योग येतो जीवनी,घेऊनी संजीवनी !आरोग्य आणि संपदा,हातात हात घेऊनी ! जगी पटली सर्वांना,योगाची अद्भुत किमया!लोपली होती कालांतरी,भुलवी भौतिक माया! भौतिकाची ओढ होती,सुदृढ शरीर दुर्लक्षित !योग अन् व्यायामाची,हरपली होती रीत ! योगगुरुची गरज होती,आधुनिक जगाला!रामदेव रुपे धावत आला,कृष्ण अपुल्या साथीला! निरामय योग शिकवला,रामदेव बाबांनी !होऊ सगळे योगाभ्यासी,सफल होऊ जीवनी!
Category: Long Poems
……ऋतू……
सहा ऋतूंचे येणे जाणेपरिवर्तन हे निसर्ग हाशिशिरामागुनी वसंत येतोसरे पानगळ बहर अहा!..१ कधी ओकतो आग ग्रीष्म हीशांतवी वर्षा जलधारातमामागुनी प्रकाश यावा रात्रीनंतर दिवस खरा…२ तसेच आहे मनुष्य जीवन. सुखदु:खाचा गोफ जणुयश वा अपयश मोद खेद हीसप्तरंगी हे इंद्रधनु…३ वसंत फुलतो मनी जीवनीअसो कोणता मग ही ऋतूविरही कोणी मुखी शब्द हेहवीस तू गे !..हवास तू !..४ निसर्ग सुंदर जीवन सुंदरफुलपाखरु हे मनही हवेदाता तो भगवंत विधाताकृतज्ञ आपण मात्र हवे!..५
मायबाप
जन्मदात्री माय,सांभाळे नऊ मास!बालपणी भरवी ,घासातला घास ! बापाची मायान दिसे बाहेरी !परी ओसंडून वाहे,मनातून भारी ! माय बाप दोन्ही,संसार रथाची चाकं!एक साथ जाती,तेव्हा मिळे सुख वाट! माय बापाचे छत्र,आता नाही डोक्यावरी!परी छाया त्यांची कधी,झाली नाही दूरी ! जन्मदाते माय बाप,प्रेम त्यांचे अखंड!मनी मी अनुभवते,माया त्यांची उदंड!
बाबा
माझ्या स्वप्नांसाठीस्वतःची स्वप्नं ते विसरलेमाझ्या वाट्यावरचे काटेते कायमच उचलत आले काबाडकष्ट करुन त्यांनीघाम सतत गाळलाभविष्याच्या फुलबाग माझात्यांनीच की हो फुलवला खेळ गमतीजमती साठीते मित्र जरी बनलेअडचणीच्या प्रसंगीदेवबाप्पाही तेच झाले चुकलो अनेकदा मीबाबांचे बोलही ऐकलेमाझ्या साठी अनेकदामूक अश्रू ढाळलेलेही पाहिले आईने धरली सदावेड्या मायेची ती छायाकुटुंबाला संपूर्ण माझ्याबाबांचाच भक्कम पाया बाबांचा अवतार जसानारळ, काटेरी फणस ते खरेकरारी चेहऱ्यावर राग जरीअंतरी काळजी, आपुलकीचे झरे सर्व संकटात आमच्यादारात उभे ते, जणू काही ढालखंबीरपणाची त्यांच्याखरंच आहे हो कमाल आईसंगे मनमोकळेबोललो, हसलो रडलोबाबांसमोर मात्र सदाघुमाघुमाच राहिलो अंतरीची त्यांची मायाकस्तुरी अत्तराचा जणू फायादिसे वरुन काही नाहीसुगंध पसरवी नुसती छाया बाबांसाठी वृद्धापकाळीबनेन का मी आधाराची काठीमनातला बाबा माझ्याहोईन का माझ्या मुलासाठी
*झुला*
पहाता झुला वयाचे भान हरपते झुला झुलण्याला वयाचे बंधन नसते उंच उंच घेता झुला मन आभाळ होते करपाशा पसरुनी नभा तोलू पाहते उंच जाता झुला यायचे धरणी माघारा, भान सदैव जपायचे मानवाचा जन्म सखा झुला जन्मा येता झुल्यात ठेवती.. ममतेने देऊनी हिंदोळा, अंगाई गाती.. असाच राहू दे आयुष्याचा झुला, होत राहो सदैव खाली वरती…..
*मैत्री*
जन्मा सवे येते मैत्री,नात्यांच्या विणीतुनी,सम विचारधारेतुनी,कधी शत्रू मैत्री,कधी विशुद्ध मैत्री. मैत्री कधी ठरवून का होते?मैत्री ला वयाचे बंधन नसते.मैत्री दिनी काव्य करायचे,मैत्री वरच बोलायचे.मैत्री तर अखंड वाहणारा निर्मळ झरा…..जिथे मिळतो आनंदाचा निखळ सहारा…… मैत्री असावी जन्मजन्मांतरी ची,मैत्री खरी संकट घडीला टिकणारी,मैत्री असावी आश्वस्त शब्दांची, बालवयी जरी पांगलो,यौवनात जरी दूर गेलो,वृद्धत्वी जरी निजधामी गेलो,मागे राहिलेल्या मैत्रेयाला आठव असणारी…..
