झाले आगमन आनंदाचे,होता लक्ष्मीपूजन …घरे-दारे सजली..नर-नारी, बाल-वृद्ध,भरजरी पोशाखी नटली…ओसंडूनी आनंद वाहतसे…तल्लीन सारी सृष्टी,पाहुनी लखलखते सौंदर्य …पहाटे समयी गार वारेsssफुलत्या कळ्यांचे गंध सारेssउबदार किरणांची,शाल पांघरूनी…निसर्गाने दाखविले औदार्य…आतषबाजी फटाक्यांची,रोषणाई दिव्यांची,रेलचेल मिठाईची,आनंदा उधाण आले,लक्ष्मी सवे नारायण आले…घरी-दारी आनंदात रममाण होताना…सख्यांनो! लक्ष वेळा तुम्हा आठवले…जिथे-जिथे असाल तिथे,तेज दिव्यांचे पाठविले…तेज अलंकार लेऊनी,तेजोमय होऊनी साऱ्याजणी,काव्य शलाका तळपत राहोsदीपावली सर्वांना,आनंददायी, यशोदायी होवो..
Category: Long Poems
वेध दिवाळीचे
आली दिवाळी दिवाळी,सणांची माला सोबतीला !दारी पणत्यांच्या ओळीआनंदात सकल बाला ! गोड आवडीचे पदार्थ करतो,खमंग चकली, चिवडा बनतो !घरभर त्यांचा स्वाद दरवळतो,सर्व घराला आनंद तो देतो ! दारासमोर सडा शिंपला,सुंदर रांगोळी ती रेखली !रंग भरूनी त्यातच सुंदर,दिवाळी आनंदाने नटली ! नवीन कोरे कपडे खरेदी,फटाक्यांची आतषबाजी !दर दिवशी नवीन भेटी,आठवणींना करते ताजी ! भाऊबीज अन् पाडवा,भाऊ,पतीचा आठव देतो,प्रेमाची ती भेट घेऊनी,स्त्रियांस सणाचे मूल्य सांगतो ! दिवाळी आनंद सौख्य आणते,सर्वांना मनास विसावा देते!वर्षभराच्या श्रमतापातुन,दिवाळी आपणास मनी सुखवते!
जीर्ण गालिचा
नकळत पाहता मागे,अंतर सरलेल्या वाटेचा..मनी अंथरला गालीचा,नक्षीदार आठवणींचा ! दिसे फिकट फिकट रंगात,जरा विटका अन् जुनाट !परी नक्षीची ती संगत,अन् वीण त्याची नीट ! जीर्ण गालीचा हा भासे,जणू जीवनाचा सारीपाट!नियतीने मांडला होता ,रंग भरून चौकोनात! किती ऊन पाऊस झेलले,या गालीचाने सोसले !मनाच्या मखमली वरती,जीव किती अंथरले ! दिली साजरी बैठक त्याने,प्रत्येक त्या क्षणाला !स्मृतीत क्षण अन् क्षण,चिरंतन रुतून मनाला! आता पुरे त्याची ही आस,क्षणोक्षणी हे वाटे !उसवलेल्या गालीचा चे,उरी बोचतात काटे !!
हस्ताचा पाऊस
आली हस्ता ची सर,हत्तीच्या सोंडेपरी !मना घालीत भीती,हस्त धुमाकूळ घाली! मेघ केव्हाचे दाटले,नभी दिसले काहूर !काळ्या काळ्या हत्तींचे,झुंड माजले दूरवर ! हस्ताचा पाऊस ,कधी करतो उन्माद!कधी खेळतो हदगा,मनी घेऊन आनंद! साऱ्या नक्षत्रात आहे,हस्ताचा मोठा तोरा !वनी येऊन खुशीत ,थाट दाखवितो मोरा! हस्ताचे पाणी भिजवी,रान आणि अंगण !मग येई कोजागिरी,फुलवे स्नेहाचे चांदणं!
