मी खूप शोध घेतला…पण नाही मिळाली ती…इतकी ती दुर्मिळ कशी झाली ? अनेक पुस्तकांतून..कवितांतून मिळायचे तीचे काही अंश…लेखक कवींच्या माध्यमातून किंचीत दर्शन घडायचे रात्रीच्या काळ्याकुट्ट विचारांच्या डोहात…काही तुकडे चमकायचे…पण काहीच क्षणांचं ते समाधान…जास्त तहान जागवायचे अनेक चित्रातून…त्यातील रंग रेषा प्रकारातून…झिरपायचं काहीतरी आत…तीचेच काही कण…पण पूर्णता नाहीच उंच डोंगरावर शोधमोहिम घेऊनही…ढकललो गेलो वारा वादळाच्या ताकतीने मागे…तिथंच दोन साधूंचा संसार असावा ? दूरच्या डोंगराच्या आडोशाला…निखळ झरा खळखळताना पाहिला….काही वेळाने तोही कर्कश वाटला… शहराच्या आवाजी प्रदुषणात…गाड्या..कारखाने..प्रार्थनांचे कर्णे दुमदुमताहेत…साठवणुकीची गोदामे सारी… समुद्रही आता रोरावतोय…गर्जना करतोय..त्याच्या लाटाही विचारताहेत जाब… उग्र रुप घेऊन धडकताहेत…किना-याला एके ठिकाणी थांबलो…विश्वासच बसेना…एक शेतकरी पाण्याच्या पाटाला वाट करुन देताना…मातीला गोंजारत होता..पाणी गिरक्या घेत..न खळखळता पुढे सरकत होतं…. ही खरी शांतता होती..ती..जी मला हवी होती ! अन् तिथंच बंधा-यावर..मी बुजगावण्यासारखा निश्चल झालो !
Category: Long Poems
आयुष्याची उतरंड
आयुष्याच्या उतरंडी मधली,किती गाडगी मडकी उरली!मोजून दिली ‘त्या’ कुंभाराने,किती दिली अन् कशी रचली! जन्माला येतानाच मृत्तिका,घेऊन आली तिचे काही गुण!फिरता गारा चाका वरती,आकारा येई तिचे हे रांजण! आयुष्याच्या भट्टीमध्ये,भाजून निघते पक्के मडके!असेल जरी ते मनाजोगते,कधी लहान तर कधी मोठे! मंद आच ही आता होईल,वाटे शांत होईल ही भट्टी!एक एक मडके सरतच जाई,हाती राहील त्याची गट्टी! नकळत कधीतरी संपून जाईल,उरात भरली ही आग!शांत मना सह निघून जाईल,मडक्यांची ही सारी रांग ! बनले मडके ज्या मातीचे,त्यातच तिचा असेल शेवट!मिसळून जाईल मातीत माती,ती तर असेल त्याचीच भेट!
माझी भाषा मराठी आहे अमृताच्या गोडीची वेळ येताच कठोर होई जणु धार पोलादाची.. ज्ञानराये आणिली गीताई माझ्या मराठी भाषेत तुका नामया ची उजळली वाणी करता रचना भावभक्तीच्या अभंगांची.. माझी भाषा मराठी आहे अमृताच्या गोडीची ll१ll कानामात्रा अनुस्वार वेलांटी माझ्या भाषेचे वळणच आगळे सज्जनांसी वाटे मायाळु परी मान झुकविते ती गर्वाची माझी भाषा मराठी आहे अमृताच्या गोडीची ll२ll कडेकपाऱ्यांतुन, अवखळ पाण्यातुन बदलते तिची हो धाटणी येता प्रवाह सारेच एकत्र वाहे खळाळत सरीता मराठीची.. माझी भाषा मराठी आहे अमृताच्या गोडीची ll३ll राजा शिवाजी चे स्वराज्य उभे या पावन मातीत अजुनही गाते मायमराठी किर्ती शिवबाच्या पराक्रमाची.. माझी भाषा मराठी आहे अमृताच्या गोडीची ll४ll पु.ल. व.पु. कुसुमाग्रज आणि कितीतरी या भाषेची लेकरे अजोड केली निर्मीती त्यांनी मराठीच्या साहित्याची.. माझी भाषा मराठी आहे अमृताच्या गोडीची ll५ll गदिमा शांता, सुरेश वसंत आणि मंगेश शब्द ज्यांचे दिवाणे गळा मराठीच्या घालती माळ तेजस्वी शब्दमोत्यांची.. माझी भाषा मराठी आहे अमृताच्या गोडीची ll६ll लता, आशा, आणि अनेक गान सम्राज्ञी तारा झंकारत्या वीणेच्या मिरवीती अभिमानाने खांद्यावरी पताका ही मराठीची.. माझी भाषा मराठी आहे अमृताच्या गोडीची ll७ll श्रेष्ठ साऱ्या जगतात माझी ही मायबोली झरती धारा अमृताच्या ही वीणा जणु माय सरस्वतीची.. माझी भाषा मराठी आहे अमृताच्या गोडीची ll८ll
…..जीवनाचे सदर…..
