नवीन दिवस, नवीन वर्ष ,कालचक्रातील पुढची आरी !कितीक गेल्या फिरत फिरत,आत्ताची ही आहे न्यारी !….१ काळाच्या गतीतील एक वर्ष,देऊन गेले कितीक गोष्टी ,जगण्यासाठी समृद्ध अनुभव,बांधला गेला अपुल्या गाठी !…२ रहाटगाडगे कालचक्राचे,विश्वामध्ये फिरत रहाते !प्रत्येक पोहरा भरून येतो,अनुभव त्याचे करित रिते !….३ कालचक्रावर असतो आपण,एक अस्तित्व ते बिंदू मात्र !त्या बिंदू चे नाते असते,परमात्म्याशी परम पवित्र!….४
Category: Long Poems
अवतार दत्तगुरूंचा…..
श्री दत्तगुरु अवतारा ,त्रिगुणात्मक जगतारका !अवतरला तुम्ही जगती ,तारण्या सकल दुःखकारका!….१ उत्पत्ती, स्थिती, लय जाणू,त्रिगुण हे या जगताचे !ब्रह्मा,विष्णू, महेश ,साक्षी भूत त्या लीलेचे !…..२ सती अनुसये चे सत्व ,इथे लागले पणाला !तिन्ही बालके सृष्टीची ,जागवले तिने मातृत्वाला!….३ गौरव झाला जगी या,अनुसया मातृभावाचा !दिगंबरा तुझा अवतार,न्याय देई अजब हा साचा!…४
ज्ञानेश्वर माऊली..
इंद्रायणी काठी,आळंदी नगरी !ज्ञानाची वैखरी,वहातसे!…….१ ज्ञानोबा माऊली,सुखाची सावली!समाधिस्थ येथे,निरंतर!…..२ सोन्याचा पिंपळ,त्याच्या पायी ज्ञाना!करीतसे ध्याना ,निरंतर……३ ज्ञानियांचा राजा,शिष्य निवृत्तीचा !सागर ज्ञानाचा ,सर्वांसाठी…..४ मन तृप्त होई,पाहुनी समाधी!मनास ही शांती,मिळतसे……५
आनंदाची दीपावली….
आला दिवाळीचा सण,आनंद, सौख्य दे मना !सर्वांना आनंदी ठेव,हीच ईश्वरा प्रार्थना !….१ लक्ष दिव्यांची रांगोळी,उजळे सारी दिवाळी !सुख सौख्य आरोग्याची,आनंदाची मांदियाळी.!….२ फुटे फटाक्यांची माळ,येई आनंदा उधाण !अंगणी खेळती मुले,वाटीत आनंदी वाण !…..३ दीपावलीच्या शुभेच्छा,सर्वास आनंददायी !आयुरारोग्य सर्वा मिळो,हीच इच्छा मनाठायी!….४ आनंदाची दीपावली ,सौख्य देईल सर्वांना!निरंतर सुख मिळो ,ही देवाजीस प्रार्थना!…५
दिवाळी
संपले तिमिर सारे, तेजात न्हाइली नगरेपथ सर्व उजळती, विहरती आनंद लहरे दीप लाखो प्रज्वले, मिटवण्या काळोख साराधुंद तो घेऊन सुगंध कुठूनसा आला वारा लहान थोरच काय निसर्ग सुध्दा उल्हसित होईआपल्या अंगणी ही आकाशकंदील झळकवी मिरवतो आकाशकंदील टांगलेला ऊंचावरीसडा रांगोळी सजली अन् तोरण सजे दारी अभ्यंगस्नान मग होई उटणे सुगंधी लावूनीतापलेले गरम पाणी, चढवीतसे न्यारीच धुंदी गोडगुलाबी थंडी बोचरी, फुलवी रोमांच अंगीनवनवीन वस्त्रे लेवूनी, सारे जाती रंगून रंगी दिव्यांची ही रोषणाई असे प्राण दिवाळीचाशकुनाची सुवर्णकिरणे, अंत करी वेदनांचा सकाळ होता जमती सारे,तिखटगोड त्या फराळासणासुदीची गोडी वाढे जमे जेव्हा आप्तांचा मेळा दिवाळीची महती सांगू किती, परमोच्च सुख आहेआबालवृद्धांसंगे देव सुध्दा वाट पाहे भोवताली भुकेले पोरके असतील कितीआनंद पोचवूया त्यांच्यापर्यंत…….आज तुम्हाला ही विनंती
देवीचे नवरंग….
