पावसाचं धुमशान जोरात चाललंय,परतीचे वेध आकाश मोकळं होऊन आवरायला लागलंय! विजा तांडव नृत्य करून कडाडून घेतायत,ढगांचा गडगडाट हत्ती च्या टकरी चा चित्कार काढत गरजतायतधडकी भरवणारा थयथयाट करून मानवाला नीट राहण्याचा संदेश देतय. धरतीमातेला दिलेले भरभरूनत्याचं असं अस्ताव्यस्त कोसळणं भूमातेला असह्यझालंय.. बळीराजाचे रुदन प्रपातात विरघळून गेलय..तरीही त्या पावसाचे धुमशान जोरात चाललय… वाटेतील सर्व प्राणिमात्र भिजवत तुडवत नाश करत चाललंय… कोसळताना सौदामिनी अनेकांचे जीव घशात घालतेय….राहणारा मागे वेदनेचा दाह सहन करत चाललाय..जळणारे जीवन पुनश्च पावसाच्या आशेने शांत होत चाललय….. असं हे निसर्गाचे ऋतुचक्र अविरत चाललंय….
Category: Long Story
राजहंस …
त्या गावकुसाबाहेरच्या सुंदर तलावा शेजारी कुणा पुण्यश्लोक दानशूर व्यक्तीने अनाथ लेकरांसाठी अनाथालय बांधले होते, ‘ बालोद्यान ‘ … तलावा भोवतालच्या गर्द राईतल्या पक्ष्यांच्या किलबिलाटासारखाच बालोद्यानात अखंड किलबिलाट चालायचा. तिथे अगदी तान्ह्या बाळापासून ते 10-11 वर्षे वयोगटातील मुलं … बालोद्यानात दंगा, मस्ती, इतर खेळ आणि त्याच बरोबर अभ्यासही व्हायचा. सकाळच्या प्रार्थनेपासून ते संध्याकाळच्या शुभमं करोति आणि रात्री झोपण्यापूर्वी रामरक्षा सगळं न चुकता म्हटलं जायचं. अनाथालयातील सगळे कर्मचारी हेच त्या मुलांचे मायबाप. बालोद्यानातील एक पाखरू मात्र इतरांपेक्षा वेगळं … सचिन … वय जेमतेम 9-10 वर्ष. पण दैवदुर्विलासाने जन्मानंतर डोळे उघडले तेच मुळी ह्या बालोद्यानात.एका अंधारलेल्या रात्री आई दरवाज्यात ठेऊन गेली ते न परतण्यासाठी.त्या अभागी तान्हुल्याच्या जन्मदात्या बापा बद्दल सगळ्यांनाच प्रश्न होता. नंतर मात्र बालोद्यानातील माई, अक्का ह्याच त्याच्या माय-बाप झाल्या. त्यांनीच त्याचं नामकरण केलं आणि त्याला स्वतःची ओळख दिली. सचिनचं जग म्हणजे माई आणि बालोद्यान. जन्माला यायच्या अगोदर पासूनच सचिन जणू नियतीचे फटके खात होता. जन्मला तोच ओबडधोबड कुरूप असं रूप घेऊन. बटबटीत डोळे, फेंदारलेले नाक, आणि काळ्या रंगा कडे झुकणारा वर्ण. ह्याच कारणामुळे सचिनची बालोद्यानाशी नाळ जुळली गेली. आश्रमातील कर्मचारी हेच त्याचे नातेवाईक.आज मात्र सचिन परावलंबी होता. नशिबाने त्याला अजून एकदा फटकारले होते. 3 वर्षाचा असतानाच बाह्य रुपाबरोबरच नियतीने सचिनला अजून एक कडू जहरी डोस पाजला होता. सचिन विकलांग होता. इतर कुणाच्या मदती शिवाय तो धड उभा राहू शकत नसे. स्वतःहून चालणे तर फारच दूर. बालोद्यानात त्याच्यावर उपचार चालू होते. माई स्वतःहून त्याकडे लक्ष ठेऊन होत्या. कारण एकच… सचिनला लाभलेली तीक्ष्ण बुद्धी. नियतीने एका हाताने रंगरूप काढून घेतले मात्र, दुसरा हात सरस्वतीच्या रूपाने सचिनच्या मस्तकी ठेवला होता. आशीर्वाद दिला होता … नियती तिचा लाडका खेळ खेळून गेली होती. “ सचिन … ए सचिन… अरे कुठे आहेस तू ?” माईंची हाक बागेत व्हिलचेअरवर बसलेल्या सचिनच्या कानी पडली. त्याने आज जाणून दुर्लक्ष केलं. पण अनुभवी माईंच्या ते लक्षात आलं. त्या जवळ आल्या आणि त्याच्या केसांतून हात फिरवत म्हणाल्या,” काय रे ? आज रागावलायस माझ्यावर? “ सचिनने मान फिरवली आणि तो दुसरीकडे पाहू लागला. “ काय झालं बाळा ?” माईंनी अत्यंत प्रेमाने विचारलं. “ मला सगळ्यांचा म्हणजे आक्ख्या जगाचाच राग आलाय.” सचिन उत्तरला. माईंना हसू आलं पण तसं न दाखवता त्या म्हणाल्या “ बापरे ..! म्हणजे त्या जगात तुझी ही माईपण आहे का? “ सचिन निरुत्तर झाला. त्याला माईंच्या विचारण्यातली खोच कळली. पण काय बोलावे ते सुचेना. सचिन गप्प बसलेला पाहून माई हसल्या. त्याच्याकडे पहात माईंनी विचारलं “ आज काय झालंय तुला ? नेहमीचे व्यायाम, दूध, ब्रेकफास्ट काहीच केलं नाहीस तू ? मला नाही सांगणार का ?” सचिनने माईंकडे तिरपा कटाक्ष टाकला. म्हणाला “ नाही ..मी तुलाच काय कोणालाच काही सांगणार नाही .” माईंना पुन्हा हसू आलं. त्या परिस्थितीत सुद्धा त्यांना बरं वाटलं. कारण बालोद्यानात माईंना कुणीही अगं तुगं करत नव्हतं … सगळेजण त्यांना अहो माई अशी हाक मारायचे. सचिन मात्र हक्काने त्यांना ए माई अशीच हाक मारायचा, अगदी कळायला लागल्यापासून. आश्रमातल्या इतरांना माई म्हणायच्या देखील… ह्या पोराचं आणि माझं काय नातं आहे ते त्या ईश्वरालाच माहीत. एक मात्र होतं … सचिनने मारलेली हाक माईंना सुखावून जायची. त्या नकळत शहारायच्या. अश्यावेळी त्यांच्या डोळ्यांत मात्र एक प्रकारची खंत दिसायची. मनाशीच म्हणायच्या … “ काय नशिबात वाढून ठेवलंय देव जाणे…” माईंनी पुढ्यात असलेल्या सचिनकडे पाहिलं. “ बरं बाबा ..! नको सांगूस. अरे, मी कोण लागते रे तुझी.? कोणीच नाही ना …?” इतकं बोलून माई परत जाण्यासाठी वळल्या. पाठमोऱ्या असलेल्या सचिनला त्याची चाहूल लागली. भरकन व्हीलचेयर वळवून माईंना सामोरा आला. त्याचा चेहरा उतरला होता. कावराबावरा झालेल्या सचिनकडे माईंचं लक्ष गेलं आणि त्या त्याच्या खुर्चीसमोर गुढग्यावर बसल्या. सचिनला माईंच्या चेहऱ्यावरची वेदना कळली आणि पुढच्या क्षणीच तो माईंच्या मिठीत विसावला. त्याच्या गदगदणाऱ्या शरीरावरुन हात फिरवत असलेल्या माईंनी त्याला शांत होण्यास वेळ दिला. सचिन शांत झाला आणि झालेला प्रकार त्याने माईंना सांगितला. आजचा दिवस उजाडला तोच एका विचित्र प्रसंगाने. इतका वेळ बाकीच्या समवयस्क मुलांबरोबर खेळत असलेला सचिन अचानक संतापाने पेटून उठला. मूळचाच ओबडधोबड कुरूप असा चेहरा विचित्र दिसत होता. लाल झालेले डोळे अजूनच बटबटीत झाले होते. झालेल्या अपमानाने थरथरत बसलेला सचिन व्हीलचेयरच्या हँडलवर डोकं आपटत होता. कुणीतरी माईंना घेऊन आलं. शिपायाला सांगून सचिनला आत ऑफिसमध्ये आणलं. पाणी पिऊन सचिन शांत झाला, नव्हे माईंनी त्याला शांत होऊ दिला. त्याच्या चिडण्याचं कारण ऐकून त्याही हेलावून गेल्या. पिंट्याने सचिनला त्याच्या व्यंगावरून सगळ्या मुलांसमोर चिडवले होते. बटबटीत डोळे आणि ओबडधोबड शरीरावरुन पिंट्याने फुगलेला बेडूक म्हणून सचिनला हिणवले. पिंट्याबरोबरच्या मुलांनी त्याची री ओढली. सगळ्यां- समोर झालेल्या अपमानामुळे सचिन असाह्यतेने आणि अगतिकपणे व्हील चेअरवरच कोलमडला. त्याच्याबद्दल डोळ्यांत अपार कणव आणि ममत्व वसलेल्या माईंनी मनाशी एक निश्चय केला. त्यांना सचिनच्या बुद्धीची कुवत माहीत होती. त्याच दिवशी माई सचिनशी बोलल्या. खूप वेळ बोलत होत्या. सचिन आता पूर्णपणे शांत झाला होता. बालोद्यानातल्या संगीत शिकवणाऱ्या बाईच्या गळ्यातून निघणारे गाण्याचे सूर कानावर ऐकू येत होते… एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एक… माईंचं अत्यंत आवडतं गाणं . पण त्यापेक्षा त्या गाण्याची शेवटची ओळ त्यांना अत्यंत प्रिय होती … तो राजहंस एक… माई सचिनबद्दल ह्या गाण्या इतक्याच आशावादी होत्या. त्या प्रसंगानंतर सचिन आमूलाग्र बदलला. त्याच्या दृष्टीने बाह्य रूप-रंग आता गौण होते. कुणी कितीही चिडवलं तरी तो हसून