‘कशी आहे ती?’ शेवटी तिच्या कष्टानाही मर्यादा असतेच ना! आताची स्त्री समाजाभिमुख झाली. तिचे कार्यक्षेत्र बदलले. त्यानुरूप पोषाख ही बदलला. स्त्री सौंदर्याच्या कल्पना ही बदलल्या. लांबसडक केसांची निगा राखण्यास वेळ कमी मिळू लागला. त्यामुळे तिथेही शॉर्टकट शोधण्यात आले. आताच्या काळात खऱ्या दागिन्यांनी मढण्यापेक्षा आर्टिफिशियल, आकर्षक दागिने बाजारात आले. अर्थात सोन्याच्या दागिन्यांना चोरीचा धोकाही होताच! कामाला जाण्यासाठी लागणारा वेळ, कामाच्या तासाच्या वेळा जर वेगवेगळ्या असतील तर असे नटून-थटून जाणे स्त्री ला आवडत तर नाहीच पण सोयीचेही नसते! त्यामुळे स्त्रीची एक वेगळीच प्रतिमा गेल्या दहा-वीस वर्षात आपल्या डोळ्यासमोर उभी झाली आहे. पारंपारिक गोष्टींचा काही प्रमाणात त्याग करावा लागला आहे. तरीही स्त्रीची नटण्याची हौस ही संपलेली नसते. ती स्वतःला सोयीनुसार सजवून आकर्षक ठेवते.यातून तिची जगण्याची उर्मी दिसते. लोकल मधून जाणाऱ्या मुंबई-पुण्याच्या स्त्रिया लोकल मध्येच सण उत्सव साजरे करतात. अगदी केळवण, डोहाळजेवण, हळदीकुंकू यासारखे कार्यक्रम सुध्दा हौसेने करतात. स्त्री अशी उत्सवप्रिय आहे. ती मायाळू आहे. आयुष्य जगण्याची तिला आस आहे. स्त्रीचे सारे जगणे एक उत्सव आहे. लहानपणापासूनच मुलगी म्हणून स्त्री स्वतःला व्यक्त करत असते. संसार मांडण्याची तिला आतून ओढ असते. पूर्वीच्या काळी छोट्या मुली चूल,बोळकी घेऊन खेळत असत. आत्ताच्या मुलींच्या खेळात मायक्रोवेव्ह, फ्रीज, गॅस या सारख्या उपकरणांची खेळण्यात भर पडली आहे. परकर पोलकं घालणारी आणि आईला साडीत पाहणारी मुलगी आता लहानपणापासून च ड्रेस,मिडी,मॅक्सी यामध्ये सहजतेने वावरते. हे बदल आपल्याला आता दिसतात. स्त्रीचे पोषाखा बरोबरच व्यक्तीमत्व ही बदलत गेले आहे. काळ बदलला, आता स्त्री ही पायपुसण्यासारखी नसून ती समाजात स्वतंत्रपणे वावरणारे व्यक्तिमत्व आहे! शैक्षणिक सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात आपला ठसा ती उमटवत असते. अजूनही खेड्यापाड्यातल्या स्त्रीला अजूनही हे स्वातंत्र्य पूर्णतः मिळालेले नाही, तरीही शिक्षणाची धडपड आणि इतरही क्षेत्रात तिचा कार्यभाग नक्कीच वाढला आहे. नजीकच्या काळात असे भाग्य, उत्कर्ष स्त्रीच्या वाट्याला येणार हे नक्कीच! तिला समानतेच्या सर्व संधी उत्तरोत्तर मिळोत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना!
Category: Blogs
स्त्री कालची आणि आजची!(भाग १)
‘कशी आहे ती?’ नारीशक्ती वरील एक लेख सहज वाचनात आला! खरंच कशी आहे स्त्री?-स्त्री ही घराची शोभा! संसाराचा गाडा ओढणारी, कुटुंबाशी निगडित असलेली व्यक्ती! फार प्राचीन काळी गार्गी, मैत्रेयी सारख्या विद्वान स्त्रिया होऊन गेल्या. त्यानंतरच्या काळातही अहिल्या, द्रौपदी, तारा,सीता, मंदोदरी यासारख्या पंचकन्यांना स्त्री सन्मान मिळाला.त्यानंतर जिजाऊ,राणी लक्ष्मीबाई, ताराराणी यांसारख्या कर्तृत्ववान स्त्रिया होऊन गेल्या. पण मध्यंतरी चा एक काळ असा आला की स्त्रीला चूल आणि मूल या चक्रात अडकून पडावे लागले. तेव्हा स्त्रीशिक्षणाचा अभाव होता. पुरुषप्रधान संस्कृतीच्या वलयाखाली स्त्री चे अस्तित्व दडपले गेले. कुटुंब सांभाळणारी, आल्या गेल्याचे स्वागत करणारी, वेळप्रसंगी एक हाती संसार करणारी हेच स्त्रीचे रूप राहिले. संसार रुपी रथाची दोन चाके म्हणून स्त्री आणि पुरुष दोघांचा विचार आपण करतो. स्त्री हे चाक असे काही पेलून धरते की, कधीकधी दोन्ही चाकांचा बोजा तिच्या अंगावर असतो. स्त्री ही अशी गृहिणी, सहधर्मचारिणी असते! पूर्वी स्त्रियांना शिक्षण कमी होते, पण व्यवहारज्ञान मात्र खूप होते. पैसा कमी होता पण असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग जास्तीत जास्त कसा करता येईल याकडे लक्ष असे. त्यामुळे स्त्री काटकसरीने संसार करून तो यशस्वी करून दाखवत असे. श्यामची आई मधील आई ही अशीच गरिबीत राहून स्वाभिमानाने संसार करणारी स्त्री होती. त्याकाळी कित्येक विधवा स्त्रियांना संसार करून मुलांची, कुटुंबाची जोपासना करावी लागली आहे. माझीच आजी एका मोठ्या घरातील होती.पतीच्या निधनानंतर शिक्षण नाही, हातात पैसा नाही, मुलांची शिक्षणे व्हायची होती, अशावेळी तिने न डगमगता संसार केला. मोठ्या घरातील फक्त दोन-तीन खोल्या स्वतःकडे ठेवून बाकी सर्व खोल्या विद्यार्थ्यांना रेंट वर दिल्या आणि त्या भाड्याच्या पैशात रोजचे व्यवहार भागवायला सुरुवात केली. घर हाच तिचा मोठा आधार होता. हातात असलेले दागिने विकून मुलांची पुढील शिक्षणे केली. त्यानंतर सुनांसाठी पुन्हा सोने खरेदी करून दागिने करून घातले. स्वतःच्या कर्तृत्वाने असे घर सांभाळणाऱ्या त्या काळातील अनेक महिलांच्या गोष्टी आपण ऐकतो. काळाच्या ओघात शिक्षणाबरोबर स्त्रीच्या कर्तृत्वाच्या कक्षा रुंदावल्या आणि स्त्री पुरुषाशी बरोबरी करता करता त्याच्यापुढे कधी निसटून गेली हे कळलेच नाही! आज प्रत्येक आघाडीवर स्त्री पुढे आहे. अवकाश क्षेत्र, संशोधन, संरक्षण क्षेत्र, राजकारण यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात स्त्रिया कार्यरत आहेतच पण रोजच्या जीवनातही बरेचसे व्यवहार स्त्रिया सांभाळतात. पूर्वी मुलांवर असलेली माया, प्रेम स्वयंपाकघरातील कुशलतेवर अधिक दिसत असे. मुलांना स्वतः करून चांगले चांगले खाऊ घालणारी, प्रेमाने घास देणारी,कोंड्याचा मांडा करणारी स्त्री आदर्श होती. पण नंतरच्या काळात नोकरी करून, स्वतःची ओढाताण करून मुलांसाठी घरी पदार्थ बनवणारी स्त्री हळूहळू कालबाह्य झाली. कामावरून घरी येतानाच वडापाव, दाबेली, केक यासारखे पदार्थ घरी येऊ लागले, तर काही वेळा ऑर्डर करून आणलेल्या पिझ्झा मुलांना खुश करू लागला. काही ठिकाणी घरी स्वयंपाकाला बाई ठेवून ती गरज भागवू लागली. काही तडजोडी कराव्या लागल्या, पण त्याला इलाज नव्हता. त्यांची मुलांवरील माया, प्रेम कमी झालं असं नाही, पण दिवसभर ऑफिस काम करून घर सांभाळणे ही तिच्यासाठी तारेवरची कसरत होती. शेवटी तिच्या कष्टानाही मर्यादा असतेच ना! अपूर्ण….
