योग येतो जीवनी,घेऊनी संजीवनी !आरोग्य आणि संपदा,हातात हात घेऊनी ! जगी पटली सर्वांना,योगाची अद्भुत किमया!लोपली होती कालांतरी,भुलवी भौतिक माया! भौतिकाची ओढ होती,सुदृढ शरीर दुर्लक्षित !योग अन् व्यायामाची,हरपली होती रीत ! योगगुरुची गरज होती,आधुनिक जगाला!रामदेव रुपे धावत आला,कृष्ण अपुल्या साथीला! निरामय योग शिकवला,रामदेव बाबांनी !होऊ सगळे योगाभ्यासी,सफल होऊ जीवनी!
Author: Ujwala Sahasrabudhe
मायबाप
जन्मदात्री माय,सांभाळे नऊ मास!बालपणी भरवी ,घासातला घास ! बापाची मायान दिसे बाहेरी !परी ओसंडून वाहे,मनातून भारी ! माय बाप दोन्ही,संसार रथाची चाकं!एक साथ जाती,तेव्हा मिळे सुख वाट! माय बापाचे छत्र,आता नाही डोक्यावरी!परी छाया त्यांची कधी,झाली नाही दूरी ! जन्मदाते माय बाप,प्रेम त्यांचे अखंड!मनी मी अनुभवते,माया त्यांची उदंड!
निसर्ग
पावसाची छोटीशी सर,उधळून गेली मातीचं अत्तर!केले तिने पाण्याचे सिंचन,अन् थरथरले धरतीचे अंगण! धरती खालील पक्व बीजांची,झाली कोवळी तृणपाती ,सृजनाची ही किमया सारी,दिसू लागली जागोजागी! ग्रीष्मातून हा आज अचानक,ऋतुबदल हा कुणी केला?उष्ण झळा त्या किरणांच्या,कुणी शीतल झुळुकीत बदलल्या? स्वच्छ निळे आकाश जाऊनीजलघट कसे हे अवतरले?अन् साऱ्या आसमंती ,शामल घट हे कुणी पांघरले? सृष्टीची ही किमया सारीदिसते मजला क्षणोक्षणी!अंतर्बाह्य हे मन थरथरते,मोरपिसाची किमया सारी! सृष्टी कर्ता हा कुणी अनामिकदिसत नसे तो द्रुष्टीने ,पण त्याची सत्ता अनुभवतेमी चराचरातील बदलाने !
वळीव
वळीव मजला आज दिसला वेगळ्या रूपात!नित्यासारखा नाचता थिरकता वाटे ना प्रत्यक्षात! वळिवाचा, गारांचा पाऊस खेळवी मुलांची मस्ती !नाचत नाचत सर्वांगाने बहरे तरुणांची प्रीती! वादळवारा, वीज कडकडे, रौद्र रूप निसर्गाचे!तुटून गेल्या निसर्ग नात्याची जाणीव करून देते! साध्या, छोट्या आनंदाला ग्रहण लागले कशाचे!समजून न येई मज हे गूढ निसर्गाचे! कोरोनाच्या छायेखाली मनी दडली होती भीती!जणू वादळ घोंगावतेय,वेढेल कधी अन् किती! क्षणात दिसली मज आभाळी कमान इंद्रधनुची !आतूरतेने मनास समजवी ही किनार आनंदाची! जातील निघून काळे ढग हे,येईल टिपूर चांदणे नभी!जे करील सर्वा समजदार,अन् आनंद येईल जगी !
वाट..
आठवणींची वहिवाट तरलावते सारी वाट!कुठून तरी येतात,वाट अडवून रहातात!ठोकरून द्याव्या म्हंटल्या,तरी जिद्दीने उभ्या रहातातवाट अडवून!मनाच्या मोहोळात घुसून,मधु प्राशन करतात!आणि मग उरतात तेमधु विरहित कोश!नुसतेच मेण मनाचेओझे बाळगत!
मूर्ती तुमची! स्वातंत्र्यवीरास..
