आठवतो स्पर्श तिचा येथील प्रत्येक ठिकाणी,उगीचच मग स्वतः हात फिरवुनीघेते तो अनुभवुनी….कुठे हरवला तो स्पर्श?ते श्वास ते मायेने पाहणारे डोळे!साऱ्या सुखाच्या राशी,केल्या जरी रित्या तरी,ते प्रेम ना मिळे!आठव आठव आठवांचा,पिंगा घालुनी साद घालीते अंतरातुनी…होतीस तोवरी न जाणले,महत्व तुझ्या असण्याचे..प्रत्येक टप्प्यावर आयुष्याच्या आता,या जिवाला सलते तुझ्या नसण्याचे…..काय सांगावे दुःख बापुडे होऊन गेले….माय तुझ्यासवे जगण्याचे आयुष्य राहून गेले……
Author: Supriya Joglekar
आईsss
फक्त आजच मातेची आठवण काढण्यास,मन माझे धजावत नाही…तीच तर आहे माझ्या ठाई ठाई…तिनेच दिले जगण्याचे धडे,आणि भरले ज्ञाना मृताचे घडे…दृष्टीआड जरी तू जहालीस,क्षणाक्षणाच्या आनंदी जगण्याची,किमया तूच साध्य करुनी दिलीस….दिलेस प्रेम आत्मा तव रिता करून…उतराई नच होणार तुझी,जीवन जरी गेले सरून….
झुला
पहाता झुलावयाचे भान हरपतेझुला झुलण्यालावयाचे बंधन नसते उंच उंच घेता झुलामन आभाळ होतेकरपाशा पसरुनीनभा तोलू पाहते उंच जाता झुलायायचे धरणी माघारा,भान सदैव जपायचे मानवाचा जन्म सखा झुलाजन्मा येता झुल्यात ठेवती..ममतेने देऊनी हिंदोळा,अंगाई गाती.. असाच राहू दे आयुष्याचा झुला,होत राहो सदैव खाली वरती…..