Positive Potpourri !
” जो जीता…वही..सही “ Living in age when Winning is Everything . It’s not enough to win but you have to keep on winning everytime. Life has become a game. That’s the reality of modern era where ordinary are doing extraordinary things. Whether you are a student, actor, businessmen, industrialist, artist or even politician. Cracking NEET/IIT/IAS exam, students have to study 24/7/365. Winning OSCAR for an actor/filmmaker require tenacity, consistency of high order. And the next most important area is politics and particularly in democratic countries like India where round the year election is the order of the day. Unless students of politics study and learn new skills, spread outreach, develop new approaches 24×7×365 days, they cannot succeed in the battle of ballots. This has been the biggest lessons of last 8 years where ruling party is much ahead of the curve than their opponents continuously. In the smart age of social media, you have to set an agenda, crate perception, build narrative and make people believe what you are doing is right. Whether you are right or not , let the posterity decide. Slowly but surely, India is developing as powerful country with strong leadership and is emerging as the fastest growing economies in the world despite global geopolitical tension. The President of both Russia and Ukraine spoke at lengths to our PM almost back-to-back underlines India’s growing clout on world stage. Every crisis can be embraced as an opportunity for better and different future with vision and energy that India has. With every election, Indian Democracy is getting stronger and more vibrant. There are lessons to be learnt for both winners and losers. Women and young new electorates are playing decisive role in electing the govt.,which PM also acknowledged. Why one party could retain UP despite incumbency while other could not do so in Punjab ? TOI in his editorial commented that Polls can be won via charisma, identity politics and welfarism. But can this be sustained minus job creation ? The Choice before the political parties is clear – go for welfarism and rank populism and win election or go for growth and employment via smart policies to crate jobs. Choosing the right alternative will decide the course of future India. India’s weakest link lies in it’s heterogeneous, complex social fabric. Forget 80/20, that might pay high dividends in the short run but even talking 99/1 will have disastrous consequences in the long run. Punjab’s victory is shot in the arms for AAP, a political start-up started a decade ago. It’s definitely a watershed moment for them as far as their growth and future is concerned. It will be very challenging task for them to set Punjab Model like Delhi in governance. Slowly AK is emerging and evolving in very distinctive manner and opposition space is vacant to be filled up. In her book, Warren Buffet invests Like A Girl Lou Ann Buffet explains why women are better investor than average man. They are lot more thorough and deliberate while taking investment decision. They do more research, more due diligence, take lesser risks, more consistent. Unlike men, women attach more importance to objective than returns. Whether they are saving for investment, or a holiday, or even money to play in the equity market, the investment nis clearly linked to the objective. The risk inversion in women investors also makes them natural diversifier. It’s universally acknowledged fact that women are careful borrowers with lower default rates and lower delinquencies. The latest CIBIL report also confirms this fact.( Excerpts from ET Wealth )
मराठी दिन का दीन? …
दीन नक्कीच नाही
