सहजची भेटता तू आणि मी,काही चमकले हृदयीच्या हृदयी! बीज अचानक मनी पेरलेप्रीतीचे का ते काहीतरी! तिसऱ्या दिवशी सूर्यप्रकाशी,बीज अंकुरे मम हृदयी! प्रेम पाण्याचे सिंचन करिता,अंकुर वाढे दिवसांमाशी! मनी वाढली प्रेम न् आशा,रोप वाढता पाचव्या दिवशी! प्रीतफूल उमलले त्यावरी,‘प्रपोज डे’ च्या त्या दिवशी! फूल प्रीतीचे मिळे मला,‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी,फूल बदलले फळात तेव्हा,परिपक्व प्रेम मिळे हृदयी!
Category: Long Poems
मिठी …
आयुष्यात सोबतकायम तिचीच असावीबाहूंच्या कवेत येण्यातिची कधी ना नसावी ॥ १ ॥ नजरेत नजर खिळून राहावी. जरी दुभंगे धरणीविसरून जाव्या सर्व यातनात्या मोहक क्षणी ॥२॥ आलिंगनात या रुसवे- फुगवेसारे विरून जावेगालावरच्या खळीत तिच्यामी स्वतःला हरवून जावे ॥३॥ करकमलांची ही मिठीराहो वा ना राहोदेह वेगळे झाले तरीजीव एकमेकांत गुंतून राहो II४॥
ऋतूंची फुलमाला..
वसंत येईल राजा बनुनी,चैतन्याने भरली अवनी !नवसृजनाचे दालन उघडुनी,नवल उमटले माझिया मनी! ग्रीष्म झळा त्या येता भुवनी,तगमग होई सजिव जीवनी!शोधित जाई गारवाही मनी,चाहुल घेई वर्षे ची आंतुनी! वर्षेचा पहिला शिडकावा,चराचराला देई गारवा !वाट पहातो ऋतू हिरवा,दिसेल तेव्हा बदल नवा! शरदाचे दिसताच चांदणे,आनंदाला काय उणे !चंद्रचकोरी नभात बघणे,धरतीवर स्वप्नात रंगणे! हेमंता ची लागताच चाहुल,पडे थंडीचे घरात पाऊल!दाट धुक्याची घेऊन शाल,निद्रिस्त राही निसर्ग विशाल! शिशिराची ती थंडी बोचरी,पान फुलां ना निद्रिस्त करी!जोजवते आपल्या अंकावरी,शांत मनोरम सृष्टी साजरी ! सहा ऋतूंची ही फुलमाला,निसर्ग वेढितो ती सृष्टीला!प्रत्येक ऋतू बहरून आला,अस्तित्वाने मनात फुलला!
सरते वर्ष
गतसालाच्या आठवणींची,सुंदर अन् रंगीत कमान !डोळ्यापुढती बघताना ती,मनीचे माझ्या हरपले भान! गतसालाच्या खुणा उमटल्या,देई उजाळा आठवणीना !कसे वर्ष गेले काही न कळले,आठवता त्या मधुर क्षणांना! मेळ घातला लेखिका सख्यांचा,वेगवेगळ्या उत्सव निमित्ताने!नवीन काही मला गवसले,मन भरले त्या आनंदाने! काव्य, कथा अन् ललीत लेखन,अधिकच माझ्या मना भावले!साहित्याच्या नवनवीन रंगी,मन माझे हे गुंतून गेले ! अखंड राहो आपली मैत्री,सर्व सख्यांच्या प्रेम ज्योती!व्हाट्सअपच्या माध्यमातूनही,जुळली आपली प्रेमळ नाती! निरोप देऊ या सरत्या वर्षाला,स्वागत करू या नववर्षाचे !आनंदाचे, सौहार्दाचे वर्ष आले,दिवस येऊ द्या भाग्याचे !
चांदोबास
चांदोबाच्या गोष्टीतला चांदोबा तू !माझे सारे बालपण व्यापून टाकलेस !कधी भाकरी सारखा गोल गोल,तर कधी चवथीच्या कोरी सारखा !मामाचा वाडा चिरेबंदी ठेवणारा,आणि लिंबा मागे जाऊन लपणारा ! तारुण्यात येताना तुझ्या साक्षीने,आणाभाका घेतल्या,तर लग्नानंतर मधुचंद्राततू मिरवलास ! नंतर मात्र…माझ्या बाळाच्या संगतीतमी तुझ्याशी भावाचे नाते जोडले!आणि तू चंदा मामा झालास ! पुढे पौर्णिमा ते संकष्टी..दिसलास तू आभाळी ..बदलत्या रूपात, आकारात...तुझे सहस्रचंद्र बघणाराकिती भाग्यवान ! म्हणून सहस्रचंद्र दर्शन सोहळ्यात,तुझा किती मान! असा तू चांदोबा,सगळ्यांचा लाडोबा ! बालपणापासून वार्धक्यापर्यंत,सर्वांना लोभवणारा….आणि मला भुलवणारा ….
सरली दिवाळी
सरली दिवाळी,जपू मनी आनंदाचे क्षण!प्रत्येक दिवाळीची,मनी असे वेगळी आठवण! वसुबारस ते भाऊबीज,दिवस असती प्रकाशाचे!तोच प्रकाश मनात राहो,दिवे उजळीत अंतरीचे ! स्नेहभाव वाढीस लागे,उणी दुणी विरघळून जाती!दीपावलीच्या आनंदात,झरती स्नेहाच्या बरसाती! रेखते अंगणी रांगोळी,ठिपक्यांची अन् नक्षीची!तशी राखावी सर्वांची अंतरे,रेखीव, सुंदर नात्यांची! असेच राहो मन आनंदी,निमित्त कशाला दिवाळीचे?प्रार्थना करू ईश्वराची,निरंतर राहो सौख्य मनाचे!
