भले बुरे जे…घडुन गेले…विसरुनी जाऊ… सारे क्षणभर…जरा विसावु…या वळणावर…या वळणावर….! अकरावी बारावीत असताना ” तुझ्या वाचून करमेना ” या चित्रपटातलं…… रेडिओवर……. हे गाणं हलकंस पहिल्यांदा कानावर पडलं…! हळूहळू ते गाणं कानात झिरपायचं आणि मस्त निवांत ऐकत रहावसं वाटायचं … … सुधीर मोघेंच्या गाण्यातलीसगळी अर्थपूर्ण कडवी … सुहासचंद्र कुलकर्णींची सुरेख चाल…! अनुराधा पौंडवालांचा मधुर आवाज…. तेंव्हापासुन collection मधलं हे ही एक नितांत आवडीचं गाणं…! खरंच आहे…आयुष्यात किती तरी वळणे येतात… कधी संकटातून.. वेदनेतून…कधी आनंदातून… ही वळणं येतातंच येतात.. मग ते वळण कौटुंबिक स्तरातील असो अथवा नात्यातलं, समाजातलं, मित्रपरिवार असो… किंवा कामाच्या ऑफिसच्या ठिकाणी…! अगदी शाळा, कॉलेज, शैक्षणिक वयातलं सुद्धा… पुढचा प्रवास बदलणारा असतो… हेच वळण जे निर्विकार असतं.. एक वाट संपुन दुसरं सुरू होणार असल्याचं एक अंतराळ…अवकाश…! भलं बुरं.. घडामोडी घडुन गेलेल्या असतात नि त्यामधला हा विसावा असतो क्षणिक या वळणावर…! खूप उन्हांनं बेजार झाल्यावर जसं पाऊस पडण्यापुर्वीचं आभाळ तयार होतं किंवा खूप पाऊस पडून कंटाळवाणं झाल्यावर पावसाने उघडीप दिल्यानंतर जसं स्वच्छ ऊन पडतं ना अगदी तसं..! ह्याच वळणावर जरा आयुष्य संथ झालेलं असतं… मनाला वाटतं की घडामोडींना पूर्णविराम मिळालाय पण वास्तवात तो स्वल्पविराम असतो…… जसं एक वाक्य संपत असतं नी दुसरं वाक्य सुरू होण्याच्या बेतात जणू काही…! पान उलटणार असतं नि माहिती नसतं पुढच्या पानावर काय ओळी लिहिल्यात ते…….! पुस्तक बंद करता येतं हो एकवेळ पण आयुष्याचं पुस्तक शेवटच्या श्वासापर्यंत वाचावंचं लागतं…! नको असलेली पानं सोडून पुढं जाता येत नाही… अन हवी असलेली मागची पानं परत कधीतरी वाचताही येत नाहीत…! ती आपोआप पालटत असतात…! पलटवावीच लागतात…नवीन वाचावीच लागतात….! फक्त विसावा काय तेवढा आपला… बाकी वळणांचं नशिबावर सोपवुन आपण जीवन प्रवास करायचा…! या आधीच्या वर्षानं करोनाचा महाभयंकर राक्षस आपल्यापुढे उभा करत आपल्या सर्वांच्या जीवन प्रवासात फारच बिकट वाट दाखवली – सरत्या वर्षानंही करोनाच्या दुसऱ्या लाटेची त्सुनामी आणली आणि आपल्या सर्वांची जरा जास्तंच परीक्षा घेतली. याही वर्षात आपण आपण अजूनही करोना – लॉक डाऊन – क्वारंटाईन यातून गेलो आहोत, जात आहोत. याच कारणांमुळे अनेक दुःखद घटनांना सामोरे गेलेलो आहोत. अनेक सुहृदांना गमावूनही बसलो आहोत आपल्या दैनंदिन आयुष्यात – कौटुंबिक, सामाजिक आणि व्यावसायिक सर्वच क्षेत्रात अनेक अडचणींतून गेलेलो आहोत – जात आहोत -अनेकांना आर्थिक दृष्टया फटका बसलाय. पहिली लाट, दुसरी लाट – डेल्टा-ओमिक्रोन अशी वेगवेगळी भुतं अजून थैमान घालतायत . करोनाचं सावट अजूनही पूर्णपणे दूर झालं नसलं तरी न्यू नॉर्मल का काय म्हणतात तेही अनेक जणांचे आधीच सुरु झाले आहे – काही ते सुरु होण्याच्या अजूनही प्रतिक्षेत आहेत. अनेक बंधनं आहेत – त्यांचा आता कंटाळा यायला लागला आहे – पण तरीही धीर सुटून देऊन चालणार नाही हेही पटतंय अशा वेळी रजनीगंधा चित्रपटातलं मधलं माझं एक आवडतं गाणं मला आठवतं – “कई बार यूं भी देखा है – ये जो मन की सीमारेखा है – मन तोडने लगता है – अनजानी आंसके पीछे … मन दौडने लगता है “ सिनेमात गाण्याचा संदर्भ वेगळा असला तरी – रोज हेच व्हायला पाहिजे – असंच व्हायला हवं या मर्यादा आपणच आपल्याला घालून घेतलेल्या असतात – अनेकदा इतरांनी आपल्याला घातलेल्या असतात – त्या अनेकदा आपण पाळतो – अनेकदा त्या तोडून अमर्याद जागून