गेली काही वर्षे, जागतिक मराठी दिन २७ फेब्रुवारीला किंवा जागतिक मातृभाषा दिनी अनेक चांगल्या पोस्ट्स, कविता, चित्रं पहायला मिळतात. छान वाटतं. एक मैत्रीण म्हणाली आजच का मराठी… रोज का नाही? खरंच मराठी रोजच का नाही?…..कमीत कमी मराठी माणसासाठी तरी? आणि असंही वाटलं… की काय हरकत आहे? मराठी दिन साजरा करायला ? आपण रोज थोडेसे वाढत असतो- मोठे होत असतो पण तरी वर्षातून एकदाच येणारा वाढदिवस आपण साजरा करतोच ना ? मग मराठी रोज बोलणाऱ्या आपण मराठी जनांनी “गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार!!!” असं लिहिणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून मराठी भाषेची पताका गगनाला भिडवणाऱ्या ज्येष्ठ साहित्यकार “कुसुमाग्रज” वि.वा. शिरवाडकर यांच्या वाढदिवशी २७ फेब्रुवारीला जर मराठी दिन साजरा करणं ही तर अभिमानाचीच गोष्ट आहे की ? पण तरीही काही प्रश्न, विचार डोक्यात आले… “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, मराठा तितुका मिळवावा , मराठी पाऊल पडते पुढे, इये मराठीचिये नगरी ” इत्यादी फक्त काही जणांनी म्हणून , लिहून मराठीचा झेंडा खरंच किती फडकत राहील ? खरंच वर्षातून एका २७ फेब्रुवारीला काही पोस्ट टाकून, गाणी ऐकून, शुभेच्छा देऊन खरोखर मराठी दिन साजरा होईल? इंग्रजी,जर्मन ,फ्रेंच ,जॅपनीज इत्यादी अनेक जागतिक भाषांच्या गराड्यात रेट्यात आपली मराठी तिचं वैभव टिकवू शकेल का? भारताच्या अनेक राज्यात, उदा. गुजराथी, राजस्थानी, तामिळ, कानडी, बंगाली अशा तिथल्या भाषेचा मातृभाषा , रोजची बोलण्यातली भाषा म्हणून जशा बोलल्या जातात तशा आपल्या महाराष्टार्त मराठी बोलली जाते का ? का इतर वेळी इंग्रजी, हिंदी किंवा हिंग्लिश नाहीतर अगदीच नाईलाज झालाच तर इतर भाषेतले शब्द मिसळून धेडगुजरी मराठी बोलायची आणि मराठीत बोलणाऱ्यांना व्हर्नाक्युलर म्हणून क्षुल्लक समजायचं ? किंवा मराठीत बोलले तरी व्याकरण , शुद्धता धाब्यावर ठेऊन ? जगभरात ९-१० कोटी लोक जी भाषा बोलू शकतात आणि महाराष्ट्राची राज्यभाषा व भारतातही मान्यताप्राप्त असलेल्या मराठीला भविष्य काय ? कुठलंही शिक्षण मग ते प्राथमिक-माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक किंवा पदवी-उच्चशिक्षण घेताना इंग्रजी शिक्षण आवश्यक आहेच पण हे करताना मराठी दुर्लक्षित राहणार नाही ना ? मराठी मातृभाषा असूनही चार वाक्य मराठीत बोलता येत नाही किंवा साधं मराठी वाचताही येत नाही हे किती जणांना लाजिरवाणं वाटतं ? ज्ञानेश्वर , तुकाराम , एकनाथ, रामदासांसारख्या संत मंडळींपासून राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे, कुसुमाग्रज, वि स खांडेकर, वसंत बापट, पुल देशपांडे, गदिमा , शांता शेळके, सुरेश भट आणि इत्यादी अनेक प्रभुतींनी समृद्ध केलेल्या मराठीचं आयुष्य किती ? ग्यानबा तुकाराम -जय हरी विठ्ठल करत पंढरीची वारी करणारे मराठीची पालखी किती दिवस वाहतील ? हे आणि असे प्रश्न माझ्यासकट अनेकांना पडत असतील पण नुसते प्रश्न पडून , वाईट वाटून काहीच होणार नाही हेही खरंच. यापेक्षा मराठी भाषेसाठी आपण काय करू शकतो? असा विचार प्रत्येक मराठी माणसाने केला तर? आपण दिवसातून अनेक वेळेस ‘सॉरी’ , हॅलो, थँक्स , प्लीज म्हणत असतो, या ऐवजी मराठी शब्द धन्यवाद, नमस्कार, वगैरे शब्द सहज वापरु शकतो का? विविध कारणास्तव आपण एकमेकांना भेटवस्तू देत असतो. अशावेळी भेटवस्तू म्हणून सर्वोत्तम मराठी पुस्तके / काव्यसंग्रह / नाटय़कृती यांचा आपण विचार करु शकतो का? महिन्या दोन महिन्यांत किमान दोन मराठी पुस्तके विकत घेऊन वाचतो का? बँका, विमा कंपन्या, मोबाईल कंपन्या यांच्याकडे मराठीतून माहिती-सूचना पुस्तिका-प्रपत्रे (फॉर्म्स) इत्यादी देण्याचा आग्रह नाही पण ती असतील तर ती वापरु शकतो का? मराठी विषय शिक्षणासाठी शाळेत दहावीपर्यंतच तेही फक्त मराठी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांसाठी, कारण मी त्यातला एक… ११-१२वीत इलेक्ट्रॉनिक्स हा व्यावसायिक विषय स्वीकारल्यामुळे मराठी नाही.. कला किंवा वाणिज्य शाखा स्विकारली तर मराठी शिकायचं तेही परत एक विकल्प म्हणूनच. शास्त्र घेणारे नाराजीनेच हा विषय घेतात, कारण गणितासारखे वा संस्कृतसारखे मराठी विषयाला भरपूर गुण मिळत नाहीत हा गैरसमज. बाकी कला..वाणिज्य शाखेतली विद्यार्थी सुध्दा मराठी घेतात कारण इंग्रजीच्या तुलनेत मराठी समजायला सोपी वाटते , मराठीची, मराठी साहित्याची आवड आहे म्हणून नाहीच. मला स्वतःला शास्त्र… इंजीनियरींगला गेल्याने दहावीनंतर मराठीचा विषय म्हणून अभ्यासला न गेल्याची खंत आहे. पध्दतशीर शास्त्रोक्तपणे आणि विषयात रस घेऊन अभ्यास केल्यास मराठी ही चांगले गुण मिळवून देते याचा अनुभव मला स्वतःला दहावीच्या परिक्षेत आला आहे शाळांमध्ये विद्यार्थ्यांबरोबर पालकांचेही या विषयावर. बौध्दिक घेतले गेले पाहिजे. मराठी विषयाच्या पदवीधराला ..काही ठिकाणी शिक्षक प्राध्यापक वगळता इतरत्र कोणतीच नोकरी मिळत नाही, हेही मराठी न निवडण्याचे कारण. मराठी योग्य पध्दतीने शिकल्यामुळे मिळणाऱ्या संधी वाढल्या पाहिजेत. मराठीचा इंटरनेटवर वापर वाढतो आहे त्यादृष्टीने इंग्रजी साईट्सप्रमाणे स्पेलचेकस किंवा इतर सोयी वाढवणे हा एक उपाय आणि व्यावसायिक संधीही … यासाठी इ-मराठीचा विस्तार होतोय, तो वाढला पाहिजे. टोकाची मराठी अस्मिता किंवा अगदी विरुध्द भूमिका म्हणजे मराठी टिकणार का नाही असे विचार आणण्यापेक्षा आजच्या हाय- टेक युगात मराठी मागे पडतेय हे स्वीकारले तरच भाषेच्या उत्कर्षाचे नवीन मार्ग सापडतील. ते सापडण्यासाठी समविचारी आधार समूह तयार व्हायला होतील. मराठी चिरंतर राहावी ही आपली सर्वांचीच मनापासून इच्छा आहे तर प्रयत्नही आपणच करायला हवेत – आपल्या स्वतःपासून , आपल्या घरापासून , मित्रपरिवारापासून सर्वांनी – प्रत्येक मराठी माणसाने – मग मराठी दीन तर राहणार नाहीच पण मराठी भाषा ही चिरायू होईल . मराठी दिन तर साजरा करूच मराठी बरोबर आपणा मराठी माणसांचीही मन कशी उंच राहील ते ही पाहू !!! मग खरंच सुरेश भटांनी लिहून ठेवलेलं ” लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी । धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एव्हढ्या जगात माय मानतो मराठी ।।” ही रचना फक्त २७ फेब्रुवारीला नाही तर रोज जगातला प्रत्येक मराठी माणूस आनंदाने अभिमानाने म्हणेल – ऐकेल !!!
