किती गंध ल्यावे किती धुंद व्हावेसुखाने सुखाला किती जोजवावेतुझ्या मिठीचा मिळता सहारामी मोहरून स्वतःस विसरून जावे.. ऋतू कोवळे ते मनामनाचेतुझ्याच पाशी येऊन थांबलेलेनको तो अबोला मना क्षीणवणारा पुन्हा पुन्हा किती तुला समजवावे..! पुन्हा एकदा फिरून चांदणे पांघरावेतुला आठवुनी सुखा जोजवावेकिती ही दुरावा पुन्हा पुन्हा यावापरि मनाला मनाने समजून घ्यावे…! कशी करावी रुजवात कळे नाकसे मनवावे तुला ते ही जमेनापुन्हा सुखाची सुरुवात व्हावीपुन्हा नव्याने रुजून यावे…!
Author: Snehal Bhide
अनाथांची माय सिंधुताईं
गेली अनाथांची मायकरून पोरके साऱ्यासकशी रोखावी डोळ्यातह्या आसवांची तळी माय फिरते जगातपरी लक्ष सर्व पिल्लांवरघाली पाखर मायेचीजशी दुधाची ती साय पिल्लू शोधे रानोमाळतिच्या ममतेची सयनाही दिसे कुठे सावलीकशी कुठे हरवली माय आपल्या चोचीतला घासभरवे सगळ्या पिल्लानादेण्या ममतेची ऊबसोडी आपल्या पिल्लाला किती बाळांची ही मायआज पहुडली शांतपरी पिल्लांच्या मनातभरून राहिला आकांत आता कोण घेईल जवळसाऱ्या पोरक्या पिल्लानास्वतः पांघरून ऊनदेईल सावली त्यांना किती आठवणींचा माळतुडवून लेक आलीतुझ्या मायेच्या उबेसाठीआज झाली ती पारखी.. कशी काढावी समजूतकसे करावे सांत्वनकोण देई आता तिलाआपल्या बोटाचा आधार आले अंधारून अवेळीदिशा झाकोळल्या दाहीआज त्या मायेसाठी नभजणू कोसळे अवकाळी