आनंद घेण्याचा प्रयत्न करतो – आता या काळात सर्व प्रतिबंधात्मक उपाय ,काळजी घेत राहून आपण आपल्यावरच घालून ठेवलेल्या कामाच्या- काही वेळेच्या आणि इतर काही मर्यादा सांभाळून , भीती ओलांडून आपण नक्कीच मोकळेपणाने आनंद घेऊ शकतो हे मात्र कळाले. गेली अनेक वर्ष आली-गेली , बरंच काही शिकवून गेली , तसंच हे एक वर्ष … एक वळण आज एक आयुष्यातलं अवघड पण लक्षात राहील असं वळण संपतय, नवीन चालू होतंय… आणि तसंही सर्वच काही निराशाजनक नाहीये.. सूर्योदय -सूर्यास्त चालू आहे – घरातली -घरात बसून किंवा प्रत्यक्ष जाऊनही ऑफिसची कामं चालू आहेत. प्रेम-माया , कुटुंबासाठीचा वेळ, संवेदनशीलता कल्पकता, शिकण्याची प्रोसेस,गप्पा गोष्टी , लेखन-वाचन, नाती-गोती , भक्ती, व्यायाम-विश्रांती ,आनंदित राहणं याला लॉकडाऊन, स्लो डाऊन कोण करू शकतो? – संक्रांती-पाडव्यापासून गणपती – दसरा -दिवाळी सारे सणवार आपण साजरे करतोच आहोत त्यामुळे हे स्लो डाऊन कायमचं राहणार नाही “There is still life and still there is a hope “ मरनेवालोंके लिये मरा नहीं जाता – उनकी यादे जरूर रहती है – जीवन चालू रहता है ! जीवन है चलने का नाम !! दोन पावलं मागे आलोत – पण आता मोठा पल्ला गाठावा लागणार आहे – नक्कीच गाठू- अजून बरंच काही करायचंय – अनेक वाटा शोधायच्यात – परिस्थिती नक्कीच बदलेल – नवीन आव्हानं सामोरी येतील – – पुढच्या वेगवान प्रवासासाठी… रिता जरी दिन वाटेमन भरलेले ठेवू धीर धरून सदाआशा जागती ठेवू भले बुरे ते विसरुनी जाऊधैर्य -आनंदाने पुढे जाऊ
Category: Blogs
The Fearless Examinee
On November 24, 2021, I faced one of the oldest and the biggest fears of my life. An EXAM for teaching and research in Economics. I didn’t cry and I didn’t give up till the end. Attempted every question till the end without missing a single one unlike the earlier times. “Aren’t you closer to retirement age now!”, exclaimed a friend who thinks we are all approaching the retirement age as we in our early 40s. While retirement is not something that crossed my mind, I did feel like being one of the oldest among 20 something-year-old boys and girls fresh out of college looking for opportunities in teaching and research just like me except with an advantage of being younger than me. Being younger seems like an advantage as fresh graduates can easily cram names, dates, mnemonics, theories and assumptions unlike the older me who feels the need to overanalyze and overthink. Though I do have more chips on my shoulder with real-life experiences as an Econometrician/Statistician, Entrepreneur and a Writer, fresh graduates haven’t yet seen my world and don’t know the bitter truth about it. I swallowed my pride and the sense of knowing-it-all-entitlement while my fat ego intermittently encouraged me to accept mediocrity every now and then. I put my head down, signed up for some online classes, listened to all younger-than-me teachers, prepared notes and revised for 11 whole months till there were papers and charts of all shapes and sizes stuck on the walls of my office-home like I was solving a criminal investigation. Then, on November 24, 2021 despite all odds, which have mostly been weather