” तेरे बीना…..जीया जाये ना “
” If the last two years of living with the virus have taught us anything, it is to remain humble, but grounded in self-belief, never losing confidence and optimism. As the great Lata Mangeshkar – whom we lost recently– sang in her immortal voice – ,आज फिर जीने जी तमन्ना है. Together with the spirit being the next line of this beautiful song, she has conveyed the eternal messge of optimism — आज फिर मरने का इरादा है. ( RBI Governor Mr. Shashikant Das in his Monetary policy speech ) As expected, finally we have learnt to live with Covid-19. It’s time to stop mass testing and daily release of infection number and redefine a Covid case as one where infection is followed by hospitalization. Omicron has shown that high transmissibility is at itself is no public health crisis. Daily infection figure create fear and unnecessary panic that need to be minimised. Indis’s adult vaccination has been a big achievement at 77 % . It’s time now to focus on economic activity and livelihood. The rise and growth of Web-series/films on OTT platform has a lot to with pandemic for last two years. Surely, it offers creative freedom, space for artists to try their histrionics. How far they have succeeded may be a matter of debate and speculation. When बधाई हो come, can बधाई दो be far behind?. When pandemic is waning, people are fed up with OTT products, highly embarrassed watching it not only with family but also with spouse, a family entertainer like बधाई दो on big screen is the right choice. It attempts to normalize the depiction of gay and lesbian community and their romantic relationship with the backdrop of marriage, middle class families but shown with sensitivity and maturity. The best part of the movies it gives perspective to the taboo subject even in small town and bring families together. गहराईयां is too complicated and delves deep in modern human relationship which average middle class audience may find it too difficult to comprehend but they are catching it up fast. Farhan Akhtar did it in 2001 in his दिल चाहता है with elan, Shakur Batra tried this in 2022 with realism. One thing for sure, you may like it or may not but you can’t ignore it. You may sympathise with present young generation as to ये कहां आ गये वो…. People with no money and beauty may consider themselves lucky after watching the tragic lives of people with money and beauty, villas and boats. Deepika is simply outstanding in her complicated character while Siddharth has a lot to learn as an actor. Naseeruddin Shah, in brief role, as usual a scene steeler. Writer Adhhyay Sengupta in his article How We Should Mourne suggested the national mourning for Lata Mangeshkar could be more soothing and less militaristic. Like every state funeral, there was a brass band which played the ‘ Last Post ‘ and servicemen fired rounds of gunfire. Watching it on television was painful and you could not help wondering – for a singer who had regaled us with her magical voice for seven decades – could we as nation not be more imaginative than sounding military honours ? The harshness of the sound at her funeral clashed jarringly with the unmatched sweetness of her vioce. But the death of Lata Mangeshkar provided us with an opportunity to reflect upon our musical choices at a state funeral as well as it’s overwhelmingly militaristic overtone. Lata’s own, ऐ मेरे वतन के लोगो could there not be more original and heartfelt ways to grieve ? Would the pain of a nation in mourning not be best soothed by Lata’s own voice ? As a grateful nation mourns her, may our mourning be as true as her voice. As one of her most memorable song reminds us, death after all, is a only game of hide and seek. तेरा जाना..दिल के अरमानों का लूट जाना,कोई देखे..बन के तकदीरों का मिट जाना
पेपरवाला……..