दिवाळी येणार !…
दिवाळी पुन्हा येणार !जुन्या आठवणी आणणार..नव्या आठवणी जागवणारदिवाळी परत येणार दिन दिन दिवाळी गाईम्हशी ओवाळी म्हणायचोआता त्या तरी आहेत कुठं आसपास…तशा तेव्हाही सर्वांच्या आसपास नव्हत्याचलहानपणी असायचा दिवाळीला गोतावळामजा खूप यायची आता तर तो नाही.. एखादा भाऊ..एकुलती बहीण एकच मामा… एखादी आत्या…आपण ही एकटेचतरीही जमतो भाऊबीजेला … सख्खे चुलत मावस सगळेच…कधी घरी ….कधी बाहेर आणि आहेत की मित्रमंडळी…काही प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देणारी, फराळाला भेटणारी अन् काही आपल्यासारखी Wapp वर विश करणारी आपण ही किती बदललोवाडा-चाळीतून अपार्टमेंट मध्ये आलोकाल होती सायकल..आता गाडी आलीतेंव्हा होती पुस्तके, आताही ती आहेतच त्याबरोबर नेट आहे, माहितीचा खजिना आहेकालपर्यंत होती फटाक्यांची दिवाळीआता थोडे फटाके थोडी संगीतमय दिवाळी तेंव्हा बरंच काही करायचो…आताही बरंच काही करतोफटाके उडवायचं तसंही वय नाही…लहानांना ही किती वाजवायचे केंव्हा वाजवायचे याची जाण आलीकाळ बदलला… मी बदललो…दिवाळी ही बदलली करोना, लॉक डाऊन…थोडी भीती, दबलेला उत्साह…संपलं सगळंआता नवीन उमेद, नवीन उत्साह, नवा जोम तरीहीआठवणी येणार …येत रहाणार…आणि दिवाळी ही..मीही आकाशकंदील लावणार.. नवीन कपडे घालणार..दारात पणती लावणार…फराळावर ताव मारणार.. मित्रांना भेटणार… तुम्हाला शुभेच्छा देणार..दिवाळी येणार..परत येणार.. येत रहाणार
शुभ दीपावली
झाले आगमन आनंदाचे,होता लक्ष्मीपूजन …घरे-दारे सजली..नर-नारी, बाल-वृद्ध,भरजरी पोशाखी नटली…ओसंडूनी आनंद वाहतसे…तल्लीन सारी सृष्टी,पाहुनी लखलखते सौंदर्य …पहाटे समयी गार वारेsssफुलत्या कळ्यांचे गंध सारेssउबदार किरणांची,शाल पांघरूनी…निसर्गाने दाखविले औदार्य…आतषबाजी फटाक्यांची,रोषणाई दिव्यांची,रेलचेल मिठाईची,आनंदा उधाण आले,लक्ष्मी सवे नारायण आले…घरी-दारी आनंदात रममाण होताना…सख्यांनो! लक्ष वेळा तुम्हा आठवले…जिथे-जिथे असाल तिथे,तेज दिव्यांचे पाठविले…तेज अलंकार लेऊनी,तेजोमय होऊनी साऱ्याजणी,काव्य शलाका तळपत राहोsदीपावली सर्वांना,आनंददायी, यशोदायी होवो..
वेध दिवाळीचे
आली दिवाळी दिवाळी,सणांची माला सोबतीला !दारी पणत्यांच्या ओळीआनंदात सकल बाला ! गोड आवडीचे पदार्थ करतो,खमंग चकली, चिवडा बनतो !घरभर त्यांचा स्वाद दरवळतो,सर्व घराला आनंद तो देतो ! दारासमोर सडा शिंपला,सुंदर रांगोळी ती रेखली !रंग भरूनी त्यातच सुंदर,दिवाळी आनंदाने नटली ! नवीन कोरे कपडे खरेदी,फटाक्यांची आतषबाजी !दर दिवशी नवीन भेटी,आठवणींना करते ताजी ! भाऊबीज अन् पाडवा,भाऊ,पतीचा आठव देतो,प्रेमाची ती भेट घेऊनी,स्त्रियांस सणाचे मूल्य सांगतो ! दिवाळी आनंद सौख्य आणते,सर्वांना मनास विसावा देते!वर्षभराच्या श्रमतापातुन,दिवाळी आपणास मनी सुखवते!
जीर्ण गालिचा
नकळत पाहता मागे,अंतर सरलेल्या वाटेचा..मनी अंथरला गालीचा,नक्षीदार आठवणींचा ! दिसे फिकट फिकट रंगात,जरा विटका अन् जुनाट !परी नक्षीची ती संगत,अन् वीण त्याची नीट ! जीर्ण गालीचा हा भासे,जणू जीवनाचा सारीपाट!नियतीने मांडला होता ,रंग भरून चौकोनात! किती ऊन पाऊस झेलले,या गालीचाने सोसले !मनाच्या मखमली वरती,जीव किती अंथरले ! दिली साजरी बैठक त्याने,प्रत्येक त्या क्षणाला !स्मृतीत क्षण अन् क्षण,चिरंतन रुतून मनाला! आता पुरे त्याची ही आस,क्षणोक्षणी हे वाटे !उसवलेल्या गालीचा चे,उरी बोचतात काटे !!