पहिली माळ सजे, केशरी रंगाने,सजवी देवीला, झेंडूच्या हाराने! ..१ पांढऱ्या रंगाची, माळ दुसरी,पावित्र्य घेऊन, आली साजरी!…२ तिसरी माळ रंग, लाल घेऊन आली,जास्वंदीची लाली येई, देवीच्या गाली!..३ चवथ्या माळेला, निळे स्वच्छ आभाळ,कुमकुमार्चनाने फुलले, देवीचे भाळ!…४ शेवंतीची फुले वाहू, पाचव्या माळेला,पिवळ्या रंगाचा शालू, शोभे देवीला!..५ सहाव्या माळेला, हिरव्याची किमया,देवीला भरु या, बांगड्या हिरव्या!..६ सातव्या माळेला, रंग येईल करडा,देवीला देऊया, मानाचा विडा.!..७ आठवी माळ करी, गुलाबी उधळण,देवीच्या खेळा मिळे, मंदिर अंगण!..८ नववी माळ सजे, जांभळ्या रंगाने,देवी सौख्य देई, जांभळ्या साजाने!..९ नवरंगाची पखरण, होई नऊ दिवस,दसऱ्यास सज्ज, देवी सिम्मोलंघनास!.१०
गणपती विसर्जनतो निघाला
आला आला म्हणेपर्यंतबाप्पा माझा निघालाआनंद घेऊन आला चतुर्थीलाआज डोळ्यांत पाणी आणून चालला केली मी उत्तरपूजानिरोपाची आरती झाली“पुढच्या वर्षी लवकर या” म्हणतानाबाही माझी ओली झाली सोबतीने बाप्पाच्या माझ्यासुख घरी वसले होतेवर्षभराच्या मळभातूनमन मोकळे झाले होते दर्शनाने रोज त्याच्याप्रसन्न होत होते सारेसजली होती आनंदानेनात्यागोत्यांची आभासी मखरे नको ढोल नको ताशेबँड बाजाही आज नकोतसंही माझ्या बाप्पालाभक्तिभावाखेरीज काही नको निसर्ग मात्र यंदा जराजास्तच प्रसन्न होतागच्चीतल्या बागेतून बाप्पालारोज नवीन फुले वाहात होताजाता जाता मात्र आकाशातूनभरपूर तो बरसून गेला निघाला आज देव माझाघर सुगंधित मंगल करूनजाताना मात्र नेहमीप्रमाणेजीव माझा आला भरून एक मात्र बरे झालेबाप्पा घरातच विसर्जित झाले पुनरागमनायचं म्हणालो तरीतुझ्याजवळच राहतो म्हणाले पुनरागमनायचं म्हणालो तरीतुझ्याजवळच राहतो म्हणाले *हरि: ॐ तत्सत् *इति श्रीगणेशार्पणमस्तु
पृथ्वीतलावरील विसर्जनानंतर श्री गणेश आपल्या घरी पोहोचलेत
आलास तु परतूनी बाळा…जाऊनिया दूर मानव देशी !वारूनी दुःखे, सुखवायां सकळा..लाडक्या,नित्य किती कष्टशी !! तुझ्या दर्शने गणेशा, होती..यातना जनांच्या बोलक्या !महिमा तव कृपेचा रे किती..वेदना साऱ्या होती हलक्या !! ते भक्त तिथे हर्षिती किती..जाणूनी..आम्ही, विरह तुझा साहतो !काळाची थबकली वाटे गती…आणूनी नेत्री प्राण,वाट तुझी पाहतो !
अभंग रचना
गौरीच्या नंदना l तू गजवदना lसुखवी सर्वांना l दर्शनाने ll….१पोटाचे हे दोंद l तिथे रुळे सोंड lनाव वक्रतुंड l गजानना ll….२मोदक प्रीय तूl लाडू आवडतो lमोद तो मिळतो lआस्वादाने ll…३वाहन तुझे ते lसान मूषकाचे lशोभिवंत साचे l दिसे जनी ll…४सुंदर गुणांचा l बुद्धीचा तू दाता lप्रीयच जगता l तुझी मूर्ती ll….५येतोस या जगी l देतोस आनंद lआनंदाचा कंद l गणराय ll…६गजानना तुझे l रुप मनोहर lतू तारणहार l भक्तप्रिय ll…७आगमन तुझे l मोद देई सर्वा lआनंदाचा ठेवा l जनांसाठी ll..८
गणेश उत्सव
बाप्पा तुझे येणे, बाप्पा तुझे जाणे?आणि आमचे उगा मिरवणे…. आम्ही बाप्पा आणला….आम्ही बाप्पा बसवला….आम्ही नैवेद्य दाखवला….आम्ही बाप्पा विसर्जित केला…अनादी, अनंत तो एक!त्याला काय कोण बनवेल अन् बुडवेल? अनंत पिढ्या आल्या…अनंत पिढ्या गेल्या….बाप्पा तरीही उरला… काळ कधी का थांबेल?…बाप्पापण कधी न संपेल…आपल्या आधी तोच एक….आपल्या नंतरही तोच एक….त्यास काय कोणाची गरज?…. मग काय हा उत्सव दहाचं दिसांचा?…का न करावा तो रोजचा?…. आपुले येणे, आपुले जाणे,त्यामधले क्षणभंगुर हे जगणे….जगण्याचाच या उत्सव करावा….अन् रोजचं बाप्पा मनी बसवावा…. सजावट करावी विचारांची…रोषणाई मनातल्या प्रेमाची…नैवेद्य दाखवावा सत्याचा….फुले दया, क्षमा, शांतीची….अन् आरती सुंदर शब्दांची…. रोजचं क्रोध, मोह, मत्सर विसर्जित व्हावा….हिशोब आजच्या भावनांचा आजचं पूर्ण व्हावा…असा बाप्पा रोजचं का न पुजावा?…. रोज नव्याने मनी बाप्पा असा जागवावा….अन् उत्सव आयुष्याचा रोज नव्याने साजरा व्हावा…. सर्वांना गणेशोत्सवाच्या आरोग्यमय शुभेच्छा