कृष्ण प्रेमकृष्ण नितळकृष्ण निर्मळकृष्ण निस्सीमकृष्ण तेजकृष्ण विराटकृष्ण मोहकृष्ण त्यागकृष्ण कुतूहलकृष्ण आदरकृष्ण सखाकृष्ण गुरुकृष्ण कोडंकृष्ण उत्तर कृष्ण पेंद्याचा सवंगडीसुदामाचा गुरुबंधूराधेचा तो सखागोपींचा सखाहरीयशोदेचा कान्हाद्रौपदीचा भ्राताअर्जुनाचा सर्वेसर्वायादवांचा राजा कृष्ण !!! रंग सावळामोरपंख डोईओठी बासरीराधा बावरीगोकुळ फुललेकृष्णरुप पाहुनी कृष्ण !!! कृष्ण श्वासकृष्ण आसकृष्ण भासकृष्ण गीताकृष्ण जीवनाचे सारकृष्ण अंतरीकृष्ण वदनीकृष्ण चराचरीकृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण !!! किती त्याची रूपंकाय त्याचा स्वभावकाय त्याचा विचारकाय त्याचा दृष्टिकोनकाय त्याची कृती ? कृष्ण !!! स्पष्ट त्याची बुद्धिमत्तालोभस त्याची महानतादिव्य त्याची दृष्टीकृष्ण सर्व सृष्टी कृष्ण !!! नाव याचं कठीणसमजायलाही हा कठीणचएकदा समजला हा कीसमजेल मग जीवनही !!! आता खरं तर मला अर्जुनच व्हायला हवं… योगेश्वर कृष्णाकडून आजचं महाभारत तरुन जाण्यासाठी !!! कृष्ण कृष्ण कृष्ण !!!
Category: Long Poems
श्रीकृष्ण
खट्याळ श्रीकृष्णाने,लावला लळा ! जसा मथुरेला,तसा दुनियेला!सगुण रूपात येऊन,अंतरंग हेलावून गेला ! बाललीलात रंगून,गोपीना लोभवून ,दूर गेला मथुरेला,राधेची धून घेऊन ! दुष्ट कंसाचा वध करून,न्याय दिला प्रजेला,मनुष्यत्वात राहून, देवत्व गुण प्रगट गेला ! पांडवांचा सखा बनून,कुरुक्षेत्री अवतरला !असत्य, दुर्गुणांचे,निर्दालन करून,भगवद्गीता तो वदला !
युगपुरुष तू
युगपुरुष तू पूर्णपुरुष तू विश्ववंद्य सन्मानकृष्णजयंती गाऊ आरती तव गुण गौरवगान।।ध्रृ।। जन्मचि कारागृही पहाराकंस वादळी वासलीला गोपांसवे गोकुळीरक्षणार्थ गोधनाससखे सोबती सर्वांसाठीकार्य तुझे वरदानतव गुण गौरव गान।।१।। वृत्ती राक्षसी वैरी ते तेनिर्दालन केलेगरीब गांजली प्रजाही सज्जनहित रक्षण झालेदीनानाथ तू भगवंता रे तूचि आशास्थान…..तव गुण गौरवगान।।२।। सत्त्यवादी तू न्याय नीतीचापक्ष पांडवांचाकौरव पांडव युद्ध प्रसंगीसारथी पार्थाचाअवतारी या कार्य आदर्शचि हाचि तव सन्मान……तव गुण गौरवगान।।३।। कर्म भक्ती नि ज्ञान मार्ग तेपार्था बोधियलेजन्म मृत्यूचे तत्व अगम्यचिसावध त्यां केलेपार्थ मनीचा किंत सारुनी दे युद्धा आव्हान……तव गुण गौरवगान।।४।। कार्य करोनी भगवंता तेप्रेमे अर्पूनीहीकर्म दोष ना त्या भक्तातेअनन्यभक्ती हीभगवत् गीता त्याग तत्व ते कृष्णा, कार्य महान…….तव गुण गौरवगान।।५।।
कृष्णा-(दहीकाल्याच्या निमित्ताने….)