निसर्गाचा दसरा
निसर्ग किमयागार अफलातूननयनरम्य दृष्यांनी ठेवतो खिळवून कधीतरी देतो अद्वैताचे भानमूकजीवांना कधी चरण्यास रान हिरव्यागार कुरणांनी धरतीला सजवीपरोपकाराची भाषा तो शिकवी मातीचा गंध ..लावी ध्यास सृजनाचाआधारही मोठा तोच मानवाचा याच्या असीमतेला सीमा नाहीविजयादशमीचे सोने भरभरुन वाही फुलवतो बघा कसा हा कट्टा सराफाचासजवून कंठ आपला मिरवतो दसऱ्याचा
कोजागिरी पौर्णिमा
अश्विनातली आज पौर्णिमा नभी पूर्ण चंद्रवनी मनी भरला आनंद!शुभ्र चांदणे अवनीवरतीआनंद रजताची ही वृष्टीसागर अंतरी येई भरतीनभी पूर्ण चंद्रवनी मनी भरला आनंद..१.. अमृतचि चांदणे औषधीदुधात घ्यावे हे मिसळोनीसर्वांनी अजि घ्या रे पिऊनीनभी पूर्ण चंद्रवनी मनी भरला आनंद..२.. को ऽ जागर्ति को जागर्तिलक्ष्मी आली अवनीवरतीकरु प्रार्थना प्रसन्न हो तीनभी पूर्ण चंद्रवनी मनी भरला आनंद..३.. जागा सारे करा जागरालक्ष्मी पूजन स्तवनही कराविष्णु पत्नी ती ये घरा घरा नभी पूर्ण चंद्रवनी मनी भरला आनंद..४..
शशीबिंब उतरले धरेवरी…
शारदीय नवरात्रानंतर येणारी ही शरद ऋतूतील पौर्णिमा ही सर्व पौर्णिमांचा जणू हिरेजडित मुकुट आहे! पावसाचे चार महिने संपल्यानंतर शरदाचे सुखद चांदणे आणि पूर्ण चंद्रासह ही पौर्णिमा येते तेव्हा सर्वांच्याच मनात नवचैतन्याचे वारे वाहू लागतात. पौर्णिमेचा चंद्र बघता बघताच मनातले की तसं तर प्रत्येक मराठी महिन्यात येणारी पौर्णिमा ही नवीन काहीतरी घेऊन येते आणि असा विचार मनात येताच माझे मन चैत्री पौर्णिमे कडे वळले. चैत्र महिन्यात येणारी पौर्णिमा हा हनुमंताचा जन्मदिन आहे. बुद्धीमंत, शक्तिमान असा मारुती चैत्री पौर्णिमेला उगवत्या सूर्या बरोबरच जन्म घेतो आणि आपल्याला शक्तीची उपासना करण्यात प्रवृत्त करतो. चैत्रा नंतर वैशाखात सूर्याचे तापमान वाढू लागते आणि उन्हाचा चटका बसू लागतो. अशावेळी येणारी वैशाखी पौर्णिमा उत्तरेत पंजाब, दिल्ली या सारख्या भागात बैसाखी म्हणून साजरी होते. निसर्गात मिळणारी लिंबू ,कलिंगड, खरबूज यासारखी फळे व त्यांचे रस इथे मुबलक प्रमाणात वापरतात. त्यानंतर येणारी ज्येष्ठ पौर्णिमा आपल्याला निसर्गाकडे नेते. पावसाची सुरुवात होऊन सृष्टी हिरवीगार होण्याचा हा काळ! या दिवशी स्त्रियांच्या वडपोर्णिमा व्रताचे नाते आपल्याला निसर्गाशी एकरूप होण्यास शिकवते !आषाढी पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. आई, गुरुजन, ग्रंथ असो वा निसर्ग आपल्या गुरुस्थानी असणाऱ्या प्रत्येका प्रती आपला कृतज्ञ भाव व्यक्त करणारी ही आषाढातील पौर्णिमा! कधीकधी चंद्राचे दर्शनही होत नाही या पौर्णिमेला! तरीही ही पौर्णिमा आपल्या मनाला एका वेगळ्या भावविश्वात घेऊन जाते. श्रावणात येणार्या नारळी पौर्णिमेपासून पाऊस हळूहळू कमी होऊ लागतो. खवळलेला समुद्र शांत होऊन समुद्रावर कोळी लोकांना आपले व्यवहार करता यावे ,यासाठी समुद्राला नारळ अर्पण करून आपण आपली कृतज्ञता व्यक्त करतो!