दुर्लक्ष करायचा. माईंच्या बोलण्याचा सचिनवर खोलवर परिणाम झाला होता. एका विशिष्ट ध्येयाने पछाडून सचिनने त्याची दिशा ठरवून वाटचाल सुरु केली होती. माई भक्कमपणे पाठीशी होत्याच. त्याची उत्तरोत्तर होत असलेली शैक्षणिक प्रगती वाखाणण्यासारखी होती. आज सचिनकडून एक दैदिप्यमान अशी कामगिरी झाली. त्याच्या शाळेत आणि बालोद्यानात जणू दिवाळी साजरी झाली. सचिन राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकला होता. गळ्यात सुवर्ण पदक घेऊनच तो परतला होता. सचिनने त्याच्या शाळे बरोबरच बालोद्यानचे नाव उज्ज्वल केले. माईंना त्याचा सार्थ अभिमान होता. दिवस पुढे सरकत होते आणि बालोद्यान सचिनच्या नव्या नव्या प्रगतीचा सोहळा साजरा करीत होते. आज, माई त्यांच्या ऑफिसमध्ये आश्रमाच्या कामासंदर्भात इतर स्टाफशी चर्चा करीत होत्या. इतक्यात शिपाई दार ढकलून आत आला. “कुणी बाई भेटायला आल्यात, इथे काम मिळेल का असं विचारतायत”. इतकं सांगून शिपाई निघून गेला. हातातले काम संपवून माई बाहेर आल्या. खिडकीतून बालोद्यानाचा परिसर पाहण्यात मग्न असताना त्या बाईंच्या कानावर आवाज आला ‘ कोण आपण ‘? आणि काय हवंय तुम्हाला ?” बाईंनी वळून पाहिलं, त्या दोघिंची नजरानजर झाली मात्र माई तिथेच मटकन खाली बसल्या. विस्फारलेल्या डोळ्यांनी समोरच्या नाकी डोळी नीटस असलेल्या बाई कडे पहात राहिल्या. शालू …! माई स्वतःशीच कुजबुजल्या. त्यांच्या समोर 12-13 वर्षांपूर्वी घरातून एका पुरुषाचा हात पकडून पळून गेलेली त्यांची लहान बहीण उभी होती. अचानक पणे समोर उभ्या ठाकलेल्या बहिणीला बघून मिनिटांपूर्वी अस्वस्थ झालेल्या माई आता सावरल्या होत्या . अजून शालूने माईंना…
पीके
माँलमध्ये काहीतरी घेत असतांना तो मला दिसला. हो. नक्की तोच होता. मी दोनतीनदा त्याच्याकडे बघून खात्री केली. हो. तो पीकेच होता. पुर्वीसारखा तो अजागळ आणि बावळट दिसत नव्हता. पहिल्यापेक्षा त्याची तब्येतही चांगली झालेली दिसत होती. डोळ्यांवरचा फ्रेमलेस चष्मा आणि पायातले स्पोर्ट्स शुज त्याला स्मार्ट बनवत होते. उंची मात्र तेवढीच होती. असेल साडेपाच फुट. त्याचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. तो कपडे बघण्यात मग्न होता आणि मलाही त्याचं लक्ष वेधून घ्यायचं नव्हतं. तो इथे पुण्यात काय करतोय हेही त्याला विचारायची मला इच्छा नव्हती. काँलेजमध्ये एकत्र होतो तेव्हापासूनच मला तो आवडत नव्हता. मी काँलेजचा हिरो होतो. सणसणीत सहा फुटाची उंची आणि कुठल्याही बाँलिवूड हिरोसारखा देखणा चेहरा. त्यातून रोजच्या व्यायामाने कमावलेली पिळदार शरीरयष्टी. त्यामुळे मी काँलेजमध्ये लोकप्रिय होतो. विशेषतः मुलींमध्ये. आमचा एक श्रीमंत मुलांचा ग्रुप होता. सगळे उंच आणि देखणे.सगळे आमच्या महागड्या बाईक्सनी काँलेजमध्ये येणारे.या ग्रुपमध्ये बुटक्या, स्मार्ट नसणाऱ्या मुलांना प्रवेश नव्हता. सायकलने काँलेजात येणाऱ्या पीकेने आमच्या या ग्रुपमध्ये यायचा बऱ्याचदा प्रयत्न केला पण आम्ही त्याला हाकलून द्यायचो. साहजिकच होतं, राजहंसांच्या ग्रुपमध्ये आम्हांला हा कावळा नको होता. माझं सामान घेऊन मी कँश काऊंटरकडे निघालो. तेवढ्यात…“अजिंक्य. ए अजिंक्य” आवाज आला तसं मी वळून बघितलं तर पी.के.माझ्याजवळच उभा होता.“तुम्ही अजिंक्य देसलेच ना?”“हो. तुम्ही?”माहित असुनही मी त्याला मुद्दामच प्रश्न केला.“अरे मी प्रथमेश काळे. तुम्ही मला पीके म्हणायचे बघा”मी मुद्दामच प्रश्नार्थक चेहरा केला.“पीके? आठवत नाही बुवा. कधीची गोष्ट आहे ही?”“अरे आपण धुळ्याच्या जयहिंद काँलेजमध्ये नव्हतो का एकत्र? तुम्ही सायन्सला होतात. मी काँमर्सला होतो. पण बऱ्याच कार्यक्रमानिमित्ताने आपण एकत्र येत होतो. अमित भंडारी, सुदेश साखला, सुमित देशमुख असे तुमचे मित्र होते बघा”आता ताणण्यात अर्थ नाही हे पाहून मी म्हणालो“अच्छा अच्छा! आलं लक्षात. पीके! येस आठवलं. पण तू इथं पुण्यात काय करतोयेस पीके?”“माझी बदली झालीये इथे कलेक्टर आँफिसला. अजून जाँईन नाही झालो. सोमवारी होणार आहे.तू सध्या कुठे आहेस?”“मी ग्रँज्युएशन नंतर एमसीए केलं .चारपाच वर्ष नाशिकला होतो. गेल्या दोन वर्षांपासून इथं साँफ्टवेअर इंजीनियर आहे. इथं नऊ लाखाचं पँकेज आहे मला “मी अभिमानाने सांगितलं.“अरे वा! खुप छान!”मग आमच्या थोड्या फार गप्पा झाल्या लग्न, मुलं, घर, जुने मित्र यांच्याबद्दल जुजबी बोलणं झाल्यावर तो म्हणाला“तुझा पत्ता दे. एखाद्या रविवारी येतो तुझ्याकडे. मस्त गप्पा मारु. पुण्यातल्या आपल्या मित्रांनाही बोलावून घे”मी न बोलावताच पीके माझ्या घरी यायचं म्हणत होता. त्याच्या लोचटपणाचा मला रागच आला. काँलेजमध्ये असतांनाही तो असाच लोचटपणा करायचा.“तू येणार असशील त्याच्या दोनतीन दिवस अगोदर मला फोन कर. मी तुला पत्ता सांगेन “मी त्याला टाळण्याच्या द्रुष्टीने म्हणालो. मग त्याने माझा मोबाईल नंबर घेतला. औपचारिकता म्हणून मग मीही त्याचा मोबाईल नंबर सेव्ह करुन घेतला.घरी जाताजाता पीकेच्या काँलेजमधल्या बऱ्याच आठवणी जाग्या झाल्या. एका नाटकाच्या रिहर्सलच्या वेळी माझी आणि त्याची पहिली भेट झाली होती. मी नाटकाचा हिरो होतो तर पी.के.आँफिस बाँयच्या भुमिकेत होता. इनमीन दोनतीन मिनिटाची त्याची फालतू भुमिका होती. त्यानंतर पीके भेटत गेला. त्याच्या पीके नावावरुन आम्ही त्याची खुप टिंगलटवाळी करायचो. पण पीके कधी रागावला नाही. चिडला नाही. सगळे त्याची चेष्टा जरी करत असले तरी तो विद्यार्थ्यांमध्ये बराच लोकप्रिय होता हे मी बऱ्याचदा अनुभवलं होतं. याला कारण म्हणजे पीके सगळ्यांच्या मदतीला धावून जायचा. त्याची स्वतःची आर्थिक स्थिती फारशी चांगली नव्हती तरीही तो अडल्यानडलेल्यांना जमेल तशी मदत करायचा. मी घरी आलो. बायकोने उशीर झाल्याचं कारण विचारल्यावर मी तिला पीके भेटल्याचं सांगितलं. तिलाही पीके या नावाची मोठी गंमत वाटली. रात्री पीकेचा विचार करताकरता मला स्वप्ना आठवली आणि मन हळवं होऊन गेलं. काँलेजमध्ये असतांना मी या स्वप्नासाठी वेडा होऊन गेलो होतो. ती होतीच तशी अप्रतिम सुंदर, गोरीपान, पाणीदार बदामी डोळ्यांची,लांबसडक केसांची. मीच काय आख्ख्या काँलेजची पोरं तिच्यावर मरत होती. तिला पटवण्यासाठी मी काय काय उद्योग केले होते. मेसेजेस काय, चिठ्ठ्या काय, फुलं काय पण पोरीने शेवटपर्यंत दाद दिली नव्हती. नोकरी लागल्यावर स्वप्नाच्या तोडीची मुलगी मिळावी म्हणून मी तब्बल ५२ मुली बघितल्या. शेवटी कंटाळून मी अर्पिताशी लग्न केलं. अर्पिताही स्मार्ट होती पण स्वप्नाची सर तिला कधीच येणार नव्हती. तसा मी आता सुखी होतो. तीन वर्षाची गोड मुलगी मला होती. बायको, मुलीसोबत मी सुखाने संसार करत होतो. पण कधीतरी स्वप्नाची आठवण यायची आणि मन हळवं होऊन जायचं. चारपाच दिवसांनीच पीकेचा मला फोन आला.