आपल्या प्रत्येकांकडे दररोज एक पेपर येतो. प्रत्येक जण वेगवेगळे पेपर घेतात. सकाळचा गरम गरम चहा आणि पेपर वाचणे या एकत्रित गोष्टी घडणे हा एक अमृतयोगच म्हणावा लागेल.
न घडलेली भेट
सन २०११ च्या जून महिन्यातील एक पावसाळी सकाळ. रविवारचा दिवस होता. पुण्याहून मुंबईला येणारी प्रगती एक्सप्रेस दादर स्टेशनात येऊन थांबली. मी, माझी पत्नी आणि मुलासह खाली उतरलो. तसं पाहिलं तर मुंबईला येण्याची ही काही माझी पहिलीच वेळ नव्हती. पण यावेळी मनात असणारी उत्सुकता (आणि थोडी अनिश्चिततेची चिंता) काही वेगळीच होती.
निरोप
सकाळी दारावरची bell वाजली. दार उघडलं तर दारात स्वयम चा नव्या स्वरूपातला वर्ष पाहिले अंक अकरावा येऊन पडला होता आणि परांजपे काका वनवासी कल्याण आश्रमाची calenders घेऊन आले होते. साल २०१५ संपल्याची वर्दी मिळाली. वर्ष संपत आले सुध्दा? वर्षभरातल्या सुख दुखाच्या घटना, काय मिळवलं काय गमावल? याचा आढावा घ्यायला गेला तर आनंदी आठवणीनी मन प्रसन्न होतं तर ज्या गोष्टी गमवाव्या लागल्या त्यांनी मन कातर होतं. वर्षभरात कुणीतरी जीवाभावाच आपल्यापासून दूर गेलेलं असतं. अत्यंत आनंदाच्या क्षणी लेकीचं लग्न होतं तेव्हा लेकीला निरोप देताना, आता रोज भेटणार नाही दिसणार नाही हे दु:ख, नवीन माणसात रमेल नं? जमवुन घेतील ना? हि काळजी. आजवर केलेले संस्कार, नाती बांधुन ठेवण्याचं स्त्रीचं अंगभुत कौशल्य या सगळ्या जबाबदाऱ्या ती नीट पार पाडू शकेल नं? हि काळजी, उरात दाटून येते. निरोप देण्याची कित्तीही मानसिक तयारी झालेली असली तरी होणाऱ्या विहिणीला “ओटीत घातली मुलगी विहीण बाई असं म्हणुनच आई लेक जावयाचा निरोप घेते. “ढल गया दिन हो गयी श्याम जाने दो जाना है” या तिच्या आर्जवाला “अभी ना जो छोडकर के दिल अभी भरा नाही” असं म्हणणारा तो आता एकमेकांचा कंटाळा येईपर्यंत एकत्र येतात. नोकरी व्यवसायानिमित्त एकमेकांचा निरोप घेतला गेला तरी मनाच्या तारा जोडल्याच असतात. पण तरीही एकमेकांचा विरह त्रासदायकच. आपल्याला सोडुन लांब जाणाऱ्या आपल्या जोडीदाराच्या खुशालीची काळजी मन व्याकुळ करते आणि भरल्या डोळ्यांनी पुसट प्रतीमेतच त्याचा निरोप घ्यावा लागतो. पण सीमेवर जाणाऱ्या वीराला मात्र ती वीरपत्नी “पहा टाकले पुसूनी डोळे, गिळला मी हुंदका, रणांगणी जा सुखे राजसा परतुनी पाहू नका” असा निग्रही निरोप देते. कर्तव्याची जाणीव तिला कठोर करते आणि निग्रही निरोप घ्यायला भाग पाडते. कठोर असला तरी हा निरोप केविलवाणा असतो. आपला जोडीदार परत येईल ना? ह्याची शाश्वती नसते. पण पंढरीतल्या विठूरायाला काल्पनिक निरोप देणारी सावळारामाची रुख्मिणी मात्र पंढरपुरातल्या दाम्भिकातेला कंटाळून “यायचे तर लवकर बोला नाही तर द्या हो निरोप मजला” असा धमकीवजा निरोप देते. पत्नीचा अकाली वियोग हि पुरुषासाठी अतिशय केविलवाणी गोष्ट असते. या जगाचा तिने निरोप घेतलाय हि गोष्टच मान्य न झालेल्या एका जीवाचा आक्रोश मांडताना “धरिला असं अबोला की बोल बोलवेना अजुनी रुसुनी आहे खुलता कळी खुलेना”असं म्हणुन तिला बोलतं करण्याचा प्रयत्न कवी अनिलांनी इतका तंतोतंत शब्दबद्ध केलं आहे की ऐकताना आपल्याही घशात हुंदका दाटून येतो. “संधीप्रकाशात अजून तो सोने तो माझी लोचने मिटू यावी”अशी याचना बोरकर करतात तेव्हा सुध्दा हाच केविलवाणा भाव जाणवतो. इतक्या वर्षांची समृद्द्ध साथ तिच्या पश्चात येणाऱ्या पोरकेपणाची भावना त्या गृहस्थाना वेळीच तिचा निरोप घेण्यास उद्युक्त करते. “तूच ओढलेले त्यासवे दे पाणी थोर ना त्याहुनी तीर्थ दुजे” या शब्दात सगळे कृतज्ञ भाव ह्या पोरकेपणाच्या भावनेमुळे उफाळून येतात. एका पतिव्रतेच्या खरंतर नवऱ्याच्या अनंत काळाच्या मातेच्या डोळ्यात कृतार्थ भाव आणणारी हि शब्द रचना!! आपल्या जोडीदाराच्या पाठी एकट रहाणं हि नुसती कल्पना सुध्दा असह्य होऊन रामाबाईसारखी साध्वी माधवरावांच्या आजारपणात सतीची वस्त्र मागवते, आपल्या सख्या सोबतच या जगाचा निरोप घेन्याचा त्यांचा निर्धार खरोखर अचंबित करणारा. निग्रही निरोप म्हटलं की कुंतीच विस्मरण होणं निव्वळ अशक्य!! अजाणतेपणी घडलेल्या चुकीची शिक्षा. आपल्या तेजस्वी अलौकिक पुत्राला एका