कृष्णा, बंदिवासातून स्वातंत्र्याकडे तुझी वाटचाल काल रात्रीपासून सुरू झाली! कंसाच्या बंदिवासात देवकीच्या पोटी जन्माला येताच, दुसऱ्या क्षणी तुला तिथून स्थलांतर करावे लागले! विष्णू अवतारातील एक म्हणून पृथ्वीवर जन्माला आल्या बरोबरच तुला इथले मानवी जीवनाचे वनवास भोगावे लागले आणि गोकुळात जाऊन तू साधा गोपाल म्हणून जगलास ! इतर गोकुळवासी मित्रांबरोबर तुझे खेळ रंगले पण ते करता करताच तू किती राक्षसांचे पारिपत्य केलेस आणि दुष्टांच्या निर्दालनासाठी असलेला तुझा मानवी अवतार कार्यरत झाला ! गरीब बिचाऱ्या गोपांना घरचे दूध,दही, लोणी मिळत नाही म्हणून गोपींची मडकी फोडली. सर्वांसोबत त्यांच्या दही काल्यात रंंगून गेलास आणि समाजवादाचा एक धडा शिकवलास! जे आहे ते सर्वांनी वाटून घ्यायचं !थोडा मोठा झाल्यावर सांदिपनी ऋषींच्या आश्रमात शिकण्यासाठी गेलास! तेथे गरीब सुदाम्याशी मैत्रीचे बंध ठेवून पुढील काळात त्याचा उद्धार केलास! किशोरावस्था संपून मोठा झालास आणि कंसाचा वध करून मथुऱेचे राज्य मिळवलेस ! तारुण्यसुलभ भावनेने स्वयंवरासाठी गेलास ,तुला द्रौपदीची आस होती पण पुढे काय घडणार याचे दृश्यरूप बहुदा तुला दिसले असावे!त्यामुळे पांडवांच्या पदरी द्रौपदी देऊन तू तिचा सखा बनलास !दुर्गा भागवत म्हणतात की मित्र या नात्याला ‘सखा ‘हे रूप देऊन स्त्री-पुरुषातील हे नाते तू अधिक उदात्त केलेस ! आयुष्यभर पांडवांची साथ देत कौरव-पांडव युद्धात तू अर्जुनाचा सारथी बनून कुरुक्षेत्रावर उतरलास योद्धा म्हणून नाही तर सारथी बनून !एक सहज विचार मनात आला, द्रौपदीने कर्णाला ‘ सूतपुत्र ‘म्हणून नाकारले! सारथ्य करणारा माणूस समाजात खालच्या स्तरावर असतो हे तिने दाखवून दिले पण शेवटी युद्धात तू सारथी बनून जी पांडवांना मदत केलीस त्यातून तू सारथी हा सुद्धा किती महत्वाचा असतो हे द्रौपदीला दाखवून दिलंस का? तुझं सगळं अस्तित्वच देवरूप आणि मानव रूप यांच्या सीमेवर होतं! जन्म घेतलास त्यात तू त्याच रंगाचा रंगून गेलास! मगध देशाच्या लढायांना कंटाळून तू गोकुळ मथुरा सोडून द्वारकेला पळून गेलास आणि स्वतंत्र राज्य स्थापन केलंस म्हणून तुला रणछोडदास नाव मिळालं! वेगवेगळ्या राज्यातील राजकन्याशी विवाह करून तू साऱ्या भरत खंडाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केलास! आणि अवतार कार्य समाप्त करताना एका भिल्लाच्या हातून तुझ्या तळपायाला बाण लागून तुझे जीवन कार्य संपवलेस! कृष्णा, तुझे नाव घेतले की आपोआपच गुणा दोषातून मुक्ती मिळते असं वाटतं ! कारण आपण काहीही घडलं तरी ‘कृष्णार्पण’ असा शब्द वापरून ते संपवतो. सगळं हलाहल जणू संपून जातं तुझ्या स्मरणात! तुझा जन्म काळ मध्यरात्री येतो, तेव्हाही आम्ही वाजत गाजत तुझा जन्मोत्सव साजरा करतो कारण अंधाराची रात्र संपून तुझ्या जन्माने उत्साहाचा आणि कर्तुत्वाचा जन्म होणार असतो. आजचा गोपाळ काला म्हणजे उत्साही कामाची सुरुवात ! पावसाच्या सरी बरोबरच पुढील वर्ष आनंदात जाऊदे हीच इच्छा! आधुनिकतेच्या नावाखाली कृष्ण – ना किंवा परमेश्वराचे अस्तित्व न माणणारे आता ‘करोना’ पुढे शरणागत झाले आहे आणि आणि त्यावरून विज्ञानाने कितीही मात केली तरी एक हातचा तुझ्याकडे, परमात्म्याकडे आहे हे मात्र मान्य केले पाहिजे !