“अजिंक्य उद्या रविवार आहे. फ्री असशील तर येऊ का तुझ्याकडे? आणि आपल्या जयहिंद काँलेजच्या मुलांपैकी जे पुण्यात आहेत त्यांनाही बोलावून घे. तेवढंच जुने मित्र भेटल्याचं समाधान मिळेल”“मी जरा बायकोला विचारुन घेतो. ती फ्री असेल आणि आम्हांला कुठं बाहेर जायचं नसेल तर मग तसं सांगतो तुला “मी त्याला टाळण्याच्या द्रुष्टीने म्हणालो. खरं तर रविवारी अर्पिताला काय आम्हांलाही कुठंच जायचं नव्हतं. पण पीकेशी मला मैत्री वाढवायची नव्हती.“अहो येताहेत तर येऊ द्या ना तुमच्या मित्राला. असंही इथे पुण्यात कोण कुणाकडे जातंय? प्रत्येक जण आपापल्या कोषात गुरफटलेला. येऊ द्या त्यांना, आपल्यालाही चांगलं वाटेल “शेजारीच उभी असलेली अर्पिता म्हणाली. तिचं बोलणं कदाचित पीकेने ऐकलं असावं या भितीने मी पटकन त्याला म्हणालो.” ये रे पीके. माझी बायको हो म्हणतेय”” ठिक आहे. मी संध्याकाळी शार्प सहाला येतो. तुझा पत्ता मला व्हाँटस्अपवर पाठव आणि हो वहिनींना सांग मी फक्त चहा घेई“बरं बरं. सांगतो”संध्याकाळी मी माझ्या काही मित्रांना पीके बद्दल सांगितलं. पण कुणालाच पीकेत इंटरेस्ट नव्हता. कुणीच यायला तयार झालं नाही.दुसऱ्या दिवशी बरोबर सहा वाजता पीके आला. तो रिक्षाने आला की कँब करुन आला हे विचारायचं मनात असूनही मी त्याला विचारलं नाही. मी त्याची आणि अर्पिताची ओळख करुन दिली. माझी स्मार्ट बायको, गोड मुलगी आणि पुण्यासारख्या शहरातला माझा टू बीएचके चा फ्लँट याचं मला खुप कौतुक होतं. मी मोठ्या गर्वाने त्याबद्दल पीकेला सांगत होतो. पीके ते ऐकून “अरे वा!छान “असं वारंवार म्हणत होता. माझं स्वतःची स्तुती करणं झालं तसं पीकेने सोबत आणलेली बँग उघडली. त्यातून एक सुंदर बार्बी डाँल आणि कँडबरी चाँकलेटस् चा मोठा गिफ्ट पँक काढून माझ्या मुलीच्या हातात दिला. मुलगी एकदम खुश झाली. मग बँगमधून पर्स काढून माझ्या बायकोकडे पहात तो म्हणाला“वहिनी ही तुमच्यासाठी.मला बायकांच्या वस्तूतलं काही कळत नाही. जशी असेल तशी गोड मानून घ्या “” अहो खुप छान पर्स आहे आणि चांगलीच महागडी दिसतेय. याची काय गरज होती भाऊजी?”“असं कसं ?पहिल्यांदाच अजिंक्यच्या फँमिलीला भेटायला येतोय म्हंटल्यावर काहीतरी गिफ्ट आणायलाच पाहिजे ना?”” थँक्स् भाऊजी मला आणायचीच होती नवी पर्स ही कितीची आहे?”“जाऊ द्या वहिनी. किंमत सांगितली की गिफ्टची व्हँल्यू कमी होते”बायको हसून आतमध्ये गेली.असं अनपेक्षित गिफ्ट मिळालं की बायका प्रचंड खुश होतात हे मला अनुभवावरुन माहित होतं.तेवढ्यात पीकेने दोन अजून छोटे गिफ्ट बाँक्स काढले आणि माझ्या हातात देत म्हणाला.“हे तुझ्यासाठी परफ्युम आहेत. काँलेजमध्ये असतांना तू रोज परफ्यूम मारुन यायचास हे मला चांगलं आठवत होतं म्हणून तेच घेऊन आलो. तुझा चाँईस मला माहित नव्हता पण आणलेत अंदाजाने”मलाही आनंद झाला कारण मला खरोखरच परफ्यूमसची आवड होती. रोज परफ्यूम लावल्याशिवाय…
खंत
दारावरची बेल वाजली तशी योगिताने धावत जाऊन दरवाजा उघडला. बाहेर तिची मैत्रीण सुनंदा उभी होती.“ये ये सुनंदा. आज अचानक कसं येणं केलंस? बस, मी पाणी घेऊन येते”तिला पाणी देऊन योगिता तिच्या समोर जाऊन बसली. सुनंदाने पाणी पिऊन ग्लास टेबलवर ठेवला आणि हसून म्हणाली“अगं काही नाही, मी सध्या हैदराबादी मोत्यांच्या दागिन्यांचा बिझिनेस सुरु केलाय. म्हंटलं आज तुला सुटी असते तर दाखवावे तुलाही काही”“अरे वा! दाखव ना. आवडले तर जरुर घेईन मी!” योगिता हर्षाने म्हणाली. सुनंदाने बँग उघडली. त्यातून अनेक प्रकारचे दागिने काढून तिने टेबलवर मांडून ठेवले. ते दागिने पहात दीडदोन तास कधी उलटले तेच योगिताला कळलं नाही. त्यातून तीन हजाराचा नेकलेस आणि अडिच हजाराच्या बांगड्या तिने पसंत केल्या. तेवढ्यात आतमध्ये झोपलेली अनुजा बाहेर आली.“बाबा उठलेत का ग अनू?” तिने अनूजाला विचारलं.“हो. पुस्तक वाचताहेत” अनू म्हणालीयोगिता निवडलेले दागिने घेऊन बेडरुममध्ये गेली. पुस्तक वाचणाऱ्या अर्पितला ते दागिने दाखवत म्हणाली“अहो बघा किती सुंदर दागिने आहेत. आणि स्वस्तही आहेत. आपल्याकडे हेच दागिने दहा हजाराला मिळतील. विशेष म्हणजे सुनंदा यांची गँरंटी घेतेय” अर्पितने एक नजर त्या दागिन्यांवर टाकली मग पडलेल्या चेहऱ्याने तो तिला म्हणाला. “योगिता दागिने चांगले आहेत गं. पण तुला माहितेय सध्या आपली परीस्थिती कशी आहे ते!”अर्पितने तिच्या उत्साहावर पाणी फिरवलेलं पाहून योगिता संतापली“हे तुमचं नेहमीचंच आहे. काहीही उत्साहाने घ्यायला गेलं की लगेच तुमचा परीस्थितीचा बहाणा तयार असतो. आम्ही कधी हौसमौज करायचीच नाही का?” अर्पितचा चेहरा अजूनच केविलपणा झाला. त्याने काहीच उत्तर दिलं नाही. त्याच्या चेहऱ्यावरचा नकार ओळखून योगिता अजूनच बिथरली. त्याच्याकडे संतापाने पहात ती तणतणतच बाहेर आली. “राहू दे गं बाई सुनंदा, ते नाही म्हणताहेत”सुनंदा आश्चर्यचकीत झाली.“का गं? का नाही म्हणताहेत?”“नेहमीचंच कारण, सध्या पैसे नाहीत. माझं मेलं नशीबच वाईट. लग्नानंतर कधी माझी हौसमौज झाली नाही. नणदा आणि सासू-सासऱ्यांचं करण्यातच सगळं आयुष्य गेलं. स्वतःसाठी तर कधी जगताच आलं नाही” “पण योगिता, तू स्वतः कमावतेस. मग स्वतःसाठी काही खर्च करण्याचा तुला एवढासुध्दा हक्क नाही? एवढ्याशा पैशासाठी तुला नवऱ्याला विचारावं लागतं?”सुनंदाने आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला. तिच्या या प्रश्नावर योगिताचे डोळे भरुन आले. भरलेल्या गळ्याने ती सुनंदाला म्हणाली” हे असंच आहे बाई. मी म्हंटलं ना माझं नशीबच वाईट आहे म्हणून! जाऊ दे. पुढच्या महिन्यात मी नक्की घेईन किंवा मध्ये जमलं तर तुला फोन करते” “चालेल. पण लवकर कर. सध्या डिस्काउंट सुरु आहे. नंतर महागात पडतील दागिने”योगिताने मान डोलावली. सुनंदाने दागिने आवरुन बँगेत ठेवले आणि ती निघून गेली.अर्पित आतमध्ये हे सर्व ऐकत होता. योगिताचं बोलणं ऐकून तो चांगलाच दुखावला. सुनंदा गेल्याचा अंदाज आल्यावर तो बाहेर आला.रागावलेल्या योगिताला म्हणाला “योगिता या महिन्यात घरपट्टीचे पाच हजार भरायचे आहेत शिवाय अनुजाच्या क्लासची फीसुध्दा भरायची आहे” वस्तुस्थिती लक्षात आल्यावर योगिता जरा वरमली तरीही आपला राग कायम ठेवत म्हणाली“खर्च कधी नसतात हो आपल्याकडे? मग काय मरेपर्यंत आम्ही काही हौसमौजच करायची नाही?”“तसं नाही योगिता पण……..”त्याचं न ऐकताच ती रडतरडत आत निघून गेली. अर्पित तिच्याकडे बघत राहिला. तिचं मन त्यालाही कळत होतं. पण इलाज नव्हता. दोघांचं लग्न झालं त्याअगोदरपासून योगिता नोकरी करत होती. लग्नानंतर दोन नणंदा आणि नेहमी आजारी असणारे सासूसासरे यांच्या दिमतीतच दोघांचे पगार संपून जायचे. जी बचत ती कशीबशी करायची तीही नणंदांच्या लग्नात संपून गेली. कालांतराने सासूसासरे वारले. आतातरी खर्च करायला मोकळेपणा मिळेल असं वाटत असतांनाच एक टू बी एचकेचं स्वतःचं घर असावं असं योगिताला वाटू लागलं. घर तर झालं पण त्यासाठी अर्पितला कर्ज घ्यावं लागलं. त्याचा अर्ध्याहून अधिक पगार त्या कर्जाच्या हफ्त्यातच जायचा. योगिताच्या पगारावर घर चालायचं. अर्थातच मनमोकळेपणाने खर्च करायची योगिताची इच्छा अपूर्णच रहायची. जेव्हा बघावं तेव्हा मन मारुन जगणं तिला असह्य व्हायचं पण इलाज नव्हता.