले जे आत्मे या मातीस्तव, मानुनी ऋण त्यांचे, प्रत्येक मनी वंदे महाराष्ट्र शब्द उठावा
माळूनी गच्च मोगरा,केश- नागीण धुंदावली |नजरेतुनी प्रीत डंख बसता …उभी काया थरारली ||
उभारू या गुढी!
कर्तव्याची ही गुढीतिला धैर्याची फांदी, माधुर्याची साखरमाळ,आनंदाची रंगीबेरंगी फुलमाळ सर्वसमावेशक गडूलासद्विचारांचा शेला लावूआरोग्याची मानसगुढी ही उभारुजीवन अधिकाधिक समृद्ध बनवू