ओढ
किती…किती आठवू तूला मीहृदयातले गाणे..तू एक..एक तू हळवे मन होई आठवता तुलागळा दाटतो… श्वास होई गहीरा दूर असशी तरी…चित्र डोळ्यांत आहेश्वासांगणिक ओढ तुझीच राहे कसे सांगू भाव.. माझ्या मनीचेमंगल भाव झरती..हृदय होई पवित्र भेटीची आस वाटे..सदा सर्वदा गंडोळे मिटुनि पाहतो…तुझे सारे भास हसू सांडते तुझे…दरवळे सुगंधपोचतो तो गंध…माझ्यासमीप नयनांत तुझ्या डुंबतो…भिजतो मीअशी स्निग्धता.. का मिळे कुठेही ? हातात हात..गुंफुनि बसावेपाण्यात पाय…डोळे चंद्रा पहावे आवाज तुझा…शांत करतो मनासतृप्तता अंगी उमले..मिळे ध्यान सुख ओवाळतो तुजला…नेत्र निरांजनसुखाचे अनंत क्षण..तुला सदा मिळोत
अजून…
उणीवांची सतत उजळणीआठवणींची वजावटबेरजेचे काहीच क्षण मात्रअजून आलेले नाहीत… गंधाची ओळखस्पर्शाचे धुंदपणचवीचे कण मात्रअजून आलेले नाहीत… कोवळ्या प्रकाशाची तिरीपअंधारा मिटवणारीऊबदार किरण मात्रअजून आलेले नाहीत… सावळीच तीची कायाउभार मस्त ठाशीवओळखीचे क्षण मात्रअजून आलेले नाहीत… होकार मिळावा आणिकधन्यता मिळे दोघांसतिचे सूर तसे मात्रअजून आलेले नाहीत…
ती *वेळ ….
