माझी मराठी विश्वजननी केली तिजला लुळी – पांगळी आम्ही स्वकियांनी…. परभाषेची घुसखोरी, सदा अपुल्या ओठांवरी, हाय फाय शब्दांना भुलतो माय मराठीस अपमानीतो असूनी मराठी, नांदी बोलण्याची, परभाषेत करतो….. मराठी भाषेचे गोडवे, मराठी भाषा दिनीच गातो….. अन्य दिनी, पॉप, झाज, सालसा यातच रमतो…. मराठी भाषा मरते आहे, आपणच ओरडतो, अनन्वित अत्याचार करूनी तिज अनादरितो … मराठी जगली पाहिजे असे फतवे काढतो, किती आत्मीयता मराठीची आपण जपतो? एवढेच सांगणे विश्वाला, माझी मराठी विश्वजननी…. गावंढळ म्हणा खुशाल तिला आहे ती खरी साऱ्या भाषांची राणी…..
Category: Long Poems
नको माझे
माझे व्यक्त होणे म्हणजे लेखन…. माझे लेखन इतरांना आवडणे ही पुढची पायरी…. माझ्या लेखनाला दाद देणे कौतुकास्पद….. माझे लेखन चतुरस्त्र होणे हे वाचकांवर अवलंबून असते… लेखन यशस्वी कधी वाटते जेव्हा वाचक वृंद वाढत जातो…. स्वतःसाठी लिहिणे…. स्वतःचेच वाचणे….. स्वतःचे कौतुक करणे…. स्वकेंद्रित लिखाण…. हे लिखाण होते का? या सर्व मुद्द्यांवरून, ‘माझे हा शब्द काढून टाकला तर’… किती छान वाटतं ते! कारण ते मग आपले होऊन जाते…… आणि मग त्यामध्ये आपलेपणा निर्माण होतो…..
निसर्ग
पावसाची छोटीशी सर,उधळून गेली मातीचं अत्तर!केले तिने पाण्याचे सिंचन,अन् थरथरले धरतीचे अंगण! धरती खालील पक्व बीजांची,झाली कोवळी तृणपाती ,सृजनाची ही किमया सारी,दिसू लागली जागोजागी! ग्रीष्मातून हा आज अचानक,ऋतुबदल हा कुणी केला?उष्ण झळा त्या किरणांच्या,कुणी शीतल झुळुकीत बदलल्या? स्वच्छ निळे आकाश जाऊनीजलघट कसे हे अवतरले?अन् साऱ्या आसमंती ,शामल घट हे कुणी पांघरले? सृष्टीची ही किमया सारीदिसते मजला क्षणोक्षणी!अंतर्बाह्य हे मन थरथरते,मोरपिसाची किमया सारी! सृष्टी कर्ता हा कुणी अनामिकदिसत नसे तो द्रुष्टीने ,पण त्याची सत्ता अनुभवतेमी चराचरातील बदलाने !
मधुमालती !
सहजता माझ्या मनीचीसदा अशी जपून रहावीबदलत्या जगाबरोबर बदलायचीलवचिकता त्यातून जन्मावी रात्री गुलाबी रंगलेलीसकाळी सफेद होतेनिसर्गाशी नाते जपतेही मधुमालती हिरव्या दाट पानांतसफेद गुलाबी हे गुच्छवाकून पहातो साऱ्यांनान मानता कुणा तो तुच्छ किमया निसर्गाचीन्यारी पहा कितीप्रेमाने सांभाळा नातीसंदेश देते ही मधुमालती
आँखे
ये आँख बड़ी अजीब चीज़ होती हैबिना शब्दों के सब कुछ कहती हैकुछ छुपाना इनकी आदत नहींगहरे से गहरे राज़,एक पल में बयाँ करती है आम तौर पर काले रंग की होती है आँखेमगर भावनाओं के कई रंग दिखाती है आँखे कभी माँ की ममता, तो कभी बहना का प्यारसजनी की आँखों में सोलह सिंगारकभी दोस्ती का वादा, तो कभी दुश्मनी की धारकभी नफ़रत की आँधी, तो कभी बदले की आग कभी मिलने की ख़ुशी, तो कभी जुदाई का गमकभी जीत का हो जश्न, तो कभी हार का मातमकभी डर का साया, तो कभी तनहाई की शाममदभरी आँखों से छलके कभी बेहोशी के जाम कभी जवानी का जोश, तो कभी मायूस बुड़ापननन्ही नन्ही आँखों से झाँके नन्हासा लड़खपनकभी बरसते शोले, तो कभी पलकों शीतल की छाँवआँख दिखाए रंग, जैसा मन में हो भाव दिखने में हो चाहे नाजुक सीमगर बड़ी ही ताकतवर होती है आँखेअगर साथ दिमाग का मिलेतो कहाँ से कहाँ पहुँचती है आँखें कल्पना के पंख लेकर ऊंचे आसमाँ पेउड़ान भरती है आँखेगहरे सागर में डूबकर अनमोल मोती भीढूंढ़ लेती है