अर्पितचीही परीस्थिती काही वेगळी होती अशी नाही. त्यालाही पर्यटनाची खुप आवड होती पण पैसे नाहीत म्हणून आजपर्यंत तो कुठेच जाऊ शकला नव्हता. पैशाअभावी बायकोची होणारी चिडचिड त्यालाही दिसायची पण त्याचाही नाईलाज होता. त्यातून आता मुलं मोठी होत होती. त्यांचा शिक्षणाचा खर्चही खुप वाढला होता. अशा परिस्थितीत सगळी हौसमौज सोडून काटकसर करणं अत्यावश्यकच झालं होतं. बजेटचं काम अर्पितकडेच असल्याने खर्चाचा ताळमेळ बसवण्याचं जिकीरीचं काम त्यालाच करावं लागायचं. योगिता पगार झाला की सगळा पगार त्याच्या हातात देऊन मोकळी व्हायची. रुपया रुपयाचा हिशोब ठेवतांना त्याला नेहमीच बायको आणि मुलांची नाराजी सहन करावी लागायची. ती तो नाईलाजाने सहन करायचा कारण एक्स्ट्रा इन्कमचा कोणताही मार्ग त्याला दिसत नव्हता. पुढच्या महिन्यात योगिताचा पगार झाल्यावर तिने तो पगार अर्पितच्या हातात दिला. अर्पितने त्यातले दहा हजार काढून तिच्या हातावर ठेवले. तिने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं.“हे काय? परत का देताय?” तिने विचारलं“काही नाही. मागच्या महिन्यात तुला मोत्यांचे दागिने घ्यायचे होते ना, ते घेऊन ये.बऱ्याच वर्षात तुला साडी घेतलेली नाहीये. लग्नासमारंभात जाण्यासाठी एकदोन साड्याही घेऊन ये”योगिता आश्चर्याने त्याच्याकडे पाहून म्हणाली“काय लाँटरीबिटरी लागली की काय तुमची? एकदम दहा हजार? घरातल्या बाकीच्या खर्चाचं काय करायचं?” “करेन मी काहीतरी. तू नकोस त्याची काळजी करु” अर्पित म्हणालायोगिता खुश झाली. आयुष्यात पहिल्यांदाच मनसोक्त खरेदी करता येणार याचा तिला प्रचंड आनंद झाला. दुसऱ्या दिवशी कंपनीतून सुटल्याबरोबर तिने सुनंदाला फोन करुन दागिने घेण्यासाठी येत असल्याचं कळवलं. सुनंदाच्या घरी जाताजाता मध्येच बाजार लागत असल्याने ती बाजाराकडे वळली. साडीच्या दुकानाजवळ तिने स्कुटी लावली. आतमध्ये ती शिरणार तोच तिच्या मनात एक विचार चमकून गेला “खरंच का आपल्याला साड्यांची आणि दागिन्यांची इतकी गरज आहे? दुसरं काही महत्वाचं तर नाही?” या विचारासरशी तिने घरातलं चित्र डोळ्यासमोर आणलं. अनुजाचं-तिच्या मुलीचं दफ्तर फाटलं होतं. सौरभ-तिचा मुलगा क्लासला जाण्यासाठी बऱ्याच महिन्यांपासून सायकल मागत होता. पण ते शक्य न झाल्याने त्याला आवडत नसतांनाही त्याच्या मित्रांच्या बाईकवर जावं लागत होतं. आणि अर्पित…हो त्याचेही शुज फाटले होते. तीन वर्षापासून तो त्यांना वारंवार शिवून वापरत होता. गेल्या पाचसहा वर्षात त्याने नवीन कपडे घेतले नव्हते. तिला तरी मागच्या वर्षी नातेवाईकांच्या लग्नात दोन नव्या कोऱ्या साड्या मिळाल्या होत्या. तिला अचानक तिच्या वडिलांची आठवण आली. तेही स्वतःसाठी काहीही खरेदी न करता बायको-मुलांच्या आनंदासाठी पगार खर्च करायचे. कधी कोणी टोकलंच तर म्हणायचे “मला कोण बघतंय?हौसमौज करायचे दिवस तुमचे आहेत.तुम्ही चांगलं राहिलंच पाहिजे”.अर्पित तरी दुसरं काय करत होता? कर्ता पुरुष म्हणून कुटुंबाला पोसण्याची जबाबदारी त्याची होती. ती तो स्वतः हाल अपेष्टा सोसून पार पाडत होता. अचानक नवऱ्याच्या आठवणीने तिचे डोळे भरुन आले. “छे! खरी गरज अर्पित आणि मुलांना आहे. आपण काय दागिने आणि साड्या आताच घेतल्या पाहिजेत असं नाही. दिवाळीचा बोनस मिळाला की आपल्याला हट्टाने त्या घेता येतील” या विचारासरशी तिने निर्णय पक्का केला. ती वळली. स्कुटी घेऊन तिने आपला मोर्चा बुटांच्या दुकानाकडे वळवला. अर्पितसाठी तिने आठ नंबरचा चांगला दिडहजार रुपयाचा बुट, साँक्स घेतले. मग कपड्यांच्या दुकानात जाऊन तिने त्याच्यासाठी शर्ट, पँटचे दोन पीस घेतले. अनुजासाठी नवीन स्कुलबँग घेतली. इतर सटरफटर खरेदी करुन ती सायकलच्या दुकानात शिरली. पाचसहा हजारात चांगली सायकल येते हे ऐकून तिला आनंद झाला. ती घ्यायला मात्र…
* *आई **
आई – उच्चारलेले पहिले नावआनंद वेदना प्रत्येक प्रसंगात ओठी येणारे तेच नाव जवळ असते तेंव्हा नसते भानआणि नसते तेंव्हा अडते प्रत्येक पानमोठे झालो दूर गेलो पणआई पाशी कायम लहानच राहिलो सण-वार आले की तिच्या हाताची चव आठवतेआणि मनात उमाळे दाटून येतात मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात तिच्या अनेक आठवणी आहेततिच्या मुलालाच फक्त कळावेत असे काही शब्द आहेत आई असते घरातील एक धागाघरातील सगळ्या फुलाचा हार करूनत्यांना दाखवते योग्य जागापाऊस येतो ओले करून जातोआईच्या प्रेमाच्या पावसासाठी आपण कायमच आसुसलेले राहतोवर वर तिचे अस्तित्व जाणवत नाहीठेच लागली तर तिच्याशिवाय कोणाला साद जात नाही आई सर्वांची काही वेगळी नसावीमाझ्या सारखीच तुमची असावी खरच आई बाळाची माउलीआई भर उन्हात शांत सावली आई दुधातली मलईआई भांड्यांना तेजावणारी कल्हई आई जशी कृष्णाने द्रौपदीला दिलेली थाळीकधीही न संपणारी तिची प्रेमाची झोळी सर्व मातांना मातृदिनाच्या शुभेच्छा !!!
त्रिवार वंदन महाराष्ट्रा तुज
प्रिय प्राणाहुनी जन्मभूमी हीमहाराष्ट्र माझात्रिवार वंदन महाराष्ट्रा तुजजय जय जय गर्जा!।।उभा पाठिशी कणखर खंबीरबंधू सह्याद्रीसुखे लाभते भाव भक्तीचीनित्य तया तंद्रीआनंदवन भुवन येथेचिप्रतापी शिव राजात्रिवार वंदन महाराष्ट्रा तुज।१।सुपीक खडकाळी ही भूमीसुजला सुफला हीकृष्णा गोदा भीमा पावनपवित्र जलवाहीराष्ट्रभक्तीचे वंश नांदतीधन्य देश माझात्रिवार वंदन महाराष्ट्रा तुज।२।टिळकांची स्वातंत्र्यवीरांचीसावरकर यांचीदेशभक्तीची ज्योत तेवतेआजही तेजाचीसीमेवरती सज्ज सैन्य हेविजयी या फौजात्रिवार वंदन महाराष्ट्रा तुज ।३।संतांच्या पदस्पर्शे पावनवीरप्रसू मातीटाळ मृदुंगासवे तळपतीतलवारी पातीउच्च संस्कृती न्याय नीती तीआदर्श येथ प्रजात्रिवार वंदन महाराष्ट्रा तुजजय जय जय गर्जा।४।
गिफ्ट
घरातलं आवरुन मनीषा धुण्याभांड्याच्या कामासाठी निघाली तशी तिची भाची,सायली तिला म्हणाली” लवकर येजो आत्या.परवाले माह्या हँपी बर्थडे हाये .मले नवा फराक घेनं हाये ना?”मनीषा हसली. “हा वं! माह्या ध्यानात हाये. मी आली की जाऊ आपण बाजारले”मनीषाने जाण्यासाठी चपला पायात अडकवल्या. तशी तिची मुलगी सरला सायलीला म्हणाली“जाती का वं सायली मां संग? ते वकीलसायेब छोट्या पोराईले चाँकलेट देता” चाँकलेट म्हणताच सायलीचा चेहरा खुलला. तरी पण तिने विश्वास न बसून मनीषाला विचारलं” हा वं आत्ये? खरंच चाँकलेट देता?”” हाव. चलती का मंग?” मनीषाने विचारलं तशी छोट्या सायलीने सरळ चप्पल घातली. मनीषाने तिचा हात धरला आणि दोघीही झोपडपट्टीतल्या छोट्या गल्लीतून चालू लागल्या. सायली ही मनीषाच्या भावाची मुलगी. भाऊ एका खेड्यात शेतमजुराचं काम करायचा. त्याची बायको चित्रा हीसुद्धा मजुरीला जायची. अख्ख्या गावात चित्रासारखी सुंदर आणि उफाड्याची दुसरी बाई नव्हती. पण गरीबीतलं सौंदर्य शापित असतं असं म्हणतात. गावाच्या पाटलापासून तरण्याताठ्या पोरांचा तिच्यावर डोळा होता. गावापासून जवळच एक साखर कारखाना होता. कारखान्याच्या चेअरमनच्या पोराने एकदा चित्राला पाहिलं आणि वेड लागल्यागत तो तिच्या मागे लागला.” मी लगीन झालेली बाई हाये. मले एक पोरगी बी हाये. तुम्ही माह्या मागे लागू नका “असं चित्राने त्याला निक्षून सांगितलं.