आज गोकुळात नंदा घरी मोठी गडबड उडाली होती! यशोदा अस्वस्थ होती येणाऱ्या बाळाच्या प्रतीक्षेत! घरातील मंडळी आणि तिच्या सख्या तिची काळजी घेत होत्या. कधी एकदा ते बाळ जन्माला येतंय याची सारे गोकुळ वाट बघत होते! बाहेर श्रावणाच्या सरीवर सरी येत होत्या. सारं रान कसं हिरवंगार झालं होतं! गोप गोपाल आनंद घेत होते सृष्टीचा!मुक्त, भारलेले, चैतन्यमय वातावरण गोकुळात होते! त्याउलट मथुरेत कंसाच्या कारागृहात वसुदेव- देवकी सचिंत बसले होते. देवकीचे दिवस भरत आले होते. कंसाचे मन अस्वस्थ होते. कंसाने आत्तापर्यंत जन्मलेली सातही बालके जन्माला आल्या क्षणीच मारून टाकली होती. प्रत्येक जन्माला येणारे बाळ त्याचा ‘आठवा’,त्याला मारणारा ‘काळ’असेल का? या भीतीने प्रत्येक बाळ त्याने यमसदनास पाठवले होते. पण खऱ्या ‘आठव्या’ चा जन्म आज होणार होता. तेही बाळ मारलं गेलं तर …म्हणून वसुदेव देवकी दुःखी होते.. पण आज परमेश्वरी लीले चा अवतार होणार होता! बंद कारागृहाच्या आत नवचैतन्य घेऊन ते बाळ जन्माला येणार होते. हुरहुर होती ती अशांना की, येणारा जीव परमेश्वरी अंश असणार आहे हे माहीत नसणाऱ्याना! रात्रीचे बारा वाजले बाहेर पावसाची धुवांधार बरसात चालू होती! देवकीने जन्म दिला होता एका बाळाला ..सुकुमार, सुकोमल अशा… आता कंसाला सुगावा लागण्याच्या आत ते बाळ बाहेर काढायला हवे होते!वसुदेवाने एक टोपली घेतली. त्यांत मऊ शय्या तयार केली. देवकीने ते गोजिरवाणी बाळ हृदयाशी धरले. त्या इवल्याश्या जिवाला तिला सोडवेना! बाळाला कुशीत घेऊन त्याचे पटापट मुके घेतले. मन घट्ट करून तिने बाळाला टोपलीत ठेवले. मऊशार वस्त्राने पांघरले. जणू तिने आपल्या मायेचे आवरण त्याच्यावर घातले, की ज्यामुळे ते कोणत्याही संकटापासून दूर राहणार होते! तो गोंडस जीव तिला हसत होता. जणू म्हणत होता,’ अगं,मी तर जगाचा त्राता! तू काळजी करू नकोस, मी सुरक्षित राहीन!’ वसुदेव बाळाची टोपली घेऊन यमुना तीरी आला. यमुना दुथडी भरून वाहत होती. ‘या बाळाला मी कसं नेणार पार?’ असा विचार त्याच्या मनात येत होता. टोपली डोक्यावर घेऊन मोठ्या धीराने त्याने नदीच्या पाण्यात पाय टाकला. समोरचा जलमार्ग कापून जायचे होते त्याला! पण जसा टोपलीतील बाळाच्या पायाला पाण्याचा स्पर्श झाला तसे पाण्याचा प्रवाह त्याच्यासाठी मार्गच बनला जणू! ती वेळ त्याची होती. दोघेही यमुना पार झाले. तिकडे नंदाच्या घरी यशोदेच्या कुशीत नुकतेच जन्माला आलेले कन्यारत्न होतेच. यशोदेच्या कुशीत त्या बाळाला ठेवून तिच्या बाळाला नंदाने वसुदेवाच्या स्वाधीन केले. आपल्या कुशीत नुकतंच जन्माला आलेला बाळ दुसऱ्याच्या ताब्यात द्यायचं! किती वाईट वाटलं असेल यशोदेला! आणि हेही माहीत होतं की, हे बाळ आपल्याला परत दिसणार नाहीये! यशोदे ची लाडकी मथुरेत आली वसुदेवा बरोबर! देवकी प्रसूत झाल्याचे कळताच कंस कारागृहात आला. बाळाचा जन्म होऊन दुसरं बाळ तिथे आणण्याच्या या प्रक्रियेत किती वेळ गेला असेल देव जाणे! पण कृष्ण सुरक्षित स्थळी पोचला आणि यशोदेची कन्या देवकीकडे आली! त्यागाची कसोटीची वेळ होती प्रत्येकाच्या! वसुदेव- देवकी ने मनावर दगड ठेवून आपलं बाळ दुसरीकडे सोपवले होते, तर नंद- यशोदेने आपली छोटी लेक दुसऱ्याच्या हाती दिली होती! तो बाल जीवही त्यागासाठी सिद्ध होता जणू! वसुदेव देवकीला उघड्या डोळ्यांनी त्या बालिकेच्या मृत्यूला पहावे लागणार होते! जीवनातील एक कसोटी पूर्ण करावी लागणार होती. या सगळ्यांना खेळवत होता तो ‘परमात्मा’ ज्याचा जन्म, दुष्टांच्या संहारासाठी झाला होता. त्यासाठी बालरूप घेऊन तो पृथ्वीवर अवतरला होता! त्याच्या नवीन जन्माची हीच ती ‘वेळ’ होती. कृष्ण जन्माष्टमी साजरी करताना कृष्णाचे हे आश्वासन आपल्या मनात कायम रहाते, ‘यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्..