वीरत्त्व ज्यांचे वर्णिता,शहारून येई तीही मूर्ती,डोळ्यासमोर येता,उमटल्या मनी या पंक्ती! किती यातना सोसल्या,नाही त्यास काही सीमा!विजय अंती येताच,विसरती लोक तयांचा महिमा! मातृभू ही त्यांची,प्रिय प्राणाहुनी असेही त्यांना,त्यांच्या पुढे उगीच करतीकोणी किती वल्गना! शब्दांत वर्णिता न येई,त्यांचा अमोल त्याग!किती देह कष्ट झाले,उरी देशभक्ती ची आग! पण असीम त्यांची महती,नाही तुलना कशाशी!वंदन तुम्हास करता,मनी नम्र होतसे खाशी!
मुक्ता
निवृत्ती, ज्ञानाची,लाडकी बहीण,जगली क्षणक्षण,भावांसाठी ! बालपण गेले,अकाली प्रौढत्व,ज्ञानाचे तत्व,सामावले ! ज्ञानदेव रुसला,बंद ताटी केली,मायेची मुक्ताई,साद घाली ! पोरपण होतेमांडे करू वाटले,ज्ञानाने चेतवले,अग्नी रूप! होती आदि माया,तिन्ही भावंडांची,शिकवण तिची,नाम्यासही ! मुक्त झाली मुक्ता,देह बुद्धी गेली,अमर राहिली,विठ्ठल कृपेत !
रिक्त पोळे…
रिक्त झाले मनजसे मधमाशीचे पोळे!गेले मधु शोषून जरी,मन त्यातच घुटमळे ! रिक्त झालेली क्षते,कोरून बांधलेली घरटी!मधु साठविला तेथे,क्षणिक त्या सुखासाठी ! फुल पाखरे प्रेमाची,उतरली काही क्षणासाठी!मागे ठेवून ती गेली,मधु दुसऱ्या कोणासाठी! पोळी आधार ही घेती,घराच्या वळचणीला!अर्थशून्य तो आधार,उमजे त्या मधमाशीला! कार्य संपताच तिचे,सोडून जाई तेच घर!घराचा सापळा तो,राही पोरकाच पार! आता गमते मनाला,सत्य त्यातील ते थोर!प्राण पाखरू ही जाता,उरे नुसतेच कलेवर !
ढग!
मनाच्या आभाळातून,शब्दांचे ढग उतरतात,वेगवेगळ्या भावना घेऊन,कधी रिक्त तर कधी भरलेले,कधी पांढरे तर कधी काळे! जसं आभाळ फिरेल तसे हे शब्द ओथंबून येतात,अगदी झेपावून येतात,झराझरा बरसू लागतात…कागदावर लेखणीच्या सहाय्यानेबरसू जातात! तेव्हाच हे मनाचे आभाळ रितं होतं!ते रितेपण पेलवत नाही काहीवेळा!उदासीनतेची छाया येते,विविध आकाराच्या त्या काळ्यापांढ-या ढगातून! एखादा ढग हत्त्तीसारखा दिसतोतर एखादा सशासारखा!फिरत असतो त्याच्याच तंद्रित!त्यातूनच निर्माण होते एखादीशब्दमाला! वेढून रहाते सार्या मनाला,व्यक्तातून अव्यक्ताकडे जाणारी,स्वत:च्याच कोशात गुरफटणारी…त्या काळ्या पांढऱ्या ढगाभोवतीदिसते चंदेरी रेषा… प्रत्येक ढगाला आपलं अस्तित्वदाखवणारी…आणि पटते…Every cloud has a silver line!
आईस…
निघून गेलीस तू दूरच्या प्रवासाला!संस्काराची शिदोरी देऊन ती आम्हाला !माहीत होते की हा प्रवास आहे अटळ..पण माहीत नव्हते हीच आहे ती वेळ!कितीक वर्षांच्या, दिवसांच्या क्षणांच्या च साक्षी!मनी बघता फोटोत द्रुष्यरूप तेची!डोळ्यासमोर येते ती तुझीच मूर्ती!पाणीदार तुझे डोळे येती नजरेपुढती!दिवस जातील, पुन्हा रूळून जाऊजीवनाशी !काव्य रूपी ही श्रध्दांजली तुझ्याचरणाशी !