वार – रविवार,तारीख – ०८-०५-२०२२,वेळ – संध्याकाळचे सव्वाचार,ठिकाण – मराठा मंडळ सभागृह, मुलुंड (पुर्व), मुंबई सभागृहात पाऊल ठेवले तेव्हा दहा पंधरा टक्के रसिक अगोदरच स्थानापन्न झालेले होते. पुढच्या अर्ध्या तासात सभागृह तुडूंब भरले. ठीक पावणेपाच वाजता म्हणजे अगदी वेळेवर कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रथम शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला गेला व दीपप्रज्वलन पार पडले. आता रंगमंचावरील पडदा उघडेल आणि कार्यक्रम सुरू होईल अशी अपेक्षा असताना एका अनामिक उद्घोषकाने माईकवरून बोलणं सुरू केलं आणि काही दिवसांपूर्वीच्या एका ब्रेकिंग न्युजचा उल्लेख करून मनाचा हळवा कोपरा दुखावला. गानसरस्वतीच्या उल्लेखाने आणि आठवणीने मन व्याकुळ झाले, डोळे पाणावले. मराठीतील सर्वोत्कृष्ट कवी (कवी व कवयित्री धरून) शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम असला तरी लतादिदींनी गायलेल्या संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानाने कार्यक्रमाचा आरंभ झाला आणि रंगमंचावरील पडदा दूर झाला. प्रथम लक्ष वेधून घेतलं ते 70 एमएम स्क्रिनच्या आकाराच्या बॅनरने. बॅनरवर डावीकडे शांताबाईंची सर्वज्ञात डोक्यावरून पदर घेतलेली, डोळ्यावर जाड भिंगांचा चष्मा व कपाळावर मोठं कुंकु असणारी मुद्रा; ‘असेन मी, नसेन मी’ या व इतर शब्दांचं सुलेखन तसेच शाईची दौत व लेखणी यांचं चित्र. बॅनर बनवणा-याची कल्पकता वाखाणण्याजोगीच. वाद्यवृंद, गायक गायिका, निवेदिका स्थानापन्न होऊन मैफलीसाठी सज्ज होतेच. विविधरंगी प्रकाशयोजनेचे नेपथ्य हा वेगळा घटक ठळकपणे जाणवून गेला. एकूण परिपूर्ण माहोल तयार झाला होता. तेवढ्यात निवेदिकेचे सुर कानावर पडू लागले आणि काही सेकंदांतच जाणवलं की आज शांताबाईंच्या जीवनाचा अख्खा पटच आपल्यासमोर उलगडत जाणार आहे. शांताबाईंनी “गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया” असं म्हणत म्हणत पुण्याच्या हुजुरपागा विद्यालयातून शिक्षणाचा श्रीगणेशा केला आणि “जय शारदे वागेश्वरी” असा जयजयकार करीत स. पा. महाविद्यालयातून महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण केले. तारुण्यात पदार्पण करत असताना त्यांना “तोच चंद्रमा नभात, तीच चैत्र यामीनी” असतानाच “स्वप्नामधील गावा दूर जाणारी वाट” दिसू लागली. पण अचानक हृदय विध्द झालं आणि “काटा रुते कुणाला, मज फुलही रुतावे हा दैवयोग” त्यांच्या नशिबी आला. पण “काय बाई सांगू, कसं गं सांगू” असं स्वतःचं दुःख कुरवाळत न बसता “नाव सांग, नाव सांग” म्हणत त्यांनी एकीला ‘त्याच्या’साठी हेरलं. एकांतात मात्र त्यांचे मनोगत होते “जीवलगा, राहिले रे दुर घर माझे, पाऊल थकले, माथ्यावरचे जड झाले ओझे” आणि तिची ‘त्याच्याशी’ गाठ घालून देतानात्यांचा “कंठ दाटून आला” होता. काळ पुढे सरकत होता आणि “रेषमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा काढण्याचं” काम करत होता. शांताबाई कोष्टी समाजाच्या. त्यामुळे कोळी समाज, त्यांची संस्कृती, त्यांच्या चालीरीती याबद्दल त्यांना काहीच माहिती नव्हती. अशा वेळेस बाईंनी काय करावे ! त्यांनी कोळी समाज, कोळी ज्ञातीबाबतचं सगळं साहित्य धुंडाळलं आणि त्यांना हवे असलेले खास शब्द गवसले. मग काय ! “राजा सारंगा, राजा सारंगा, डोलकरा रं”, “वादलवारं सुटलं गं”, “वल्हव रे नाखवा हो, वल्हव रे रामा”, “पुनवेचा चंद्रम आला घरी” या गीतांचा जन्म झाला. शांताबाई थोरांमध्ये थोर आणि पोरांमध्ये पोर होऊन जायच्या. त्यामुळे त्यांनी बालगीतांतही लिलया मुशाफिरी केली. “पाऊस आला, वारा आला”, “किलबिल किलबिल पक्षी बोलती”. त्यांना “ऋतू हिरवा” दिसू लागला आणि “आज चांदणे उन्हात हसले” असंही वाटलं. भाषेचे बंधन नसल्याने त्यांनी चक्क “माझे राणी माझे मोगा” या गोवी भाषेतील गाण्याची निर्मिती देखील केली. ‘बांबू’ बघून कुणाला काही सुचेल का हो ? पण शांताबाईंनी ते देखील करून ठेवलंय “नंबर 54, House of बांबू”. शांताबाईंनी साहित्याच्या प्रत्येक प्रकारात पाऊल ठेवले. अपवाद फक्त विनोद आणि नाटक यांचा. त्यांना याबाबत छेडलं असता त्यांनी मला माझ्या मर्यादा ठाऊक आहेत असं उत्तर दिलं होतं. तरीही त्यांनी ‘हे बंध रेशमाचे’ या नाटकासाठी पदं लिहिलीच. उदाहरणार्थ “का धरीला परदेस, सजणा का धरीला परदेस”. अखेरच्या काळात कालातीत रचना देखील त्या करून गेल्या. “असेन मी, नसेन मी तरी गीत असेल हे”. त्यांचं हे जन्मशताब्दी वर्ष असूनही त्यांची गीतं अजूनही आहेतच आणि ती रहातीलच. अशाच एका कालातीत गीताने मैफलीची सांगता झाली – “मराठी पाऊल पडते पुढे”. एवढी सुंदर मैफल जमवून आणणा-यांच्या पाठीवर कौतुकाची थाप तर द्यायलाच हवी. वाद्यवृंदाचा मेळा खुपच सुंदर जमला होता. कितीही अवघड सुरावट असली तरी प्रत्येक वादकाने ती अप्रतिम व बिनचुक सादर केली. काही वादकांनी ते जाणकार नसलेल्या वाद्यवादनाचा अंश देखील सादर केला. उत्कृष्ट सांघिक कामगिरी करून घेतल्याबद्दल श्री. अंकुश हाडवळे अभिनंदनास पात्र आहेत. दोन्ही गायक व दोन्ही गायिका कमालीच्या गायल्या. “जीवलगा”, “काटा”, “परदेस”, “कंठ”, “नंबर 54”, “मराठी पाऊल” ही गाणी अजुनही कानात रूंजी घालत आहेत.