हे स्त्रीये तू गती आहेस….साऱ्या सृष्टीला चैतन्याचे अमृतपान करणारी सती आहेस…..तुला तुझ्याच साठी फक्त एक दिवस ठेवून मानवाने त्याची अल्पमती दाखविली आहे…..तरी तुला आजच्या दिवसा बरोबर … प्रत्येक दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा प्रदान करते……तूच शुभदायी……तुच सुखदायी….तूच तारा तूच मंथरा….. तूच मंदोदरी तूच शूर्पणखा…..तूच गृहिणी, तुच जगत जननी…तूच निर्मिती तूच विध्वंसीनी…तुझ्या स्वरूप कुरूप सर्व रूपाला कोटी कोटी प्रणाम……🙏🏻तुझ्यात शक्तीतील” मी’ एक
Category: Short Poems
पिळ..
आई-वडिलांचं छत्र होतं डोक्यावर तोवर आपले हट्ट पुरवून घेण्याचा पिळ होता.. जबाबदारी खांद्यावर आली तेव्हा कर्तव्यबुद्धीचा पिळ होता.. मुलांना त्यांच्या आवडीनुसार वाढू देण्यासाठी कधी-कधी स्वतःच्या मतांना घातलेली मुरडही होती.. वार्धक्याकडे कूच करताना मात्र त्याने ठरवलं आता सगळेच पिळ सोडायचे आणि फक्त मुळांसारखा आधार बनून रहायचं.. फळं-फुलं-पक्षी अंगावर खेळवत आणि खोल-खोल जाणिवा रुजवत..
कलंकित कळी
क्षणिक मोहा पायी आयुष्य बाटले गेले..आयुष्याचे दान मग पसा पसा वाटत गेले…लक्तरे होताना देहाची,काळीज दगडाचे करू लागले..तारुण्य ओघळले, नजर थिजली …अवशेष या प्राक्तनाचे मीच गोळा करू लागले….नित्य सरणावर जाताना मरणाचे दान मागु लागले…
दिवा वंशाचा उजळला घरी,अन,आयुष्य ओवाळिले दुसऱ्यासाठी |स्मरण व्हावे आज सकल तयांचे …जिथे न चिरा … न तेवते पणती ||
बरसून गेले आज अवेळी ,आतुरलेले मेघ नभीचे |शिल्प असे की तू न कळे …चिंब ओले त्या पारावरचे ||
माझे मी पण,तडजोडीत संपले |जोडता जोडता …आयुष्य सरले ||
ती सांजवेळ साजिरी,ओली निथळून आली |कंपित आवेग अधरी …लाजून पाकळी मिटलेली ||
सहज मिळते आयुष्य!सुख आपण शोधायचे..आनंद देताना, आनंद घ्यायला शिकायचे!दसरा सण मोठा!रागाचे लोभाचे उच्चाटन करायचे!समाधानी राहताना…इतरांचे समाधानी हास्य पाहायचे….सोने लुटायचे!सोने मिळवायचे…बाकी आयुष्य!सोन्यासारखी माणसे, जोडायचे….
बूंदाबांदी से प्रफुल्लित था मनअब भयभीत होता हूँ बिन मौसम तु बरसता हैंसबकुछ बहता देख रहा हूँ किलकारीयोंसे विचलित हैं मनसूंखी आंखोंमें भूख देख रहा हूँ बहते पानी का तांडव हरजहाँकुछ निवालों की फिराक में हूँ !
चंद्र मनी आज माझ्या, अन तिच्या हृदयातही…..नयनी नेत्र गुंतले, अन चांदणे गात्रांतुनीगोजिऱ्या चंद्राच्या साक्षीत प्रीत फुले ही साजिरीतिची नजर पीत आज माझी ‘कोजागिरी’ …. ll