changes, stress and hormonal disturbances inside my body, I got down out of my flat, took a 15-minute rickshaw ride to the centre and walked inside the maze of a corporate park along with other fellow test applicants to take the UGC-NET test in Economics for teaching and research. The centre was a spectacle! At the entrance we had to check for our seating arrangement consisting of four LABS. I was directed to LAB 2 according to the board and my fellow test applicants quietly walked along with me passing all boards showing directions to LAB 2. The path turned left and then right and then an inclined left like a maze. There were already many applicants standing in a line like it was meant to be a first-basis seating arrangement. I didn’t join the queue and found a place to sit far away from the queue. My hot flashes had begun that developed sweat patches along my neck, chest, arm pits, ears and forehead. It felt like an endless sweat as I kept wiping myself with my favourite cotton scarf I had got after a trek in Kashmir. 10 minutes into wiping and I was still feeling warmer than earlier. I checked out the other ladies who sat calmly beside me reading some notes and heard some other young girls standing in the line and talking about their trip from Thane station to the centre. That somehow calmed me down but not for long. Soon, we were instructed to walk inside the LABS without our belongings except for the halt ticket, ID and stationary. LAB 2 was a long and a wide room full of computers in the basement of the building. There were no windows and fans didn’t work. There were air conditioners which looked so old that it triggered more hot flashes in me. “Attempting the test in discomfort with frequent hot flashes is not a good sign”, I thought. After a quick registration by the attendants who fed our details in the system along with the instantly clicked photos, we were told to sit wherever the computers worked. I was led by some attendants to a computer at the end of that claustrophobic room. Some of the test applicants beside me looked cluelessly at me while I sat in front of one of the computers and fed my roll number to login. I also helped another girl to feed her login details, calmly but as I returned to my computer a lady behind me who was probably older than me turned out to be an economist herself. It was her very 1st attempt and was extremely chatty. That triggered more hot flashes than usual and I began fidgeting with a table fan attached to the wall hoping that it would begin. Unfortunately, the fan didn’t work and I frantically raised my hand to ask an attendant to shift my place. She quickly okayed my concern after seeing my sweaty face and kurti. But the next computer didn’t work and I quietly moved to another one right in front of an AC. While the confusion on seating arrangements for incoming test applicants continued, the attendants hastily instructed us to