स्मरण क्रांंतीवीरांचे
गाऊया क्रांतीचे गुणगानक्रांतीविरांच्या पराक्रमांचेस्मरणचि हा सन्मान।।ध्रृ।। संसारी ना ध्यान तयांचेशिर तळहातावरीस्वराज्यप्राप्ती श्वास जयांचेध्यास उरी अंतरीहास्य मुखावरी फासावरी ते चढलेशूर जवानगाऊया क्रांतीचे गुणगान।।१।। मंत्र करेंगे मंत्र मरेंगेमंत्रघोष गाजलाज्योतीने चेतवीत ज्योतीक्रांती घोष गर्जलागुलामगिरी घन तिमिरी विलसेक्रांती सूर्य महानगाऊया क्रांतीचे गुणगान।।२।। स्वातंत्र्याच्या वेदीवरतीआनंदे बलिदाननाम कुणाचे अनाम कोणीसार्थ वेचिले प्राणस्वतंत्रतेच्या संग्रामातील सैनिकसर्व महानगाऊया क्रांतीचे गुणगान।।३।। अमृत उत्सव स्वातंत्र्याचाआनंद उत्सव हास्वातंत्र्यास्तव प्राण वेचिलेशहीद त्यांचा हाकृतज्ञ आम्ही कधि न विस्मरुनित्य करु सन्मानगाऊया क्रांतीचे गुणगान।।४।।
तिरंगा
तीन रंगात फडकत राहील,माझ्या देशाचा सन्मान !आकाशातून विहरत जाई,भारताचा अभिमान ! केशरी, पांढरा,अन् हिरवा, रंगध्वजाचे येत क्रमाने.!वैराग्याला प्रथम स्थान ते.. .. दिले असे देशाने! पावित्र्य जयाचे दावून सर्वा,शुभ्र पांढरा मध्ये असे!हिरव्या रंगाने ती अपुली, सस्यशामल भूमी दिसे. ! विजयचक्र हे मधोमध दावी‘विजयी भव’ चे रूप सर्वा!चक्रा वरच्या आऱ्या दावती, देशभक्तांच्या शौर्या! उंच लहरता तिरंगा अपुला,स्वातंत्र्याची ग्वाही देतसे!दरवर्षी नव जोशाने हा,स्वातंत्र्यनभी फडकतसे! गर्वाने आम्ही पुजितो,जो देशाचा मानबिंदू खरा!त्याच्या छत्राखाली भोगतो,स्वातंत्र्याचा रंग हा न्यारा! स्वातंत्र्यदिन, असो वा प्रजासत्ताक दिन असो!आमचा तिरंगा, फडकत राहील !तिरंग्याच्या रक्षणासाठीप्रत्येक बांधव,सज्ज राहील!
जागर
तरंगांचे काय होउठतात आणि विझतात तेअंतरीच्या कंपनांचेधडधडणे चालू सदा… सदा आठव राहतोमंद वा तेजाळतास्वप्न मग गोंजारतेभेटेल का ती एकदा ? एकदा भेटली तीदिले प्रासादिक गोड काहीआस हृदयी वाढली..अन्दर्शनाची आस राही राही अनंत इच्छाअसे तसे तिला सुखवावेसमर्पुनि देह तिजलावितळूनी वाफ व्हावे व्हावे असे…तसे व्हावेकल्लोळ कायम चाललेलादिवसांगणिक ओढ वाढेकळे ना काही…माझे मला