आठवतो स्पर्श तिचा येथील प्रत्येक ठिकाणी,उगीचच मग स्वतः हात फिरवुनीघेते तो अनुभवुनी….कुठे हरवला तो स्पर्श?ते श्वास ते मायेने पाहणारे डोळे!साऱ्या सुखाच्या राशी,केल्या जरी रित्या तरी,ते प्रेम ना मिळे!आठव आठव आठवांचा,पिंगा घालुनी साद घालीते अंतरातुनी…होतीस तोवरी न जाणले,महत्व तुझ्या असण्याचे..प्रत्येक टप्प्यावर आयुष्याच्या आता,या जिवाला सलते तुझ्या नसण्याचे…..काय सांगावे दुःख बापुडे होऊन गेले….माय तुझ्यासवे जगण्याचे आयुष्य राहून गेले……
Category: Short Poems
ओष्ठपर्ण
मनातले गाणे माझेशब्दात उतरणार होते एकटाच इथे मीआशेने काळीज झुरत होते वाट तुझी पाहतानामाझाच मी ना राहिलो गाण्यासाठी गीत तुझे तेओष्ठपर्ण बनून रंगलो
जगलेले ते क्षण सोनेरी,संगे तुझिया अल्पकाळा साठी |विखुरलेल्या आज त्या सयी…जणू सुटलेल्या रेशीम गाठी ||
घाव काळजातले की भाव डोळ्यांतले,समजावून देतात खरा अर्थ नात्याला |माझी माझी म्हणून नाती बाकीची…असतात फक्त ओझी वाहायला ||
पाळताही येत नाही,नाही जवळी ठेवता |सवे तिच्या जगूनही …‘ वेदना ‘… न येई जगता ||
अमावस्येचा अंधार संपुन उगवली चैत्र शुद्ध प्रतिपदाजाऊदे सरुन सारे दु:ख, त्रास दैन्य अन आपदा.. नव्या पालवीपरी फुटु दे आशांचे धुमारेगगनावरी जाऊदे मनीच्या स्वप्नांचे मनोरे.. नववर्षदिनी आज घेऊ संकल्प आगळासत्कर्माने उजळूदे आयुष्य सोहळा.. यशकिर्तीची गुढी उंच उंच चढु देसुखसमाधान सदा घरीदारी नांदु दे… हीच प्रार्थना आमची चरणी ईश्वराच्यागुढीपाडवा देऊन जावो तुम्हाला आठवणी सुखाच्या..
नववर्षाची गुढी…
आयुष्याची गुढी..
आयुष्याच्या उंच गुढीवर,सद्भावनांचे वस्त्र ! सुखदुःखाच्या आठवणींची,कडुलिंबाची फांदी ! आनंदाचे क्षण वेचणारी,रंगीबिरंगी फुलमाळ ! त्यावरी शोभे निरोगी,आरोग्याची साखरमाळ ! सर्वांस बांधतो धागा,आपल्या संचिताचा ! वरती चमके सोनेरी,सुंदर गडू रामभक्तीचा !
मानसगुढी
उभारू या गुढी! कर्तव्याची ही गुढीतिला धैर्याची फांदी, माधुर्याची साखरमाळ,आनंदाची रंगीबेरंगी फुलमाळ सर्वसमावेशक गडूलासद्विचारांचा शेला लावू आरोग्याची मानसगुढी ही उभारुजीवन अधिकाधिक समृद्ध बनवू
रंग बरसले,तनूवर सजले |मनात झिरपताच …श्रीरंग अवतरले ||
हे स्त्रीये !….
हे स्त्रीये तू गती आहेस….साऱ्या सृष्टीला चैतन्याचे अमृतपान करणारी सती आहेस…..तुला तुझ्याच साठी फक्त एक दिवस ठेवून मानवाने त्याची अल्पमती दाखविली आहे…..तरी तुला आजच्या दिवसा बरोबर … प्रत्येक दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा प्रदान करते……तूच शुभदायी……तुच सुखदायी….तूच तारा तूच मंथरा….. तूच मंदोदरी तूच शूर्पणखा…..तूच गृहिणी, तुच जगत जननी…तूच निर्मिती तूच विध्वंसीनी…तुझ्या स्वरूप कुरूप सर्व रूपाला कोटी कोटी प्रणाम……🙏🏻तुझ्यात शक्तीतील” मी’ एक