केतकी व मंदार यांना शतप्रतिशत गुण. या दोघांशी तुलना करता प्रीति व सौमितकुमार हे काकणभरच कमी पडले. थोडंसं डावं, उजवं तर असणारच. हाताची बोटं कुठे सारखी असतात. वय, अनुभव या बाबींमुळे देखील फरक पडतोच. नेपथ्य व्यवस्था, प्रकाश योजना, ध्वनी संयोजन, इत्यादी घटकांची कामगिरी चोख. मराठा मंडळ सभागृहातील संपूर्ण व्यवस्था लौकिकाला साजेशी होती. सरतेशेवटी कार्यक्रमाचे निर्माते श्री. राजेंद्र शिंगरे यांचे जेवढे आभार मानावेत तेवढे थोडेच होतील. नोकरी, घर, संसार सांभाळून अशी यशस्वी मैफल जमवण्याचे शिवधनुष्य त्यांनी अगदी व्यवस्थित पेलले. एका कार्यक्रमासाठी दोन महिने मेहनत घ्यायची व तो कार्यक्रम सादर करायचा. तो कार्यक्रम पार पडला की पुन्हा दोन महिने मेहनत हे न संपणारं चक्र त्यांना सांभाळावं लागत असणार. काही शब्दांत त्यांचं कौतुक करणं खरं तर योग्य ठरणार नाही. आता तुम्ही म्हणाल की मी निवेदिकला विसरलोच. नाही. अजिबात नाही. निवेदिका तर या मैफलीची आत्मा आहे. तिच्याबद्दल काय बोलू ? माझ्याकडे शब्दच नाहीत. कार्यक्रम सुरू झाल्यावर काही मिनिटांतच मी अवाक झालो होतो. कार्यक्रम संपला तरी माझा ‘आ’ वासलेलाच होता. मी अनेक कार्यक्रम पाहिले आहेत. हसरा आणि बरा दिसेल असा चेहरा व वाणी या भांडवलावर समोर कागद ठेवून निवेदन करणारेच इतकी वर्षे बघत आलो आहे. त्या दिवशी मात्र निवेदिकेच्या हातात माईकशिवाय काहीच दिसत नव्हते. हातात काय, समोर, खाली कागद, मोबाईल काहीच दिसत नव्हते. तरीही न थांबता, न अडखळता, न चुकता शांताबाईंचा अख्खा जीवनपट तीन साडेतीन तास खुमासदार, ओघवत्या वाणीने कानावर पडत होता. निवेदिका, अनघा मोडक हिने सर्व गायक गायिका व वाद्यवृंद चमूचा परिचय करुन देताना स्वतःबद्दल मात्र खुपच त्रोटक माहिती दिल्याने श्री. शिंगरे यांनी रसिक प्रेक्षकांतून एका रसिकाला अनघाचा परिचय करून देण्यास सांगितले असता तिच्याबद्दल समजले. “अनघाचे डोळे गेले पण दृष्टी गेली नाही” असे त्यांनी सांगितले. मी तर म्हणेन की अनघाने ‘दृष्टीआड सृष्टी’ ही म्हण वेगळ्याच अर्थाने सार्थ ठरवली आहे. तिने खरोखरच ‘दृष्टीआड सृष्टी’ निर्माण केली आहे. तिच्या त्या ‘सृष्टी’चा अनुभव निरंतर घेण्यासाठी सर्वच रसिक सदैव तयार असतील याबाबत माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही.
Category: Blogs
“सोचा कहां था… ये जो..ये जो हो गया”
ROTARY SAHAWAS CARNIVAL –हंगामा-2022 पिछले दो वर्षों की महामारी, लॉकडाउन, न्यू-नार्मल के बाद डरते, सहमते लोगो को ‘नार्मल लाइफ’ स्वीकारना आसान नही। सड़को, होटलों, थिएटरों, हवाईअड्डो, रेसोर्ट्स पर उमड़ती भीड़ क्या दर्शाती है ? चील, रिलेक्स, एन्जॉय ! अपनो को खोने का गम, सपनो के टूटने का दर्द, धंदो की लगी ‘वाट’, बिखरते रोजगार, वर्क फ्रॉम होम इत्यादि घटनाओं से बदलती, बढती जिंदगी… ऐसी दोलायमान पार्श्वभूमि में 30 अप्रैल 2022, शनिवार को पुण्याई सभागृह, पुणे में संपन्न रोटरी सहवास कार्निवाल-हंगामा 2022। क्लब एडमिन रो.निवेदिता मुळे और इवेंट डायरेक्टर रो.सुधीर वैद्य की मेहनत और सूझबूझ का ही नतीजा थी वो रंगारंग शाम जिसमे सभी रोटरी सहवासीओ के सहभाग ने इसे और भी रंगीन बनाया। गीत, संगीत, नृत्य को सुनना, देखना हमेशा आनंददायी रहता है और इसे पेश करने वाले अगर आपके अपने मित्र, सहयोगी हो तो क्या बात है ! पेशेवर कलाकारों के अति-सामान्य परफॉर्मन्स को बर्दाश्त करने की आदत है पुणेकरो को। ऐसे में जब शौकिया कलाकर मेहनत और लगन से अपनी कला पेश करते है तो असामान्य लगते है। यही इस कार्निवाल की खासियत थी। रो. अश्विनी मुळे की पुत्री शारवी मुळे की गणेश वंदना से कार्यक्रम की बहारदार शुरुवात हुई जिसे उसने भरत-नाट्यम शैली में प्रस्तुत किया। शारवी में भविष्य के लिये अच्छी संभावनाएं है। डांस के लिए खड़े होकर नाचना पड़ता है ये हमारी गलतफहमी थी। वर्षा चित्ते, अपर्णा मुटाटकर, मीनल, स्वाती, दीपा और जयश्री धूपकर ने तुमसे मिल के दिल का ये जो हाल कुर्सी पर बैठकर जो प्रस्तुत किया वो कमाल था। मि. एंड मिसेस सहवासी युगलों का रेट्रो डांस – डी वी/मीनल, अजय/अपर्णा, सुधीर/ सुप्रिया, पुरुषोत्तम/निवेदिता, धनेश/अपर्णा, दीपा/हेमंत, अतुल/श्री एक विशेष आकर्षण था जिसमे तालिया भी बजी और सीटियां भी। उड़े जब जब जुल्फे तेरी, जहां में जाती हूँ, ओ मेरी जोहरजबी, एक मे और एक तू, क्या बोलती तू, नैनो में सपना, कोई लडका है, तुम को पाया है, ताल से ताल मिलाओ – हमारे संगीतकारो, गायकों ने फिल्मी गीतों को जो संजीवनी दी है जो हमे हमेशा गाने, थिरकने को ललचाती है और ऐसे कार्निवाल वो प्लेटफार्म होते है जहां आपकी दिली ख्वाहिशें पूरी की जा सकती है। सुधीर का बलराज साहनी, निवेदिता की नीतू सिंह, वसंत का अमीर खान, धनेश का जितेंद्र, हेमंत की शाहरुखी मुस्कान, अतुल-श्री का रोमांस – कुछ खास थे। इन सब के बीच संगीता पंडित की ऐश्वर्या और ऋता की ‘चीटियां कलाइया रे’ सोने पे सुहागा। जयश्री धूपकर और स्वाती कोठाडिया का छोटा पर सहज स्किट दिल छू गया। इसमें दो सहेलियों की मुलाकात और बात थी। जयश्री का ऐतिहासिक स्थल-दर्शन ( Bridegroom ) अनुभव रोचक था। पुरुषों को नाचना हमेशा चुनौती रही है। जिन्हें नचाना का शौक हो उन्हें नाचना मुश्किल होता है। इस चुनौती को स्वीकारा हमारे चित्ते दा, सुधीर, हेमंत, धनेश, अभिजीत, दिनकर और वसंत जी ने। धनेश, दिनकर ने अपने जलवे यहाँ भी बिखेरे और संगीता की एक सरप्राइज एंट्री ने समां बांधा। रोटरी सहवास की दो मधुर कोकिला- स्वाती कामटीकर और मधुर गोडबोले द्वारा प्रस्तुत ‘मेडली’ मराठी-हिंदी भाव गीत और सिने संगीत का सुमधुर मिश्रण था जिसे सभी ने सराहा। और अब पेश हुआ Ladies Dance जिसका सभी को इंतज़ार था। संगीता, सुप्रिया, प्रतिभा, पूजा, अपर्णा शाह, मंजूषा, निवेदिता ने मिलकर एक प्रोफेशनल परफॉरमेंस प्रस्तुत की जिसे सहवासीओ ने भी स्टैंडिंग ओवेशन दिया और वन्स मोर भी। इनमे जो नानी,दादी बन चुकी उन्हें ढूंढने, पहचानने उनके पोते, पोती भी स्टेज पर आ गए थे। सूत्र संचालक, निवेदन की जिम्मेदारी रो.