तूच दुर्गा, तूच लक्ष्मी, तूच रूप सरस्वतीचे! त्या तिरंग्यास पेलण्याचे, अतुल्य आहे सामर्थ्य तुझे! कोणतेही क्षेत्र नाही, वर्ज्य तुजला या जगी! जाऊ दे तुझ्या यशाची, पताका ती उंच नभी! तूच आहेस सरितेपरी, साथ देण्या राष्ट्रासही ! ओघ तुझा अखंड वाहे, कोमल असुनी सामर्थ्यशाली! कर्तृत्व तुझे अनमोल, आहेस तू नारी अजोड! असशी माता, कन्या,जाया, नाही तुझ्या कर्तृत्वास तोड!
Category: Long Poems
तिरंगा
तीन रंगात फडकत राहील, माझ्या देशाचा सन्मान ! आकाशातून विहरत जगभर जाई, भारताचा अभिमान ! केशरी, पांढरा,अन् हिरवा रंगध्वजाचे येत क्रमाने.! वैराग्याला प्रथम स्थान ते.. ..दिलेअसे देशाने! पावित्र्य जयाचे दावून सर्वा, शुभ्र पांढरा मध्ये असे! हिरव्या रंगाने ती अपुली, सस्यशामल भूमी दिसे. ! विजयचक्र हे मधोमध दावी ‘विजयी भव’ चे रूप सर्वा! चक्रा वरच्या आऱ्या दाखवती, देशभक्तांच्या शौर्या! उंच लहरता तिरंगा अपुला, स्वातंत्र्याची ग्वाही देतसे! दरवर्षी नव जोशाने हा, स्वातंत्र्यनभी फडकतसे! गर्वाने आम्ही पुजितो, जो देशाचा मानबिंदू खरा! त्याच्या छत्राखाली भोगतो, स्वातंत्र्याचा रंग हा न्यारा! स्वातंत्र्य दिन असो वा प्रजासत्ताक दिन असो! आमचा तिरंगा, फडकत राहील! या तिरंग्याच्या, रक्षणासाठी! प्रत्येक बांधव, सज्ज राहील!
प्रजासत्ताक दिन
असो उणे 30°ची थंडी….! वा असो ५०℃ ची गर्मी…..! क्षणभराचीही नसे विश्रांती ऋतुकाळाची मला नसे क्षिती तमा कुठलीच मी बाळगत नाही टापूतल्या शत्रूला टिपल्याशिवाय मी रहात नाही माझ्या पवित्र मायभूमीला कधी मी नराधमांचा स्पर्शही करू देत नाही आईवडील, भाऊबहीण, पत्नी-मुलं सगळीच नाती तुमच्या सारखी सीमेचे रक्षण करता मनात मात्र भारतमाताच सारखी उरी असूदे वा असो कारगिल आम्ही नसतो कधीच गाफील शत्रूची कागाळी आम्ही सहन करत नाही जीवासंसाराची ची पर्वा आम्ही करत नाही भारतमातेची सीमा राखतो आम्ही भारतमातेची सीमा राखतो आम्ही प्रजासत्ताकाची हीच महती देशाची वाढवू यशोगाथा कीर्ती
रसाळ उसाचे पेरकोवळा हुरडा अन बोरंवांगे गोंडस गोमटेटपोरे मटार पावटे हिरवा हरभरा तरारेगोड थंडीचे शहारेगुलाबी ताठ ते गाजरतीळ दार अन ती बाजर वर लोण्याचा गोळाजीभेवर रसवंती सोहळाडोळे उघडता हे जडदिसे इवल्या सौख्याचे सुगड
अय्या, ईश्श झालंय टाईमबारआता, शोना-बाबू बोल ना यारअडगुलं मडगुलं ज्यांनी म्हणायचंतेच झालेत आता स्वीटू बेबी सगळंच चाललंय खुल्लमखुल्लागायब झाली स्वप्नांतली छबीयेता जाता सगळ्यांनाचप्रसादासारख्या मिठ्या नी पापे गडबडून जातात सगळेअचानक मोबाईलवर पडता छापेअबोल आणि अबोध प्रेमलुप्त झालंय का काळाच्या पोटात? कामाशिवाय पती-पत्नींनाहीप्रवेश निषिद्ध एकमेकांच्या गोटात..पुन्हा वाटतं कधीतरी द्यावाव्हाईटवाॅश वर्तमानाला लाजरं-बुजरं रंगवून टाकावंप्रत्येकाच्या मनालाहळूच उलगडत जावीअलवार नात्यांची गोडी त्यात विहरू दे पुन्हाअय्या न् ईश्श ची जोडी..
