अशाच एका सायंकाळी,अवचित गेली नजर आभाळी!दिसला मज तो वनमाळी ,खेळत रंगांची ही होळी ! करी घेऊनी ती पिचकारी,होई उधळण ती मनहारी !सप्तरंगांची किमया सारी,रंगपंचमी दिसे भूवरी ! सांज रंगांची ती रांगोळी,चितारतो तो कृष्ण सावळी !क्षितिजी उमटे संध्यालाली,पश्चिमेवर तो सूर्य मावळी ! फाल्गुनाच्या उंबरठ्यापाशी,सृष्टी अशी रंगात बरसली !घेऊन नवचैतन्याच्या राशी,चैत्र गुढी ही उभी राहिली !
Category: Long Poems
पंढरीच्या वाटे
पंढरीच्या वाटेफुले पायघडीपालखी ही दिंडीतुकोबांची!! पंढरीच्या वाटेसडा ही रांगोळीनाचे मांदियाळी वैष्णवांची!! पंढरीच्या वाटेअबीर गुलालझाले लालेलालआभाळ ही !! पंढरीच्या. वाटेस्वप्नी देखियेलीबंद बंद झालीपंढरी ही !! पंढरीच्या वाटेकरोना करोनाबंद वारी दैनापांडुरंगा !! पंढरीच्या वाटेये रे बा विठ्ठलातूच ये भेटीलाभक्तांसाठी !!!
समजत होते…रिस्क आहे..तरीही मी गुंतवला जीव.. तीच्यात..त्यांच्यावररिस्क शिवाय का मोठा फायदा होतो..हे मार्केटचे ब्रीदवाक्य सोबतीला…बुडवायला ! दिवस जातील तसे माझी गुंतवणूक वाढली…पण त्या प्रमाणात रिटर्न ?…राहू दे…गुंतवणूकीची दखलही नाही घेतली मार्केटच्या नियमांना धुळीस मिळवणारी…मला बेदखल करणारी ही कंपनी…आयुष्यभराची कंपनी/सोबत ठरावी या आशेवर राहिलो ! शाॕर्ट टर्मवरुन लाँग टर्मवर उतरलो…सहनशील व्हायचे ठरवले…संयम वाढवलाआत्त्तापर्यंतच्या कोणत्याही गुंतवणूकीनं इतका वेळ नाही घेतला …रिटर्न द्यायला ! मग पुढे इतर ठिकाणीही मन गुंतवलं…इकडे नाहीतर तिकडे…कुठेतरी प्रतिसाद मिळेल अशी आस होती ! वर्षांवर वर्षे गेली..सरकारे बदलली…गुंतवणूकीचे नियम पहिल्या इतके सोपे नव्हते आता…मुक्त व्यापार..सौदे वाढले ! आता या गुंतवणूक बाजारावर विश्वास नाही राहिला…परतावा वाढलाय पण विश्वासार्ह कंपन्याच राहिल्या नाहीत !
हाल ए गालिब़
कल बहोत पी मैने..सुबह सुबह शायर मिलेजाम पे जाम होते रहें.. शायरी चढ़ती गयी ठंड के माहोल मे घोल दिये रुबायीलब्ज़ ब लब्ज़..तरोताजा़ होते रहे हमसफर भी मिजा़ज़ ए शायर होते गयेठहाकों पर ठहाके फुटतें रहे…पीते रहें इश्के समंदर दिनभर साथ था हमारेगहराईयाँ नापते चले…लब्जों के सहारे लोग मिलते रहे…सीधेसे और चालाक भीउम्मीद बनती बिगडती रही…लोगों से हमारी शाम होते ही साथी और भी एक जुड गयाप्याला हाथ मे लेके चले शहर अपने हम राह टेढी मिली..गर्दीश मे गुम हो गयेरात की गहराई लेके..पहुँच गए मंझिल पे हम
अ क स्मा त
डोळ्यांत कुतुहल…ओठांवरी तृष्णावाढत राहिले..ओढत राहिलेपाहता तुला..पुन्हा पुन्हा हातांचे चाळे..चाललेउगाचचमेळ न त्यांचा बैसलाबट गालावरी तुझीया.. ढळतच राहेपाहता तुला..पुन्हा पुन्हा गर्दीत हरवले.. तुझे माझे डोळेशोधण्या..ओळखीचे काहीपापण्यां ओलावल्या नकळतपाहता तुला..पुन्हा पुन्हा जाहली वेळ निरोपाची.. आणिकसंपला सोहळा अपुलाऊतु गेले अकस्मात.. हृदयाचे आसूपाहता तुला..पुन्हा पुन्हा
सोबत
तव आठवा’वीण दिन फुकाच जातोभेटतची जा नित्य मजसी तूकुणास ठावे लाट कोणतीफेसाळुनि धावेल आणि..परंतु ! क्षणा क्षणाला मज आठवसी तूतूझेच मोहक चित्र निरंतररंग तयातील उडण्याआधीसामोरी ये…सखी क्षणभर ! कितीक वर्षे भजले मी तुजलाप्रसन्नता मिळाली तव आठवितागोजिरे रुप तुझे त्यावेळचेठसली मनावर ती सात्विकता ! सोबत सदा तूझीच असेतरी..आयुष्यभर मी वाट पाहिलीसांज आता आयुष्याची..अन्आस फक्त तूझ्या दर्शनाची !