स्वरूप गोडबोले ने बखूबी निभाई और अपनी प्रश्न-मंजूषा से दर्शकों को बांधे रखा। सी एल कुलकर्णी और सुधीर वैद्य दर्शको के बीच रहकर रोटरी सहवासीओ से रोचक, मनोरंजक सीधी-बात की। Know Your Rotarian रोटरी की एक फिलोसोफी रही है। ये प्रश्न और बातचीत उसी की खूबसूरत कड़ी थी जिसके लिये स्वरूप, सुधीर और सी एल बधाई के पात्र है। भावी प्रेसीडेंट रो.अजय मुटाटकर, प्रेसीडेंट इलेक्ट रो.संदेश कोठाड़ीया और प्रेसीडेंट नॉमिनी रो. निवेदिता मुळे ने अपने प्रेसीडेंट-वॉक में अच्छे टीम-वर्क का परिचय देते हुए कुछ हासिल करने का संकल्प दर्शाया। जिसका हमे था इंतज़ार वो घड़ी आ गई – प्रेसीडेंट डांस… जी हां…प्रे. चित्ते दा और फर्स्ट लेडी वर्षा ताई ने वाकई अपनी जिंदगी की कहानी भावपूर्ण सुनाई – आयुष्या वर बोलू काही…. आप बीती। ” नसतेच घरी तू जेव्हा जीव तुटका तुटका होतो,जगण्याचे धागे विरति संसार फ़ाटका होतो,न अजुन झालो मोठा न स्वतन्त्र अजूनी झालो,तुजवाचून उमगत जाते तुजवाचून जन्मच अडतो “अमेजिंग परफॉरमेंस रही रोटरी के पहले युगल की। इस कॉर्निवाल की कहानी कोरियोग्राफर स्नेहा भावे का जिक्र किये बिना अधूरी है। सेलेब्रेटी शामक डावर की शिष्या स्नेहा ने वो एक मंजी हुई कोरियोग्राफर है साबित किया। अपनी छोटी छोटी बातों से डांस की ट्रिक्स और टैक्ट दोनो समझाये। और ये सब कुछ अत्यंत स्नेह से ! धन्यवाद…स्नेहा ! रो. सुधीर वैद्य ने आभार प्रदर्शन किया औऱ टीम सहवास को बधाई दी। पुण्याई हॉल के स्वादिष्ठ भोजन से कार्यक्रम की मीठी समाप्ति हुए। रोटरी 2022-23 की टैगलाइन की तरह यह कॉर्निवाल सही मानो में खुशीयां बांटने, मुस्कुराहटे फैलाने का एक जरिया था – ENJOY ROTARY.. बादल पे पाँव हैया छुटा गांव हैअब तो भई चल पड़ीअपनी ये नाव है
मनाचे श्लोक आणि आपण
श्लोक १ गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा| मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा| नमूं शारदा मूळ चत्वार वाचा| गमूं पंथ आनंत या राघवचा|| अर्थ: जो इंद्रियांचा स्वामी आहे, जो सत्व रज तम या त्रिगुणांचे अधिष्ठान आहे आणि जो निर्गुणांचा आरंभ आहे, त्या गणेशाला व परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी या चार वाणींचे मूळ असलेल्या देवी शारदेला मी नमस्कार करतो आणि अनंत स्वरूप असलेल्या ईश्वराचा मार्ग सांगतो. मनुष्य मन हे अतिशय चंचल असतं. वाईट गोष्टी किंवा चुकीच्या मार्गावर ते लवकर आणि सहज भटकून जातं. विकारांना बळी पडतं. कितीही प्रयत्न केला तरी काम, क्रोध, मद, मत्सर याकडे त्याला आकर्षित व्हायला वेळ लागत नाही. पण यामुळेच मनुष्य अनेक वेळा आयुष्यात गोंधळलेल्या स्थितीत अडकतो. काय करावे? कसे करावे? काय उपाय असेल? असे असंख्य प्रश्न त्याच्या डोक्यात आणि मनात घर करू लागतात. यावर समर्थ रामदासस्वामी म्हणतात, “भक्तीसाठी व परमार्थासाठी मनावर चांगले संस्कार घडवून ते मजबूत करावे लागतात. मनाची शक्तीच मनुष्याला पारमार्थिक प्रगती करण्यास मदत करते.” म्हणून समर्थांनी मनाला ‘सज्जन’ असे संबोधले आहे. आजचं जीवन अतिशय धकाधकीचं झालेलं आहे. प्रत्येक मनुष्य कोणता ना कोणता मानसिक त्रास भोगत जगतो आहे. असंख्य प्रश्नांच्या गोंधळांचा पसरा त्याच्या डोक्यात आणि मनात साचला आहे. उत्तर काही मिळत नाही. पण मुळात मनुष्य अश्या बिकट परिस्थितीत अडकतोच कसा? हा सुद्धा मनात गोंधळ घालणाराच प्रश्न आहे. हो ना? मी सुद्धा रोजच्या जीवनात असंख्य मानसिक त्रासातून जात असतो किंवा जात आलेलो आहे. त्यामुळे हे प्रश्न जे आज समजातल्या असंख्य देहांना पडत असतील, ते मलासुद्धा पडतात. म्हणून मनाचे श्लोक याची मदत घ्यावी असं मी ठरवलं. पण हे श्लोक वाचत असताना आणि त्याचा अर्थ समजून घेताना मला काही गोष्टी सुचल्या. त्या गोष्टी काय आहे? कोणत्या आहे? कश्या प्रकारच्या आहे? ह्याचा उलगडा करायलाच मी हा एक प्रयत्न करून बघतो आहे. ह्या प्रयत्नाला मी ‘मनाचे श्लोक आणि आपण’ असे नाव दिले आहे. मुळात का आपण अश्या स्थितीतीत अडकतो ह्याकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन मी तुमच्या समोर मांडतो आहे. एक एक श्लोकाचा अर्थ आणि माझा दृष्टीकोन असे याचे स्वरूप असेल. हिंदुस्थानात कोणत्याही कामाच्या किंवा नवीन गोष्टीच्या आरंभी देवांची पुजा केली जाते. आपलं कार्य सफल व्हावं, कार्य करताना मन एकाग्रचित्त असावं आणि ध्येय किंवा उदेश्य पूर्ण व्हावं म्हणून प्रथम गणेशाला आणि नंतर आपल्या इष्ट देवाची पुजा केल्या जाते. ह्या प्रयत्नाचा आरंभ करताना मी त्या गजननाला आणि आई शारदेला नमस्कार करतो आणि माझा हा प्रयत्न त्यांच्याच आणि रामदास स्वामींच्या आशीर्वादाने सफल होईल अशीच आशा करतो. जय जय रघुवीर समर्थ|
Maharashtra – दिन, दिशा और दशा !