दीप मनीचा तेवता
दीप मनीचा तेवता तोझाकुनी ठेवू नकोजे दिल्याने वाढते तेराखुनी ठेवू नकोदीप मनीचा…१… पेटले जे भोवती तेफक्त तू पाहू नकोधाव घेई शांतवायामागे कधी राहू नकोदीप मनीचा…२… दु.खितांना हात दे तूकष्टता लाजू नकोअंतरीचा तो उमाळामारुनी राहू नकोदीप मनीचा…३… वरद हस्ते लाभले तेएकला भोगू नकोलक्ष हस्ते दे समाजाथोरवी सांगू नकोबा मना विसरु नको
अनाथांची माय सिंधुताईं
गेली अनाथांची मायकरून पोरके साऱ्यासकशी रोखावी डोळ्यातह्या आसवांची तळी माय फिरते जगातपरी लक्ष सर्व पिल्लांवरघाली पाखर मायेचीजशी दुधाची ती साय पिल्लू शोधे रानोमाळतिच्या ममतेची सयनाही दिसे कुठे सावलीकशी कुठे हरवली माय आपल्या चोचीतला घासभरवे सगळ्या पिल्लानादेण्या ममतेची ऊबसोडी आपल्या पिल्लाला किती बाळांची ही मायआज पहुडली शांतपरी पिल्लांच्या मनातभरून राहिला आकांत आता कोण घेईल जवळसाऱ्या पोरक्या पिल्लानास्वतः पांघरून ऊनदेईल सावली त्यांना किती आठवणींचा माळतुडवून लेक आलीतुझ्या मायेच्या उबेसाठीआज झाली ती पारखी.. कशी काढावी समजूतकसे करावे सांत्वनकोण देई आता तिलाआपल्या बोटाचा आधार आले अंधारून अवेळीदिशा झाकोळल्या दाहीआज त्या मायेसाठी नभजणू कोसळे अवकाळी
परिस्थितीच्या धक्क्यांतून अन् जवळच्या नातेवाईकांच्या धोक्यातून…कणखर बनत गेलीस ! घडवलंस स्वतःला…स्वतःचीच सोबत घेऊन…पुस्तकांचीही साथ मिळाली तूला..तूच निवडलंस त्यांना विश्वासू सोबती म्हणून….शब्दांवरची पकड घट्ट केलीस ! झिडकारली गेलीस..समाजाकडून..टाकली गेलीस..तरी तुटली नाहीस..झुकली नाहीसवाकड्या मार्गाला गेली नाहीस…मनाचा अंतर्दिप विझू दिला नाहीस ! अनेक अनाथांची माय झालीस..उभं केलंस त्यांना..या सोसाट्याच्या वादळातसन्मानानं नि जबाबदारीनं राहणारे नागरिक घडवलेस…तूझ्या आश्रमशाळेत..सिंधु संस्कृतीचं विद्यापीठच झालीस ! तूझं बोलणं ऐकत रहावं असं…सर्व विषयांना स्पर्श करणारंअनेक पुस्तकांचं सार तूझ्या आयुष्यात उतरलेलं…अखंड ऊर्जेनं तू बोलायचीस…नि उच्चशिक्षितालाही लाजल्यागत व्हायचं ! समाजानं तूला दगा दिला…पण तू त्याच समाजाला धडा दिलास…समाजानं पाजलेलं विष पचवून…समाजाला तू अमृतच दिलंस !तूझे ऋण अनाथांबरोबरच समाजावरही राहतील !
क्रांती ज्योतीसावित्रीबाई फुले…
ज्योत लाविलीस तू,मनामनात सर्वांच्या!शिक्षणाची कास तू,धरलीस स्त्रियांच्या ! ज्योतिराव, सावित्री,गाठ बांधली स्वर्गात!एकरुप होऊनी,मग्न झाले कार्यात! दीनदुबळया दलितांना,आधार त्यांचा मिळाला!अनाथ,सान बाळांना,मायेचा झरा लाभला! अस्पृश्यतेस दूर सारूनी,दीप समानतेचा लावला!मुलामुलींना शिक्षणाचा,ध्यास तुम्ही लावला! शेणगोळे आणि शिव्याशापझेलले तिने धैर्याने !तिच्या त्यागाची फळे,आज चाखतात मानाने! ममता, समता यांचे नाते,जोडले समाजात त्यांनी!ऋण त्यांचे विसरू नये,हीच इच्छा मन्मनी !
माई तुझ्या वेदनांना अंत नाही..
सिंधुताई,माय माऊली,कष्टमय आयुष्य जगली!झुंजत झुंजत आयुष्याशी,निरपेक्ष,निरामय जीवन जगली! जन्म जाहला जिथे तिच्या,आयुष्याला मोलचं नव्हते!वाढत होती जणू बेवारशी,प्रेम, जिव्हाळा तिथे न भेटे! ज्यांनी द्यावा तिला आसरा,असे सासर तिला पारखे!माय माऊली टाकून दिली,जग अवघे वागे शत्रू सारखे! स्मशानातच तिला लाभले,सुख कसे ते अनोळखी!प्रेताची आगच बनली ,ठेवी न तिला रोज भूखी! हाल अपेष्टांचे डोंगर लंघुनी,जाहलीस तू प्रेममयी!अनाथांची माय बनुनी,प्रेमभाव ओतलास जगी! जरी तुझे अस्तित्व लोपले,तेज तुझे राहील जगी!त्या तेजाच्या प्रकाशात ,नित्य चमकशील तू नभी!