ज्योत लाविलीस तू,मनामनात सर्वांच्या!शिक्षणाची कास तू,धरलीस स्त्रियांच्या ! ज्योतिराव, सावित्री,गाठ बांधली स्वर्गात!एकरुप होऊनी,मग्न झाले कार्यात! दीनदुबळया दलितांना,आधार त्यांचा मिळाला!अनाथ,सान बाळांना,मायेचा झरा लाभला! अस्पृश्यतेस दूर सारूनी,दीप समानतेचा लावला!मुलामुलींना शिक्षणाचा,ध्यास तुम्ही लावला! शेणगोळे आणि शिव्याशापझेलले तिने धैर्याने !तिच्या त्यागाची फळे,आज चाखतात मानाने! ममता, समता यांचे नाते,जोडले समाजात त्यांनी!ऋण त्यांचे विसरू नये,हीच इच्छा मन्मनी !
Author: Ujwala Sahasrabudhe
माई तुझ्या वेदनांना अंत नाही..
सिंधुताई,माय माऊली,कष्टमय आयुष्य जगली!झुंजत झुंजत आयुष्याशी,निरपेक्ष,निरामय जीवन जगली! जन्म जाहला जिथे तिच्या,आयुष्याला मोलचं नव्हते!वाढत होती जणू बेवारशी,प्रेम, जिव्हाळा तिथे न भेटे! ज्यांनी द्यावा तिला आसरा,असे सासर तिला पारखे!माय माऊली टाकून दिली,जग अवघे वागे शत्रू सारखे! स्मशानातच तिला लाभले,सुख कसे ते अनोळखी!प्रेताची आगच बनली ,ठेवी न तिला रोज भूखी! हाल अपेष्टांचे डोंगर लंघुनी,जाहलीस तू प्रेममयी!अनाथांची माय बनुनी,प्रेमभाव ओतलास जगी! जरी तुझे अस्तित्व लोपले,तेज तुझे राहील जगी!त्या तेजाच्या प्रकाशात ,नित्य चमकशील तू नभी!
स्वागत नववर्षाचे
सूर्य उगवतीचा घेऊन येईल,आशा आकांक्षाची नवी पहाट!नवीन संकल्प, नवीन आशा,दाखवतील आम्हा सोनेरी वाट ! आशेच्या हिंदोळ्यावरती ,आकांक्षांचे रावे झुलती !साथ देऊनी त्यांना आपण,करु कालक्रमणा त्यांचे संगती! नववर्षाची सोनपावले,उमटतील अवनीवरती!नाविन्याचे क्षण उमलता,आनंद दाटला अवतीभवती! कालचक्रा ना आदी अंत रे,बिंदू मात्र हो आम्ही पामरे!जुने जाऊ द्या काळामागे ,विसरुन अवघे भरु या मोदे!
मन राऊळी
मनाच्या राऊळी, विठ्ठल झाला हो जागा !नाही पंढरी, मंदिरी, आहे तुझ्याच अंतरंगा! मनाच्या राऊळी, घंटानाद होई पहाट प्रहरी!मनातील विठ्ठला संगे, करू पंढरीची वारी ! वाळवंटी चंद्रभागेच्या, वारकरी गर्दी ना करे!विठ्ठलाच्या डोळ्यातून, विरहाचे अश्रू झरे! भक्तगण झाला, माझ्या संगतीला पारखा!अश्रुंनी भिजला, भक्त पांडुरंगाचा सखा! रोगराईने केली भक्त गणात दूरी दूरी!अंतरीच्या ओढीने, भक्त विठ्ठला साठी झुरी! विठ्ठल म्हणे भक्ता, नाही तुझ्या माझ्यात अंतर!तुझ्या मनाच्या राऊळी, असे मी निरंतर!