आँखेपत्थर में छुपे हीरे को भी पहचानती है आँखेंदिल में बसे अरमानों को भी समझती है आँखें वर्तमान तो क्या, इतिहास में भी झाँकती है आँखेआनेवाले भविष्य को भी देखती है आँखेहर मुश्किल को आसान बनाती है आँखेअंधे को भी सपने दिखाती है आँखे जब जुबाँ हो चुप तो बोलती है आँखेकुछ बोल ना पाए तो झरती है आँखेआंसुओं से भी दिल की बात कहती है आँखे इन आंसुओं के भी है कई अंदाज निरालेकहीं दुःखों के सागर, तो कहीं खुशियों के मेलेहर एक जज़बात दिल का, बयाँ करते है आंसुहर एक बोझ दिल का, हलका करते है आंसु दोस्तों, ज़रा सोचो,अगर ये आँखे ही ना होती, तो क्या होता ? दुनिया के सारे रंग काले के बराबर होतेपुरी जिंदगी एक आँख मिचौली बन जातीफिर, ना रंगों की होली, ना दीपों की दिवालीत्यौहार के दिन भी कटते खाली-खाली रातों के साए दिन पे भी छाए रहतेसारे के सारे अंधे बेचारे उजाले को तरसतेस्वयं सूरज के भाग्य में भी अँधेरा ही होताकब उगा, कब डुबा, कोई खबर ही ना रखता आशाओं के दीप ना जलतेउम्मीदों के फूल ना खिलतेप्रगति के मार्ग परकोई कदम ना आगे बढ़तेदुनिया वहीं की वहीं रह जातीगहरे अँधेरे में डूब के खो जाती इन कलाकारोंकी भी भला कोई क़ीमत क्या होतीजब उनको देखने-परखने वाली, कोई आँख ही ना होतीफिल्मों पे ‘राज’ करने वाला शोमन ना होताकॉमन मॅन को जगाने वाला लक्ष्मण ना होता विन्ची, रवी वर्मा कहीं के ना रहतेपेंटिंग्ज सारे उनके ख़ाक में मिलतेकागज़ को भी लफ्जों के मोती नसीब ना होतेना जाने कितने शायर भूखे मरते ए मधुबाला, तेरा हुस्न भी बेकार होताइन दो आँखों में गर प्राण ना होताअगर भगवान का दिया ये कॅमेरा (आँख) ना होतातो मनुष्य की इस तिसरी आँख (कॅमेरा) काकोई मतलब ही ना बनता मगर अफ़सोस !!इस के बावज़ूद भी मैं कहूँ,अगर ये आँखे ना होतीतो शायद, कुछ अच्छा ही होता काले-गोरे का भेद ना होतासारे झगड़ोंका मूल ही नष्ट होताउच्च-नीच का ख़ौफ़ ना होताकिसी को दिखावे का शौक़ ना होताधन-दौलत का नशा ना होतापैसे के पीछे कोई अंधा ना होता दहेज़-ज़ेवरात के लिए मासूमों की जान ना जातीहवस की आग में किसी निर्भया की बली ना चढ़तीरुपयों के लिए रूप का ब्यापार ना होताकिसी के चहरे पे झूठ का नकाब ना होता आदमी आँखों से नहीं, दिल की नजर से देखता,तन से नहीं, मन से प्यार करतातभी जाकर, अपनी अंतरात्मा को पहचान पाता इसी लिए कहता हूँ दोस्तों,कुदरत की ये देन है, चीज बड़ी अनमोल हैसौंदर्य का वरदान है, तुम्हारे व्यक्तित्व की पहचान हैमगर देनेवाले से, जिम्मेदारी का एक वादा भी हैनज़र अच्छी हो, सोच अच्छी होइसी में ही पुरे विश्व की भलाई है
वळीव
वळीव मजला आज दिसला वेगळ्या रूपात!नित्यासारखा नाचता थिरकता वाटे ना प्रत्यक्षात! वळिवाचा, गारांचा पाऊस खेळवी मुलांची मस्ती !नाचत नाचत सर्वांगाने बहरे तरुणांची प्रीती! वादळवारा, वीज कडकडे, रौद्र रूप निसर्गाचे!तुटून गेल्या निसर्ग नात्याची जाणीव करून देते! साध्या, छोट्या आनंदाला ग्रहण लागले कशाचे!समजून न येई मज हे गूढ निसर्गाचे! कोरोनाच्या छायेखाली मनी दडली होती भीती!जणू वादळ घोंगावतेय,वेढेल कधी अन् किती! क्षणात दिसली मज आभाळी कमान इंद्रधनुची !आतूरतेने मनास समजवी ही किनार आनंदाची! जातील निघून काळे ढग हे,येईल टिपूर चांदणे नभी!जे करील सर्वा समजदार,अन् आनंद येईल जगी !