begin the test. I forgot about my hot flashes but also forgot everything I had studied. I think I blanked out while attempting the 1st question itself in Paper I that was common for all applicants. After five minutes into the 2nd question, I regained my senses with gradually paced breathes, just like I pace my steps on any inclined hike on the mountains when trekking. One question after another, I began solving, calculating, arguing in my head and completely immersed myself in the test while also keeping a track of time. I flagged questions that were harder and moved on. I had planned to spend only 60 minutes for Paper I and the remaining 120 minutes for Paper II which was Economics. As soon as it was time, I switched to solving questions in Paper II which somehow seemed easier than Paper I. My breathing had calmed down completely and I cared less about the hot flashes and everything else around me. It was a battle of wits between me and the questions on the computer. I kept calm and solved one question after another realizing that I was much more prepared for Economics unlike the earlier…
सांगावसं वाटलं म्हणून
काळ अव्याहतपणे चालतच असतो. त्याची पाऊले वाजत नाहीत. पण चाल मात्र जाणवत असते. कालचा दिवस संपून आजचा दिवस उजाडला की काळ पुढे सरकल्याची जाणीव होते. या अक्राळविक्राळ काळाला कवेत घेण्यासाठी माणसाने कालगणना सुरू केली. बारा महिन्यांचे एक वर्ष बनवले आणि काळाची मोजदाद सुरू झाली. एक महिना म्हणजे काळाचे जणू एक पाऊलच. अशी अकरा पावले चालून झाली की काळ बारावे पाऊल टाकतो शेवटच्या महिन्यात आणि वर्ष संपत आल्याची जाणीव होते. हा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर महिना, म्हणजेच काही दिवस कार्तिकाचे आणि काही दिवस मार्गशीर्षाचे ! दसरा दिवाळी सारखे आनंददायी सण होऊन गेलेले असतात. एकंदरीतच सणांची गडबड संपत आलेली असते. पण सुगीचे दिवस मात्र सुरू झालेले असतात. साखर कारखान्यांसाठी ऊस वाहून नेणा- या बैलगाड्या आणि ट्रॅक्टर यांनी रस्ते ताब्यात घेतलेले असतात. त्यातच ऊस पळवणा-या बाल गोपालांच्या टोळ्या आपल्याच नादात असतात. बाजारातही वेगवेगळ्या फळांची रेलचेल असते. हवेतला गारवा वाढू लागलेला असतो. मागच्या वर्षीची थंडी, यंदाची थंडी अशा थंडीच्या गप्पा मारण्यासाठी मात्र शेकोटीची आवश्यकता वाटत असते. उबदार कपड्यांना आणि गोधडी,वाकळ यांना बरे दिवस आलेले असतात. झाडांची पाने गळून ती मात्र ओकीबोकी दिसू लागतात. अशा या गोठवणार-या थंडीत दूर कुठेतरी भजनाचे स्वर ऐकू येतात आणि लक्षात येते, अरे,दत्तजयंती आली वाटते. खेड्यापासून शहरापर्यंत श्रद्धेने साजरी होणारी दत्त जयंती एक नवा उत्साह निर्माण करते. उत्पत्ती, स्थिती आणि लय या निसर्गाच्या नियमांची जाणीव करून देते. त्या दरम्यानच येतो तो नाताळचा सण. येशूचा प्रकटदिन. प्रार्थना मंदिरे आणि परिसर सुशोभित झालेला असतो. छोट्या छोट्या झोपड्या, येशूचा जन्म सोहळा हे सगळे देखावे लक्ष वेधून घेत असतात. बच्चे मंडळीचे लक्ष असते ते मात्र सांताक्लाॅजकडून मिळणा-या गिफ्टवर. हे साजरं होत असतानाच सरत्या वर्षाला निरोप देण्याची आणि नव वर्षाचे स्वागत करण्याची तयारी सुरू होते. गत वर्षाचा हिशोब मनात मांडत असतानाच आपण सर्वांनाच नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत असतो. आंतरराष्ट्रीय नवे वर्ष सुरू होत असते. आपणही त्यात सामील होत असतो. नव्या वर्षाचे संकल्प मनात सुरू झालेले असतात. ते सिद्धीस नेणे आपल्याच हातात असते. जुन्या परंपरा आणि नव्या कल्पना यांचा सुंदर मेळ घालून आयुष्य अधिक सुंदर बनवण्यासाठी आपणही गेल्या वर्षाला बाय बाय करत नव्या वर्षात पाऊल टाकायचे आणि नवी आव्हाने स्वीकारायची. काळाचा हात धरून त्याच्या पावलाबरोबर चालायचे हे तर ठरलेलंच. नव वर्षाच्या शुभेच्छा देत चला एक नवा प्रवास सुरू करूया !
संस्कृत सुवचनानि ३
अतिपरिचयात् अवज्ञा। अतिपरिचयादवज्ञा संततगमनादनादरो भवति। मलयेभिल्लपुरन्ध्री चन्दनतरुकाष्ठमिन्धनं कुरुते॥ अर्थ :- (कोणाशीही) अति ओळख (अति जवळीक) आपला मान (किंमत कमी) करते आणि सारखे सारखे (कोणाकडे) जाण्यामुळे आपल्याविषयीचा आदरभावही कमी होतो. (अहो, आता हेच पहा ना,) मलयपर्वतावर राहणारी भिल्लीण (भिल्ल स्त्री) चंदनाच्या लाकडाचा चुलीसाठी सरपण (इंधन) म्हणून उपयोग करते. टीप :- ‘अतिपरिचयात अवज्ञा’ या संस्कृत उक्तीचा मराठीतही सर्रास उपयोग होतो. ‘अतिपरिचयादवज्ञा’ हा शब्द योजलेले अजून काही श्लोक पाहू, अतिपरिचयादवज्ञा संतत गमनादनादरो भवति। लोकः प्रयागवासी कूपे स्नानं समाचरति॥ अति ओळखीने आपली अवज्ञा होते. आपल्या शब्दाचा मान कमी होतो आणि सततच्या येण्याजाण्याने आदर कमी होतो. (हेच बघा ना) प्रयागनिवासी लोक विहिरीतल्या पाण्याने अंघोळ करतात. या श्लोकातही आधीच्या श्लोकाप्रमाणेच अतिपरिचय योग्य नाही असेच सुचवले आहे. प्रयाग हे तिर्थ त्रिवेणीसंगम तिर्थ आहे. तिथे संगमावर अंघोळ करणे हिंदू मान्यतेनुसार पुण्यदायक मानले जाते. देशाच्या सर्वभागातून लोक तिथे संगमस्नानासाठी येतात पण खुद्द प्रयाग वासियांना त्याचे एवढे अप्रूप वाटत नाही. त्रिवेणी संगम स्नानाची किंमत त्यांना नाही. ते आपले घराजवळच्या विहिरीच्या पाण्यानेच स्नान करतात. आता आपण जो पुढचा श्लोक पहाणार आहोत तो मात्र आध्यात्मिक आशयाचा आहे. पहा, अतिपरिचयादवज्ञा इति यद्वाक्यं मृषैव तद्भाति। अतिपरिचितेऽप्यनादौ संसारेऽस्मिन्न जायतेऽवज्ञा॥ अतिपरिचयाने मान कमी होतो हे वाक्य खोटं असावं असं वाटतं. कारण आपल्याला अतिपरिचित असणारा अनादी असा हा संसार (अनादी असे हे ब्रह्मांड जिथे आपण कोट्यावधी जन्म येरझार्या घालतो असे म्हणतात), त्या या संसाराचा लोक अतिपरिचयामुळे अनादर (तिरस्कार) करताना दिसत नाहीत. अजून एक श्लोक आहे ज्यात चार सुवचने समाविष्ट आहेत तो असा, अतिपरिचयादवज्ञा। अतिलोभो विनाशाय। अतितृष्णा न कर्तव्या। अति सर्वत्र वर्जयेत् ॥ अतिपरिचयादवज्ञा ‘पिकते तिथे विकत नाही’ हेच खरे. जे आपल्याकडे मुबलक प्रमाणात असते त्याची किंमत आपल्याला नसते किंवा जोपर्यंत एखादी गोष्ट मिळत नाही तोपर्यंत तिचं खूप अप्रूप असतं एकदा ती गोष्ट प्राप्त झाली की किंमत शून्य. यावरून निदा फाजलींचा एक उर्दू शेर आठवला, दुनिया जिसे कहते हैं जादू का खिलौना है। मिल जाए तो मिट्टी है खो जाए तो सोना है। हा संसार, ही दुनिया ज्याला म्हटलं जातं ते एक जादूचं (मायावी) खेळणं असावं. कारण जोपर्यंत इथे एखादी गोष्ट मिळत नाही तोपर्यंत त्या वस्तूला सोन्याची किंमत असते आणि एकदा ती वस्तू मिळाली की तिचं मूल्य आपल्या लेखी मातीमोलाचं होतं. माझ्याही एका गझलेत अशाच अर्थाचा एक शेर आहे. तो असा, पाहतो आहेस तू रोखून का शिखरा? संपते स्वारस्य माथा गाठल्यानंतर फेसबुक व व्हॉटस्ऍप वर ‘अतिपरिचयादवज्ञा’ करणार्यांपासून सुटके साठीच तर ब्लॉक, अनफ्रेंड, डिलिट इ. ऑप्शन्स दिलेले असतात.