जीवनाचे सदर वाचायला नजर असावी लागते। मजकुरांच्या जंजाळातून सफर करावी लागते जीवनाचे सदर..।। भरगच्च पृष्ठांच्या लाटा अंगांगावर झेलत क्षर अक्षरांची ही नित्य कदर करावी लागते जीवनाचे सदर….।! छोट्या मोठ्या वार्ता त्या वारेमाप वादळवाटा तोटे खोटे खरे काय खबर असावी लागते जीवनाचे सदर….।। जळीत बळी कानपिळी उपासमारी कथांच्या व्यथा साफ पचवताना भावभावनांची नजर मरावी लागते जीवनाचे सदर वाचायला नजर असावी लागते.
प्रेम लता…
सहजची भेटता तू आणि मी,काही चमकले हृदयीच्या हृदयी!बीज अचानक मनी पेरलेप्रीतीचे का ते काहीतरी!तिसऱ्या दिवशी सूर्यप्रकाशी,बीज अंकुरे मम हृदयी!प्रेम पाण्याचे सिंचन करिता,अंकुर वाढे दिवसांमाशी!मनी वाढली प्रेम न् आशा,रोप वाढता पाचव्या दिवशी!प्रीतफूल उमलले त्यावरी,‘प्रपोज डे’ च्या त्या दिवशी!फूल प्रीतीचे मिळे मला,‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी,फूल बदलले फळात तेव्हा,परिपक्व प्रेम मिळे हृदयी!
विसाव्याचे क्षण…
उरात रुतले काटे काही,शल्य त्याचे टाकून देऊ!आयुष्याच्या अंतिम अंकी,रिक्त, मुक्त होऊन जाऊ! जरी अंत हा माहीत नाही,मरणाचे राही मनात स्मरण!किती दिवस अन् किती वर्षेही,मनात मोजी प्रत्येक क्षण क्षण! मानव देह हा दिला प्रभूने,काही करावे त्याचे सोने!येता विसाव्याचे क्षण हे,संपत जाई कणाकणाने! स्मृतीत चिरंतन क्षण वेचावे,मनीची खळबळ मनी रहावी!एकांताच्या क्षणी रमावे,अंतर्यामी गुंतून जावे!
स्वरलतास श्रद्धांजली
शब्द भावना दाटल्या,काहूर माजले अंतरंगी!सोडून गेली काया ,लताचे सूर राहिले जगी! स्वर लता होती ती ,दीनानाथांची कन्या !सूर संगत घेऊन आली,या पृथ्वीतलावर गाण्या! जरी अटल सत्य होते,जन्म-मृत्यूचे चक्र !परी मनास उमजेना,कशी आली मृत्यूची हाक! जगी येणारा प्रत्येक,घेऊन येई जीवनरेषा!त्या जन्ममृत्यूच्या मध्ये,आंदोलती आशा- निराशा! मृत्यूचा अटळ तो घाला,कधी नकळत घाव घाली!कृतार्थ जीवन जगता जगता,अलगद तो उचलून नेई !