पेटाऱ्यात घालून नदीत सोडुन देण्याला, त्या अल्लड कुमारिकेची प्रगल्भता म्हणावी की समाजाला तोंड देण्याची भीती? त्या एवढ्याशा जीवाला नदीत सोडताना भीती नसेल वाटली? का हे करताना परमेश्वरावराचा अढळ विश्वास हे कृत्य करायला सामर्थ्य देऊन गेला असेल? कुंतीनं मुलाला जिवंत सोडलं होतं. कुठे ना कुठे तो सुखरूप राहील अशी आशा होती, पण पुत्रवियोगाचं दु:ख ओढवत त्या मातेचं काय? “राजहंस माझं निजला“ या कवितेत गोविंदाग्रजांनी मातेचा विलाप व्यक्त केला आहे. पण पुत्र वियोगाचं दु:ख वडिलांनाहि तितकच होतं. वडिलाना होणारं दु:ख तिळभरही कमी नसतं. “आज आठवे मजसी श्रावण शब्द्वेधती मृगया भीषण पारधित मी वधिला ब्राह्मण त्या विप्राच्या अंध पित्याचे उमगे दु:ख अपार “ दोन पित्यांच्या पुत्र वियोगाचं वर्णन गीत रामायणात ग. दि. माडगूळकरानी केलं आहे. एक अंध पिता ज्याने दु:खावेगाने शापवाणी उच्चारली आणि दुसरा दशरथ वचनपुर्ती साठी मुलाला वनवासात जाण्याची आज्ञा करावी लागली. “जेथे राघव तेथे सीता” म्हणून रामाला निरोप नाकारणाऱ्या सीतामाईच्या दु:खाचं यथायोग्य मूल्य मापन झालं, पण “भावाचा वियोग सहन करू शकत नाही” असं म्हणणाऱ्या लक्ष्मणाच्या पत्नीला आपल्या नवऱ्याचा निरोप घ्यावाच लागला. त्याला निरोप देताना काय असतील तिच्या भावना? विरहाचं अपार दु:ख, जाऊबाईना नेणार आणि मला नाही हि तक्रार की “भावाच्या तुलनेत आपल्याला नाकारल्याचं वैफल्य?” तिच्या भावना ह्या कायम उपेक्षितच!! वनवासात जाताना अयोध्या नगरीने “आज अयोध्या प्रथम पराजित थांब सुमंता थांबावी रे रथ” अश्या व्याकुळ भावनेने निरोप दिला होता तर वृंदावनाच्या प्रजेने अकृराला क्रूर ठरवत “नकोस नेऊ आनंदाचा ठेवा” म्हणत श्री कृष्णाला निरोप दिला होता. स्नेही जीवाचा निरोप घेणं क्लेषकारकच पण घरातल्या आता कदाचित निरुपयोगी झालेल्या रोजच्या वापरातल्या वस्तु टाकून देताना सुद्धा “टाकवत नाही हि भावना असते” तर ज्याच्यावर आपलं राहत घर बदलावं बदलण्याची वेळ येते, त्यांना ती वास्तू सोडताना किती यातना होत असतील? संदीप खरेनी म्हटल्या प्रमाणे “का रे इतकं लळा लावूनी नंतर मग हि गाडी सुटते डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते” म्हणुनच मग स्वप्नात जेव्हा “घरात” एखादी घटना घडते तेव्हा घरातली माणसं कुणीही असोत या “आठवणीचा ठिपका बनलेल्या घरातच” स्वप्नातल्या अनेक घटना घडत असतात. नुकतीच whats app वर एक post वाचली. शाळेतल्या दहावीच्या निरोप समारंभाबाबत होती ती. शाळेत जायला आपली सुरुवात होते तेव्हा आई वडिलांच्या सुरक्षित कोषातून बाहेरच्या जगात पहिलं पाउल टाकतांना देखिल अपार दु:ख डोळ्यातून आक्रोश करत असतं. मुलाला शाळेत सोडुन परतणाऱ्या आई वडिलाना कठोरपणे हात सोडवून घ्यावाच लागतो तेव्हा पुढचं जग खुलं होतं. ज्या शाळेत प्रवेश घेताना रडतो त्या शाळेतून बाहेर पडताना देखिल दु:खच!! निरोप हा क्लेशकारक असला तरी हितकरच ठरतो, हे माहित असूनही निरोप घेताना मन व्याकुळ होतच. आपल्या सारख्या सर्व सामन्यांच्या आयुष्यातही बदल्यामुळे असे निरोपाचे हळवे प्रसंग अनेकदा येत् असतात. माणुस आपल्या भावतालातल्या प्रत्येक सजीव निर्जीव वस्तूवर जीव लावातो तेव्हाच त्याचा भवताल सुंदर होतो. या सुंदर विश्वातून बाहेर पडताना एकःद्याचे डोळे ओलावत असतील तर त्याच्या बरोबर इतरानाही ते क्लेश्कारच होतं. सचिन तेंडूलकरने क्रिकेटचा घेतलेला निरोप हा त्याच्या सोबत इतरानाही चटका लावून जाणारा. ज्या मैदानावर तो खेळला त्या पिचला नमस्कार करूनच प्रथम दर्जाच्या क्रिकेटचा त्याने निरोप घेतला. चार दिवसात नव वर्ष सुरु होईल. गेल्या वर्षात काय गमावल काय कमावलं ह्याचे हिशोब मांडले जातील. कमावलं काय ते पटकन आठवणार नाही पण गमावल काय ते चटकन लक्षात येईल. जे गमावल, ते आपलं होतं! हे गमावल्या नंतरच जाणवतंय हे सुध्दा लक्षात येणार नाही कदाचित. कुणाला दुखावलं असेल कुणी आपल्याला दुखावलं असेल. जाणुन बुजुन नाही पण नकळत!! मनुष्य स्वभाव आहे तो ह्यात गैर काहीच नाही. लहानपणी म्हणजे खरंतर सोळाव्यात चिंचेच देठ घेऊन एक एक पान तोडत “he loves me he…
काळी चंद्रकळा नेसू कशी?