*पाऊस पाऊस, पाणीच पाणी*
पाऊस पाऊस, पाणीच पाणीवळचणीला ओला कावळा ओली चिमणी….इथे तिथे विसावा शोधू लागले,घर बांधायाचे राहून गेले… पाऊस पाऊस, पाणीच पाणीबाजारी रमलेले नरनारी,दुकानाच्या आडोशाला उभे राहिले,विस्मरण छत्रीचे आज जाहले ,पाऊस थांबण्याची वाट पाहू लागले,हाती धरिल्या पिशव्यांचे ओझे वाटू लागले… पाऊस पाऊस, पाणीच पाणीआठवुनी शैशव अपुले, वृद्ध पलंगी दबकून बसले,गवाक्षातील शिडकाव्याने अंग तयांचे गारठु लागले,ओढुनी शाल अंगावरी घोटभर चहाची वाट पाहू लागले….. पाऊस पाऊस, पाणीच पाणीओहोळ, नाले पिसाट जाहले,उन्मत्त होऊनी नदीस मलीन करू लागले….. पाऊस पाऊस, पाणीच पाणीगढूळली सरिताअश्रूभरीत डोळ्यांनी, सागराकवेत जाण्यासाठी आसुसली,झरझर वाहुनी खळाळत सागरास मिळाली,सरितेचे अश्रू पिऊनी सागर खारट जाहला,होता बाष्प जल थेंबांचे पाऊस होऊनी कोसळू लागला…… पाऊस पाऊस, पाणीच पाणीधांदल गडबड, भिन्न विचार अन् भिन्न गाणी…….
*भाषांची राणी*
माझी मराठी विश्वजननी केली तिजला लुळी – पांगळी आम्ही स्वकियांनी…. परभाषेची घुसखोरी, सदा अपुल्या ओठांवरी, हाय फाय शब्दांना भुलतो माय मराठीस अपमानीतो असूनी मराठी, नांदी बोलण्याची, परभाषेत करतो….. मराठी भाषेचे गोडवे, मराठी भाषा दिनीच गातो….. अन्य दिनी, पॉप, झाज, सालसा यातच रमतो…. मराठी भाषा मरते आहे, आपणच ओरडतो, अनन्वित अत्याचार करूनी तिज अनादरितो … मराठी जगली पाहिजे असे फतवे काढतो, किती आत्मीयता मराठीची आपण जपतो? एवढेच सांगणे विश्वाला, माझी मराठी विश्वजननी…. गावंढळ म्हणा खुशाल तिला आहे ती खरी साऱ्या भाषांची राणी…..
नको माझे
माझे व्यक्त होणे म्हणजे लेखन…. माझे लेखन इतरांना आवडणे ही पुढची पायरी…. माझ्या लेखनाला दाद देणे कौतुकास्पद….. माझे लेखन चतुरस्त्र होणे हे वाचकांवर अवलंबून असते… लेखन यशस्वी कधी वाटते जेव्हा वाचक वृंद वाढत जातो…. स्वतःसाठी लिहिणे…. स्वतःचेच वाचणे….. स्वतःचे कौतुक करणे…. स्वकेंद्रित लिखाण…. हे लिखाण होते का? या सर्व मुद्द्यांवरून, ‘माझे हा शब्द काढून टाकला तर’… किती छान वाटतं ते! कारण ते मग आपले होऊन जाते…… आणि मग त्यामध्ये आपलेपणा निर्माण होतो…..
निसर्ग
पावसाची छोटीशी सर,उधळून गेली मातीचं अत्तर!केले तिने पाण्याचे सिंचन,अन् थरथरले धरतीचे अंगण! धरती खालील पक्व बीजांची,झाली कोवळी तृणपाती ,सृजनाची ही किमया सारी,दिसू लागली जागोजागी! ग्रीष्मातून हा आज अचानक,ऋतुबदल हा कुणी केला?उष्ण झळा त्या किरणांच्या,कुणी शीतल झुळुकीत बदलल्या? स्वच्छ निळे आकाश जाऊनीजलघट कसे हे अवतरले?अन् साऱ्या आसमंती ,शामल घट हे कुणी पांघरले? सृष्टीची ही किमया सारीदिसते मजला क्षणोक्षणी!अंतर्बाह्य हे मन थरथरते,मोरपिसाची किमया सारी! सृष्टी कर्ता हा कुणी अनामिकदिसत नसे तो द्रुष्टीने ,पण त्याची सत्ता अनुभवतेमी चराचरातील बदलाने !