भाद्रपदात येणारे गौरी गणपतीचे सण साजरे करून येणारी भाद्रपद पौर्णिमा ही पुढे महालया चे दिवस सुरु करते. आपल्या पूर्वजांचे स्मरण या काळात केले जाते. या काळात पाऊस कमी होऊन पिके, भाजीपाला याची नवनिर्मिती दिसू लागते. अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमा ही सर्व पौर्णिमांचा मुकुट मणी वाटतो मला! पाऊस संपल्याने सारी सृष्टी हिरवेगार झालेली! दिवाळीसारखा सण तोंडावर आल्याने सगळीकडे उत्साह भरलेला! आकाश निरभ्र होऊन चांदण्यांनी भरलेले तर त्यांचा सखा चंद्र, त्याच्या शांत, स्निग्ध प्रकाशाने सृष्टीला सौख्य देणारा! या दिवशी चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवून आपण जागरण करतो. या पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा असेही म्हणतात. कारण नवीन भात आले असल्याने पौर्णिमेला खिरीचा नैवेद्य केला जातो. कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा! संध्याकाळच्या शांत वातावरणात त्रिपुर लावून त्याची शोभा पहाण्याचा आनंद वेगळाच! त्रिपुरासुराचा वध केला तो हा दिवस म्हणून त्रिपुरी पौर्णिमेचे महत्व! आल्हाददायक वातावरणात येणारी मार्गशीर्ष पौर्णिमा!यापौर्णिमेचा चंद्र आकाराने थोडा मोठाच वाटतो. हळूहळू दिवस मोठा होत जाणार आणि रात्र लहान याची जाणीव करून देणारा! सर्व सृष्टीचे तारणहार ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा दत्तावतार मार्गशीर्ष पौर्णिमेला होतो. माघी पौर्णिमेचे वैशिष्ट्य जाणवते ते माघ स्नानात! या काळात, तीर्थक्षेत्री नद्यांच्या काठी मोठे मोठे मेळे भरतात आणि लोक पवित्र नदी स्नानाचा आनंद घेतात! अशा तऱ्हेने वर्ष संपत येते आणि फाल्गुन पौर्णिमा येते. सर्व वाईट गोष्टींचे अग्नि समर्पण करून चांगल्याचा उदय व्हावा म्हणून होळी पेटवली जाते! यानंतर आपण पुन्हा नवीन वर्षाचे स्वागत करायला सज्ज होतो. हिंदू संस्कृतीत निसर्गातील पंचमहाभूतांचा संबंध आपण सणांशी जोडला आहे. पृथ्वी ,आप, तेज, वायु. आकाश या सर्वांशी निगडीत असे आपले सण वार आहेत. पौर्णिमा हे भरतीचे प्रतीक आहे.कोणताही आनंद हा पौर्णिमेच्या चंद्रासारखा भरभरून घेता आला पाहिजे! भरतीनंतर ओहोटी हा निसर्ग नियमच आहे. जसे पौर्णिमेनंतर पंधरा दिवसांनी येणारी अमावस्या! अमावस्या नंतर दुसऱ्याच दिवसापासून कलेकलेने चंद्रकला वाढताना आपल्याला दिसते. मनावर आलेली अमावस्येची काजळी दूर होत होत होत पौर्णिमे कडे वाटचाल चालू होते. आपलं जीवन हे असंच असतं!