संस्कृत सुवचनानि २
सुवचन – अति सर्वत्र वर्जयेत। अतिदानात बलिर्बद्धो अतिमानात सुयोधन:। विनष्टो रावणो लौल्यात् अति सर्वत्र वर्जयेत॥ अर्थ :- अत्यधिक दानशील असल्याने दैत्यराज बळीला पाताळात बंदी होऊन रहावं लागलं. अतिशय अभिमानी अगदी दुराभिमानी असल्याने सुयोधनही दुर्योधन म्हणून कुख्यात झाला व शेवटी भीमसेनाकडून वधला गेला. अति लोलंगतेमुळे असुरराज महाबळी रावणाचाही नाश झाला म्हणूनच कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत अतिरेक करणे टाळावेच. टीप- ‘अती तिथे माती’ अशी मराठीमध्ये म्हण आहेच परंतु संस्कृतमधील ‘अति सर्वत्र वर्जयेत’ ही उक्ती आपण मराठीतही व्यवहारात बोलताना वापरतो. वरील श्लोकाच्या बाबतीत एक पाठभेदही आढळतो तो असा, अतिदानात बलिर्बद्धो अतिमानात सुयोधन:। अति दानात् बलिर्बद्धः अभिमानात् सुयोधनः | याच श्लोकाचे ‘अति सर्वत्र वर्जयेत’ हे चौथे चरण ठेऊन लिहिलेले इतरही श्लोक संस्कृतमधे आहेत. ते पाहूयात, अतिदानात बलिर्बद्धः अतिमानात सुयोधनः। रावणोति मदान्नष्टः अति सर्वत्र वर्जयेत्।। या श्लोकात अति मदाने (अति माज केल्याने) रावण नष्ट झाला असे म्हटले आहे. अतिदानाद्धतः कर्णस्त्वतिलोभात् सुयोधनः। अतिकामाद्दशग्रीवस्त्वति सर्वत्र वर्जयेत्॥ अतिदानशूरतेमुळे कर्णाचा नाश झाला (दानशूरतेला कलंक लागू नये म्हणून याचकरुपात आलेल्या इंद्राला कवचकुंडले दान करावी लागली.) अतिलोभाने (राज्यलोभाने) दुर्योधनाचा नाश झाला. अतिकामामुळे दशानन (दशग्रीव) रावणाचा वध झाला खरोखर अतिरेक सर्वत्र टाळायलाच हवा. अति रूपेण वै सीता चातिगर्वेण रावणः। अतिदानाद्बलिर्बद्धोह्यति सर्वत्र वर्जयेत्।। अतिसुंदरता या गुणामुळे सीतेचे हरण झाले आणि अत्यंत गर्विष्ठतेमुळे रावणचा अंत झाला. अति दानशूरपणाच्या गुणामुळे बळीराजाला आपलं राज्य गमावून पाताळात अडकून पडावं लागलं त्यामुळे अतिरेक सर्वत्र त्यागावा. या श्लोकातून हे सुद्धा लक्षात येतं की अवगुणच नव्हे तर चांगले गुणही अतिप्रमाणात असतील तर त्यानेही मनुष्य धोक्यात येतो म्हणून विवेक-विचार चातुर्य महत्त्वपूर्ण होय. एक हिंदी दोहासुद्धा अतिप्रमाण त्रासदायक असते असे सांगतो. अति भली न बरसना अति भली न धूप। अति भली न बोलना अति भली न चुप॥ अती पाऊसही वाईट आणि अती ऊनही चांगले नाही. अती बोलणेही चुकीचे आणि अतिमौनही नुकसानदायकच.
बदल
कांही कांही शब्द लहानपणी किती निरागस कोमल मृदू होतें आणि आतां त्यांचेच अर्थ, संदर्भ किती बदलत गेले;असं आताशाफार जाणवतं! अफगाण स्नो स्वच्छ पांढरा, थोडीशी चमक असलेला आणि त्याचा गार गार स्पर्श!! निळ्या काचेच्या बाटलीत प्रत्येक मध्यम वर्गीय घरातलं सर्वमान्य कॉस्मेटिक!! तीन ड्रॉवर असलेलं, वरती मोठा आरसा असलेलं एक टेबल;त्यावर उटी चंदन पावडर, दरबार गंध आणि हीं दणदणीत अफगाण स्नो काचेची ची बाटली!! बर्फ़ाच्या डोंगरांचे चित्र मिरवणारी!! स्वच्छ तोंड धुवून याचे चार ठिपके चेहऱ्यावर लागलें कीं एकदम ताजेतवाने! जणू साठीच्या दशकातील ग्लो अँड लव्हली!! आणि अफगाणचें प्रसिध्द ड्राय फ्रुटस!!अक्रोड आणि बेदाणे!! रवींद्रनाथ टागोर आणि बलराज सहानी यांचा घराघरात पोहोचलेला काबुलीवाला तरुणपणी फिरताना आवडीचं ठिकाणनेव्ही नगर परिसर आणि तिथेच असलेलं अफगाण युद्धाची स्मृतीं जपणारं अफगाण चर्च!! आतां आतां आज अफगाणिस्तान शब्दाचा अर्थच दहशतवाद असावा अशी भावना आहें आपली. काय काय ऐकू येतंय ! काय काय दिसतंय! कुठे हरवले तें सरळ सोपे दिवस? कुठे सापडेल तो काबुली वाला? सापडेल का खरंच? पुन्हा म्हणेल एकदा तरी—– ए मेरे प्यारे वतनए मेरे बिछडे चमनतुझपे दिल कुर्बान तूं हीं मेरी आरजूतूं हीं मेरी आबरुतूं हीं मेरी जान