लता…श्रध्दांजली
” ल य आणि ता ल म्हणजे लता ” शांत भक्तिगीते जिची ऐकून, सकाळ जागी होते ती … लताआश्वासक आवाजाने जिच्या दिवस उजाडू लागतो ती … लता मनमोहक सुरांनी जिच्या संध्या धुंद होते ती … लताहळुवार स्वरांनी थकवा दूर करणारी अंगाई गाते ती … लता बागेतल्या मंद हवेत जिची भावगीते ऐकावीत ती … लतादूर डोंगरांवर जेव्हा ढग उतरतात तेंव्हा झाकोळून टाकते ती … लता झरझर झरणाऱ्या निर्मल पाण्यासारखी खळखळते ती … लतानदीच्या शांततेचं आणि समुद्राच्या अथांगतेचं दर्शन घडवते ती … लता ग्रीष्मात तळपते श्रावणधारेसारखी बरसते भिजवून टाकते ती … लताथंडगार हवेत मस्त गाण्यातून पश्मीना शालीची उब देते ती … लता कृष्णाला आर्त साद घालून राधेचं प्रेम सादर करणारी ती … लतामीरेचं भजन, ज्ञानोबाचं पसायदान गाणारी ती … लताआईची ममता, बहिणीची माया, मुलीचे आर्जव जागवते ती … लता उषेची लाली पसवुन आशेला दिशा दाखवते ती … लताआकाशाची निळाई मीनेवर चढवून हृदयनाथवर सावली धरते ती … लता कुणीही गायलं तरी तिनं कसं गायलं असतं हे आठवून देणारी ती … लताती सदा गातच रहावी, अशी कामना खुद्द गानदेवताच करेल ती … लता स्वरसूर, ल य, ता ल, मेलडीची अनिभिषिक्त सम्राज्ञी लता अशी लुप्त होणार नाहीभारतरत्नांच्या मांदियाळीतील हा ल खलखता ध्रुव ता रा लता कायमच चमकत राहील भावपूर्ण श्रद्धांजली
स्त्री शक्ती
काल माघी गणेश जयंती. या सोनी याच्या दिवशी मला आठवतो आहे तो एक जानेवारी २०२१ चा दिवस. ऑनलाईन अँप्लिकेशन, नंतर इंटरव्ह्यू आणि मग डाॅक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अशी कांचन गंगेसारखी शिखरे सेवानिवृत्तीनंतर पार करून वि जयश्री मिळवत वाढीव धनश्री मिळवण्यासाठी आपल्या ऑफिसमध्ये मी त्या दिवशी पाऊल ठेवले. घरून निघताना विशेष पूजा अर्चना करून निघालो होतो. कारण त्या दिवशी माझी सेकंड इनिंग सुरू होणार होती. या सेकंड इनिंगसाठी प्रेरणा मिळाली होती ती अर्थातच गृहलक्ष्मीकडून. ऑफिसमध्ये आल्यावर पहिले दोन दिवस ट्रेनिंगचे होते. त्यावेळेस प्रत्येक सिनियरच्या चेहर्यावर झळकत होतं ते सोनलस्मित. त्यामुळेच या वयातही नवीन काही शिकण्यास प्रोत्साहनच मिळाले. स्वागत झाले ते भागीरथी मावशींनी दिलेल्या अमृततुल्य चहाने. अजूनही त्या गोरा चहा असला की मला आवर्जून आणून देतात. प्रत्यक्ष कामाला सुरुवात केल्यावर असं लक्षात आलं की आपल्या सगळ्याच विद्या भ्यासाचा कस लागणार आहे इथे. त्यामुळे रेणुका मातेचं नाव घेऊन माझ्या प्रिय अंका ला सुरूवात केली. असो. आजच्या तिळगुळ समारंभासाठी वर उल्लेख केलेल्या [ व नवीन SMO Soja madam ] समस्त स्त्री शक्ती ला माझा सलाम.