सरत्या वर्षाला दाखवून पाठचालुया आता नववर्षाची वाट करूया थोडासा थाट-माटआली पहा रम्य पहाट नवचैत्यन्याचे वाहतील वारेनको विसरु या जुने सारे चैत्यन्याचे नवे धुमारेउजवून टाकू आयुष्य सारे नवीन स्वप्ने , नव्या आशानवीन आभा , अन नव्या दिशा जुन्या आठवणी, नव्या अपेक्षाउमेद नवी, अन नव्या आकांक्षासगळेच बरोबर घेऊन जाणेमागील दुःखे सोडून देणे नवा श्वास , नवा उत्साहनव्या जोमाने पुढे जाणे सारे डाव नव्याने मांडू, जुनी नाती सुदृढ करू नवे खेळ चालू करू अन नवे सवंगडी जमा करू
Category: Long Poems
“” मी “”
जगतच असते मी नातेसंबंधाना जोपासत, गोंजारतकधी नीरसपणे, कधी उत्कटतेनेहीअसते कधी मुलगी, कधी पत्नी कधी ताई आणि कधी आई देखीलत्या त्या भूमिका सांभाळत बोलतै देखील सर्वांशी, ऐकतो नवरा तेव्हा बायको काय म्हणतेय ते, मुल ही ऐकतात आई काय म्हणतेय,पण जेव्हा तू विचारतोस, काय चाललय तूझं, तेव्हा विचारात पडते मी! कारण तेव्हा कळत मला, मी काही केवळ मु्लगीपत्नी ,आई आणि ताईच नाहीये मीही “मी’ सूद्धा आहेच की आणि मी,शोधायला लागतेस्वतःला अशा रस्त्यावरुन जो शेवटी पोहचतो तुझ्यापर्यंत मग विश्वासते तुझ्यावर स्वत्व सांभाळत माझं !तेव्हा विचारतोस तू तुझ्या माझ्यातलं नातं ?आता कसं सांगू तुला ?सगळ्याच नात्यांना नावं द्यायची नसतात ते,तुला कधी कळेल का हे ?
….प्रेम….
प्रेम असतं ईश्वराचं देणंखरच,प्रेम निसर्गाचं देणंविश्वाचं गाणं ही प्रेमच असतंप्रेमच जगण्याचं कारणं असतं. प्रेम एक गूढ भावनाका जडावं कोणावरतीकळत नाही कुणा.प्रेम वाटणं व्यक्त करणंस्वीकारणं ही असतं परस्परांचा प्रतिसादप्रेम बहरणं असतं.प्रेम बालवयातलंनिष्पाप झरा जसाआयुष्यभर मनावरउमटून जातो ठसा. किशोरवयीन प्रेमचोरट्या नजरेत बरसतंतारुण्यातील प्रेम मात्रझोकून देत असतं. शारीरिक प्रेमापरीसभावनिक सरस असतंनिष्ठा त्याग नि.स्वार्थी तेजिवापाड असतं. प्रेम कुणीही करोप्रेम प्रेमच असतंप्रेम जीवनाधारआनंद घन असतं. प्रेमाविना जीवनक्षण क्षण मरण असतंप्रेमाविना जीवनजिवंत मरण असतं….जिवंत मरण असतं।।
अवकाशीचे ग्रहगोल
अवकाशी फिरणारे गोलजाणवून देती धरतीचे मोलजिथे नाही पाणी ते सर्व फोलम्हणती जी.. पाण्याबरोबर योग्य वायुज्यानी होई सृष्टी चिरायुमानवा लाभें दीर्घायुजयाचे नि.. पृथ्वी जरी असे माऊलीग्रह-गोलांचीही साऊलीसवे माना आपुल्या पाऊलीचालते कीं.. पंचतत्त्वाचा देह आलाज्याचा भार प्रबळ झालात्यांप्रमाणे जन्म चाललाजगती यां.. मार्ग जरी बदलावे वाटेमग अंतरीं भावना दाटेशांतवता ग्रहां वाट फुटेमोक्षाची ही..
आजची लोकोक्ती – परदु:खं शीतलं
महदपि परदु:खं शीतलं सम्यगाहु: प्रणयमगणयित्वा यन्ममापद्गतस्य।अधरमिव मदान्धा पातुमेषा प्रवृत्ता फलमभिनवपाकं राजजम्बूद्रुमस्य॥– ‘विक्रमोर्वशीय’, कालिदास. अर्थ :- दुसर्याचे दु:ख (कितीही) मोठे असले तरी शीतल असते असे म्हणतात ते योग्य आहे. (आता हेच पहा ना) ही मदांध (कोकिळा) माझ्यासारख्या संकटात पडलेल्या (माणसाच्या) मनधरणीला दाद न देता (आर्जवांकडे दुर्लक्ष करून) नव्याने पिकलेल्या जांभळीच्या फळाचा (सौंदर्यवती तरुणीच्या अधरांचे) चुंबन घ्यावे तसा आस्वाद घेण्यात गुंतली आहे. टिप –संस्कृत काव्य, महाकाव्य, नाटक इत्यादींमधील श्लोकाचा काही भाग अथवा श्लोकातील आशयसमृद्ध चरण पुढे संस्कृत व तिच्यापासून निर्माण झालेल्या भाषांमध्ये वाक्प्रचार, म्हण (उक्ती), अथवा संस्थांचे बोधवाक्य म्हणून वापरले गेले. असे काही श्लोक व त्यांपासून मराठी भाषेमध्ये रूढ झालेल्या उक्ती अथवा विविध संस्थांनी संस्कृत श्लोकांपासून स्वीकारलेली बोधवाक्ये आपण काही दिवस अभ्यासणार आहोत. महाकवी कालिदास रचित विक्रमोर्वशीय नाटकातील राजा विक्रमाचा हा स्वगत संवाद आहे. उर्वशीचा शोध घेणारा राजा विक्रम कोकिळाला उर्वशीविषयी महिती विचारतो परंतु त्याच्याकडून काही उत्तर न मिळाल्याने वरील उद्गार काढतो. यावरूनच संस्कृत भाषेत परदुःखं शीतलं ही उक्ती प्रचलित झाली असावी आणि त्यातूनच तो संस्कृतपासून निर्माण झालेल्या हिंदी, मराठी इ. भाषांमध्ये परदुःख शीतल असते अशा अर्थाचा वाक्प्रचार रूढ झाला असावा. विरलः परदुःखदुःखितो जनः।खरंय की दुसर्याच्या दुःखाने दुःखी होणार्यस माणसांची या जगात वानवाच आहे.आप दुःख भारी, परदुःख शीतळ
झुला
पहाता झुलावयाचे भान हरपतेझुला झुलण्यालावयाचे बंधन नसते उंच उंच घेता झुलामन आभाळ होतेकरपाशा पसरुनीनभा तोलू पाहते उंच जाता झुलायायचे धरणी माघारा,भान सदैव जपायचे मानवाचा जन्म सखा झुलाजन्मा येता झुल्यात ठेवती..ममतेने देऊनी हिंदोळा,अंगाई गाती.. असाच राहू दे आयुष्याचा झुला,होत राहो सदैव खाली वरती…..