Maharashtra celebrates it’s 62st birth anniversary on 1st May. In the life of state, 62 year is not too long a period but good enough to retrospect. A state that contributes still 14% of country’s GDP, 12% of power consumption, a development index, accounts for 18% of approved industrial investment in the country speaks volume about Maharashtra. But this is just an outer layer but internally, it has robust strengths, solid substance and intelligence par excellence. Maharashtra state has always been known for liberal outlook, progressive policies and tolerant attitude. During my Banking days in Thane & Pune I interacted with good number of students for Education loans etc. I always impressed upon the students how Maharashtra is the right choice for them. My usual dialogue was, जब देश के अन्य भागों इस बात पर चर्चा चल रही थी की बेटियो ने पढ़ना चाहिये या नही उस समय पूना में बेटियां साईकल पर कॉलेज जाती थी। Mahatma Phule, Savitri Bai Phule brought women education in Pune. In Kolhapur, Shahu Maharaj introduced reservation in jobs for backward class in 1902 which later Dr. Baba Saheb Ambedkar brought for the entire nation. Raghunath Dhonde Karve, a Maths professor & social reformer, spoke of family planning, Sex-education in 1921. मनरेगा, स्वच्छ भारत, 33 % women reservation, RTI Act , Superstition acts etc all had it’s origin in Maharashtra in the form of रोजगार हमी योजना , संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान and several other legislations.Development model through Cooperative movement is yet another milestone in the annals of Maharashtra. Places are known for the kind of people borne there and their contribution to society/ nation that bring social, economical, educational, cultural and industrial revolution etc. From Namdev, Gnyaneshvar, Tukaram, Chhatrapati Shivaji, Bal Gangadhar Tilak, Gopal Ganesh Agarkar, Justice Ranade, V D Savarkar, Mahatama Phule, Shahu Maharaj, Bhimrao Ambedkar & so many who made Maharashtra spiritually, socially, rationally reformed state. Maharashtra people are known for their pride & principled stand, toughness, intolerances to injustice, modernist approach. History is full of such examples, which we can quote, like resignation from cabinet by FM Mr. C D Deshmukh and Law Minister Dr. Ambedkar over difference with PM on policy issues. Dignity, decency, discretion, discipline are the hallmarks of Maharashtra state. Maharashtra has the distinction of providing leadership to the country in time of crisis in the past. Where is Maharashtra today ? Where are you coming from hardly matter when you don’t know where you are going. In typical, traditional rabbit & tortoise race story, Maharashtra has been a sleeping rabbit for long. It’s a Wakeup call for Maharashtra. On road, where there are too many first generation car owners, third generation car owner find it difficult to pass through.
वळीव..
खिडकीतून बाहेर आकाशाकडे पहाताना उन्हाच्या झळा घरात बसून सुध्दा अंगाला जाणवत होत्या! एप्रिल महिन्याचा मध्य म्हणजे उन्हाळ्याची तीव्रता खूप जास्त! आकाशाच्या निळ्या पार्श्र्वभूमीवर ढगांचे पांढरे शुभ्र पुंजके विखुरलेले दिसतात होते आणि माझं मनही असंच विचारांच्या आवर्तात भरकटत होतं! लहानपण डोळ्यासमोर आले, परिक्षा संपण्याच्या आनंदाबरोबरच मोठ्या उन्हाळी सुट्टी ची चाहुल लागलेली असे. ही सुट्टी कशी घालवायची याची स्वप्नं रंगवत दिवस जायचे. आतासारखे टिव्ही, मोबाईल, मोबाईल गेम, सिनेमा हे विश्व आमच्या समोर नव्हते, फार तर परिक्षा झाल्यावर एखादा सिनेमा बघायला मिळायचा! कोकणाततर सुटीत पत्ते खेळणे, समुद्रावर फिरायला जाणे आणि गाण्याच्या भेंड्या, डबा ऐसपैस सारखे खेळ खेळणे हीच करमणूक होती. सकाळी आटवल भाताचा नाश्ता झाला की दुपारच्या जेवणापर्यत आम्ही घरात फिरकत नसू! आंबे बाजारातसुरु झाले की रोज आमरसावर ताव मारणे, फणस, काजूचा आस्वाद घेणे यात दुपार कधी सरायची कळत नसे. घामाच्या धारा वहात असायच्या, पण संध्याकाळी ऊन उतरले की समुद्रावरचा वारा ‘शीतल विंझणवार्या’सारखा वाटायचा. बालपण कोकण चा मेवा खात कधी संपलं कळलंच नाही आणि काॅलेजसाठी देशावर आले. देशावरचे उन्हाळी वातावरण खूपच वेगळे! ऊन खूपअसे, पण घामाच्या धारा कमी! संध्याकाळी ४/५नंतर हवा एकदम बदलत असे या दिवसात! अभ्यासाच्या वार्या बरोबरच बाहेरची हवाही बदलती असे. दुपारचे कडक ऊन संध्याकाळी वार्या वावटळीत कमी तीव्र वाटायचे!हाॅस्टेलवर रहात असताना जानेवारी नंतर हवेतला गारवा कमी होऊन वातावरण तापत असे.आमच्या काॅलेजच्या परिसरातील झाडांची पाने पिवळी, करड्या रंगाची दिसू लागत, अधून मधून वावटळीत सुटे आणि दूरवर फुफाटा उधळत असे. वसंत ऋतूच्या चाहुलीने निसर्गात सृजनाची निर्मिती दिसायला सुरुवात होई. झाडांवर पालवी फुटलेली दिसे. कोकिळेचे कूजन ऐकायला येई, कुठेतरी निष्पर्ण चाफा पांढर्या, गुलाबी रंगाचे वस्त्र पांघरून दिसे तर कुठे पिवळ्या, जांभळ्या फुलांची शाल पांघरलेला कॅशिया असे! आकाशाच्या निळ्या पार्श्र्वभूमीवर गुलमोहराचे केशरी तुरे खुलून दिसत! मोगरा,मदनबाणाची छोटी छोटी झुडुपे पांढर्या कळ्यांनी भरून गेलेली दिसत.संध्याकाळी त्यांचा सुगंध सगळा परिसर गंधमयी करत असे! अशा या वातावरणात आकाशात ढगांची बदलाबदली कधी सुरू होई कळत नसे! पांढरे शुभ्र ढग हळूहळू करडे बनत, बघता बघता आकाश काळ्या ढगांनी भरून जाईल.