पण पोरगा ऐकत नव्हता. एकदा शेतातून परत येत असतांना चेअरमनच्या पोराने तिला गाठलं. तिचा हात धरला.चित्राने आरडाओरड तर केलीच पण पोराच्या थोबाडीत मारली. गोष्ट पोलिसांपर्यंत गेली. ड्युटीवरच्या हवालदाराने चित्राची तक्रार नोंदवून घेतली तर नाहीच उलट तिलाच दमदाटी केली. प्रकरण चिघळलं तसे तालुक्याचे आमदार धावत आले. त्यांनी दोघात समेट घडवून आणला. पुन्हा चित्राच्या वाट्याला जाणार नाही या बोलीवर चेअरमनच्या पोराला सोडून देण्यात आलं. काही दिवस शांततेत गेले. एक दिवस चेअरमनच्या पोराने चित्राच्या नवऱ्याला बेदम दारु पाजली. दारु पिऊन तो बेहोश झाल्यावर त्याला मित्रांच्या मदतीने गावाबाहेरच्या शेतात टाकून दिलं. रात्री अकरा वाजता गावात सामसुम झाल्यावर चेअरमनचा पोरगा दोन मित्रांसोबत चित्राच्या झोपडीजवळ आला. चित्राने दार उघडताच तिचं तोंड दाबून तिघं आत शिरले. चित्राची पोरगी सायली शांतपणे झोपली होती. तिघांनी आळीपाळीने चित्रावर सामुहिक बलात्कार केला. चित्रा संधी साधून जशी किंचाळली तशी सायलीला जाग आली. समोरचं द्रुश्य पाहून ती थरथर कापू लागली. तशाही परीस्थितीत ती बाहेर येऊन ओरडू लागली. ते ऐकून चित्रानेही ओरडायला सुरुवात केली. त्या ओरडण्याला संतापून चेअरमनच्या पोराने जवळचाच कोयता उचलला आणि चित्रावर सपासप वार करुन चित्राची हत्या केली. एव्हाना सायलीच्या ओरडण्याने आख्खी झोपडपट्टी जागी झाली. चित्राला तसंच रक्तबंबाळ अवस्थेत सोडून चेअरमनचा पोरगा मित्रांसोबत धावत सुटला. लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण हातातल्या कोयत्याचा धाक दाखवून तो आपल्या गाडीने पळून जाण्यात यशस्वी झाला. जातांना एका पोराने आपल्या मोबाईलवर त्याचा आणि गाडीचा फोटो काढला. चित्राचा नवरा सकाळी घरी आला. ज्यांनी आपल्याला दारु पाजली त्यांनीच आपल्या बायकोवर बलात्कार करुन तिचा खुन केला हे ऐकून त्याला जबरदस्त धक्का बसला. चित्राचा पोस्टमार्टेम नंतर अंत्यविधी झाला तसा चित्राचा नवरा गुपचुप शेताकडे पळाला. तिथे पडलेलं किटकनाशक पिऊन त्याने आत्महत्या केली. सहा वर्षाची सायली अनाथ झाली.वहिनीच्या अंत्यविधीला आलेल्या मनीषाला भावाचाही अंत्यविधी पहावा लागला. अनाथ झालेल्या भाचीला छातीशी कवटाळून मनीषा शहरात आपल्या घरी आली. सुदैवाने मनीषाचा नवरा चांगल्या स्वभावाचा होता. पण घरात आधीच तीन पोरं होती.त्यात सायलीची भर पडली होती. मनीषाचा नवरा मार्केटमध्ये हमाली करायचा. संसाराला हातभार म्हणून मनीषा चार घरची धुणीभांडी करायची. तीन पोरांना पोसतांना सायलीची अडचणच होणार आहे हे मनीषाही जाणून होती. पण आपल्या घासातला घास ती पोरक्या झालेल्या सायलीला भरवत होती. सायलीला घेऊन ती वकीलसाहेबांच्या घरी आली. या बंगल्यात काम करायला मनीषाला खुप आवडायचं. वकिलसाहेबाची बायको खडूस असली तरी वकीलसाहेब दिलदार होता. दर दिवाळीला साडीचोळी तर मिळायचीच शिवाय बोनस आणि पगारवाढही असायची. वकीलसाहेब गरीबीतून वर आला होता असं ती ऐकून होती. वकीलसाहेबांना लहान मुलं फार आवडायची. तीची मुलं तिच्यासोबत असली की हमखास चाँकलेट नाहीतर काहीतरी खाऊ मिळायचा. मुलं खुष होऊन जायची. त्यांची स्वतःची मुलं मोठी होऊन मुंबईत शिकत होती. आज सायलीची बडबड ऐकून ते बाहेर येतील आणि सायलीला चाँकलेट देतील असं तिला वाटून गेलं. झालंही तसंच. थोड्याच वेळात ते बाहेर आले. “कोण ही बडबड करणारी गोड मुलगी?”त्यांनी विचारलं.“माह्या भावाची पोरगी हाये”” अस्सं!काय नाव बेटा तुझं?”” सायली” सायली लाजून म्हणाली” अरे व्वा!छान नाव आहे. शाळेत जातेस का?”” हाव. पयलीत हाये”“वा छान! चाँकलेट आवडतं का तुला?” सायलीने खुश होऊन जोरजोरात मान हलवली. वकिलसाहेब आत गेले. एक मोठं कँडबरी चाँकलेट घेऊन आले. ते एवढं मोठं, महागडं चाँकलेट पाहून सायली हरखली. असं चाँकलेट तिने फक्त टिव्हीवर पाहिलं होतं. तिच्या हातात चाँकलेट देऊन वकीलसाहेब आत जाणार तेवढ्यात सायली एकदम म्हणाली “माह्या नं परवाले हँपी बर्थडे हाये.आत्या मले फराक घीसन देणार हाये” वकीलसाहेब जोरात हसले. मनीषाला म्हणाले. “मनीषाताई परवा हीला घेऊन या माझ्याकडे.मी तिला गिफ्ट देईन. काय सायली हवं ना गिफ्ट?”सायलीचा चेहरा एकदम उजळला. तिने हसून जोरजोरात मान हलवली. वकीलसाहेब आत निघून गेले. सायली चाँकलेटकडे हसऱ्या चेहऱ्याने पाहू लागली. भाचीला खुश पाहून मनीषालाही आनंद झाला. वकीलसाहेब आत गेले तेव्हा त्यांचे तीन असिस्टंट त्यांचीच वाट बघत होते. वकीलसाहेबांनी डायरी उघडून आजच्या खटल्यांवर नजर टाकली. असिस्टंटना सुचना करुन त्यांना आँफिसमध्ये भेटायला सांगितलं. दोन खटल्यात त्यांना स्वतःला आर्ग्युमेंट करायचं होतं. एकंदरीत आजचा दिवस व्यग्र असला तरी काळजीचा नव्हता. वकीलसाहेब म्हणजे अँड.रत्नाकर नाईक आज जिल्ह्यातले नावाजलेले वकील होते.जिल्ह्यातच नव्हे तर हायकोर्टातही त्यांचं चांगलंच वजन होतं. अतिशय बुध्दीमान,अभ्यासू, धुर्त, चाणाक्ष नाईकसाहेबांकडे केस दिली आणि ते हरले असं कधीच होत नव्हतं. किंबहुना त्यांचं नाव ऐकलं की विरोधी पक्षकारांचे वकील थरथर कापायचे. आपण हरणार हे त्यांना अगोदरच समजून जायचं इतका त्यांचा दरारा होता. त्यांनी आर्ग्युमेंट सुरु केलं की न्यायाधीशही मंत्रमुग्ध व्हायचे. त्यांचे मुद्दे खोडून काढणं इतर वकीलांना अतिशय कठीण जायचं. आज मिळत असलेली किर्ती नाईकसाहेबांना सहजासहजी मिळालेली नव्हती. त्यांचं बालपण अतिशय गरीबीत गेलं होतं. ते फक्त दोन वर्षांचे असतांना त्यांचे वडील कसल्याशा आजाराने वारले. आई अशिक्षित. मुलगा गेला म्हणून सासरच्यांनी तिला हाकलून दिलेलं. माहेरही दरीद्री. झोपडपट्टीत शेजारी राहणाऱ्या भाजीवालीकडून तिने भाजी विकायचा व्यवसाय शिकून घेतला. भल्यापहाटे उठून मार्केटला जायचं. लिलावात विकत घेतलेली भाजी टोपलीत घालून ती जड टोपली डोक्यावर ठेवायची आणि उन्हातान्हात गल्लोगल्ली फिरायचं. दुपारी घरी येऊन शेजारपाजारच्या झोपड्यात खेळणाऱ्या छोट्या रत्नाकरला स्वयंपाक करुन खाऊ घालायचं. दुपारनंतर परत गल्लोगल्ली फिरायचं असा तिचा रोजचा दिनक्रम. पोराने शिकून मोठं व्हावं ही त्या माऊलीची इच्छा. रत्नाकर नगरपालिकेच्या शाळेत जाऊ लागला. शाळेची अवस्था भयंकर होती. भिंतींचा रंग उडालेला. पावसामुळे त्यांना ओल आलेली. जागोजागी फरशी उखडलेली. तुटलेले बाक. असं असूनही रत्नाकरला ती शाळा आवडायची. झोपडपट्टीतल्या नरकात जगण्यापेक्षा दिवसातले पाच तास इथे घालवायला त्याला आवडायचे.मुळातच बुध्दिमान असलेला रत्नाकर शाळेत पहिला येऊ लागला.हे ऐकलं की त्याच्या आईचं ह्रदय अभिमानाने भरुन यायचं. आपला लेक नक्की मोठा साहेब होणार याची तिला खात्री वाटू लागली. सगळं ठिक चाललं असतांना रत्नाकरच्या आईला दम्याचा आजार जडला. रात्रीबेरात्री खोकून खोकून तिचा जीव अर्धमेला व्हायचा. ती उठून…