महाराष्ट्रीयन स्त्रियांच्या वेषभूषेत नऊवारी, पाचवारी साडीची खासियत असते. पंजाबी ड्रेसचे प्रमाण वाढले असले तरी लग्नात मिरवायला शालू, पैठणीच आवडते. आपल्या महाराष्ट्रीयन पद्धती नुसार लग्नानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला काळी साडी घेण्याची पद्धत होती. काळ्या साडीवर पांढरी खडी असलेली चंद्रकळा उठून दिसत असे. त्यावर हलव्याचे दागिने घातले की चंद्र कळा अधिकच खुलून दिसे. लग्नानंतर पहिल्या वर्षी हौसेने हळदीकुंकू करून नवीन सुनेला काळी साडी नेसायला लावणे आणि हलव्याचे दागिने घालून तिचा सण करणे हे सासू ला आवडत असे तसेच सुनेलाही त्यात कौतुक वाटत असे. आमच्या लग्नानंतर माझ्या मोठ्या नणंदेने हलव्याचे सर्व दागिने करून आणले होते. बिंदीपासून ते पायातल्या जोडव्या पर्यंत! अगदी कंबर पट्टा सुद्धा केला होता हे सर्व दागिने काळ्या चंद्र कळेवर खूपच खुलत होते.इतकी वर्ष झाली तरी तेव्हाचा तो चंद्रकळेचा स्पर्श मनाला आठवतो आणि अजूनही मी अधून मधून संक्रांतीला काळी साडी खरेदी करते. जानेवारी महिन्यात येणारा संक्रांत सण हा विविध गोष्टीने सजलेला असतो शेतकऱ्यांसाठी शेतात पिकणारी दौलत- बाजरी वांगी, तीळ,सर्व प्रकारची धान्ये आणि भाज्या -अशा स्वरूपात दिसत असते. भारतात सगळीकडे हा सण विविध रुपात साजरा केला जातो. दक्षिणेत त्याला ‘पोंगल’ म्हणतात.तर उत्तरेकडे हा संक्रांतीचा सण ‘पतंगाचा सण’ म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवसात हवा स्वच्छ असते. आकाश निरभ्र असते. आकाशाच्या पार्श्वभूमीवर उंच उंच जाणारे पतंग मनोहारी दिसतात.! या सणाला दानाचे महत्त्व आहे.त्यामुळे आपल्या जवळ असलेले दुसऱ्याला देणे ह्याचे संक्रांतीला महत्व आहे.हळदीकुंकू करून त्या निमित्ताने सवाष्णी ला दान करणे हा मूळ हेतू होता,तो कमी होऊन आता कोणी काय वस्तू लुटल्या हे सांगणे आणि आपले वैभव दाखवणे यासाठीच हळदीकुंकू समारंभ करतात की काय असे वाटते! पूर्वी सुगड दान करत असत.त्या सुगडात उसाचे करवे, तीळगुळ,वाटाणा हरभरा,पावटा,यासारखे त्या दिवसांत मिळणाऱ्या गोष्टी घालत असत.आता सुगडाची पध्दत शहरात फारशी दिसत नाही,पण गावाकडे मात्र अजूनही सुगडांचे पूजन केले जाते. आपल्या हिंदू संस्कृतीत आपले सणवार हे कालानुरूप साजरे केले जातात.या थंडीच्या दिवसांत स्निग्ध पदार्थ जास्त खावेत या हेतूने तीळगुळ, तूप, लोणी,बाजरी यांसारख्या गोष्टींचा उपयोग आहारात केला जातो.संक्रांतीनंतर सूर्याचे संक्रमण होऊन दिवस मोठा होऊ लागतो.उष्णता वाढू लागते.उन्हाळ्यात काळे कपडे आपण घालू शकत नाही.पण संक्रांतीला आपण आवर्जून काळे कपडे वापरतो.लहान बाळांना बोरन्हाण घालणे,काळी झबली,फ्राॅक घालणे हे सर्व कौतुकाने करतो,कारण पुढील चार महिने काळा कपडा अंगावर नको वाटेल! प्रत्येक सण असा काही हेतू ने साजरा केला जातो. आज काळी साडी कपाटातून बाहेर काढल्यावर आपोआपच असे काही विचार, आठवणी मनात जाग्या झाल्या, त्या शब्द रूपात प्रकट केल्या.. इतकेच!