ढगांचा कडकडाट, आणि विजेच्या गडगडाटासह हवा आपलं रूपच पालटून टाकत असे. जोराचा वारा सुटला की पाखरेलगबगीने आपल्या घराकडे परतू लागत आणि मग जी वळवाची सर येई त मृद्गगंध उधळीत, जीवाला शांत करीत येई! तो पाऊस अंगावर झेलू की टपटप पडलेल्या गारा वेचू असं होऊन जाई, छपरावर, रस्त्यावर सगळीकडे गारांचा सडा पसरलेला दिसे. डोळ्यासमोर तो वळीव असा उभा राहिला की मन मोराचा पिसारा किती फुलून जाई ते वर्णनच करता येत नाही.पावसाची पहिली सर अंगावर घेतली कि तो वळीव प्राशन करून घ्यावासा वाटतो! पावसाची सर थांबता थांबताच आकाशात इंद्रधनुष्याची कमान बघायचं सुख अनुभवायला मिळते. पांढर्याशुभ्र ढगातून बदलत जाणारा तो काळा ढग! असा ओथंबून येतो की, त्याची होणारीबरसात मनाचे शांतवन करते. कधी कधी मनाला प्रश्र्न पडतो की, ते पांढरे ढग काळ्यामध्ये परावर्तित झाले तरीकधी? विजेच्या संगतीने कडकडाट करीत हे भावव्याकुळ ढग प्रुथ्वीवर रिते कसे बरं होतं असतील? पांढरे ढग श्रेष्ठ की काळे ढग? अशा आशयाचा वि.स.खांडेकरांचा धडा आठवून गेला! दोन्ही ही तितकेच महत्त्वाचे! काळ्या ढगांचे अस्तित्व च मुळी पांंढर्या ढगांवर अवलंबून! विचारांच्या आवर्तातही ही. ढगाळलेली अवस्था येते कधी कधी! विचारांचे पांढरे ढग जेव्हा परिपक्व होतात, तेव्हा ते हळूहळू करडे बनतात. पुढे दाटूनयेते आणि काळे बनतात. योग्य वेळ आली की डोळ्यातून सरीवर सरी बरसत रहातात आणि मनावरचे अभ्राचे पटल नष्ट करून स्वच्छ मनाने पुन्हा नाविन्याचा आस्वाद घेतात! नवनिर्मिती करणार्या त्या बरसणाऱ्या ढगांची माझे मन आतुरतेने वाट पहात रहाते!
Positive Potpourri !
एम पी इंटर कॉलेज, रामनगर, के प्रिंसिपॉल श्री संजीव शर्मा ने 15 अप्रैल को मुटाटकर परिवार के सम्मान समारोह में इस बात पर आश्चर्य व्यक्त किया कि जहां आज परिवार के 4.5 सदस्यों का एक होना मुश्किल हो वहां परिवार के 45 सदस्य एकत्रित हो यह सुखद आश्चर्य है। आधार, आनंद, प्रेम और सुख इन बुनियादी जरूरतों को हर व्यक्ति तलाशता है और अपने परिवार, पड़ौसीओ और मित्रों में ढूंढता है। मित्रो को चुना जा सकता है और सुविधा, आवश्यकताओं के अनुरूप बदला जा सकता है, पड़ौसीओ का आपके पास कोई विकल्प नही। उन्हें झेलना या उनसे निभाना पड़ता है। परिवार आपका प्रारब्ध है और परीक्षा भी और उसका संरक्षण, सम्मान करने में एक अद्भुत ईश्वरीय संकेत है । इस परीक्षा में उत्तीर्ण होने के लिए उन सभी गुणों, विशेषताओं की आवश्यकता है जो आपको जीवन मे सुखी, समाधानी बनाते है।यह विषय व्यापक है और डेल कार्नेगी की तरह How to Develop Families & Influence Relatives जैसी किताब लिखी जा सकती है। प्रथम मुटाटकर कार्निवल के लिये रामनगर का चयन, जो कॉर्बेट नेशनल पार्क का प्रवेश द्वार भी है, एक योग्य, समर्पक निर्णय था। मेरे दादाजी स्व. त्रिम्बक माधव मुटाटकर एक ड्राइंग मास्टर के रूप में काशीपुर के स्व. गोविंद वल्लभ पंत द्वारा संचालित विद्यालय में 1917 में आये थे। रामनगर के एम पी इंटर कॉलेज के प्रिंसिपाल होने तक का उनका सफर अनूठा और प्रेरणादायीं रहा। 1961 में रिटायर होने के बाद भी अध्यापन का कार्य उन्होंने जारी रखा। उनके कई विद्यार्थी आगे चलकर IAS/IFS आदि सेवाओ में उत्तीर्ण हुए। उम्र के 85 वर्ष तक वो यू.पी. बोर्ड के एग्जामिनर रहे। व्यक्ति जितने वर्ष जिया यह उसकी उम्र हो सकती है पर मृत्यु के बाद उसे कितने वर्षों तक याद किया जाता है वह उसका जीवन होता है। मुफ्त में जमीन मिलने के उस दौर में जमीन का एक टुकड़ा भी अपने नाम करने और उस पर इमारत खड़ी करने का ख्याल भी जिसे न आया हो शायद उन्ही का नाम लोग याद रखते हैं। यहाँ पर हमारे चंदू काका, स्व. सुलभा काकू और अमोल मुटाटकर की प्रशंसा करनी होगी जिन्होंने रामनगर निवासियो से रिश्ते बनाये रखे, वहाँ रहते समय भी उसके बाद भी। वाकई.. ये रिश्ता…क्या कहलाता है! इस मुटाटकर मिलन समारोह का उदघाटन हमारे ज्येष्ठ चाचा श्री मनोहर मुटाटकर ने किया.। एक श्रेष्ठ कथा-कथानकार रहे चाचा ने अपने पिता, स्व.दामू काका का किस्सा सुनाकर परिवार के मूल्यों व मान्यताओं की याद आज की युवा पीढ़ी को दिलाई। अपनी कंपनी का इंटरेस्ट फ्री लोन जब उन्होंने कंपनी के दबाव में आकर लिया औऱ ये बात जब पिताजी को मालूम पड़ी तो क्या हुआ ? लोन की राशि का इस्तेमाल तो उन्होंने किया ही नही बल्कि उनके बचत खाते में रखी ऋण राशि पर जो ब्याज उन्हें मिला उसे भी उन्होंने ऋण राशि के साथ लौटाया। घटना छोटी है पर बड़ी अर्थपूर्ण है और दर्शाती है – प्रतिष्ठा, अनुशासन औऱ संस्कार। तीन भाई – गोपाल, दामोदर , त्रिम्बक, भतीजे विठ्ठल अनंत मुटाटकर और तीन जेठानियों राधा, शांता, शारदा, नौ पुत्रो, सात पुत्रियों, नौ पोतों, बारा पोतियों और उनके रिश्ते-नातो की कहानी है मुटाटकर परिवार । इन तीनो भाइयों को जोड़ने वाली मजबूत कड़ी का काम भतीजे विठ्ठल ( भैया ) ने किया जो स्वयं कुशाग्र बुद्घि वाले होनहार विद्यार्थी थे। एम्प्लाइज स्टेट इन्शुरन्स कॉरपोरेशन के कमीशनर/ Actuary रहे भैया दिल्ली में कार्यरत रहे और सही मानो में दिल्ली मुटाटकर परिवार की उन दिनों राजधानी रही। शिक्षा, नौकरी, स्वास्थ्य आदि जैसी पारिवारिक समस्याओं का समाधान, निदान भैया के करौल बाग़, सफदरजंग, सर्वोदय एन्क्लेव, साकेत स्थित निवासों से हुआ। शीला मुटाटकर ने इन्ही यादों को तरोताजा किया। कल्पना और अनुराधा मुटाटकर ने कई संस्मरण सुनाये। संजय मुंडले ने अपने संभाषण में मुटाटकर परिवार की policies और principles का जिक्र किया जो किसी भी कामयाब कॉर्पोरेट के management priniciples हो सकते है। पॉजिटिविटी, हर चुनौती में अवसर देखने और कंफर्ट जोन से बाहर रहने, अच्छे स्टॉक में इनवेस्टेड रहने की लांग टर्म पॉलिसी, अपनी एक्सटेंडेड फैमिली को हर संभव सहायता करने का जज्बा। डॉ दिंडोरकर, सुजला काकू ने भी इस अवसर पर अपने विचार रखे। नीता पेंढारकर ने अपनी सुमधुर आवाज में भजन की प्रस्तुति की। राजू पेंढारकर के मैसेज को नीता ने पढ़कर सुनाया। इसमें उन्होंने अतीत से जुड़ने के प्रयासों की सराहना की। अपने जो साथ छोड़ गये उनकी याद राजू जी ने कुछ ऐसे की जब तेरी याद आयी दिल मेरा देर तक धड़कता रहाकल तेरी चर्चा घर में हुईघर मेरा देर तक महकता रहा परिवार की युवा पीढ़ी के लिये यह कॉर्निवाल एक प्लेटफॉर्म था एक दूसरे से मिलने-जुलने और समझने का। इस परंपरा को आगे बढ़ाने की एक गंभीर चुनौती उनके सामने है। आत्म-निर्भरता के इस युग मे नये विकल्प खोजने होंगे रिश्ते बनाने, बढ़ाने, संवारने में। आज की पीढ़ी समर्थ भी है और साहसी भी। अमोल मुटाटकर के अथक प्रयासों का ही नतीजा है- मुटाटकर कार्निवाल। उदय और संजय मुंडले का सहयोग भी सराहनीय ! अंत मे समस्त मुटाटकर परिवार को साधुवाद जिनसे मिलने कॉर्बेट नेशनल पार्क के टाइगर्स भी बेताब थे। यह इत्तेफाक नहीं।