परीक्षा
“आई आनंदाची बातमी आहे.मला ९८ टक्के मिळाले” आईला मिठी मारत मानस म्हणाला.सुनिताच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहीले. “खुप खुप अभिनंदन बेटा. तुझ्या कष्टाचं चीज झालं. बाबांना सांग लवकर. त्यांनाही खुप आनंद होईल” मानसने सुभाषला फोन लावला.आपला रिझल्ट सांगितला. “अरे वा खुप मस्त. अभिनंदन बेटा. मी आलोच घरी” सुभाष म्हणाला .मानस हा सुभाष-सुनिताचा एकुलता एक मुलगा. दोघांच्या आशा, स्वप्नं सगळी मानसभोवती केंद्रित झालेली. दहावीच्या परीक्षेत त्याला चांगले मार्क मिळावे यासाठी शहरातल्या एका नामांकित क्लासमध्ये त्याला अँडमिशन करुन दिली होती. खरं तर दोघांच्या खाजगी नोकऱ्या.क्लासची महागडी फी त्यांना परवडत नव्हती तरीसुद्धा स्वतः वर्षभर काटकसर करुन त्यांनी मानसला कोणतीही अडचण येऊ दिली नव्हती. मानसनेही त्याची जाण ठेवत आईवडिलांना अपेक्षित असं दणदणीत यश दहावीत मिळवलं होतं. सुभाष घरी आला. येतांना त्याने पेढे आणले होते. मानसला जवळ घेऊन त्याने त्याला पेढा खाऊ घातला. “बाबा आमच्या क्लासच्या सरांनाही पेढे द्यायचे का?” “हो मग! अरे त्यांच्यामुळे तर तुला इतके छान मार्क्स मिळालेत. चल जाऊया आपण त्यांच्याकडे” दोघंही बापलेक पेढे घेऊन मानसच्या क्लासमध्ये पोहोचले.क्लासमध्ये खुप गर्दी होती. रिझल्ट लागलेल्या विद्यार्थ्यांचे पालक सरांना भेटायला आले होते. “अरे ये ये मानस आणि मनःपूर्वक अभिनंदन.९८ टक्के मिळाले ना?” सरांनी हाक मारुन मानसला जवळ बोलावलं.“हो सर. थँक्यू सर” मानस म्हणाला.“सर हे घ्या पेढे. तुमच्यामुळे मानसला एवढं मोठं यश मिळालं”सरांना पेढे देत सुभाष म्हणाला.सरांनी पेढे घेतले आणि हसत म्हणाले.“सुभाषभाऊ पुर्ण शहरात आपला क्लास टाँपवर आहे. अहो २५ मुलांना ९५%च्यावर, ५० मुलांना ९० च्यावर आणि ३० मुलांना ८०%वर मार्क्स आहेत.” मानसला आठवलं या क्लासमध्ये ९वीत ८०%असलेल्यांनाच प्रवेश मिळतो. याचा अर्थ सगळी स्काँलर मुलंच इथे घेतली जातात. ही मुळातच स्काँलर असलेली मुलं अर्थातच चांगले मार्क्स मिळवणारच होती. त्याला प्रश्न पडला ‘मग या मुलांच्या यशात खरंच क्लासचा काही रोल होता? आणि कमी टक्के असलेल्या मुलांनी चांगल्या क्लासमध्ये शिकायचंच नाही का? हुशार नसलेल्या मुलांनी मग जायचं कुठे? “सर ९वीत ७०% मिळालेल्या माझ्या मित्राच्या भावाला आपल्या क्लासमध्ये अँडमिशन मिळेल?” मुद्दामच त्याने सरांना विचारलं “अजिबात नाही. आपण आपल्या क्लासचा दर्जा उच्च ठेवलाय मानस आणि आपण तो मेन्टेन करतो” सर आत्मप्रौढीने म्हणाले. तेवढ्यात इतर पालक आत शिरले तेव्हा मानस आणि सुभाषने सरांचा निरोप घेतला. रिझल्ट लागला. आता अँडमिशनची प्रक्रीया सुरु झाली. ११वी-१२वी करुन मेडीकलला जायची मानसची इच्छा होती. आपल्या मुलाने डाँक्टर व्हावं असं सुनीता-सुभाषचंही स्वप्न होतं. शहरातल्या एका नामांकित काँलेजमध्ये वार्षिक १५ हजार रुपये भरुन मानसने प्रवेश घेतला. मानसचा काँलेजला जायचा पहिलाच दिवस म्हणून सुनिता मुद्दामच घरी राहिली. मानस काँलेजला गेला आणि दोन तासातच परत आला. “अरे! काँलेजला गेला नाहीस?” सुनीताने विचारलं.“अगं गेलो होतो. पण दोनचारच मुलं आली होती. त्यामुळे पिरीएडस् होऊ शकले नाहीत. माझा मित्रही आला होता. तो म्हणाला आजकाल काँलेज कुणीच अटेंड करत नाहीत. फक्त प्रँक्टिकलला येतात”“अरे मग शिकणार कसं?”“काँलेजमध्ये चांगलं शिकवत नाहीत म्हणून सगळे क्लासेस लावून घेतात ““अरे मग काँलेजची आपण एवढी फी भरतो ती कशासाठी?”“फक्त नावासाठी आणि परीक्षा देण्यासाठी.चांगल्या काँलेजमधून शिकलो हे सांगण्यासाठी”” ते काही नाही. तू काँलेजची लेक्चर्स अटेंड करत जा” सुनीता रागाने म्हणाली. “अगं आई आम्ही गेलो होतो प्राचार्यांना भेटायला. ते म्हंटले किमान दहा तरी मुलं येऊ द्या क्लासमध्ये, मग पाठवतो प्राध्यापकांना. त्यांचं म्हणणं आहे की विद्यार्थीच बसत नाहीत लेक्चर्सना. आम्ही तर तयार आहोत”“बापरे म्हणजे काय आता क्लासेस लावायचे?”“काही इलाज नाही आई. मेडीकलला जायचं म्हंटल्यावर क्लासेस तर लावावेच लागतील”सुनीताने कपाळावर हात मारुन घेतला. आधीच दोघांची तुटपुंजी कमाई त्यात हा नवीन खर्च. संध्याकाळी सुभाष घरी आल्यावर मानसने सगळा किस्सा त्याला सांगितला.“ठिक आहे. पण क्लासेस लावायचे तर कुठे? चांगले क्लासेस कोणते आहेत? “सुभाषने विचारलं.“हो मी काढलीय माहिती. तुम्हाला वेळ असेल तर जाऊन यायचं का?”“जावंच लागेल. शिकण्यासाठी हे सर्व करावं तर लागणारच आहे” दोघं एका क्लासमध्ये पोहोचले. बाहेर बसलेल्या रिसेप्शननिस्टने मार्क्स विचारले. त्यांनी सागितल्यावर ती म्हणाली.“ठिक आहे. आमची ११वी, १२वीची मिळून १,८०००० फी आहे एका टप्प्यात भरली तर! तुम्ही चार टप्प्यातही भरु शकता. पण मग ५० हजाराचे चार टप्पे. अशी फी होईल दोन लाख.”“बापरे एवढी फी?कोणी देतं का?” सुभाषने विचारलंती हसली आणि जरा मग्रुरीनेच म्हणाली. “कुणी देतं का? अहो सर आमची १२० विद्यार्थ्यांची कँपँसिटी आहे. ११५जागा भरल्यात. तुम्ही घाई केली नाहीत तर तुमच्या मुलाला अँडमिशन मिळणं मुश्किल आहे. मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी खर्च हा करावाच लागतो” तेवढ्यात एक मुलगी आईवडिलांसोबत चौकशी करण्यासाठी आली. रिसेप्शनिस्टने तिला मार्क्स विचारले. तिने ७५ टक्के सांगितल्यावर ती म्हणाली.“साँरी ८५ टक्क्यांच्या खाली आम्ही अँडमिशन देत नाही. पण आम्ही तुला वेटींगवर ठेवू. आमच्या उरलेल्या पाच जागा भरल्या नाहीत तर आम्ही तुला काँल करु.” मुलीचा चेहरा पडला. तिचे पालक रिसेप्शनिस्टला विनवण्या करु लागले. “अहो एकदा सांगितलं ना तुम्हाला” रिसेप्शनिस्ट त्यांच्यावर खेकसत म्हणाली. “मी काही करु शकत नाही म्हणून”“अहो पण इथे वाट बघत बसलो तर बाकीचे क्लासेस फुल्ल व्हायचे. मग तिथेही अँडमिशन मिळणार नाही” त्या मुलीचे वडिल अगतिकतेने म्हणाले. “साँरी. तुम्ही सरांना भेटू शकता” तो संवाद ऐकून मानसला काय वाटलं कुणास ठाऊक तो त्या रिसेप्शनिस्टला म्हणाला“मँडम तुम्ही यांना अँडमिशन द्या. मला नाही घ्यायची अँडमिशन” तिथे बसलेले सगळे त्याच्याकडे अवाक होऊन बघू लागले.“अरे मानस असा काय करतोस? अँडमिशनसाठीच तर आलो ना आपण?” सुभाष आश्चर्यचकीत होऊन म्हणाला.“नाही बाबा. आपण फक्त चौकशीसाठी आलोय. चला आपण बाहेर जाऊया” आणि तो उठून बाहेरही पडला. सुभाषही हतबल होऊन त्याच्यामागे बाहेर पडला. “मानस काय वेडेपणा चालवलाय? अरे आपल्या शहरातला सर्वात नावाजलेला क्लास आहे हा आणि तू….”