किती गंध ल्यावे किती धुंद व्हावेसुखाने सुखाला किती जोजवावेतुझ्या मिठीचा मिळता सहारामी मोहरून स्वतःस विसरून जावे.. ऋतू कोवळे ते मनामनाचेतुझ्याच पाशी येऊन थांबलेलेनको तो अबोला मना क्षीणवणारा पुन्हा पुन्हा किती तुला समजवावे..! पुन्हा एकदा फिरून चांदणे पांघरावेतुला आठवुनी सुखा जोजवावेकिती ही दुरावा पुन्हा पुन्हा यावापरि मनाला मनाने समजून घ्यावे…! कशी करावी रुजवात कळे नाकसे मनवावे तुला ते ही जमेनापुन्हा सुखाची सुरुवात व्हावीपुन्हा नव्याने रुजून यावे…!
कोलाहल
कुठंही जा…माणसंच माणसंशांतता म्हणून नाहीसंगीत रजनीत देखीलयांची रिंगटोन बंद होत नाही पोस्टात जा…ज्येष्ठ नागरिकांची गर्दीबँकेत जा..कर्जमाफीची रांगहिमालय पण आलाय….या रांगेच्या कक्षेत थंड हवेची ठिकाणंनुसतीच नावालासगळीकडे नुसता बथ्थड माणसांचा गिजबिटकाला मंदिरे तर भरुन वाहताहेतदेव देतोच आहे सगळ्यांना सगळंअसं समजून सारे जमताहेत शाळा म्हणे विद्या मंदिरसंख्या सौष्ठवानं भरलेल्या खोल्याअन् लावतात तासांची बत्त्तीघडतात मेरीटचं स्वप्न लेवून कोमेजणारी मुलं सण उत्सवांना धुमारेच फुटतातरस्त्यांवर ढोल..नगारे कान फाटेस्तोवर गरजतातकाचा नि सिमेंट तडकतं तिथल्या तिथेच समुहात ताकत असतेहे दाखवायला रोज एक समुह सरसावतोय इथंया माणसांच्या ओझ्यानंपृथ्वीही ढळतेय आता पूर…भूकंप…त्सुनामी वाटतात नैसर्गिकपण त्यांच्या पाठीशी समर्थ उभे आहेतकारखानदार..खाणमालक..धुराड्यांचे पुरस्कर्ते
रेट्रो
हरवले ते दिन…हरवले ते मैत्र सारेव्यस्त झाले तास अन् सेकंद सारेभोवतीच्या सगुण फुलांना…येता जाता हाक द्या रे ! वेळ आता मिळत नाही..कारण आहे सर्वांमुखीशेजारीच राहूनही आता..आम्ही सारे अनोळखी ! घर..अॉफिस..घर..इतुकाच मार्ग आमुचा…आजूबाजूस वळून पाहण्या..मान आता ना वळे ! कोण,कुठले..अनोळखी तरीही…भेटती काही लोक असेजन्मांतरीची ओढ वाटे…मन गुंतूनी फुलायचे ! रोज रोज त्याच गोष्टी…सवयीने पार पाडतोयंत्र हे सैलावले आता…सुहृदांची सोबत मागतो !
वाट..
आठवणींची वहिवाट तरलावते सारी वाट!कुठून तरी येतात,वाट अडवून रहातात!ठोकरून द्याव्या म्हंटल्या,तरी जिद्दीने उभ्या रहातातवाट अडवून!मनाच्या मोहोळात घुसून,मधु प्राशन करतात!आणि मग उरतात तेमधु विरहित कोश!नुसतेच मेण मनाचेओझे बाळगत!