“Oscar Awards 2022 – थप्पड़ की गूंज ” – Positive Potpourri!
* Mr. D. Subbarao, IAS & former RBI Governor, in his article, Has IAS Failed the Nation? attempted to analyse the malaise in the IAS. The standard scapegoat is the recruitment examination, the induction training, the subsequent in-service training, limited opportunities for self-improvement, and indifferent or callous career management. These are all the areas in need of improvement but to think that these are the biggest problems ailing IAS is to miss the wood for the trees. The biggest problems affecting the system is deeply flawed system of incentives and penalties. The service still attracts the best talent in the country who with energy and enthusiasm want to change the world but they change themselves by becoming the cog in the wheels of complacency, inefficiency & indifference. He acknowledged that there are hundreds of young IAS officers out there in the field performing near miracles under testing circumstance. He admitted that his generation of civil servants and subsequent cohorts have bequeathed a flawed legacy to these unsung heroes. To them passes the challenges and opportunity of recovering the soul of the IAS. * Amidst the gloom and uncertainty over the Ukraine War, there is something India can cheer about. The country’s export has touched the $ 400 billion (Rs. 30.4 lakh crore) mark for the first time, helped by opening up of the global economy in Post-pandemic period and high commodity prices favouring exporters of petroleum products, metals and steel. By March end it’s expected to touch $ 410 billion. For a country that had been trying hard to reverse its fortunes in export, this is a significant achievement. The question now is how sustainable this export growth is. As long as high prices last and the economy is not hampered by another way of covid, the Ukraine war has created a commodity squeeze in Europe, which countries like India can fill in. Hailing the country’s success in achieving its goods export target, PM said that this is a key milestone in India’s आत्मनिर्भर भारत journey. The key export sectors are petroleum products, engineering, gems and jewellery, chemicals and pharmaceuticals. The top five export destinations are USA, UAE, China, Bangladesh and the Netherlands. * Number of companies having credit exposures Rs. 5 crore or above and categorised as non-performing assets (NPAs) have been hovering in a range of 5485 to 5755 during March 2016 to March 31 2021. But as on 31 Dec 2021, this number has come down to 5231. India INCs credit quality has remarkable improvement in FY22, according to an analysis of rating agencies like CRISIL and ICRA. Are we leaving the worst behind? * What is the pulse of the global investors now, especially with respect to India? Can India distinguish itself from other emerging markets? Mr. Deepak Parekh, HDFC Chairman, answered, given India’s growth potential, political stability, rapid scale up in vaccination, promising entrepreneurship, it’s digital stack, and rising middle class, among several others the country still does not get its rightful place in the international stage particularly in terms of coverage by the foreign press. We get more negative coverage and we will have to work very hard to change this perception or raise awareness in this. * This year OSCAR Award 2022 ceremony was memorable for many reasons. The kind of transformation OTT explosion and streaming Platform is bringing in the creative field of cinema is mind blowing. With CODA winning this year the best picture Oscar and the closest runner up The Power of The Dog was also from a streaming platform. The powerful studio of the west and filmmakers like Steven Spielberg opposed the entry of streaming platform and said that theatrical release should be must for OSCAR. But streaming platform found a hybrid route and spurred a creative revolution. Will Smith’s थप्पड़ की गूंज will reverberate much longer than the news of his winning the Best Actor award for King Richard. Remember our own Delhi Crime tasted Emmy Success indication that there is global audience even for local content. Oscar awards only confirmed that OTT platforms are heaven for cinematic creativity.