“नावाजलेला आहे कारण ते हुशार मुलांनाच प्रवेश देतात. बघितलं ना तुम्ही, त्या मुलीला क्लासची खरी गरज होती. तिला ते प्रवेश देत नव्हते. आणि बाबा मला इतका महागडा क्लास लावायचाच नाहिये. आपण एखादा नवा क्लास बघू. ते फी कमी घेतात आणि नांव मिळवण्यासाठी चांगलंसुध्दा शिकवतात” “तू पैशांची काळजी नको करुस मानस. तुला डाँक्टर करायचं आमचं स्वप्न आहे. प्रसंगी आम्ही स्वतःला गहाण ठेवू पण तुला कसलीच कमी पडू देणार नाही” मानस हसला “मला समजतंय ते बाबा पण त्याची काहीच गरज नाही. चला आपण दोनतीन क्लास बघू आणि फायनल करु” तीन क्लासमध्ये चौकशी केल्यानंतर चौथ्या क्लासमध्ये त्यांनी प्रवेश नक्की केला. मानससारखा हुशार मुलगा आपला क्लास जाँईन करतोय हे पाहून क्लासवाल्यांनाही आनंद झाला. मानस काँलेजमध्येही तीनचार वेळा जाऊन आला पण पिरीएडस् कुणीच अटेंड करत नव्हतं याचं त्याला दुःख होत होतंएकदा केमिस्ट्रीच्या प्रँक्टिकलला सगळे विद्यार्थी जमले. आज सगळ्यांशी बोलायचंच असं मानस ठरवून आला होता. प्रँक्टिकल संपल्यावर व्हरांड्यात जमलेल्या मुलांकडे तो गेला. “मित्रांनो तुमच्यापैकी क्लास कुणी नाही लावलेला?”सगळे एकमेकांकडे पाहू लागले. एक मुलगा म्हणाला “अरे वेड्या सायन्सचा स्टुडंट क्लास लावणार नाही असं कधी होईल का?”“आम्ही नाही लावला क्लास.का काय झालं?” सगळ्यांच्या नजरा त्या आवाजाकडे वळल्या.चारपाच गरीब घरची मुलं समोर उभी होती. “का? तुम्ही का नाही लावला क्लास?” मानसने विचारलं. “आम्ही १५किमी. वरच्या एका खेड्यात रहातो. घरची परीस्थिती एवढी चांगली नाहिये. आमच्यापैकी कुणाचे वडील शेती करतात…
धुळवड
आरवने घड्याळात पाहीलं. सकाळचे आठ वाजले होते.त्याच्या मित्रांचा अजून पत्ता नव्हता.खरं म्हणजे ते येणार असं काही ठरलं नव्हतं पण दरवर्षीप्रमाणे ते येतील मग रंगांची आतषबाजी सुरु होईल अशी त्याला अपेक्षा होती. “आरव अंघोळ करुन घे रे”किचनमधून आई ओरडली. तिने असं ओरडायची ही तिसरी वेळ होती. आरवने तिला काहीही उत्तर दिलं नाही. आपण मित्रांची वाट बघतोय हे तो तिला कोणत्या तोंडाने सांगणार होता? कारण गेल्या कित्येक महिन्यात कुणीही मित्र त्याला भेटायला आला नव्हता किंवा तो स्वतःही कुणाला भेटायला गेला नव्हता. पण आजतरी कुणीतरी येईल ही आशा सोडवत नव्हती म्हणून तो दरवाजाकडे डोळे लावून बसला होता. नऊ वाजले तसं त्याला निराशेने घेरलं. अजूनही त्याचे मित्र आले नव्हते आणि त्यांनी का यावं? आरवने बारावी नापास झाल्यानंतर सगळ्या मित्रांशी संबंध तोडून टाकले होते. त्याच्या आईवडिलांनी,मित्रांनी त्याला किती समजावलं होतं की नापास होण्यात त्याची काहीही चूक नव्हती. आणि ते खरंच होतं. आरव काँलेजमधला सर्वात हुशार विद्यार्थी! तो मेरीटमध्ये येणार हे सगळ्यांनीच ग्रुहीत धरलं होतं पण परिक्षेच्या पाच दिवस अगोदर आरव डेंग्यूने आजारी पडला. डेंग्यूचं निदान झालं तसं डाँक्टरांनी त्याला अँडमीट व्हायला सांगितलं. आरवने नकार दिला. परिक्षा ऐन तोंडावर असतांना अँडमीट होणं त्याला शक्यच नव्हतं. पण पहिल्या पेपरच्या आदल्या दिवशी आरव तापाने फणफणला. त्याच्या वडिलांनी धावपळ करुन त्याला अँडमीट केलं. आरवची अवस्था क्रिटिकल झाली. त्याला आईसीयू मध्ये ठेवावं लागलं. देवाची क्रुपा म्हणूनच तो वाचला. वीस दिवसांनी तो घरी परतला तेव्हा परिक्षा संपली होती. निकाल लागला. आरव अर्थातच नापास झाला. आरवचे अगदी सामान्य बुध्दीमत्तेचे मित्रमैत्रिणीही पुढे निघून गेले. कुणी इंजीनियरिंगला गेलं कुणी मेडिकलला. कधीही नापास न झालेला आणि करीयरची मोठमोठी स्वप्नं पहाणारा आरव डिप्रेशनमध्ये गेला. घरी आलेल्या मित्रांनाही तो भेटेनासा झाला. त्यांचे फोन उचलेनासा झाला. मग काही दिवसांनी फोन येणंही बंद झालं. आँक्टोबरला तो परत परिक्षेला बसला पण त्याचं अभ्यासातलं मन उडून गेलं होतं. मेरीटचा विद्यार्थी होता तो पण चक्क चार विषयात नापास झाला. आईवडिलांच्या आग्रहाखातर आता परत मार्चमधल्या परिक्षेसाठी त्याने फाँर्म भरला होता. पण आताही त्याचं अभ्यासात मन लागत नव्हतं. याही परिक्षेत आपण नापासच होणार अशी भिती त्याला वाटू लागली होती. त्याने तो अधिकच निराश होत होता. साडेनऊ झाले तशी त्याच्या आईने त्याला हाक मारली “आरव आता बस झालं वाट बघणं. तुझे मित्र येतील असं वाटत नाही. करुन घे अंघोळ. मला मग पुढची कामं करायला बरं पडेल”तो मित्रांचीच वाट बघतोय हे त्या माऊलीच्या लक्षात आलं होतं.जड अंतःकरणाने आरव उठून अंघोळीला गेला. अंघोळ झाल्यावर पुस्तक घेऊन तो त्याच्या रुममध्ये जाऊन बसला. अर्थात काही वाचण्यात त्याचं मन लागणार नव्हतंच. सव्वा दहा वाजले तशी दारावरची बेल वाजली. अक्षयने कान टवकारले.“ए आऱ्या बाहेर ये”तो आवाज ऐकताच आरवच्या मनाने एकदम उडी मारली. होय हा त्या सुम्याचाच आवाज. आरवने पुस्तक ठेवलं आणि तो झपाट्याने बाहेर आला. बाहेर त्याची तीच ती सुप्रसिद्ध गँग अर्धवट रंगलेल्या अवस्थेत बाहेर उभी होती.“ए आऱ्या भुल गया क्या हमको?”“अरे याने तर अंघोळ केलेली दिसतेय”“बस का आरव. अरे थोडी तर वाट बघायचीस”“अरे साडेनऊपर्यंत तुमची वाट बघितली. मला वाटलं तुम्ही मला विसरलात”“असं कसं विसरु? अरे या शिरीषची गाडी पंक्चर झाली होती म्हणून वेळ लागला यायला”“ए आता गप्पा पुरे. ए चल आरव. नेहमीसारखा हंगामा करायचाय आपल्याला!”“अरे पण मी अंघोळ केलीय आणि माझ्याकडे रंगसुध्दा नाहीयेत खेळायला”आरवने बचावात्मक पवित्रा घेतला“अरे रंगाची फिकीर तू कशाला करतो बाँस. ये देख पुरा ड्रम भरके लाया है तेरे लिये”एक मुलगी म्हणाली. “नको. यावर्षी राहू द्या. इच्छा होत नाहिये रंग खेळायची” त्याने तसं म्हणायचा अवकाश दोन मुलं आत आली. त्यांनी आरवला उचलूनच बाहेर आणलं. तो बाहेर आल्यावर सगळे मित्रमैत्रिणी रंग घेऊन त्याच्यावर तुटून पडले. मग आरवलाही जोर चढला त्याने त्यांच्याचकडचे रंग घेऊन सगळ्यांना रंगवायला सुरुवात केली. सगळे रंगून झाल्यावर एक जण म्हणाला” ए चला चौकात जाऊया.आपले सगळे मित्र वाट बघताहेत”” चल आरव बस मागे”आरव अवघडला.“अरे पण ते तुमचे मित्र ना? मग मला…”“ए आरव ये क्या लगाके रखा है तुमचे मित्र माझे मित्र? चल बैठ जल्दी,जादा शाणपणा मत कर” आरव मुकाट्याने मागे बसला. सगळे चौकात आले. दोन तास सगळ्यांनी मनसोक्त धुम केली. सगळे रंगून थकल्यावर आरव सगळ्यांना म्हणाला “आज संध्याकाळी माझ्याकडून सगळ्यांना पावभाजीची पार्टी” लगेच सुम्या म्हणाला.“नाही आरव आज तुलाच आमच्याकडून वेलकम पार्टी. एक वर्ष झालं तू मित्रांना भेटला नाहीस. अरे नापास झालास म्हणून काय मित्रांना तोडून टाकायचं? तू त्या जीवघेण्या आजारातून वाचलास हे काय कमी आहे? एक वर्ष वाया गेलं म्हणजे आयुष्य संपत नसतं आरव. तुझ्या तशा वागण्याने आम्ही सगळेच अस्वस्थ होतो. खुप बरं वाटलं आज तुला आमच्यात बघून. आज की शाम तेरे नाम. दोस्त मरते दम तक ये दोस्ती टूटना नही चाहिये” आरवने तशाच रंगलेल्या अवस्थेत सुम्याला मिठी मारली. ते पाहून सगळे मित्रमैत्रिणी जवळ आले. त्यांनी आरवला उचलून घेतलं आणि एकच जल्लोष केला. आरव हवेत तरंगतच घरी आला.मित्रांसोबत रंग खेळल्यामुळे त्याच्या मनावरची नैराश्याची धुळ उडून गेली होती.प्रसन्नतेचे नवीन रंग त्यावर चढले होते.अंघोळ झाल्यावर तो आईला म्हणाला. “आई लवकर वाढ खुप भुक लागलीये.आणि हो मला लगेच अभ्यासाला बसायचंय.यावेळी मला मेरिटमध्ये यायचंच आहे”आईच्या डोळ्यातून आनंदाश्रू कधी बाहेर पडले हे तिलाही कळलं नाही.