जाऊ देवाचिया गावा…
‘जाऊ देवाचिया गावा’ गुणगुणतच शेगावच्या प्रवासाला प्रारंभ केला. पुण्याहून शेगावला जाण्याचा प्रवास साधारणपणे १२ तास,अगदी ए.सी.मधून प्रवास केला तरी बाहेर उन्हाच्या जवळा जाणवत होत्या. खूप दिवसांपासून शेगाव चे वर्णन ऐकत होते. महाराज जरी अगदी साधेपणाने राहणारे संत होते तरी, आताचे शेगाव, महाराजांची कर्मभूमी खरंच एखाद्या सुंदर राजधानी सारखी नटलेली आहे. भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याने भरपूर देणग्या मिळत आहेत आणि त्याची व्यवस्था खूपच छान केली आहे. शेगाव स्टेशनवर उतरल्यावर संस्थाना पर्यंतचे अंतर २/३ कि.मी.आहे. संस्थांची मर्यादित बस सेवा ही आहे आणि रिक्षाही आहेत आम्ही आनंद विहार मध्ये जाऊन खोली बुक केली चार जणांसाठी एसी खोलीचे भाडे एका दिवसासाठी फक्त 950 रुपये! इतर सर्वच सोयी छान होत्या. सकाळी लवकर मंदिरात गेलो असता खूपच सुखद अनुभव आला. सर्व सेवेकरी अतिशय नम्रतेने मार्गदर्शन करत होते. रांगे मध्ये बसण्याची व्यवस्था, वाटेत पाण्याचे कूलर, पंखे होते. दर्शनासाठी किती वेळ लागेल याचा डिस्प्ले, सर्वत्र व्यवस्थित माहिती देणारे बोर्ड यामुळे कुठे तक्रारीला जागाच नव्हती. कित्येक देवस्थानच्या ठिकाणी अस्वच्छता गोंधळ दिसतो तो इथे अजिबात नाही. सर्व सेवेकरी सतत स्वच्छता करताना दिसत होते. परिसरात एकही झाडाचे पान किंवा कागदाचा कपटा पडलेला दिसत नव्हता! त्यामुळे वातावरण प्रसन्न होते. आम्ही दर्शन घेऊन नंतर कारंजा येथे दत्तमंदिर पाहून आलो. येताना नागझरी जवळ गोमाजी बाबांची समाधी पाहिली. ते गजानन महाराजांचे गुरु होते. मठा पासून काही अंतरावर आनंद सागर नावाचे उद्यान छान प्रेक्षणीय केले आहे. पाण्याची कमतरता असूनही नदीचे पाणी लांबून उद्यानाजवळ वळवले आहे. सगळीकडे झाडांची वाढ करून परिसरात गारवा आणला आहे. गुरुवारी दिवशी दर्शनासाठी आणि प्रसादासाठी खूप रांग असते, पण कोठेही गैर शिस्त दिसत नाही. ध्यान मंदिरात पोथी वाचनासाठी सुंदर व्यवस्था आहे. एकंदरीत शेगावच्या या पुण्यमय वातावरणात दोन दिवस मन समाधानाने भरून गेले. आधुनिक काळात संतांचा महिमा हा श्रद्धेचा विषय व्यक्तिगणिक बदलतो. पण सामाजिक स्वास्थ्याचा तो पूर्वी एक अविभाज्य भाग होता. गोंदवलेकर महाराज, शिर्डीचे साईबाबा, शेगाव चे गजानन महाराज या सारख्या संतांनी शंभर वर्षापूर्वी जे कार्य केले ते खरोखरच अपूर्व होते. समाजात एकरसता आणण्यासाठी संतांनी गरीब-श्रीमंत, जातिभेद या सर्व गोष्टी बाजूला सारून, क्वचित समाजाचा विरोध पत्करून अध्यात्मिक पातळीवर काम केले.ते स्वतः कफनीवर राहिले असतील, पण आज त्यांच्या नावावर श्रध्देने हजारो लोक पोसू शकतील एवढे ऐश्वर्य त्यांनी या स्थानाला मिळवून दिले. हेही अफाट कार्यच आहे. गोंदवले, शेगाव,शिर्डी ही खेडी होती.पाण्याची टंचाई होती, काही शी दुष्काळ ग्रस्त च होती, अशा ठिकाणी संतांच्या वास्तव्याने कार्य सुरू झाले. या संस्थानाने ही आरोग्य, शिक्षण कार्यही तिथे चालू केले. असे सर्व बघितल्यावर वाटते की अध्यात्मिक आणि भौतिकतेचा चांगला समन्वय साधला तर काय निर्माण होऊ शकत नाही? तिथे काम करणारा प्रत्येक जण ‘हे महाराजांचे काम आहे, आपण खोटं काम करता कामा नये’ या जाणिवेने थोडा जरी वागला तरी बरीचशी सुधारणा होऊ शकते. राजकारणाचे स्वार्थ कारण झाले की तिथे विवेक बुद्धी कशी कमी होत जाते ते आपण पहातोच आहोत, पण अशा तीर्थक्षेत्रांचे दर्शन आणि वातावरण पाहिले की वाटते, अजूनही कुठेतरी चांगुलपणा शिल्लक आहे. श्रद्धा आहे जी आपले मनोबल वाढवते. बाह्य जगात, विशेष करून शहरीकरणात, जो दिखाऊपणा, एकमेकांशी सतत स्पर्धा व त्यामुळे आलेली अस्वस्थता दिसते इथे दिसत नाही. दोन दिवसाच्या शेगाव वास्तव्यात मन खरंच शांत झालं! प्रवास लांबचा असला तरी भौतिक सुखाचा (…) थोडा का होईना सात्विक आनंद मिळाला हेच या छोट्याशा ट्रीपचे फलित!