गरीबांतले अमीर
कोरोना काळात अनेक वेगवेगळे अनुभव प्रत्येकाला आले. प्रत्येकाने आर्थिक समस्या तर झेलल्याच आहे. त्यावेळेत सौभाग्याने अनेक गरजू लोकांची मला मदत करता आली, ही माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे. आणि त्यादरम्यान नागपूरला, माझ्या रहात्या शहरी, रस्यावर राहणारे अंदाजे किती गरीब लोकं आहे याचा अनुभव आला. बघायला गेलो तर बहुतेक हि संख्या लाखाच्या घरात सहज जाईल. नागपूर हे शहर खुप मोठं आहे. त्यामुळे असे रस्यावर राहणारे लोकांची संख्यासुद्धा जास्तच आहे. त्याकाळात आम्ही, म्हणजे मी आणि माझे काही मित्र अन्न, पाणी आणि गरजू वस्तूंचं वाटप या गरीबांमध्ये करत होतो. एप्रिलचा महिना आणि नागपूरची गर्मी! अश्या स्थितीत हे लाॅकडाउन. मला प्रश्नच पडायचा की, हे लोकं कसे राहतात या अवस्थेत? बहुतेक जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती! असंच एकदा नागपूरच्या प्रताप नगरला मला नेहमी एक गरीब दिसायचा, मला त्याची आठवण झाली आणि त्याला अन्न, पाणी आणि इतर गोष्टी त्याला मिळतात आहे का हे बघायला मी गेलो. तो नेहमी दिसायचा तो तिथेच बसलेला मला आढळला. तो दोन रस्त्याच्या मधल्या दुभाजकावर बसलेला असतो. एक खुप जुना कोट, कानाला माकड टोपी, पायात फाटके जोडे, तोंडात नेहमी एक बीडी आणि त्याच्यासोबत एक गाठोडं आणि एक पिशवी. मी त्याला बघितलं आणि त्याच्या जवळ गेलो. त्याला विचारलं, “काका, जेवले का?” तो हिंदीत बोलला, “परसों खाया था।“ म्हणजे तो उपाशी आहे हे कळलं. त्याला लगेच मी माझ्याजवळ असलेल्या दोन अन्नाच्या थैल्या दिल्या. “खाना है। खा लेना।“, मी त्याला म्हटलं आणि पुढे निघालो. मग पुढे काही दिवस सतत त्याला ही अन्नाची थैली देत राहीलो. एक दिवस जेव्हा सगळेच रस्ते सुनसान झाले तेव्हा त्याने मला विचारलं, “सब लोग कहां मर गये? कोई दिख नहीं रहा।“ मग त्याला जी परिस्थिती आहे ती सांगितली. ते ऐकून तो हसला आणि म्हणाला, “यह जिंदगी ही एक बीमारी है। एक दिन सबको मारेगी। तो यह विषाणू से क्या डरना?” आणि तो हासला. मग म्हणे, “पर जिंदगी मिली हैं, तो उसे पुरा जीना यहीं इस बीमारी का इलाज है। चाहे जैसा जीना पडे।“ तो जे त्या दिवशी बोलला ते आजपण कानात फिरत असतं. आयुष्य मिळालं आहे तर ते पुर्ण जगलं पाहीजे. मग ते कसं ही का नसो. आज अनेकांवर अनेक संकटं, परिस्थिती, वेळ येते जेव्हा अनेक लोकं हताश, निराश होऊन जातात. आयुष्यात काहीच उरलं नाही आहे किंवा आहे ती स्थिती ते हाताळू शकत नाही, म्हणून आत्महत्येस प्रेरित होतात आणि आयुष्य ससंपवतात. हा मुर्खपणा आहे. पण तरी काही लोकं हेच करतात. अशी काही बातमी वृत्तपत्रातून किंवा समाज माध्यमांवर ऐकली किंवा आपल्याच ओळखीच्याने हे पाऊल उचललं असं कळलं की, मला हे गरीब लोकं आठवतात. यांच्याजवळ पैसा नाही, डोक्यावर छत नाही, कोणी विचारणारं नाही, खायला दोन वेळचं अन्न नाही, कोणतंच सुख नाही. तरीसुद्धा हे लोकं जगतात. रोज भीक मागतात. तरी देखील स्वतःला संपवायचा मार्ग नाही अवलंबवत. मग ज्यांच्या जवळ काहीतरी तर आहे फक्त परिस्थिती अवघड आहे, ते लोकं का असा मृत्यूचा मार्ग वापरतात? आणि अश्या लोकांमध्ये तर काही धनवान लोकं देखील आढळून येतात. आश्चर्य आहे. म्हणून मला कधी कधी ह्या रस्त्यांवर राहणाऱ्या गरीबात अमीर लोकं दिसतात. हे गरीबातले अमीर लोकं आहे. तुम्हाला काय वाटतं?
तोरण
चैत्र पाडवा! नवीन मराठी वर्षाचा पहिला दिवस! श्री राम वनवासाहून परत आले तो हा दिवस! त्यांच्या स्वागता प्रित्यर्थ गुढ्या तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले गेले. मराठी कालगणनेनुसार चैत्र वर्षाचा पहिला महिना! रोजच्या व्यवहारात आपण इंग्रजी कालगणनेनुसार वर्ष सुरू करतो. परंतु हिंदू कालगणनेनुसार चैत्र हा पहिला मराठी महिना आणि नवीन वर्षारंभ सुरू होतो.तोरण म्हंटले कि सण आठवतात. तसेच कोणत्याही शुभकार्याचा आरंभ करताना आपण तोरण बांधतो. दसरा,दिवाळी, पाडवा, चैत्र पाडवा या दिवशी आपण आंब्याच्या पानाचे तोरण दाराला बांधतो. तोरण हे शुभ गोष्टींचे प्रतीक आहे. तोरण म्हंटले की आणखी एक प्रचलित वाक्य आठवते. ‘शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले’ वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिवरायांनी पहिला किल्ला घेतला आणि स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली. आपल्या नवीन कामाची सुरुवात करतानाही आपण तोरण बांधतो. नवीन आॅफिस, नवीन घर, नवीन कामाची जागा घेतली की तोरण बांधून मगच नवीन जागेत प्रवेश केला जातो. पण मला आत्ता वेगळेच तोरण डोळ्यासमोर आहे! आकाशात ढग जमून आले आहेत. पावसाचा थेंब फुटला आहे. अशावेळी आकाशात सप्तरंगांची कमान दिसू लागते! जणू आभाळात सात रंगांचे सुंदर तोरण बांधले आहे असं वाटतं! ढगांचे पडघम वाजू लागतात. उंच उंच झाडे वाऱ्याबरोबर डोलू लागतात. चराचरामध्ये चैतन्याची चाहूल लागते. दिवसभर होणारी काहिली जरा कमी होऊन दुपारनंतर आभाळ बदलू लागते. अतिशय गर्मी ओसरून एकदम कुठून तरी धुरळा उठतो. आभाळ मेघाच्छादित होते. ढगांच्या गडगडाटात पावसाची एखादी सर येते. मृदगंधा चे अत्तर दरवळू लागते आणि अशावेळी ऊन-पावसाचा खेळ चालू होऊन आकाशात सप्तरंगी तोरण दिसू लागते. जणू नवचैतन्याची सुरुवात झालेली असते. तसे तोरणाचे विविध प्रकार आहेत. आंब्याची पानं मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन सोडतात म्हणून दाराला आंब्याच्या पानाचे तोरण बांधण्याची पूर्वापार पद्धत पडली असावी! झेंडूची फुले आणि आंब्याची पाने या दोन्हीचे एकत्र तोरण आपण बांधतो. अलीकडे प्लास्टिकची झेंडूची फुले किंवा पाने असलेली मण्यांची, टिकल्यांची अशी विविध प्रकारची तोरणे मिळतात. त्यात पानांवर स्वस्तिक, कलश, श्री, देवी अशी विविध चित्रे वापरून तोरणे बनवली जातात. लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीचे चित्र असलेले तोरण सगळीकडे दिसते. तर साहित्यिक कार्यक्रमात सरस्वतीचे चित्र तोरणावर दिसते. दसऱ्याला विशेष करून झेंडूच्या फुलाचे तोरण बांधले जाते. नवीन लेखनाची सुरुवात करून लेखक साहित्यिक तोरण बांधतो. तर राजकीय पक्षाच्या प्रसारासाठी, प्रचारासाठी पक्ष कार्यालयाला तोरण बांधून सुरुवात केली जाते. तोरण शब्दावरून आज विविध प्रकारची तोरणे डोळ्यासमोर आली आणि माझ्या नवीन लेखनाचा शुभारंभ करताना मीही आज चैत्र पाडव्याला शब्द मण्यांचे, शब्दकळांचे तोरण बांधत आहे.