बापू
एक केसरी फेटा माझामाझ्या बापूंचा ठेवासन्मान मिळवला केसरीयानेसमाजमनी केला रावा अडीअडचणीस धावून गेलेअपुले परके नच भेद कधीसंकटा मानिले शत्रू अपुलामानवता सदैव मनी ! शेतात कष्टले…मातीत गुंतलेघामावरी श्रद्धा कायमचीव्यर्थ..वाया काही ना जाऊ दिलेमोल जाणिले तयांप्रती ! मुलगा..पती..बाप..आजोबाकर्तव्या ना मागे हटलेआदर्श राहिला मनी आमच्याअसे होते बापू अमुचे ! नातवा पाहुनिया..चमकती डोळेकौतुकाचा डोह…नेत्री दिसेबोबड्या बोलांचे मानिले सोहळेअखंड समाधानाची छाया असे ! जरीपटका पाहतो आता.. जेंव्हा जेंव्हाफेटा सन्मानाचा मज आठवतोकर्तव्यांचे भान ठेवुनिया..मी बापूंना नित्य स्मरतो !
तीचा शोध
मी खूप शोध घेतला…पण नाही मिळाली ती…इतकी ती दुर्मिळ कशी झाली ? अनेक पुस्तकांतून..कवितांतून मिळायचे तीचे काही अंश…लेखक कवींच्या माध्यमातून किंचीत दर्शन घडायचे रात्रीच्या काळ्याकुट्ट विचारांच्या डोहात…काही तुकडे चमकायचे…पण काहीच क्षणांचं ते समाधान…जास्त तहान जागवायचे अनेक चित्रातून…त्यातील रंग रेषा प्रकारातून…झिरपायचं काहीतरी आत…तीचेच काही कण…पण पूर्णता नाहीच उंच डोंगरावर शोधमोहिम घेऊनही…ढकललो गेलो वारा वादळाच्या ताकतीने मागे…तिथंच दोन साधूंचा संसार असावा ? दूरच्या डोंगराच्या आडोशाला…निखळ झरा खळखळताना पाहिला….काही वेळाने तोही कर्कश वाटला… शहराच्या आवाजी प्रदुषणात…गाड्या..कारखाने..प्रार्थनांचे कर्णे दुमदुमताहेत…साठवणुकीची गोदामे सारी… समुद्रही आता रोरावतोय…गर्जना करतोय..त्याच्या लाटाही विचारताहेत जाब… उग्र रुप घेऊन धडकताहेत…किना-याला एके ठिकाणी थांबलो…विश्वासच बसेना…एक शेतकरी पाण्याच्या पाटाला वाट करुन देताना…मातीला गोंजारत होता..पाणी गिरक्या घेत..न खळखळता पुढे सरकत होतं…. ही खरी शांतता होती..ती..जी मला हवी होती ! अन् तिथंच बंधा-यावर..मी बुजगावण्यासारखा निश्चल झालो !
आयुष्याची उतरंड
आयुष्याच्या उतरंडी मधली,किती गाडगी मडकी उरली!मोजून दिली ‘त्या’ कुंभाराने,किती दिली अन् कशी रचली! जन्माला येतानाच मृत्तिका,घेऊन आली तिचे काही गुण!फिरता गारा चाका वरती,आकारा येई तिचे हे रांजण! आयुष्याच्या भट्टीमध्ये,भाजून निघते पक्के मडके!असेल जरी ते मनाजोगते,कधी लहान तर कधी मोठे! मंद आच ही आता होईल,वाटे शांत होईल ही भट्टी!एक एक मडके सरतच जाई,हाती राहील त्याची गट्टी! नकळत कधीतरी संपून जाईल,उरात भरली ही आग!शांत मना सह निघून जाईल,मडक्यांची ही सारी रांग ! बनले मडके ज्या मातीचे,त्यातच तिचा असेल शेवट!मिसळून जाईल मातीत माती,ती तर असेल त्याचीच भेट!