फुटतया रडू रानातली वस्तीखोपटापुढं शाळाघंटा होते…जीवआत आत गोळा..।।१।।लहान बहिणी भाऊघरात अंध आजीटोपलंभरुन भाकरीतूच कर भाजी..।।२।।आई बा जातातरोजंदारी वरकशापायी शाळा?काम घरचं कर..।।३।।भावड्याला मात्र म्हणतातपळ शाळेकडेनापास गाडी त्याचीजात नाही पुढे..।।४।।मोती अक्षर माझंनंबर पहिला आलातरीही आई म्हणतेदे सोडून शाळा..।।५।।नको गं आई मलाशाळेतून काढूसांगताना ही मलाफुटतया रडू..।।६।।
Category: Long Poems
मूर्ती तुमची! स्वातंत्र्यवीरास..
वीरत्त्व ज्यांचे वर्णिता,शहारून येई तीही मूर्ती,डोळ्यासमोर येता,उमटल्या मनी या पंक्ती! किती यातना सोसल्या,नाही त्यास काही सीमा!विजय अंती येताच,विसरती लोक तयांचा महिमा! मातृभू ही त्यांची,प्रिय प्राणाहुनी असेही त्यांना,त्यांच्या पुढे उगीच करतीकोणी किती वल्गना! शब्दांत वर्णिता न येई,त्यांचा अमोल त्याग!किती देह कष्ट झाले,उरी देशभक्ती ची आग! पण असीम त्यांची महती,नाही तुलना कशाशी!वंदन तुम्हास करता,मनी नम्र होतसे खाशी!
प्रपोझ
करता येईल का प्रपोझबसणे गुडघ्यावर अन् हातात मस्त रोझ कधी सुचलं नाही ना कधी केलंअर्ध आयुष्य असंच सरून गेलं आता जर आलीच कधी अशी वेळतर बघेन म्हणते करून हा ही खेळ पुढाकार घेऊन बोलतं करायचंय तुलाबघायचंय झालेला तुला नाद-खुळा इच्छा माझी आहे अशी सक्तकधीतरी डोळ्यातलं प्रेम शब्दात होऊ दे व्यक्त एखादाच उद्गार अन् हातात हातजन्मभर लाभो अशीच तुझी साथ..
मुक्ता
निवृत्ती, ज्ञानाची,लाडकी बहीण,जगली क्षणक्षण,भावांसाठी ! बालपण गेले,अकाली प्रौढत्व,ज्ञानाचे तत्व,सामावले ! ज्ञानदेव रुसला,बंद ताटी केली,मायेची मुक्ताई,साद घाली ! पोरपण होतेमांडे करू वाटले,ज्ञानाने चेतवले,अग्नी रूप! होती आदि माया,तिन्ही भावंडांची,शिकवण तिची,नाम्यासही ! मुक्त झाली मुक्ता,देह बुद्धी गेली,अमर राहिली,विठ्ठल कृपेत !
मी जलद होऊनी आलो
भेटीस तुझ्या मीसखये आतुर झालोबेभान धुंद मीजलद होऊनी आलो।।१।। अबाहूत अशी येनको दुरावा आतामम प्रिये न सहवेदुःख तुझे विरहार्ता।।२।।हा विरहाग्नी गेनित्य जाळितो तुजलादारूण उसासेक्षीण तनु धरणीला।।३।।साजिरे गोजिरेहसरे ते तव वदनसखी हाय लोपले दिसे उदासही म्लान।।४।।होऊन मेघ मीमृगातला आसुसलाप्रिय धरणी आलोतृप्त कराया तुजला।।५।।
रिक्त पोळे…
रिक्त झाले मनजसे मधमाशीचे पोळे!गेले मधु शोषून जरी,मन त्यातच घुटमळे ! रिक्त झालेली क्षते,कोरून बांधलेली घरटी!मधु साठविला तेथे,क्षणिक त्या सुखासाठी ! फुल पाखरे प्रेमाची,उतरली काही क्षणासाठी!मागे ठेवून ती गेली,मधु दुसऱ्या कोणासाठी! पोळी आधार ही घेती,घराच्या वळचणीला!अर्थशून्य तो आधार,उमजे त्या मधमाशीला! कार्य संपताच तिचे,सोडून जाई तेच घर!घराचा सापळा तो,राही पोरकाच पार! आता गमते मनाला,सत्य त्यातील ते थोर!प्राण पाखरू ही जाता,उरे नुसतेच कलेवर !
हा राहू तो केतू तो शनी हा मंगळये दोस्ता तुझ्या येण्याने सगळेअमंगळच पुसले जाते; हा हिरवा तो भगवा तो निळा हा केशरीये दोस्ता तुझ्या येण्याने सगळेनिर्मळ होऊन जाते; हा कुजका तो सडका तो आंबट हा तिखटये दोस्ता तुझ्या येण्याने सगळेचविष्ट होऊन जाते; हा दूर तो नाराज तो अबोल हा भडकये दोस्ता तुझ्या येण्याने गप्पांनाचांगलीच रंगत भरते!
ढग!
मनाच्या आभाळातून,शब्दांचे ढग उतरतात,वेगवेगळ्या भावना घेऊन,कधी रिक्त तर कधी भरलेले,कधी पांढरे तर कधी काळे! जसं आभाळ फिरेल तसे हे शब्द ओथंबून येतात,अगदी झेपावून येतात,झराझरा बरसू लागतात…कागदावर लेखणीच्या सहाय्यानेबरसू जातात! तेव्हाच हे मनाचे आभाळ रितं होतं!ते रितेपण पेलवत नाही काहीवेळा!उदासीनतेची छाया येते,विविध आकाराच्या त्या काळ्यापांढ-या ढगातून! एखादा ढग हत्त्तीसारखा दिसतोतर एखादा सशासारखा!फिरत असतो त्याच्याच तंद्रित!त्यातूनच निर्माण होते एखादीशब्दमाला! वेढून रहाते सार्या मनाला,व्यक्तातून अव्यक्ताकडे जाणारी,स्वत:च्याच कोशात गुरफटणारी…त्या काळ्या पांढऱ्या ढगाभोवतीदिसते चंदेरी रेषा… प्रत्येक ढगाला आपलं अस्तित्वदाखवणारी…आणि पटते…Every cloud has a silver line!
सोनसळी बहावा
एका रात्री पाहिला बहावा,चंद्र प्रकाशी बहरताना!गुंतुन गेले हळवे मन माझे,पिवळे झुंबर न्याहाळताना! निळ्याशार नभिच्या छत्राखाली ,लोलक पिवळे सोनसावळे!हिरव्या पानी गुंतुन लोलक ,सौंदर्य अधिकच खुलून आले! शांत नीरव रात भासली,जणू स्वप्नवत् स्वर्ग नगरी!कधी न संपावे ते अपूर्व क्षण,आस लागली मनास खरी! फुलल्या बहाव्याच्या मिठीत,सामावून अलगद जावे!मृदू कोमल स्पर्शाने त्याच्या,अंगोपागी बहरुन यावे !
सागराची गाज मजगारुड घालते आहे.. तव स्मृतीच्या तालावरबेभान नाचते आहे .. पदस्पर्शी मुलायम वाळूनाहक चुरते आहे .. सहवासाचा उत्फुल्ल गुलाबमी इथेच पुरते आहे .. ना फिरून आता येणेनक्कीच ठरवते आहे .. ते घाव अनुल्लेखाचेजहरी पचवते आहे .. पूस अस्तिस्वास माझ्यातुलाही सुचविते आहे ..