सुखदुःखाच्या चंद्रकला नी व्यापलेले! कधी दुःखाचे क्षण येतात पण त्यांची तीव्रता काळाबरोबर कमी कमी होत जाते आणि सुखाची पौर्णिमा दिसू लागते. पण कायमच पौर्णिमा राहिली तर तिचे काय महत्त्व! तसेच पूर्णत्व हेही कायमचे नसते!’ पूर्णत्वाच्या पलीकडे नष्टत्त्वाचे उभे कडे’ अशी एक उक्ती आहे. त्याप्रमाणे सुखदुःखाची भरती ओहोटी आयुष्यात येत राहते. पुर्ण चंद्राचे या भरती ओहोटीशी कायमचे नाते असते. असा हा पूर्ण चंद्र प्रत्येक पौर्णिमेला आपण बघतो पण निसर्गाच्या अत्युत्तम अविष्काराचा दिवस कोजागिरी ला आपण पहातो.या दिवशी चंद्रप्रकाशात आटीव दुधाचा नैवेद्य दाखवून दुधाचा आस्वाद घ्यावा.आणि चांदणी रात्र आपण आनंदात घालवू या असाच विचार कोजागिरी पौर्णिमा निमित्ताने मनात आला!
………..विजयादशमी…………
दुष्ट बुद्धी दुराचारविकृतीचा पुतळा तोतुंबळ युद्ध देवांशीबाण वर्षा करी तो….१ महिषासुर..त्या सामोरीमूर्त सुरांच्या तेजांचीसिद्ध सिंहावरी सवारदुर्गा अष्ट भुजांची….२ देवी दुर्गा पराक्रमीमहिषासुरा मर्दिलेदेवांचा जय देखोनीजयजयकारे नभ भरले….३ दुष्टांचे निर्दालनहीरक्षण केले सुजनांचेपराभूत वृत्ती असुरीविजय सत्त्य नी नीतीचे….४ परंपरा ही विजयाचीआजही असत्त्य अन्यायीपहा हारती सर्वत्रसत्य जिंकते ही ग्वाही….५ सीमोल्लंघन आजलानव विचारे ही प्रगतीविजयादशमी!विजयाचासत्याचा ध्वज घ्या हाती….६
सलाम….ती ला
उत्तुंग भरारी तिचीनेत्र दिपून जातातस्वावलंबी पंख तिचेआकाशी झेप घेतात।। सांभाळते घर छाननोकरीतही रमतेसंचार सर्व क्षेत्रातउच्च पदी ती दिसते।। जिद्द चिकाटी कष्टातकधीच मागे नसतेप्रेम जिव्हाळा वात्सल्यमूर्तीरुप ती असते।। कर्तृत्वाचे भान तिलात्याग माया साहस तेशांत वृत्ती नित्य तरीझाशीवाली कधी होते।। फेड नाही उपकार तेधन्य नारी जीवनहीकर्तृत्वाला सलाम हासलाम मातृत्वाला ही।।
चांदणी चौकातला तोपूल आता तू विसरून जा… पुलावरुन मुळशीला जातानाघेतलेला थांबा, आता तू विसरून जा गार्डन कोर्ट, पिकॉक बे च्या रस्त्यावर असतापाहिलेली मित्रांची वाट यापुढे विसरून जा बंजारा हिल्स, अप अन् अबोव्ह राहतील कदाचितपोचताना तिथे लागलेली वाट, तू आता विसरून जा कट्ट्यावरचे रम्य क्षण सोबत प्रियेच्या तिथेघेतलेल्या आणाभाका तिथे.. त्याही तू विसरून जा वाहतूक बहुधा सुधारावी आताट्रॅफिक जॅ्म्स ते तू विसरून जा चांदणी चौकातला पूल पडला, नाव ते नक्कीच राहील पूल दिसला नाही जरी आता, चांदणी चमकत राहीलपुसून जातील आठवणी , हरवतील काही खुणाटोमणे – थट्टा साऱ्या, त्याही तू आता विसरून जा