जागतिक चिमणी दिन..
चिमणी म्हटलं की मला वि. स. खांडेकर यांच्या एका कादंबरीतील, बहुतेक ‘अमृतवेल’ या कादंबरीतील वाक्य आठवते, ‘मुली म्हणजे माहेरच्या अंगणातील दाणे टिपणाऱ्या चिमण्या! कधी भुरकन उडून जातील सांगता येत नाही!’लग्न झालं की मुली दुसऱ्या घरी जातात.खरंच, मुलीचा लहान असल्यापासून चिमणीसारखा चिवचिवाट, नाजूकपणा, अंगणात खेळणं बागडणं डोळ्यासमोर येतं! मुलं मात्र पोपटासारखी वाटतात असं मला उगीचच वाटतं! पण मुलगी मात्र चिमणी सारखीच असते. छोट्या चणीच्या मुलीला लहानपणी ‘चिऊ’म्हटलं जातं, मग ती चाळीशीची झाली तरी आपल्यासाठीच ‘चिऊ’च रहाते! साधारण चाळीस पन्नास वर्षांपूर्वी अशा करड्या रंगाच्या छोट्या दिसणाऱ्या चिमण्या खूप होत्या. अंगणात काही धान्याचं वाळवण घातलं की या चिमण्यांचे ‘ चिमण घास’ चालू असायचे पण त्यांना हाकलायला नको वाटायचं! माझी मुलगी लहान असताना आम्ही शिरपूरला होतो .तिथे इतक्या चिमण्या असत की त्या चिमण्यांसाठी म्हणून आम्ही खास बाजरी आणून ठेवली होती. सकाळच्या कोवळ्या उन्हात मुलांना बसवायचं आणि समोर बाजरी फेकायची! की तेथे चिमण्या गोळा होत असत, माझी छोटी त्या चिमण्या बघत आनंदाने तिच्या चिमण्या हाताने टाळ्या पिटायची! आता त्या चिमण्या गेल्या अंगणाची शोभा वाढवणाऱ्या! शहरात सिमेंटच्या घराच्या जंगलात चिमण्या आता दिसतच नाहीत. चिमणीच्या आकाराचे, चॉकलेटी रंगाचे, ऐटबाज पंखांचे, छोटे पक्षी दिसतात पण त्या खऱ्या चिमणीची सर काही त्यांना येत नाही! कावळा चिमणीच्या गोष्टीतील चिमणी हुशार असे, ती नेहमीच कावळ्या पेक्षा अधिक समंजस आणि शहाणी, त्यामुळे कावळ्याचे शेणा चे घर वाहून गेले तरी चिमणी आपल्या मेणाच्या मऊ मुलायम, न भिजणार्या घरट्यात राही!’घर माझं शेणाचं पावसानं मोडलं, मेणाचं घर तुझं छान छान राहिलं’ म्हणणाऱ्या कावळ्याला चिमणी तात्पुरता आसरा सुद्धा देत असे. देवाण-घेवाणीचं हे प्रेम निसर्गातील पक्षी आणि प्राण्यात सुद्धा असं दिसतं! पूर्वी पहाटे जाग येई ती चिमण्यांच्या कलकलाटाने! लहान गावातून निसर्ग हा सखा असे. शहरात येऊन या निसर्गाच्या मैत्री ला आपण मुकलो असंच मला वाटतं! सकाळ होते तीच मुळी गाड्यांचा खडखडाट ऐकत आणि कामाची गडबड मागे लावून घेत.. स्वच्छंदी आयुष्य जगायचंच विसरलो जणू! कोरोना च्या काळात माणसं बंदिस्त झाली पण पक्षी थोडे मुक्त झाले. सकाळचा पक्षांचा किलबिलाट पुन्हा एकदा ऐकू येऊ लागला. निसर्गात असणार्या प्रत्येक जिवाचे काहीतरी वेगळेपण असते! तसेच या चिमणीचे! चिमणीचा एवढासा जीव थोड्याशा पाण्यात पंख फडफडवून स्वच्छ आंघोळ करताना दिसतो तेव्हा मन कसं प्रसन्न होतं तिला बघून! कोणत्याही गोष्टीला छोटी किंवा लहान सांगताना आपण चिमणीची उपमा देतो. नोकरीवरून येणाऱ्या आईची वाट बघत असणारी मुलं चिमणी एवढं तोंड करून बसलेली असतात तर या छोट्यांच्या तोंडचे बोल हे ‘ चिमणे बोल ‘ असतात. लहान बाळाचे पहिले बोल,चिमखडे, चिमणीच्या चिवचिवाटासारखे वाटतात. नव्याने अन्न खाणाऱ्या बाळाला आपण ‘हा घास काऊचा, हा घास *चिऊचा म्हणून’ भरवतो आणि बाळ मटामटा जेऊ लागते! कोणत्याही छोट्या गोष्टीचं प्रतीक म्हणजे चिमणी! रानात एक नाजूक गवत असतं त्याला आपण ‘ चिमणचारा’ म्हणतो.लहान बाळाचे लाहया, चुरमुर्याचे छोटे घास म्हणजे चिमणचाराच असतो. पूर्वी वीज नसायच्या काळात कंदीला बरोबर चिमणी असायची. छोट्या आकारातील हा दिवा म्हणजे चिमणीसारखा! आज जागतिक चिमणी दिनाच्या दिवशी ही छोटीशी चिमणी विविध रुपात आठवणीत आली. आपल्या साहित्यरुपी प्रचंड विश्वात मी दिलेला हा छोटासा चिमणाघास !