जगतच असते मी नातेसंबंधाना जोपासत, गोंजारतकधी नीरसपणे, कधी उत्कटतेनेहीअसते कधी मुलगी, कधी पत्नी कधी ताई आणि कधी आई देखीलत्या त्या भूमिका सांभाळत बोलतै देखील सर्वांशी, ऐकतो नवरा तेव्हा बायको काय म्हणतेय ते, मुल ही ऐकतात आई काय म्हणतेय,पण जेव्हा तू विचारतोस, काय चाललय तूझं, तेव्हा विचारात पडते मी! कारण तेव्हा कळत मला, मी काही केवळ मु्लगीपत्नी ,आई आणि ताईच नाहीये मीही “मी’ सूद्धा आहेच की आणि मी,शोधायला लागतेस्वतःला अशा रस्त्यावरुन जो शेवटी पोहचतो तुझ्यापर्यंत मग विश्वासते तुझ्यावर स्वत्व सांभाळत माझं !तेव्हा विचारतोस तू तुझ्या माझ्यातलं नातं ?आता कसं सांगू तुला ?सगळ्याच नात्यांना नावं द्यायची नसतात ते,तुला कधी कळेल का हे ?