गुणाधिश तो … तोचि विघ्नहर्ता,आगळे वेगळे रूप तयाचे |पाहुणा नसेची तो सकळांचा …जणू मंगल नाते मित्र-सख्याचे ||
Category: Short Poems
श्वासातील गंध केवड्याचा,अवचित उडून गेला |कोरड्या ह्या नेत्र ज्योती …जोजवितात नाजूक मेंदीला ||
चूड लागता जपलेल्या स्वप्नांना,नजरेत दिसते वास्तव भीषण |दाहकतेचे डंख तन- मनास …सोसून उरते वेदनेचे मी पण ||
आगळा वेगळा छंद हा लागला,चोरून क्षणभर तुला बघण्या |रिता पाहता चौकट-उंबरा…भग्न हृदय अन कळा जीवघेण्या ||
बंदिशालेत जन्मला,गोकुळी नांदला |अक्षय गीतेमधुनी…विश्वाला उमगला ||
वेदनेस आठवण आली,राहतोस कसा तूं मजविना |साथ तुझी न सोडणे आता…जगायचे क्षण तुज प्रियेविना ||
बांधली चिंधी तिने,हरीच्या बोटाला |जागला भगिनी प्रेमा …संकट समयी वस्त्रहरणाला ||
शब्दावाचून मज कळला,झंकार तुझ्या मनाचा |उमटले गीत डोळ्यांत …छेडीत दिलरुबा हृदयाचा ||
मोगरा फुलला,उंबरी घमघमला |नजर मिळताच …हृदयी विराजला ||
आसमंती टाळ वाजतीभीमेकाठी भक्त नाचती विठूची आस लागतीपाऊले चालली पंढरीची तुका ग्याने चाल रचलीझांज वाजवित वारी चालली ग्यानबा तुकाराम चा जल्लोष करतीवाट चालती पंढरीची पोहचूनी पंढरीत नमन करती माऊलीसहोऊन पावन चंद्रभागेत लागली ओढ विठूची आम्हास