जीवनसाथी
प्रसाद घरात शिरला पण त्याचा पडलेला चेहरा पाहून काहितरी वाईट घडलंय याची जाणीव प्राचीला झाली. घरात आल्याआल्या त्याला प्रश्न विचारुन दुखवण्यापेक्षा त्याचा चहा झाल्यावरच विचारु असं ठरवून ती आत गेली. प्रसाद जीव नसल्यासारखा सोफ्यावर पडून राहिला. दोन्ही हातांनी त्याने तोंड झाकून घेतलं. प्राचीने त्याच्यासाठी पाणी आणलं तेव्हाही तो तसाच बसून होता.“खुप थकल्यासारखे दिसताय. फँक्टरीत जास्त काम पुरलं का?” विचारायचं नाही असं ठरवूनही न रहावून प्राचीने विचारलं. “माझी नोकरी गेली. शेवटी कंपनीने आम्हांला काढून टाकलं” तो खचलेल्या आवाजात म्हणाला.“अरे देवा!” प्राचीला जबरदस्त धक्का बसला. तसं पाहिलं तर गेल्या सहा महिन्यापासून याचा अंदाज आला होताच. कोरोनामुळे कंपनीचं दिवाळं निघालं होतं. बऱ्याच कामगारांना अगोदरच डच्चू देण्यात आला होता. प्रसादसारख्या इंजीनियर्सचे तीन महिन्यांपासून पगार नव्हते. पण कोरोनाची लाट कमी झाली. वातावरण बऱ्यापैकी सुधारलं तेव्हा कंपनी परत एकदा व्यवस्थित चालायला लागेल अशी सर्वांची अपेक्षा होती.दुर्दैवाने तसं झालं नव्हतं. “तुम्ही थोडं फ्रेश व्हा. मी चहा करुन आणते. मग नंतर बोलू आपण” ती स्वतःला सावरत म्हणाली. तिने चहा करुन आणला तरी प्रसाद तसाच खुर्चीवर बसून होता. भविष्याच्या काळजीने त्याचा चेहरा पिळवटून गेला होता. बरोबरच होतं. या वयात आता नोकरी मिळणं अवघडच होतं. मुलं आता मोठी होणार होती. त्यांचे शिक्षणाचे खर्च, घराच्या कर्जाचे हफ्ते याचा मेळ बसवणं कठिण होऊन बसणार होतं. असलेली शिल्लक संपल्यानंतर पुढे काय हा मोठा यक्षप्रश्न उभा रहाणार होता. “थोडं तोंड धुवून घ्या. म्हणजे जरा बरं वाटेल” त्याला तसं बघून प्राची समजावत म्हणाली. तो नाईलाजाने उठला आणि तोंड धुवून आला. चहाचा एक घोट घेऊन त्याला बरं वाटलं खरं पण मनावरचं मळभ काही दुर झालं नाही. “काही काळजी करु नका. मिळेल दुसरी नोकरी” “नोकऱ्या काय अशा वाटेवर पडल्या आहेत का सहजासहजी मिळायला?” तो जरा जोरातच बोलला.त्याचा तो कठोर स्वर ऐकून ती दुखावली. पण त्याची मानसिक अवस्था ठिक नाहिये हे तिच्या लक्षात आलं. प्रत्युत्तर न देता ती चुप राहिली. त्याचा चहा झाल्यावर ती कप किचनमध्ये घेऊन आली तेव्हा तिच्या मनात शेकडो विचारांचं वादळ घोंघावत होतं. नोकरी नसलेला आणि घरी रिकामा बसलेला नवरा सांभाळणं किती कठिण असतं हे ती अनेक जणांकडून ऐकून होती. असे बेकार नवरे व्यसनांच्या आहारी जातात.त्यामुळे नंतर त्यांना काम करण्याची इच्छाच रहात नाही. असे नवरे समाजाच्या, नातेवाईकांच्या नजरेतून तर उतरतातच पण मुलंही आपल्या बापाचा तिरस्कार करतात. “देवा माझ्या नवऱ्याच्या बाबतीत असं होऊ देऊ नको रे. त्याला लवकरात लवकर दुसरी नोकरी लागू दे “तिने मनातल्या मनात प्रार्थना केली. ती जेव्हा लग्न करुन या घरात आली तेव्हा तीची नोकरी करण्याची खुप इच्छा होती. उच्चशिक्षित असल्यामुळे त्यावेळी प्रयत्न केला असता तर नोकरीही सहज मिळू शकली असती. तिने तो विषय एकदा प्रसाद आणि सासूजवळ काढलाही होता. पण “तू नोकरी करायला लागलीस की साहजिकच तुला वाटेल की नवरा आणि सासूने घरकामात मदत करावी. माझं ठिक आहे पण मी गेल्यावर प्रसादला तू कामाला लावशील. ते त्याला आणि मलाही सहन होणार नाही. आमच्या घराण्यात पुरुष घरकामाला हातही लावत नाहीत. तुझ्या सासऱ्यांनी कधी इकडची काडी तिकडे केली नाही आणि प्रसादलाही आम्ही करु दिली नाही. त्यामुळे नोकरीचा विचारही मनातून काढून टाक “असं तिच्या सासूने बजावून सांगितलं होतं.त्यादिवसानंतर तिने तोंडाला कुलूप लावून टाकलं होतं. प्रसादलाही तिने कोणतंही काम सांगितलं नव्हतं. घरातली कामं तर सोडाच पण भाजी आणणं, किराणा आणणं, लाईटबिल भरणं ही कामही तीच करायची. मुलं झाली पण मुलांना अंघोळ घालणं,त्यांना तयार करणं, त्यांना जेवू घालणं ही कामसुध्दा तिनं कधीही प्रसादला सांगितली नव्हती. तिच्या मनात सहज विचार आला. आज ती नोकरी करत असती तर प्रसादची नोकरी जाणं एवढ्या काळजीचा विषय बनलं नसतं.तिनं एक विषादाचा सुस्कारा सोडला. दुसऱ्या दिवसापासून प्रसादचं नोकरीसाठी भटकणं सुरु झालं. पण ती सोपी गोष्ट नव्हती.एकतर या शहरात इंडस्ट्रीज कमी होत्या. ज्या होत्या त्यांची परिस्थिती वाईट होती. घरदार सोडून पुण्यामुंबईकडे जाणं आणि तिथं कमी पगारावर नोकरी करणं जिकीरीचं होणार होतं. तरीसुद्धा जाँब पोर्टलवर तो जिथे शक्यता वाटत होती तिथे अर्ज पाठवत होता. पण कुठूनच काही जमत नव्हतं. पंधरा दिवस उलटून गेले, एक महिना झाला, दोन महिने उलटले तरी नोकरी मिळण्याची चिन्हं दिसत नव्हती. शिल्लक असलेल्या रकमेला हळूहळू पाय फुटू लागले होते. जास्तीत जास्त सहा महिने त्या रकमेत भागवता आलं असतं. मग मात्र अडचणींचे डोंगर उभे रहाणार होते. प्रसाद आता तालुक्याच्या गांवात, शेजारच्या जिल्ह्यातही नोकरी शोधू लागला. ओळखीच्या लोकांना, नातेवाईकांना त्याने त्याच्यासाठी नोकरी शोधण्याची विनवणी केली होती. पण सगळेच मदतीची आश्वासनं देतात, प्रत्यक्षात कुणीच मदत करत नाही हा अनुभव त्याला आता येऊ लागला होता. असाही आपल्यावर वाईट प्रसंग आले की काही नातेवाईकांना आसुरी आनंद होत असतो आणि शक्य असुनही ते मदत करण्याचं मुद्दामच टाळतात हे काय तो जाणून नव्हता? त्याची आता चीडचीड होऊ लागली होती. घरात असला की तो विनाकारणच मुलांवर खेकसायचा, चिडायचा. एकदा तर त्याने खेळताखेळता टीपाँयवरचा फ्लाँवरपाँट तोडला म्हणून छोट्या प्रवीणलाही खुप मारलं होतं. तेव्हापासून प्राची मुलांना त्याच्यासमोर जाऊ देत नव्हती. मुलंही त्याला घाबरुन रहात होती. प्राचीला स्वतःला त्याची भीती वाटत होती. कुठल्याही बोलण्यातून किंवा वागण्यातून त्याचा अपमान होणार नाही याचा ती कसोशीने प्रयत्न करत होती. पण थोडं जरी त्याच्याकडे दुर्लक्ष झालं की प्रसाद सगळ्या परिस्थितीचा राग प्राचीवर काढायचा. तिला वाटेल ते बोलायचा. एक दिवस तो बाहेरून आला तशी ती त्याला म्हणाली “अहो आज माझ्या मैत्रीणीचा फोन आला होता. तिच्या ओळखीच्या १० लोकांना सकाळ संध्याकाळ जेवणाचे डबे करुन हवेत. एका डब्याचे महिन्याला तीन हजार देणार आहेत. करुन देत जाऊ का?”“आईला विचारलंस?” “हो.त्या हो म्हणताहेत पण “‘मला आणि प्रसादला कोणतंही काम सांगायचं नाही ‘अशी अट त्यांनी घातलीये”“बरोबर. तू कर पण मला तरी काहिच काम सांगू नकोस. मी आधीच टेंशनमध्ये आहे. आणि ते डबे बिबे मी पोहचवणार नाही हं”“नाही. ते स्वतःच घ्यायला येणार आहेत” “आणि मला पैसेही मागू नकोस”“नाही. मी प्रत्येकाकडून पाचशे रुपये अँडव्हान्स मागून घेणार आहे”“मग ठिक आहे”दुसऱ्या दिवसापासून प्राचीची धावपळ सुरु झाली. मिळालेल्या अँडव्हान्समधून तिने तांदूळ, डाळी,गहू ,भाज्या आणल्या. सकाळी लवकर उठून डब्यांची तयारी, मुलांचे डबे, त्यांची तयारी करुन त्यांना शाळेत पाठवणं. सासुला आणि नवऱ्याला चहा नाष्टा करुन देणं या सगळ्यात सकाळ जाऊन दुपार कधी येते हे तिला समजेनासं झालं. संध्याकाळीही तेच व्हायचं. प्राचीच्या हाताला चव होती.पंधराच दिवसांनी १० डब्यांचे २० डबे झाले. तीचा दिवस आता प्रचंड धावपळीत जात होता. सासू आणि नवऱ्याची तिला थोडीशीही मदत होत नव्हती. पाचवीत जाणाऱ्या आपल्या मुलीला-प्रज्ञाला ती हाताशी धरुन निभावून नेत होती. महिन्याभरानंतर पहिल्या दहा डब्यांचे तीस हजार तिच्या हातात पडले तेव्हा तिला गहिवरुन आलं. प्रसादला तिची धावपळ, तिचे कष्ट याची थोडीफार जाणीव व्हायला लागली होती. रोज सकाळ संध्याकाळ २० डब्यांच्या ८० पोळ्या लाटणं सोपं काम नाही हे त्यालाही कळत होतं. तिला मदत करावी असं त्याला कधीकधी तीव्रतेने वाटून जायचं पण आईने केलेले संस्कार त्याला ती मदत करायला थांबवत होते. शिवाय ‘शेवटी झालाच ना बायकोचा…